Jump to content

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १२६: ओळ १२६:


कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना [[जॉन ड्युई]] यांचेही मार्गदर्शन लाभले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' तत्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोदन करुन अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी इ.स. १९१६ च्या फेब्रुवारी मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली. मग इ.स. १९१६ च्या मे महिन्यात लंडनकडे रवाना झाले.<ref name=":3" /><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५९|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६०|language=मराठी}}</ref>
कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना [[जॉन ड्युई]] यांचेही मार्गदर्शन लाभले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' तत्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोदन करुन अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी इ.स. १९१६ च्या फेब्रुवारी मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली. मग इ.स. १९१६ च्या मे महिन्यात लंडनकडे रवाना झाले.<ref name=":3" /><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५९|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६०|language=मराठी}}</ref>

=== लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन ===
[[चित्र:Dr. B. R. Ambedkar with his professors and friends from the London School of Economics and Political Science, 1916-17.jpg|thumb|right|300px|डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मधल्या रांगेत उजवीकडून पहिले) [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स|लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये]] शिकत असतांना प्राध्यापक व मित्रांबरोबर घेतलेले छायाचित्र, १९१६-१७]]
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar as Barrister in London.jpg|thumb|बॅरिस्टर-ॲट-लॉ पदवी प्राप्त केल्यानंतर आंबेडकर यांचे छायाचित्र, इ.स. १९२२, लंडन]]
आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम केला व पुढील शिक्षण लंडन मध्ये ठरवले. इ.स.१९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत [[लंडन|लंडनला]] पोहचले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६०|language=मराठी}}</ref> कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक [[एडविन कॅनन]] यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते. तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील 'इंडिया हाऊस' च्या ग्रंथालयात भीमरावांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६० व ६१|language=मराठी}}</ref> अर्थशास्त्रामध्ये पदव्या ग्रहन करण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी [[लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स|लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये]] प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा भरपूर अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी. ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी लेखी विनंती प्रा. एडविन कॅनन यांच्या शिफारशीसह लंडन विद्यापीठाला कळवली होती. लंडन विद्यापीठाने ही विनंती मान्य केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६१|language=मराठी}}</ref> तसेच [[कायदा|कायद्याचा]] अभ्यास करून '[[बॅरिस्टर]]' व्हावे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगत त्यांनी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील 'ग्रेज इन' मध्ये प्रवेश घेतला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६०, ६१ व ६३|language=मराठी}}</ref> एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता 'प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स' (भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरु केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६२|language=मराठी}}</ref> परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. मात्र लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवागणी मिळवली होती.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६४|language=मराठी}}</ref>

