"विठ्ठल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन iOS app edit
(चर्चा | योगदान)
ओळ ६६: ओळ ६६:
२०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला 'विठ्ठल' नावाचा मराठी चित्रपट प्रकाशित झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.cinestaan.com/movies/vitthal-39008|शीर्षक=Vitthal (2019) - Review, Star Cast, News, Photos|संकेतस्थळ=Cinestaan|अॅक्सेसदिनांक=2019-07-01}}</ref>
२०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला 'विठ्ठल' नावाचा मराठी चित्रपट प्रकाशित झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.cinestaan.com/movies/vitthal-39008|शीर्षक=Vitthal (2019) - Review, Star Cast, News, Photos|संकेतस्थळ=Cinestaan|अॅक्सेसदिनांक=2019-07-01}}</ref>


==विठ्ठलासंबंधित अन्य पुस्तके==
दादाभाऊ गावडे यांनी ’शोधिता विठ्ठल’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. पी. विठ्ठल यांनी लिहिलेल्या 'शून्य एक मी' या संग्रहात 'विठ्ठल : एक संवाद' नावाचा लेख आहे.
* एक विठ्ठल नाम (डाॅ. [[विद्यासागर पाटंगणकर]])
* दादाभाऊ गावडे यांनी ’शोधिता विठ्ठल’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. पी. विठ्ठल यांनी लिहिलेल्या 'शून्य एक मी' या संग्रहात 'विठ्ठल : एक संवाद' नावाचा लेख आहे.


==मराठी विठ्ठलगाणी आणि कविता ==
==मराठी विठ्ठलगाणी आणि कविता ==

१०:०७, २७ जुलै २०१९ ची आवृत्ती

पंढरपूरचा पांडुरंग
विठ्ठल-रखुमाईच्या सजविलेल्या मूर्ती

विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत मानले जाते.[१][२] विठोबा, विठू, पांडुरंग,विठूराया वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यतः भारताच्या महाराष्ट्रकर्नाटक ह्या राज्यात पूजिली जाते.[३][२]

देवता स्वरूप

विठोबा या देवतेचा उगम आणि विकास ही विशेषतः वैष्णव संप्रदायातील म्ह्तावाची संकल्पना म्हणून ओळखली जाते.[२] विठोबा हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारातील नववा अवतार आहे असे मानले जाते. परंतु शास्त्र-पुराणांमध्ये विठ्लाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू होते. विठोबाच्या प्रतिमा ह्या कटीवर हात ठेऊन, भक्त पुंडलिकाने टाकलेल्या विटेवर उभ्या राहिलेल्या सावळ्या पुरुषाच्या वेषात दर्शवितात. त्याच्या संगे काही वेळा पत्‍नी रखुमाई उर्फ रुक्मिणी उभी असते.

विठोबा हा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे व कर्नाटकातील हरिदास संप्रदायाचे आराध्य दैवत आहे.[१][४] त्याचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रात कर्नाटक सीमेजवळ पंढरपूर येथे आहे.[५] जरी हे मंदिर कधी बांधले गेले हे निश्चित माहित नसले तरी ते तेराव्या शतकापासून उभे आहे ह्याचे पुरावे आढळतात. पंढरपूरमध्ये वर्षातून चार यात्रा भरतात. त्यातील आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत लाखो भाविक सहभागी होतात. आलेले भाविक भीमा नदीमध्ये स्नान करतात. या नदीला येथे 'चंद्रभागा' म्हणतात. विठोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत होय.[६]

संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ इत्यादी विठोबाचे थोर भक्त १३व्या ते १७ व्या शतकात होऊन गेले. वारकरी संतांनी विठोबाच्या स्तुतीत अनेक मराठी अभंगांची रचना केली आहे. कन्‍नड कवींनी कानडी श्लोक व आदि शंकराचार्यांनी पांडुरंगाष्टक स्तोत्र रचिले आहे.[७] विठोबाचे प्रमुख सण शयनी एकादशीप्रबोधिनी एकादशी आहेत.

पंढरपूरच्या विठ्ठलाचा दैनिक पूजाविधी

दररोज पहाटे चार वाजता पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर[२] उघडल्यानंतर देवाला उठवण्यासाठी प्रार्थना म्हटली जाते. प्रार्थनेचे मंत्र काकड्याच्या वैदिक आणि पौराणिक मंत्रांप्रमाणे असतात. सव्वाचार वाजता काकड्याला सुरवात होते. कान्ह्या हरिदास रचित ‘अनुपम्य नगर पंढरपूर’ ही आरती म्हटली जाते. आरतीनंतर देवाला खडीसाखर आणि लोण्याचा प्रसाद दाखवला जातो. नंतर नित्यपूजा सुरू होते. त्यामध्ये प्रथम संकल्प, गणेशपूजा, भूमिपूजा, वरुणपूजा, शंखपूजा, घंटापूजा होते. त्यानंतर पुरुषसूक्ताचे पठण करत पूजा केली जाते. सकाळी ११ वाजता विविध पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवला जातो.[८]

धूपारती

दुपारी चार वाजता विठ्ठलमूर्तीचा चेहेरा पुसून देवाला नवीन पोषाख आणि अलंकार घातले जातात. सायंकाळी सात वाजता धुपारती होते. या वेळी प्रथम पाद्यपूजा नंतर गंध लावून हार घालतात. धूप, दीप ओवाळून दहीभाताचा नैवेद्य दाखवतात. त्या वेळी उपस्थित हरिदास आणि भक्त मंडळी
‘जेवी बा सगुणा सख्या हरी, जेवी बा सगुणा,
कालविला दहीभात आले मिरे लवणा,
साय दुधावरी साखर रायपुरी कानवले चिमणा,
उद्धवचिद्‌घन शेष ही इच्छितो गोपाळा रमणा’’
हे पद म्हणतात. शेवटी ‘युगे अठ्ठावीस’ ही आरती म्हटली जाते आणि धुपारती होऊन उपचार संपतो.

शेजारती

नित्योपचारातील शेवटचा उपचार म्हणजे शेजारती. रात्री साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास शेजारती केली जाते. प्रथम विठ्ठलमूर्तीची पाद्यपूजा होते. त्यानंतर देवाला दुपारी घातलेला पोषाख बदलला जातो. धोतर नेसवून अंगावर उपरणे घातले जाते. डोक्‍याला पागोटे बांधले जाते. पोषाख बदलत असताना देवाच्या आसनापासून शेजघरापर्यंत पायघड्या घातल्या जातात. देवाला गंध लावून नंतर हार घालतात. त्या वेळी ‘हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका’ इत्यादी आरत्या म्हटल्या जातात. शेवटी मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले अर्पण केली जातात आणि शेजारती संपते.

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील वर्षभराचे नित्योपचार

पहाटे ४ - मंदिर भाविकांसाठी खुले
पहाटे ४.१५ ते ६ - काकडआरती आणि नित्यपूजा
सकाळी ११ ते ११.१५ - महानैवेद्य
दुपारी ४.३० ते ५ - पोषाख नेसवणे
सायंकाळी ७ ते ७.३० - धुपारती
रात्री ११.४५ ते १२.४५ - शेजारती.[८]

दशावतार origional photo

बाबा पाध्ये

विठ्ठल भक्तीतून मंदिरातील सर्व उपासना, पूजाअर्चा करण्याची साग्रसंगीत व्यवस्था लावण्याचे श्रेय बाबा पाध्ये यांच्याकडे जाते.[९] बडवे यांनी विठ्ठलाचे आणि उत्पात यांनी रखुमाईचे पालकत्व घ्यायचे असा दंडक त्यांनी घालून दिला. बडवे आणि पुजारी या दोघांनी विठ्ठलाची नित्य सेवा, काकडारती, महापूजा, दुपारचा नैवेद्य, सायंकाळची आरती आणि शेजारती हे सर्व पहायचे. सात सेवाधाऱ्यांनी त्यांना मदत करायची आणि त्यांची कामेदेखील ठरलेली, अशी चोख व्यवस्था बाबा पाध्ये यांनी लावून दिली होती.[९]

संस्कृत पंडित असलेल्या बाबा पाध्ये यांनी रचलेल्या, विठ्ठलाची महती कथन करणाऱ्या १८ व्या शतकातील ‘श्रीविठ्ठल स्तवराज’ या संस्कृत काव्याचे हस्तलिखित पंढरपूर येथील मंजूळ घराण्याकडे आहे. या काव्यामध्ये ३५ श्लोक आहेत. हस्तालिखिताची सुरुवातच ‘नमो भगवते विठ्ठलाय’ अशी आहे. ‘छंद देवता कीलक न्यास’ या शास्त्रीय पद्धतीने हे काव्य रचले आहे. मात्र, हा काव्यग्रंथ अपूर्णावस्थेतच आहे. 'विठ्ठलध्यानमानसपूजा " या ग्रंथात बाबा पाध्ये यांनी विठ्ठल देवतेच्या रूपाचे वर्णन केलेले आहे.[९]

आळंदी-पंढरपूरची वारी

देहू व आळंदीहून दरवषी लाखो वारकरी पायी वारीने पंढरपूरला जातात[२].आळंदीहून संत ज्ञानेश्वर, सोपानदेवांची सासवडहून, मुक्ताईची एदलाबादहून आणि निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर, संत तुकाराम महाराज यांची देहू येथून अश्या पालख्या पंढरपूरला येतात.[२] काही शतके ही परंपरा चालत आली आहे.[१०]

विठोबाशी निगडित कथा

विठोबा हा देव भक्त पुंडलिकाच्या भेटीला आलेला व वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. त्याच{{

=

=

}}ा अवतार हा गयासुर नावाच्या राक्षसाच्या समूळ नाश करण्यासाठी द्वापार युगात झाला होता. त्यावेळी गयासुर अरीने सत्यश्रेष्ठ धर्माचा नाश करण्यासाठी देव गणांना भुलवण्याचे तथा गो-ब्राम्हण हत्येचे अखंड सत्र चालवले होते. यास्तव श्री मन्महा मूळ जगत्पित्याच्या आज्ञेने श्रीहरीने बौध्य नामे अवतार घेऊन गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते . नंतर त्याचा परमभक्त जो पुंडलिक यास भेटून स्वरूप दाखविले होते आणि मातापित्याची सेवा केल्याचे फळ म्हणून मोक्षास पात्र केले होते.

पांडुरंग माहात्म्य

आजवर जी पांडुरंग माहात्म्ये उपलब्ध आहेत, त्यांत संस्कृतमधील स्कंदपुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराण यांतील तीन माहात्म्ये आहेत. मराठी भाषेत श्रीधर नाझरेकर, प्रल्हाद महाराज बडवे आणि गोपाळबोधो यांनी लिहिलेली माहात्म्ये प्रसिद्ध आहेत. शिवाय आणखीही काही माहात्म्ये आहेत.[११]

मराठी कवी श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी मराठी भाषेत पांडुरंग माहात्म्य रचले तो काळ इ. स. १६९० ते १७२० दरम्यानचा आहे. मात्र तेनाली राम यांनी रचलेले तेलुगू पांडुरंग माहात्म्य त्यापूर्वी म्हणजे इ.स. १५६५चे आहे. संस्कृत भाषेतील पंचमहाकाव्यांप्रमाणेच तेलुगू भाषेतही पाच महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक महाकाव्य म्हणून तेनाली राम यांच्या ‘पांडुरंग माहात्म्य्यनु’या रचनेचा उल्लेख केला जातो. तेनाली राम यांचे माहात्म्य स्कंद पुराणावर आधारित आहे. या काव्याचे पाच आश्वास (अध्याय) आहेत. शिव-पार्वती संवादातून या तेलुगू पांडुरंग माहात्म्याचे कथानक उलगडते. या माहत्म्यात दक्षिणतीरी पौंडरिक क्षेत्र असल्याचा उल्लेख आहे. हे महाकाव्य दक्षिणी भारतात भाविकांच्या पठणाचा भाग आहे.

अकबर-बिरबल, कालिदास – भोज राजा यांच्या चातुर्यकथा जशा प्रसिद्ध आहेत, तशाच तेनाली राम (काळ इ.स. १५०५ ते १५८०) यांच्याही कथा विख्यात आहेत.

साहित्यात व कलाक्षेत्रात

पंढरपूरच्या विठ्ठलाशी संबंधित नवी माहिती, नवे विचार देणारे ‘कथा पांडुरंगाच्या’ हे पुस्तक वा.ल. मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून सापडलेले विठ्ठलसहस्रनाम आणि इतर माहिती, अविंध संतांची विठ्ठलभक्ती, विठ्ठल मंदिरातली धार्मिक स्थळे आणि त्यांचा दुर्लक्षित इतिहास, पंढरपूरचा वास्तुवारसा, विठ्ठलावर संशोधन करणारे परकी संशोधक, विठ्ठलाव्यतिरिक्तचे पंढरपूर अशा वेगवेगळ्या विषयांवर मंजूळ यांनी लिहिले आहे. हस्तलिखितांतून आढळणारी संतचरित्रे, वेगवेगळ्या राज्यांतला विठ्ठल, कृष्णाचा विठ्ठल कसा झाला, विठ्ठल- पांडुरंग याविषयी माहिती देणाऱ्या हस्तलिखितांची सूची अशी माहितीही या पुस्तकांत आहे, याच बरोबर ही माहिती मंदिरांच्या भिंतींवरही कोरलेली आहे .[१२][१३]

पत्रकार कवी दशरथ यादव यांनी वारीच्या वाटेवर महाकादंबरी लिहिली असून त्यावर ’दिंडी निघाली पंढरीला’ हा चित्रपट तयार झाला आहे. यादव यांनी ‘दैनिक सकाळ’साठी वारीचे वार्तांकन केले होते, .त्यावर अभ्यास करून त्यानी पुस्तक लिहिले आहे. वारीचे खंडकाव्य व अभंग रचनाही त्यांनी केली आहे.

