"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ १६०: | ओळ १६०: | ||
'इंडिया अँड चायना' या पुस्तकाचा लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या सहकार्यामुळे २८ नोव्हेंबर १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२७|language=मराठी}}</ref> |
'इंडिया अँड चायना' या पुस्तकाचा लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या सहकार्यामुळे २८ नोव्हेंबर १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२७|language=मराठी}}</ref> |
||
== जातीअंताचा लढा व अस्पृश्यता निर्मूलन == |
|||
[[File:Dr. Babasaheb Ambedkar delivering a speech 2.jpg|thumb|300px|right|एका सभेत भाषण करताना आंबेडकर]] |
|||
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याच वेळी जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43756471</ref> सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार ह्या बाबतीत आंबेडकर पथप्रदर्शक होते. आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.<ref>https://m.thewirehindi.com/article/waiting-for-a-visa-br-ambedkar-koregaon-maharashtra/30384</ref> [[इ.स. १९३५]]-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या [[वेटिंग फॉर अ व्हिझा]] या आपल्या आत्मकथेत डॉ. आंबेडकरांनी [[अस्पृश्यता|अस्पृश्यतेसंबंधी]] त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=Ambedkar|first1=Dr. B.R.|शीर्षक=Waiting for a Visa|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|website=http://www.columbia.edu|publisher=Columbia University|accessdate=15 April 2015}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|last1=Moon|first1=Vasant|शीर्षक=Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 12|date=1993|publisher=Bombay: Education Department, Government of Maharashtra|location=Mumbai|accessdate=15 April 2015}}</ref> हे आत्मचरित्रपर पुस्तक [[कोलंबिया विद्यापीठ]]ात ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|शीर्षक=Waiting for a Visa, by Dr. B. R. Ambedkar|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-26}}</ref> |
|||
=== साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष === |
|||
इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरुपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबेरी अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून [[माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९|गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९]] बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी 'अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच,' यासारख्या मागण्या केल्या होत्या.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०० व १०१|language=मराठी}}</ref> तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्सा मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रजी सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरु ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१|language=मराठी}}</ref> |
|||
=== 'मूकनायक' पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा === |
|||
आंबेडकरांचे समाजकार्य सुरु असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे [[शाहू महाराज]] हे आपणहोऊन आंबेडकरांना भेटले. त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१ व १०२|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी [[इ.स. १९२०]] साली मुंबईत '[[मूकनायक]]' नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशीत करण्यात आला. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता व सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०२|language=मराठी}}</ref> आंबेडकर ५ जुलै १९२० मध्ये आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री [[:en:Edwin Montagu|ई.एस. माँटेग्यू]] यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=११०|language=मराठी}}</ref> |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
२२:३२, ९ मार्च २०२० ची आवृत्ती
प्रस्तावना
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय, हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या, कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक आणि प्रजासत्ताक भारताचे पिता होते.[१] भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना 'बाबासाहेब' म्हणतात, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय.
कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदव्या मिळवणारे आंबेडकर हे प्रतिभाशाली विद्यार्थी होते; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधनासाठी अभ्यासक किंवा विद्वान म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांचे जीवन सामाजिक व राजकीय घडामोडींत व्यतित झाले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
१९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना 'बोधिसत्व' उपाधी प्रदान केली. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनानीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[२] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.
सुरुवातीचे जीवन
मालोजीराव हे रामजींचे वडील व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.[३] मालोजीरावांना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतर मुलगीचा मिराबाई यांचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीरावांचे चौथे अपत्य होते.[४] मालोजीरावांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[५] शिक्षण सुरु असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते.[६] रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी वाचत, सकाळी स्त्रोते व भुपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरु झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले.[७] मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुचली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच 'नॉर्मल स्कूल'मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.[८] रामजींना उत्तम शिक्षण बनवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिक शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिक शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात 'सुभेदार' पदाचीही बढती मिळाली.[९] रामजी व भीमाबाई या दांपत्यांना सन १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[१०]
रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[११] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (सध्या डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[१२] रामजींनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चूकिचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.[१३][१४][१५]) अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरुन निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील 'कॅम्प दापोली' वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश देता न आल्याने घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १९९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील 'कॅम्प स्कूल' या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[१७] त्यानंतर बालक भीमाचे व अन्य मुलांची संगोपन त्यांच्या मीरा आत्यांनी केले आणि कठीण परिस्थितीत ते जगले.
इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे एका साधारण घरात राहिले, आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात ते राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. भीमरावाचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. साताऱ्यातील कॅम्प स्कूल मधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१८] कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग) कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अंबावडेकर हा चूकीचा उल्लेख[१९]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरुखे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. तेव्हा त्यावर भीमरावांनी होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे 'आंबेडकर' असे झाले. नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा पास केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[२०]
डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार आले व तेथील 'लोअर परळ' भागातील 'डबक चाळ' नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[२१] मुंबईमधे भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[२२] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. रामजी बाबांना इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे कार्य सहसा शालेय शिपायाद्वारे केले जात असे आणि जर शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे. शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत. आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२३] इ.स. १९०७ साली तरूण भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२४] मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरूजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणूकींची माहिती कळाली व बुद्धाकडे वळले.[२५][२६] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२७] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी २०१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजींचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२८]
उच्च शिक्षण
आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२९] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[३०] त्यांचा शैक्षणिक प्रवास इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होऊन इ.स. १९२३ च्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेऊन आंबेडकरांनी बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ, आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५०च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननिय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[३१]
मुंबई विद्यापीठ
भीमराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती देण्याचे मान्य केले. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[३२] आंबेडकर घराण्यात सर्वप्रथम भीमरावच महाविद्यालयाचे शिक्षण शिकू लागले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[३३] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व पर्शियन विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. यामुळे इंग्लिश विषयाचे प्राध्यापक म्युल्लर व पर्शियन विषयाचे प्राध्यापक के.बी. इराणी यांचे ते आवडते विद्यार्थी होते. जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्नांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून भीमरावांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. भीमरावांनी सन १९१२ च्या नोव्हेंबर महिन्यात बी.ए. ची परीक्षा दिली व सन १९१३ च्या जानेवारी महिन्यात ते बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.[३४] त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली होती. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून भीमराव बडोदा संस्थानात नोकरीसाठी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडीलांशी भेट झाली आणि ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३५] यामुळे ते बडोदा येथील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३६]
कोलंबिया विद्यापीठ
बी.ए. उत्तीर्ण झाल्यामुळे भीमरावांना पुढील वाटचाल करण्यासाठी काही पर्याय खुले झाले. नोकरी करणे व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, हा एक पर्याय होता तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, हाही एक पर्याय होता.[३७] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी भीमराव महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराज काही बोलले नाही मात्र त्यांनी भीमरावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणे व त्यासाठी भीमरावांना अमेरिकेत पाठविणे, पसंत केल्याचे सांगितले.[३८] महाराजांनी भीमरावांना होकार दिल्यामुळे ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या.[३९] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करू लागले व २१ जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोहचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[४०] त्यांनी या विद्याभ्यासासाठी प्रमुख विषय म्हणून अर्थशास्त्र हा विषय निवडला आणि जोडीचा इतर विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांच्या पुस्तकांचे भरपूर वाचन केले व दोन्ही विषयांवर अभ्यासपूर्ण प्रभुत्व मिळवले. यामुळे विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[४१]
दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करुन घेतली.[४२] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लाला लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लाला लजपतराय व विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडवीन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[४३] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी भीमरावांच्या ज्ञानाची स्तूती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल गौरोद्गार काढले की, "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत."[४४][४५]
एम.ए. च्या पदवीसाठी भीमरावांनी 'एन्शंट इंजियन कॉमर्स' (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए. ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर 'अॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी' नावाचे प्रकाशित करण्यात आला.[४६][४७]
त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. या डॉक्टरेट पदवीसाठी 'द नॅशनल डिव्हिडण्ट ऑफ इंडिया: अ हिस्टोरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी' (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरु केले.[४८] सन १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारुन त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी) ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच भीमरावांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[४९] मात्र पीएच.डी. चा डॉक्टरेट प्रबंध स्वीकारल्यामुळे सन १९१७ मध्येच विद्यापीठाने भीमरावांना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली आणि 'भीमराव रामजी आंबेडकर' हे 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' झाले.[५०] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच इ.स. १९२५ मध्ये आंबेडकरांचा पीएच.डी. चा प्रबंध 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती' या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रितसर प्रदान करण्यात आली.[५१] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन होते, त्यांनीच या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[५२] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथमहाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[५३][५४]
९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात 'कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनिसीस अँड डिव्हलपमेंट' (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[५५] शोधलेखात त्यांनी शास्त्रीय विवेचन केले होते. हा शोधलेख इ.स. १९१७ च्या मे महिन्यात 'इंडियन अँटीक्वेरी' नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रुपात प्रकाशित झाला, जे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[५६]
कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन लाभले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' तत्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोदन करुन अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी इ.स. १९१६ च्या फेब्रुवारी मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली. मग इ.स. १९१६ च्या मे महिन्यात लंडनकडे रवाना झाले.[५२][५७][५८]
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन
आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम केला व पुढील शिक्षण लंडन मध्ये ठरवले. इ.स.१९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहचले.[५९] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते. तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील 'इंडिया हाऊस' च्या ग्रंथालयात भीमरावांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[६०] अर्थशास्त्रामध्ये पदव्या ग्रहन करण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा भरपूर अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी. ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी लेखी विनंती प्रा. एडविन कॅनन यांच्या शिफारशीसह लंडन विद्यापीठाला कळवली होती. लंडन विद्यापीठाने ही विनंती मान्य केली.[६१] तसेच कायद्याचा अभ्यास करून 'बॅरिस्टर' व्हावे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगत त्यांनी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील 'ग्रेज इन' मध्ये प्रवेश घेतला.[६२] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता 'प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स' (भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरु केले.[६३] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. मात्र लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवागणी मिळवली होती.[६४]
इ.स. १९१७ च्या जुलै महिन्यात आंबेडकर मुंबईला परत आले. नोकरी करून पैसा साठवण्याचा आणि चार वर्षांच्या आत पुन्हा लंडनला जाण्याचा निर्धार त्यांनी केला. बडोदा संस्थानच्या करारान्वे त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरीचा स्वीकार केला. आंबेडकरांना महारांचे 'मिलिटरी सेक्रेटरी' म्हणून नेमण्यात आले. मात्र आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी अस्पृश्य असल्याने आंबेडकरांचा सतत अपमान करत. आंबेडकर गायकवाडांना याबाबतचे निवेदनही दिले होते, मात्र गायकवाड यावर काही बोलले नाही. अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात कुठेही आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[६५] दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याचे काम मिळाले, ज्याचे दोन्ही विद्यार्थ्यांकडून त्यांना दरमहा ₹१०० मिळत.[६६] जोडीला त्यांनी 'स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स' नावाची कंपनी सुरु केली, जी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देत असे. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[६७] 'दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स' या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[६८] हे पन्नास रुपये व दोन शिकवण्याचे शंभर रुपये असे मिळून दीडशे रुपये त्यांना दरमहा मिळे, परंतु घरखर्च व अपूर्ण शिक्षणासाठी साठवणूकीसाठी ही मिळकत त्यांच्यासाठी अपुर्ण होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना अत्यल्प आर्थिक मदत होई. तिसरा उपाय म्हणून आंबेडकरांनी 'कास्ट्स इन इंडिया' व 'स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज' आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरुपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या अवस्थेत सुद्धा ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[६९] पुढे 'सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स' या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात 'राजकीय अर्थशास्त्र' विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळे.[७०] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्याची जबाबदारी एकट्या आंबेडकरांवर आली. प्राध्यापक आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी (लेक्चर्स) त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत. आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देत व बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करुन ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[७१] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनल्या जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[७२] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[७३]
३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये प्रवेश घेतला. त्याचप्रमाणे ग्रेज-इन मध्येही प्रवेश घेऊन बॅरिस्टरीचा अभ्यास सुरु केला.[७४] ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई. दिवसभर पुरेल इतके साहित्य ते एकदाच आपल्या बसण्याच्या ठिकाणी ठेवत. त्यांचा अभ्यास अखंड चाले. दुपापरच्या वेळी थोडेसे खाण्यासाठीच ते जागेवरुन थोडा वेळ आपल्या जागेवरुन उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत. राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हतेच. सतत अभ्यास करणे, हेच त्यांचे ध्येय होते.[७५] वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध 'प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया' (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी. च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील 'मास्टर ऑफ सायन्स' (एम.एस्सी.) ही पदवी प्रदान केली.[७६] २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संख्येने त्यांना 'बॅरिस्टर-ॲट-लॉ' (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली; आंबेडकर वकील बनले.[७७] त्यानंतर 'द प्रोब्लम ऑफ रुपी' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.) च्या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करुन जर्मनीच्या बॉन विद्यापीठाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करुन ते जर्मनी] येथे गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. त्यांना जर्मन भाषाही शिकलेले होते. तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. परंतु त्यांना हे अध्ययन मध्येचे सोडून ताबडतोब लंडनला यावे लागले. कारण त्यांचे शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवले होते.[७८] आंबेडकर लंडनला परतले, १९२३ च्या मार्च महिन्यात परीक्षकांनी स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे पुनर्लेखन करण्याचे सांगितले होते, कारण प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केली होती. पुनर्रचनेस तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथूनच प्रबंध करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाला सादर करण्यासाठी प्रबंध लिहिण्याचा प्रयत्न सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. इ.स. १९२३ च्या ऑगस्ट मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखानाची पद्धत बदलली व पुनह प्रबंध विद्यापीठाला पाठवून दिला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत इ.स. १९२३ च्या नोव्हेंबर मध्ये त्यांना डी.एस्सी. ची पदवी प्रदान केली.[७९] लंडनच्या 'पी.एस. किंग अँड कंपनी' प्रकाशन संस्थेने 'द प्रोब्लम ऑफ रुपी' हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरुपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला डी.एस्सी. पदवीचे मार्गदर्शक असलेले अर्थशास्त्रज्ञ डॉ. एडविन कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडीलांस अर्पण केला होता.[८०] या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जाऊ लागले.[८१] इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिण्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.[८२]
जातिसंस्था विषयक सिद्धान्त
अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी मानववंशशास्त्र विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी आपला विषय ठरवला - 'भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता'. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.[८३] तरुण आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालिल सिद्धान्त मांडले.
वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.[८४][८५]
जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'[८६]
४ जानेवारी, १९२८ च्या टाईम्स ऑफ इंडियात इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल वृत्तांत आला होता. त्याची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ व्या शतकातील पेशवाईतील रिजनाच्या स्थितीशी केली.[८७][८८]
आंबेडकरांनी 'जात' या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
जात ही 'श्रमविभागणी' वरही अवलंबून नाही आणि 'नैसर्गिक कल वा योग्यतेवरही' अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कुळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडीलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.[८९][९०]
वकिली
सन १९२२ मध्ये ग्रेज इन येथून बॅरिस्टर-ॲट-लॉ ही पदवी घेतली आणि ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईत परतले होते. समाजकार्य करावे व अर्थाजनासाठी वकिली करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व परळच्या दामोदर हॉलमध्ये पहिल्या मजल्यावर एक खोली कार्यालयासाठी मिळवली. जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्चन्यायालयात आपले नाव नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला व ५ जुलै १९२३ रोजी उच्च न्यायालयाने आंबेडकर नाव नोंदवून घेतले. त्यांची वकिली सुरु झाली, मात्र ते अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले. अशा स्थितीत बाळकृष्ण गणेश मोडक नावाच्या एका स्पृश्य वकीलाने आंबेडकरांना वकिली करत राहण्यासाठी सहकार्य केले.[९१]
वकील आंबेडकरांना पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधव बंधूंची केस मिळाली. ही केस वर्षभर चालली व यशस्वीही झाली. केसची फी म्हणून आंबेडकरांना सहाशे रुपये मिळाले.[९२] वकिलीतून घरखर्च भागत नसल्यामुळे त्यांनी बॉटलीबॉईज अकौंटसी इन्स्टिट्युटमध्ये मर्कंटाइल लॉचे प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवली. याचे त्यांना महिन्याला दोनशे रुपये वेतन मिळे. ही प्राध्यापक पदाची नोकरी त्यांनी १० जून १९२५ ते ३१ मार्च १९२८ पर्यंत केली.[९३]
आंबेडकरांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यात सहभाग घेतला होता. ब्राह्मणेत्तर सत्यशोधक चळवळीशी संबंधित नेते केशव गणेश बागडे, केशवराव मारुतीराव जेधे, रांमचंद्र नारायण लाड आणि दिनकरराव शंकरराव जवळकर या चौघांवर "देशाचे दुश्मन" हे पुस्तक लिहिण्याच्या कारणांवरुन खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मानले होते. परंतु आंबेडकरांनी ऑक्टोबर १९२६ मध्ये त्या चौघांनाही वरच्या न्यायालयात निर्दोष मुक्त केले. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल.बी. भोपटकर होते.[९४]
'इंडिया अँड चायना' या पुस्तकाचा लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या सहकार्यामुळे २८ नोव्हेंबर १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.[९५]
जातीअंताचा लढा व अस्पृश्यता निर्मूलन
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याच वेळी जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे.[९६] सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार ह्या बाबतीत आंबेडकर पथप्रदर्शक होते. आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.[९७] इ.स. १९३५-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.[९८][९९] हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.[१००]
साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष
इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरुपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबेरी अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९ बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी 'अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच,' यासारख्या मागण्या केल्या होत्या.[१०१] तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्सा मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रजी सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरु ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.[१०२]
'मूकनायक' पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा
आंबेडकरांचे समाजकार्य सुरु असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे शाहू महाराज हे आपणहोऊन आंबेडकरांना भेटले. त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.[१०३] आंबेडकरांनी इ.स. १९२० साली मुंबईत 'मूकनायक' नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशीत करण्यात आला. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता व सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.[१०४] आंबेडकर ५ जुलै १९२० मध्ये आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री ई.एस. माँटेग्यू यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.[१०५]
संदर्भ
संदर्भ
- ^ "Bhimrao Ambedkar". c250.columbia.edu. 2018-03-16 रोजी पाहिले.