[[File:The photograph of Dr. Babasaheb Ambedkar was appointed as Professor of Economics on November 19, 1918..jpg|thumb|right|१९ नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापक असतानाचे छायाचित्र.]]
इ.स. १९१७ च्या जुलै महिन्यात आंबेडकर मुंबईला परत आले. नोकरी करून पैसा साठवण्याचा आणि चार वर्षांच्या आत पुन्हा लंडनला जाण्याचा निर्धार त्यांनी केला. [[बडोदा संस्थान|बडोदा संस्थानच्या]] करारान्वे त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरीचा स्वीकार केला. आंबेडकरांना महारांचे 'मिलिटरी सेक्रेटरी' म्हणून नेमण्यात आले. मात्र आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी अस्पृश्य असल्याने आंबेडकरांचा सतत अपमान करत. आंबेडकर गायकवाडांना याबाबतचे निवेदनही दिले होते, मात्र गायकवाड यावर काही बोलले नाही. अस्पृश्य असल्यामुळे [[वडोदरा|बडोद्यात]] कुठेही आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६५ व ६६|language=मराठी}}</ref> दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याचे काम मिळाले, ज्याचे दोन्ही विद्यार्थ्यांकडून त्यांना दरमहा ₹१०० मिळत.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६६|language=मराठी}}</ref> जोडीला त्यांनी 'स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स' नावाची कंपनी सुरु केली, जी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देत असे. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६६|language=मराठी}}</ref> 'दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स' या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६६ व ६७|language=मराठी}}</ref> हे पन्नास रुपये व दोन शिकवण्याचे शंभर रुपये असे मिळून दीडशे रुपये त्यांना दरमहा मिळे, परंतु घरखर्च व अपूर्ण शिक्षणासाठी साठवणूकीसाठी ही मिळकत त्यांच्यासाठी अपुर्ण होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना अत्यल्प आर्थिक मदत होई. तिसरा उपाय म्हणून आंबेडकरांनी '[[कास्ट्स इन इंडिया]]' व '[[स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज]]' आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरुपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या अवस्थेत सुद्धा ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६७|language=मराठी}}</ref> पुढे 'सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स' या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात 'राजकीय अर्थशास्त्र' विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळे.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६७ व ६८|language=मराठी}}</ref> याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्याची जबाबदारी एकट्या आंबेडकरांवर आली. प्राध्यापक आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी (लेक्चर्स) त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत. आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देत व बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करुन ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६८|language=मराठी}}</ref> सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे [[शाहू महाराज|राजर्षी शाहू महाराज]] यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनल्या जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६८ व ६९|language=मराठी}}</ref> ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६९|language=मराठी}}</ref>




==संदर्भ==
==संदर्भ==

२२:१७, ९ मार्च २०२० ची आवृत्ती


प्रस्तावना

बोधिसत्व
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
 
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

कार्यकाळ
३ एप्रिल १९५२ – ६ डिसेंबर १९५६
राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू

कार्यकाळ
१५ ऑगस्ट १९४७ – ६ ऑक्टोबर १९५१
राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
मागील पद स्थापित
पुढील चारू चंद्र बिस्वार

कार्यकाळ
२९ ऑगस्ट १९४७ – २४ जानेवारी १९५०

कार्यकाळ
२० जुलै १९४२ – २० ऑक्टोबर १९४६
मागील फेरोज खान नून

मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेता
कार्यकाळ
इ.स. १९३७ – इ.स. १९४२

मुंबई विधानसभेचे सदस्य
कार्यकाळ
इ.स. १९३७ – इ.स. १९४२

मुंबई विधिमंडळाचे सदस्य
कार्यकाळ
डिसेंबर इ.स. १९२६ – इ.स. १९३७

जन्म १४ एप्रिल, इ.स. १८९१
महू, मध्य प्रांत, ब्रिटिश भारत
(सध्या भीम जन्मभूमी, डॉ. आंबेडकर नगर, मध्य प्रदेश)
मृत्यू ६ डिसेंबर, १९५६ (वय ६५)
नवी दिल्ली, दिल्ली, भारत
(सध्या डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, दिल्ली)
राष्ट्रीयत्व भारतीय भारत ध्वज IND
राजकीय पक्ष  • स्वतंत्र मजूर पक्ष
 • शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन
 • रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
मागील इतर राजकीय पक्ष सामाजिक संस्था :
 • बहिष्कृत हितकारिणी सभा
 • समता सैनिक दल

शैक्षणिक संस्था :
 • डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी
 • द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट
 • पिपल्स एज्युकेशन सोसायटी

धार्मिक संस्था :
 • भारतीय बौद्ध महासभा
आई भीमाबाई सकपाळ
वडील रामजी सकपाळ
पत्नी  • रमाबाई आंबेडकर
(विवाह १९०६ - निधन १९३५)

 • सविता आंबेडकर
(विवाह १९४८ - निधन २००३)
नाते आंबेडकर कुटुंब पहा
अपत्ये यशवंत आंबेडकर
निवास राजगृह, मुंबई
शिक्षण  • मुंबई विद्यापीठ
 • कोलंबिया विद्यापीठ
 • लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
 • ग्रेज इन्, लंडन
 • बॉन विद्यापीठ, जर्मनी
धर्म बौद्ध धर्म
सही डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांची सही

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय, हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरूद्ध होणारा सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या, कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक आणि प्रजासत्ताक भारताचे पिता होते.[] भारतात आणि इतरत्र बहुतेक वेळा त्यांना 'बाबासाहेब' म्हणतात, ज्याचा मराठीत अर्थ "आदरणीय पिता" असा होय.

कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट पदव्या मिळवणारे आंबेडकर हे प्रतिभाशाली विद्यार्थी होते; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवरील संशोधनासाठी अभ्यासक किंवा विद्वान म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांचे जीवन सामाजिक व राजकीय घडामोडींत व्यतित झाले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान दिले.

१९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना 'बोधिसत्व' उपाधी प्रदान केली. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनानीच त्यांचे निधन झाले. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर 'भारतरत्‍न' हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.[] इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.

सुरुवातीचे जीवन

तरुण डॉ. आंबेडकर

मालोजीराव हे रामजींचे वडील व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.[] मालोजीरावांना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतर मुलगीचा मिराबाई यांचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले रामजी हे मालोजीरावांचे चौथे अपत्य होते.[] मालोजीरावांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.[] शिक्षण सुरु असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय भीमाबाईंशी झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते.[] रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी वाचत, सकाळी स्त्रोते व भुपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरु झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले.[] मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुचली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच 'नॉर्मल स्कूल'मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.[] रामजींना उत्तम शिक्षण बनवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यास पुण्याच्या सैनिक शाळेत प्रवेश मिळाला. प्रशिक्षित शिक्षक होऊन त्यांची इंग्रजी राजसत्तेच्या सैनिक शाळेत पदोन्नती होऊन ते मुख्याध्यापक बनले व या पदावर ते चौदा वर्ष राहिले. त्यांना मुख्याध्यापक पदाच्या अखेरच्या टप्प्यात 'सुभेदार' पदाचीही बढती मिळाली.[] रामजी व भीमाबाई या दांपत्यांना सन १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आनंदराव व भीमराव (भिवा) ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता.[१०]

रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती. येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते.[११] या काळात १४ एप्रिल १८९१ रोजी महू (सध्या डॉ. आंबेडकर नगर) या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.[१२] रामजींनी मराठीइंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. आंबेडकरांचे कुटुंब हे त्याकाळी अस्पृश्य (दलित) गणल्या गेलेल्या महार जातीचे होते आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चूकिचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.[१३][१४][१५]) अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरुन निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील 'कॅम्प दापोली' वस्तीत परिवारासह राहू लागले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश देता न आल्याने घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करून द्यावी लागली. इ.स. १९९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले. यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. रामजींनी इ.स. १९९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील 'कॅम्प स्कूल' या मराठी शाळेमध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१६] या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत इ.स. १८९६ मधे मस्तकशूल या आजाराने आंबेडकरांच्या आई भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते.[१७] त्यानंतर बालक भीमाचे व अन्य मुलांची संगोपन त्यांच्या मीरा आत्यांनी केले आणि कठीण परिस्थितीत ते जगले.


इ.स. १८९६ मध्ये रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे एका साधारण घरात राहिले, आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात ते राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. इ.स. १८९८ साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. भीमरावाचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. साताऱ्यातील कॅम्प स्कूल मधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.[१८] कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग) कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अंबावडेकर हा चूकीचा उल्लेख[१९]) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरुखे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. तेव्हा त्यावर भीमरावांनी होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे 'आंबेडकर' असे झाले. नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा पास केली व यावर्षीच रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार गेले.[२०]


डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ मुंबईला सहपरिवार आले व तेथील 'लोअर परळ' भागातील 'डबक चाळ' नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.[२१] मुंबईमधे भीमराव हे एल्फिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.[२२] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. रामजी बाबांना इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा पेल्याला स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे कार्य सहसा शालेय शिपायाद्वारे केले जात असे आणि जर शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे. शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न दापोलीच्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ रमाबाई यांच्याशी झाले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत. आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.[२३] इ.स. १९०७ साली तरूण भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.[२४] मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर गुरूजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच बुद्धांच्या शिकवणूकींची माहिती कळाली व बुद्धाकडे वळले.[२५][२६] आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.[२७] पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी २०१२ रोजी त्यांना पहिला मुलगा यशवंत झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजींचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.[२८]

उच्च शिक्षण

विद्यार्थी दशेतील आंबेडकर, सन १९१८

आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी.एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते.[२९] आंबेडकर हे त्यांच्या हयातीतील भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.[३०] त्यांचा शैक्षणिक प्रवास इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरु होऊन इ.स. १९२३ च्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाला. मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेऊन आंबेडकरांनी बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट-लॉ, आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५०च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननिय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या.[३१]

मुंबई विद्यापीठ

भीमराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले होते. आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती देण्याचे मान्य केले. त्यानंतर ३ जानेवारी इ.स. १९०८ रोजी रामजींनी भीमरावांचे नाव मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रीव्हियसच्या वर्गात दाखल केले.[३२] आंबेडकर घराण्यात सर्वप्रथम भीमरावच महाविद्यालयाचे शिक्षण शिकू लागले. या काळात रामजी डबकचाळ सोडून इंप्रूव्हमेंट ट्रस्टच्या (पोयबावाडी-परळ) चाळीत राहायला गेले. येथे भीमराव नियमित अभ्यास करत असे.[३३] महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश व पर्शियन विषयांत शेकडा ७५ पेक्षा जास्त गुण मिळत असे. यामुळे इंग्लिश विषयाचे प्राध्यापक म्युल्लर व पर्शियन विषयाचे प्राध्यापक के.बी. इराणी यांचे ते आवडते विद्यार्थी होते. जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्‍नांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून भीमरावांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. भीमरावांनी सन १९१२ च्या नोव्हेंबर महिन्यात बी.ए. ची परीक्षा दिली व सन १९१३ च्या जानेवारी महिन्यात ते बी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.[३४] त्यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली होती. महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या आर्थिक सहकार्यातून मुक्त व्हावे, असा विचार करून भीमराव बडोदा संस्थानात नोकरीसाठी मिळवली व २३ जानेवारी १९१३ रोजी नोकरीवर रूजू झाले. पण नवव्या दिवशीच मुंबईत वडील आजारी असल्याची तार त्यांना मिळाली व दोन दिवसांनी ते मुंबईत आले. भीमरावांची वडीलांशी भेट झाली आणि ३ फेब्रुवारी १९१३ रोजी रामजींचे निधन झाले.[३५] यामुळे ते बडोदा येथील नोकरीवर पुन्हा वेळेवर हजर होऊ शकले नाहीत. दरम्यान त्यांना पुढचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याची व त्याकरिता अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली.[३६]

