शिवाजी द्वितीय
Appearance
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
छत्रपती शिवाजीराजे राजारामराजे भोसले | ||
---|---|---|
छत्रपती | ||
कोल्हापूर संस्थान | ||
अधिकारकाळ | १७१० - १७१४ | |
राज्याभिषेक | २ सप्टेंबर १७१० | |
राज्यव्याप्ती | कोल्हापूर संस्थान | |
राजधानी | कोल्हापूर | |
पूर्ण नाव | छत्रपती शिवाजीराजे राजारामराजे भोसले | |
जन्म | ९ जून १६९६ | |
जिंजी, तामिळनाडू | ||
मृत्यू | ४ मार्च १७२६ | |
कोल्हापूर, महाराष्ट्र | ||
पूर्वाधिकारी | पद निर्माण | |
राजमाता | ताराबाई भोसले | |
उत्तराधिकारी | छत्रपती संभाजी द्वितीय | |
वडील | छत्रपती राजाराम महाराज | |
आई | महाराणी ताराबाई | |
पत्नी | महाराणी भवानीबाई | |
संतती | रामराजे छत्रपती | |
राजघराणे | भोसले | |
राजब्रीदवाक्य | हर हर महादेव |
दुसरे शिवाजी किंवा शिवाजी राजाराम भोसले (जून ९, १६९६ - मार्च ४, १७२६) मराठ्यांचे छत्रपती थोरले राजाराम आणि त्यांची जेष्ठ पत्नी महाराणी ताराबाई यांचे पुत्र होते. थोरल्या राजाराम महाराजांचा मृत्यूनंतर, दुसऱ्या शिवाजी महाराजांना १७०० मध्ये त्यांची आई ताराबाईंनी राजमाता म्हणून कारभार पाहून मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून स्थापित केले. त्यांचे चुलत भाऊ, छत्रपती थोरले शाहू हे १७०७ मध्ये मुघलांच्या तावडीतून सुटून आले तेव्हा ताराबाईंनी त्यांचा सिंहासनाचा वारसाचा हक्क धुडकावून आव्हान दिले. त्यामुळे मराठा साम्राज्याचे कोल्हापूर व सातारा असे दोन तुकडे झाले. शिवाजी द्वितीय ने १७१० ते १७१४ पर्यंत कोल्हापूरचा राजा म्हणून सेवा केली. त्या वेळी सावत्र आई राजासबाईने बंड केले आणि कोल्हापूर सिंहासनावर स्वतःचा पुत्र दुसऱ्या संभाजीला बसवले.