- ^ Worldwide Ambedkar Jayanti celebration from ccis.nic.in on 19th March 2015
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३४ व ३५.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३५.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३५.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३५.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे". Loksatta. 2016-04-14. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल – Loksatta". www.loksatta.com. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ "आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या 'त्या' आठवणी". marathibhaskar. 2016-12-26. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३५.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या 'त्या' आठवणी". marathibhaskar. 2016-12-26. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Pritchett, Frances. "1900s". www.columbia.edu. 2018-03-14 रोजी पाहिले.
- ^ Kapadiya, Payal (2012). B.R. AMBEDKAR: Saviour of the Masses. Mumbai: Wisha Wozzawriter published by Puffin. p. 14.
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४९-५०.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ लोखंडे, भाऊ (२०१२). डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा. कोल्हापुर: परिजात प्रकाशन. pp. १२२.
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५० व ७७.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Frances Pritchett. http://web.archive.org/web/20100625044711/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html. 25 June 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2010 रोजी पाहिले. Unknown parameter
|deadurl=
ignored (सहाय्य); Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ आगलावे, डॉ. सरोज (एप्रिल २०१५). ओक, चंद्रशेखर (ed.). "कर विकासोन्मुख हवेत..." लोकराज्य. अंक १०. मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन: १२.
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ८८ व ८९.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. २६, २७, ७३, ७९, ११३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५५.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५६ व ५७.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५७.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५७.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५७.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गोखले, द.न. डॉ. आंबेडकरांचे अंतरंग.
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५७ व ५८.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गोखले, द.न. डॉ. आंबेडकरांचे अंतरंग.
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५८.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६२ व ६३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ a b Pritchett, Frances. "txt_zelliot1991". www.columbia.edu. 2018-03-31 रोजी पाहिले.
- ^ Ambedkar, B.R. "The Evolution of Provincial Finance in British India" (PDF).
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५९.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६०.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६०.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६० व ६१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६०, ६१ व ६३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६४.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६५ व ६६.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६६.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६६.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६६ व ६७.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६७.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६७ व ६८.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६८.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६८ व ६९.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६९.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६९.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६९-७०.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ७०-७१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ७१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ७१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ७२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ७३.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ८५.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ आंबेडकर, डॉ. बाबासाहेब (२०१४). माझी आत्मकथा. औरंगाबाद: कौशल्य प्रकाशन. pp. ३१.
- ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. ६.
- ^ Pritchett, Frances. "Castes in India: Their Mechanism, Genesis, and Development, by Dr. B. R. Ambedkar". www.columbia.edu. 2018-04-01 रोजी पाहिले.
- ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. ६.
- ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. ६ व ७.
- ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. ७.
- ^ "Section 2 [Why social reform is necessary for political reform]". ccnmtl.columbia.edu (इंग्रजी भाषेत). 2018-04-01 रोजी पाहिले.
- ^ राणे, दिनेश. युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. दिल्ली: ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन. pp. ७ व ८.
- ^ Castes in India: Their Mechanism, Genesis and Development, B. R. Ambedkar
- ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १२०.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १२०.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १२० व १२१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १२६.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १२७.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ https://www.bbc.com/marathi/india-43756471
- ^ https://m.thewirehindi.com/article/waiting-for-a-visa-br-ambedkar-koregaon-maharashtra/30384
- ^ Ambedkar, Dr. B.R. http://www.columbia.edu. Columbia University http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html. 15 April 2015 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य); External link in|website=
(सहाय्य) - ^ Moon, Vasant (1993). Mumbai: Bombay: Education Department, Government of Maharashtra. Missing or empty
|title=
(सहाय्य);|access-date=
requires|url=
(सहाय्य) - ^ Pritchett, Frances. www.columbia.edu http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html. 2018-03-26 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १०० व १०१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १०१.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १०१ व १०२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. १०२.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ११०.
|year=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)