कोलंबिया विद्यापीठ

१९१३-१६ दरम्यान कोलंबिया विद्यापीठात असताना विद्यार्थी डॉ. आंबेडकर

बी.ए. उत्तीर्ण झाल्यामुळे भीमरावांना पुढील वाटचाल करण्यासाठी काही पर्याय खुले झाले. नोकरी करणे व घरची आर्थिक स्थिती सुधारणे, हा एक पर्याय होता तर पदव्युत्तर शिक्षण घेणे आणि आपली शैक्षणिक पात्रता आणखी वाढवणे, हाही एक पर्याय होता.[३७] महाराज सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. त्याचवेळी भीमराव महाराजांना भेटले व बडोदा येथे आपल्याला बरोबर होत असलेला सामाजिक अन्याय महाराजांना सांगितला; त्यावर महाराज काही बोलले नाही मात्र त्यांनी भीमरावांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणे व त्यासाठी भीमरावांना अमेरिकेत पाठविणे, पसंत केल्याचे सांगितले.[३८] महाराजांनी भीमरावांना होकार दिल्यामुळे ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या.[३९] या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर आंबेडकर अमेरिकेला जाण्यासाठी मुंबईच्या बंदरातून एस.एस. अंकोना बोटीने प्रवास करू लागले व २१ जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोहचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शाखेत त्यांनी जुलै १९१३ ते जून १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.[४०] त्यांनी या विद्याभ्यासासाठी प्रमुख विषय म्हणून अर्थशास्त्र हा विषय निवडला आणि जोडीचा इतर विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले. त्यांनी अर्थशास्त्र व समाजशास्त्र या विषयांच्या पुस्तकांचे भरपूर वाचन केले व दोन्ही विषयांवर अभ्यासपूर्ण प्रभुत्व मिळवले. यामुळे विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन आर. के. सेलिग्मन यांचे आवडते विद्यार्थी झाले.[४१]

दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांनी भीमरावांशी ओळख करुन घेतली.[४२] भीमराव आंबेडकर या ग्रंथालयात सर्वांच्या अगोदर हजर असत आणि सर्वात शेवटी बाहेर पडत असत, याची माहिती लाला लजपतराय यांना झाली होती. त्या अनुषंगानेही त्यांची ओळख झाली. एकदा लाला लजपतराय व विद्यार्थी भीमराव आंबेडकर यांचा अर्थशास्त्र व समाजशास्त्र संबंधित विषयांवर संवाद सुरू असताना प्राध्यापक एडवीन सेलिग्मन तेथे आले व तेही संवादात सहभागी झाले.[४३] प्रा. सेलिग्मन हे आंबेडकरांचे राज्यशास्त्र आणि समाजशास्त्राचे सखोल ज्ञान जानून होते. लजपतराय यांनी भीमरावांच्या ज्ञानाची स्तूती केली. त्याचवेळी सेलिग्मन यांनी आंबेडकरांबद्दल गौरोद्गार काढले की, "भीमराव आंबेडकर हे केवळ भारतीय विद्यार्थ्यांमध्येच नव्हे तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येही सर्वात बुद्धिमान विद्यार्थी आहेत."[४४][४५]

एम.ए. च्या पदवीसाठी भीमरावांनी 'एन्शंट इंजियन कॉमर्स' (प्राचीन भारतीय व्यापार) या विषयावर प्रबंध लिहून तो १५ मे १९१५ रोजी कोलंबिया विद्यापीठाला सादर केला. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना विद्यापीठाने एम.ए. ची पदवी प्रदान केली. हा प्रबंध नंतर 'अ‍ॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिया कंपनी' नावाचे प्रकाशित करण्यात आला.[४६][४७]

त्यानंतर आंबेडकरांनी पीएच.डी. या डॉक्टरेट पदवीसाठी 'द नॅशनल डिव्हिडण्ट ऑफ इंडिया: अ हिस्टोरीकल अँड ॲनलाटिकल स्टडी' (भारताचा राष्ट्रीय लाभांश: इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन) नावाचा प्रबंध लिहिणे सुरु केले.[४८] सन १९१७ मध्ये विद्यापीठाने त्यांचा प्रबंध स्वीकारुन त्यांना पीएच.डी. (डॉक्टर ऑफ फिलॉसफी) ची पदवी देण्याचे मान्य केले मात्र यासोबत एक अटही घातली की ज्यावेळी हा प्रबंध छापून त्याच्या काही प्रती विद्यापीठात सादर केल्या जातील तेव्हाच भीमरावांना पीएच.डी. पदवी रीतसर दिली जाईल.[४९] मात्र पीएच.डी. चा डॉक्टरेट प्रबंध स्वीकारल्यामुळे सन १९१७ मध्येच विद्यापीठाने भीमरावांना त्यांच्या नावापुढे 'डॉक्टर' (डॉ.) हा शब्द लावण्याची अनुमती दिली आणि 'भीमराव रामजी आंबेडकर' हे 'डॉ. भीमराव रामजी आंबेडकर' झाले.[५०] आंबेडकरांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधामध्ये, ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. त्यानंतर आठ वर्षांनी म्हणजेच इ.स. १९२५ मध्ये आंबेडकरांचा पीएच.डी. चा प्रबंध 'ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती' या नावाने लंडनच्या पी.एस. किंग अँड कंपनीने ग्रंथरूपात प्रकाशित केला. आंबेडकरांनी प्रबंधाच्या प्रती कोलंबिया विद्यापीठात सादर केल्या, त्यानंतर ८ जून १९२७ रोजी आंबेडकरांना पीएच.डी. ही डॉक्टरेट पदवी रितसर प्रदान करण्यात आली.[५१] आंबेडकरांचे पीएच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक प्रा. सेलिग्मन होते, त्यांनीच या ग्रंथाची प्रस्तावना लिहिली होती. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं सेलिग्मन यांच्याशी आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[५२] डॉ. आंबेडकरांनी आपला हा ग्रंथमहाराज सयाजीराव गायकवाड यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला.[५३][५४]

९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र विषयाच्या चर्चासत्रात 'कास्ट्स इन इंडिया : देअर मेकनिझम, जेनिसीस अँड डिव्हलपमेंट' (भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी) नावाचा आपला एक नवीन शोधलेख वाचला.[५५] शोधलेखात त्यांनी शास्त्रीय विवेचन केले होते. हा शोधलेख इ.स. १९१७ च्या मे महिन्यात 'इंडियन अँटीक्वेरी' नावाच्या मासिकात प्रकाशित झाला. नंतर हाच शोधलेख पुस्तकाच्या रुपात प्रकाशित झाला, जे आंबेडकरांचे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते.[५६]

कोलंबिया विद्यापिठामध्ये आंबेडकरांना जॉन ड्युई यांचेही मार्गदर्शन लाभले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्ही सुद्धा प्रभावित झाले होते. आंबेडकरांनी या विद्यापीठात प्रथमच 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' तत्वांचा अनुभव घेतला होता. "कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले", असे आंबेडकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ ३ वर्षांच्या आधी पूर्ण केला होता. लंडनला जाऊन अर्थशास्त्रामध्ये संशोदन करुन अन्य पदव्या मिळवाव्यात ह्या विचाराने त्यांनी इ.स. १९१६ च्या फेब्रुवारी मध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांना दोन-तीन वर्ष शिष्यवृत्तीची मुदतवाढ मिळविण्यासाठी विनंतीपत्र पाठवले. मात्र ती विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर आंबेडकर प्राध्यापक सेलिग्मन यांच्या शिफारसपत्रासह गायकवाडांना दुसरे विनंती पत्र पाठवले, मात्र यावेळी त्यांना केवळ एका वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मुदत वाढवून देण्यात आली. मग इ.स. १९१६ च्या मे महिन्यात लंडनकडे रवाना झाले.[५२][५७][५८]

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मधल्या रांगेत उजवीकडून पहिले) लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असतांना प्राध्यापक व मित्रांबरोबर घेतलेले छायाचित्र, १९१६-१७
बॅरिस्टर-ॲट-लॉ पदवी प्राप्त केल्यानंतर आंबेडकर यांचे छायाचित्र, इ.स. १९२२, लंडन

