समस्थानिके
Appearance
अणुक्रमांक, अर्थात प्रोटॉनांची संख्या समान असून अणुभार मात्र भिन्न असणाऱ्या अणूंना त्या मूलद्रव्याची समस्थानिके (अन्य मराठी नावे: समस्थानीय[१]; इंग्लिश: Isotope, आयसोटोप ;) असे म्हणतात. समस्थानिकांच्या अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या समान असली, तरीही अणुकेंद्रातील न्यूट्रॉनांची संख्या भिन्न असल्यामुळे त्यांच्या अणुभारांत तफावत आढळते. उदाहरणार्थ, प्रोटियम H-1 (१ प्रोटॉन, ० न्यूट्रॉन), ड्यूटेरियम H-2 (१ प्रोटॉन, १ न्यूट्रॉन) आणि ट्रिशियम H-3 (१ प्रोटॉन, २ न्यूट्रॉन) ही हायड्रोजनची तीन समस्थानिके आहेत. प्रोटियमलाच आपण हायड्रोजन म्हणून ओळखतो. ड्यूटेरियमला जड हायड्रोजन असेही म्हणतात. ट्रिशियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ वैज्ञानिक पारिभाषिक संज्ञा.
बाह्य दुवे
[संपादन]- "आयसोटोप.इन्फो - समस्थानिकांविषयीचे संशोधन व चालू घडामोडींचा आढावा घेणारे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "एक्सप्लोरिंग द टेबल ऑफ आयसोटोप्स (समस्थानिकांची सारणी धुंडाळताना)" (इंग्लिश भाषेत). 2006-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-15 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |