वादळ
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे.
वादळांमागील कारणे:
१) जेथे तापमान जास्त असते, तेथे हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागात जाते आणि खाली जमिनीवर, किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते.
या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर वादळाचा जन्म होतो.
२) तयार झालेले वादळ ज्या मार्गावरून प्रवास करते त्या मार्गावर वादळे होत रहातात. पाण्यावरून किंवा आर्द्र वा अति उष्ण प्रदेशावरून जाताना वादळाची ताकद वाढते, आणि जमिनीवर किंवा थंड प्रदेशावर वादळ आले, किंवा त्याची सर्व शक्ती पावसाच्या किंवा अन्य रूपाने संपली, की ते शांत होते.
३) वातावरणात उंचीवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर उतरले तरी तिथल्या जमिनीवर किंवा तिथल्या पाण्याच्या पृष्ठभागावर वादळाची निर्मिती होऊ शकते.
वादळांचे प्रकार[संपादन]
- धुळीचे किंवा रेतीचे वादळ
- घूर्णवात
- पावसाचे वादळ
- बर्फाचे वादळ
- मेघगर्जनेचे वादळ
- चक्रीवादळ