आंबेडकरांनी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपल्या अभ्यासक्रम केला व पुढील शिक्षण लंडन मध्ये ठरवले. इ.स.१९१६ च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले व पुढचा प्रवास रेल्वेने करत लंडनला पोहचले.[५९] कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी परिचयपत्र दिले होते. "डॉ. भीमराव आंबेडकरांची अर्थशास्त्रातील प्रगती एखाद्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकापेक्षाही जास्त आहे" असे त्या परिचयपत्रात सीगर यांनी लिहिले होते. तसेच प्रा. सेलिग्मन यांनीही अर्थशास्त्रज्ञ सिडने वेब यांच्या नावे परिचयपत्र आंबेडकरांजवळ दिले होते, ज्यात आंबेडकरांना अर्थशास्त्राच्या विविध ग्रंथांचा अभ्यास करता यावा म्हणून लंडन येथील विविध ग्रंथालयात प्रवेश मिळवून द्यावा असे सांगितले होते. त्यानुसार वेब यांनी लंडनमधील 'इंडिया हाऊस' च्या ग्रंथालयात भीमरावांना अभ्यास करता येईल अशी सोय उपलब्ध करून दिली.[६०] अर्थशास्त्रामध्ये पदव्या ग्रहन करण्याच्या हेतूने इ.स. १९१६ च्या ऑक्टोबर महिन्यात आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेतला. कोलंबिया विद्यापीठात एम.ए. व पीएच.डी. या पदव्यांसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा भरपूर अभ्यास केला होता, त्यामुळे बी.एस्सी. ची परीक्षा न देता थेट एम.एस्सी. साठी प्रवेश मिळावा, अशी लेखी विनंती प्रा. एडविन कॅनन यांच्या शिफारशीसह लंडन विद्यापीठाला कळवली होती. लंडन विद्यापीठाने ही विनंती मान्य केली.[६१] तसेच कायद्याचा अभ्यास करून 'बॅरिस्टर' व्हावे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगत त्यांनी ११ नोव्हेंबर १९१६ रोजी लंडनमधील 'ग्रेज इन' मध्ये प्रवेश घेतला.[६२] एम.एस्सी. पदवी मिळवण्याकरिता 'प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स' (भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) विषयावर प्रबंध लिहिणे सुरु केले.[६३] परंतु त्यांच्या एक वर्ष शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे अभ्यास अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. मात्र लंडन सोडण्यापूर्वी आंबेडकरांनी पुढील चार वर्षांच्या कालमर्यादेत म्हणजे ऑक्टोबर १९१७ ते सप्टेंबर १९२१ पर्यंत कोणत्याही वेळी लंडन येऊन आपला अपूर्ण राहिलेला अभ्यास करण्यासाठी पुन्हा प्रवेश घ्यावा, अशी लंडन विद्यापीठाकडून परवागणी मिळवली होती.[६४]

१९ नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची मुंबईच्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापक असतानाचे छायाचित्र.

इ.स. १९१७ च्या जुलै महिन्यात आंबेडकर मुंबईला परत आले. नोकरी करून पैसा साठवण्याचा आणि चार वर्षांच्या आत पुन्हा लंडनला जाण्याचा निर्धार त्यांनी केला. बडोदा संस्थानच्या करारान्वे त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरीचा स्वीकार केला. आंबेडकरांना महारांचे 'मिलिटरी सेक्रेटरी' म्हणून नेमण्यात आले. मात्र आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी अस्पृश्य असल्याने आंबेडकरांचा सतत अपमान करत. आंबेडकर गायकवाडांना याबाबतचे निवेदनही दिले होते, मात्र गायकवाड यावर काही बोलले नाही. अस्पृश्य असल्यामुळे बडोद्यात कुठेही आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.[६५] दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याचे काम मिळाले, ज्याचे दोन्ही विद्यार्थ्यांकडून त्यांना दरमहा ₹१०० मिळत.[६६] जोडीला त्यांनी 'स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स' नावाची कंपनी सुरु केली, जी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देत असे. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.[६७] 'दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स' या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.[६८] हे पन्नास रुपये व दोन शिकवण्याचे शंभर रुपये असे मिळून दीडशे रुपये त्यांना दरमहा मिळे, परंतु घरखर्च व अपूर्ण शिक्षणासाठी साठवणूकीसाठी ही मिळकत त्यांच्यासाठी अपुर्ण होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना अत्यल्प आर्थिक मदत होई. तिसरा उपाय म्हणून आंबेडकरांनी 'कास्ट्स इन इंडिया' व 'स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज' आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरुपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या अवस्थेत सुद्धा ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.[६९] पुढे 'सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स' या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात 'राजकीय अर्थशास्त्र' विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळे.[७०] याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्याची जबाबदारी एकट्या आंबेडकरांवर आली. प्राध्यापक आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी (लेक्चर्स) त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत. आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देत व बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करुन ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.[७१] सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनल्या जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.[७२] ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.[७३]