याच वारी विषयावर चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ नावाचा मराठी चित्रपट काढला. २००३ साली निघालेल्या या चित्रपटाला उत्तम चित्रपटाचा, गाण्यासाठीचा, संगीत दिग्‍दर्शनाचा आणि चित्रपट दिग्‍दर्शनासाठीचा असे चार पुरस्कार मिळाले.

२०१८ सालच्या डिसेंबर महिन्यात राजीव रुईया यांनी दिग्दर्शित केलेला 'विठ्ठल' नावाचा मराठी चित्रपट प्रकाशित झाला.[१४]

विठ्ठलासंबंधित अन्य पुस्तके

  • एक विठ्ठल नाम (डाॅ. विद्यासागर पाटंगणकर)
  • दादाभाऊ गावडे यांनी ’शोधिता विठ्ठल’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे. पी. विठ्ठल यांनी लिहिलेल्या 'शून्य एक मी' या संग्रहात 'विठ्ठल : एक संवाद' नावाचा लेख आहे.

मराठी विठ्ठलगाणी आणि कविता

विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने विठ्ठलावर मराठी कवींनी अनेक गीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, कविता आणि नाट्यगीते लिहिली आहेत. त्यांतली काही ही -


(अपूर्ण यादी)

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ a b Monier-Williams, Sir Monier (1883). Religious Thought and Life in India: An Account of the Religions of the Indian Peoples, Based on a Life's Study of Their Literature and on Personal Investigations in Their Own Country (इंग्रजी भाषेत). J. Murray.
  2. ^ a b c d e f Dhere, Ramchandra Chintaman (2011-10-10). Rise of a Folk God: Vitthal of Pandharpur (इंग्रजी भाषेत). Oxford University Press, USA. ISBN 9780199777594.
  3. ^ Monier-Williams, Sir Monier (1883). Religious Thought and Life in India: An Account of the Religions of the Indian Peoples, Based on a Life's Study of Their Literature and on Personal Investigations in Their Own Country (इंग्रजी भाषेत). J. Murray.
  4. ^ Novetzke, Christian Lee (2016-10-18). The Quotidian Revolution: Vernacularization, Religion, and the Premodern Public Sphere in India (इंग्रजी भाषेत). Columbia University Press. ISBN 9780231542418.
  5. ^ Pillai, S. Devadas (1997). Indian Sociology Through Ghurye, a Dictionary (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 9788171548071.
  6. ^ http://wayback.archive.org/web/20080209014300/http://solapur.gov.in/htmldocs/rpandharpur.htm. Archived from the original on १९ ऑगस्ट २०१४. २००७-०९-३० रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ Vidyateertha, Abhinava; Committee, Sri Abhinava Vidyathirtha Mahaswamigal Pattabisheka Silver Jubilee Celebrations Souvenir (1979). The Call of Sringeri (इंग्रजी भाषेत). Sri Abhinava Vidyarthirtha Mahaswamigal Pattabisheka Silver Jubilee Celebrations Souvenir Committee.
  8. ^ a b http://www.vitthalrukminimandir.org/home.html. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ a b c Dhere, Ramchandra Chintaman (2011-06-15). Rise of a Folk God: Vitthal of Pandharpur (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780199777648.
  10. ^ Mokashi, D. B. (1987-07-01). Palkhi: An Indian Pilgrimage (इंग्रजी भाषेत). SUNY Press. ISBN 9780887064623.
  11. ^ Dalal, Roshen (2014-04-18). Hinduism: An Alphabetical Guide (इंग्रजी भाषेत). Penguin UK. ISBN 9788184752779.
  12. ^ Sankalia, Hasmukhlal Dhirajlal (1985). Studies in Indian Archaeology: Professor H.D. Sankalia Felicitation Volume (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 9780861320882.
  13. ^ Buck, Harry Merwyn; Studies, Society for South India (1974). Structural approaches to South India studies (इंग्रजी भाषेत). Wilson Books. ISBN 9780890120002.
  14. ^ Cinestaan https://www.cinestaan.com/movies/vitthal-39008. 2019-07-01 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

हे सुद्धा पहा


बाह्या दुवे

http://www.thehindu.com/news/national/other-states/pandharpur-temple-allows-women-men-of-all-castes-as-priests/article6038635.ece दि हिंदू दैनिक - २३ मे २०१४