संदर्भ

संदर्भ

  1. ^ "Bhimrao Ambedkar". c250.columbia.edu. 2018-03-16 रोजी पाहिले.
  2. ^ Worldwide Ambedkar Jayanti celebration from ccis.nic.in on 19th March 2015
  3. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३४ व ३५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  10. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  11. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  12. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  13. ^ "आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे". Loksatta. 2016-04-14. 2018-03-14 रोजी पाहिले.
  14. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल – Loksatta". www.loksatta.com. 2018-03-14 रोजी पाहिले.
  15. ^ "आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या 'त्या' आठवणी". marathibhaskar. 2016-12-26. 2018-03-14 रोजी पाहिले.
  16. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ३५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  17. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४१. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  18. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  19. ^ "आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या 'त्या' आठवणी". marathibhaskar. 2016-12-26. 2018-03-14 रोजी पाहिले.
  20. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  21. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  22. ^ Pritchett, Frances. "1900s". www.columbia.edu. 2018-03-14 रोजी पाहिले.
  23. ^ Kapadiya, Payal (2012). B.R. AMBEDKAR: Saviour of the Masses. Mumbai: Wisha Wozzawriter published by Puffin. p. 14.
  24. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ४९-५०. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  25. ^ लोखंडे, भाऊ (२०१२). डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा. कोल्हापुर: परिजात प्रकाशन. pp. १२२.
  26. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५० व ७७. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  27. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५१. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  28. ^ Frances Pritchett. http://web.archive.org/web/20100625044711/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html. 25 June 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 July 2010 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  29. ^ आगलावे, डॉ. सरोज (एप्रिल २०१५). ओक, चंद्रशेखर (ed.). "कर विकासोन्मुख हवेत..." लोकराज्य. अंक १०. मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र शासन: १२.
  30. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ८८ व ८९. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  31. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. २६, २७, ७३, ७९, ११३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  32. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५१. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  33. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५१. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  34. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  35. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  36. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  37. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  38. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  39. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  40. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५५. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  41. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५६ व ५७. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  42. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५७. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  43. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५७. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  44. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५७. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  45. ^ गोखले, द.न. डॉ. आंबेडकरांचे अंतरंग.
  46. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५७ व ५८. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  47. ^ गोखले, द.न. डॉ. आंबेडकरांचे अंतरंग.
  48. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५८. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  49. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६२ व ६३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  50. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  51. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  52. ^ a b Pritchett, Frances. "txt_zelliot1991". www.columbia.edu. 2018-03-31 रोजी पाहिले.
  53. ^ Ambedkar, B.R. "The Evolution of Provincial Finance in British India" (PDF).
  54. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  55. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  56. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  57. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ५९. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  58. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६०. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  59. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६०. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  60. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६० व ६१. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  61. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६१. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  62. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६०, ६१ व ६३. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  63. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  64. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६४. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  65. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६५ व ६६. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  66. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६६. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  67. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६६. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  68. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६६ व ६७. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  69. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६७. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  70. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६७ व ६८. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  71. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६८. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  72. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६८ व ६९. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  73. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ६९. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)