"विराट कोहली" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १६२: | ओळ १६२: | ||
[[File:Virat Kohli Batting.jpg|250px|thumb|कोहली न्यूझीलंड विरूद्ध २०१० मध्ये फलंदाजी करताना.]] |
[[File:Virat Kohli Batting.jpg|250px|thumb|कोहली न्यूझीलंड विरूद्ध २०१० मध्ये फलंदाजी करताना.]] |
||
खराब कामगिरीनंतर सुद्धा, ऑस्ट्रेलिया विरूद्ध ऑक्टोबर मध्ये झालेल्या [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०#एकदिवसीय मालिका|तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी]] कोहलीची निवड झाली. पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. विशाखापट्टणम् येथील दुसर्या सामन्यात कोहलीने त्याचे तिसरे एकदिवसीय शतक साजरे केले. त्याने १२१ चेंडूंत ११८ धावा केल्या त्यामुळे हा सामना २९० धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीरांना लवकर गमावूनसुद्धा भारताने जिंकला.<ref name=mom3>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/464529.html ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (सप्टेंबर-ऑक्टोबर २०१०), २रा एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम्, ऑक्टोबर २०, २०१०]</ref> त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्याने कबूल केले की आधीच्या दोन मालिकांमधील अपयशामुळे भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी तो दडपणाखाली होता.<ref>[http://www.espncricinfo.com/ci/content/story/482917.html स्थान टिकवून ठेवण्याचे दडपण कोहलीला जाणवत होते (इंग्रजी मजकूर)]</ref> २०१० च्या शेवटी [[न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०|न्यूझीलंड विरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी]] गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताचा एक खूपच अननुभवी संघ निवडण्यात आला, ज्यात कोहलीने आपले स्थान राखले.<ref>[http://www.espncricinfo.com/ci/content/story/489325.html गंभीर नेतृत्वाच्या आव्हानाने उत्सुक (इंग्रजी मजकूर)]</ref> गुवाहाटीमधल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने १०४ चेंडूत १०५ धावा केल्या, हे त्याचे लागोपाठ दुसरे व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील चवथे शतक. सामन्यामध्ये भारताने ४० धावांनी विजय मिळवला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.<ref name=mom4>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/467883.html न्यूझीलंडचा भारत दौरा-नोव्हेंबर २०१०, १ला एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी, नोव्हेंबर २८, २०१०]</ref> दुसर्या आणि तिसर्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना गंभीरसोबत १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि अनुक्रमे ६४ आणि ६३* धावा केल्या.<ref>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/467884.html न्यूझीलंडचा भारत दौरा-नोव्हेंबर २०१०, २रा एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, जयपूर, डिसेंबर १, २०१०]</ref><ref>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/467885.html न्यूझीलंडचा भारत दौरा-नोव्हेंबर २०१०, ३रा एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, वडोदरा, डिसेंबर ४, २०१०]</ref> भारताने मालिकेत न्यूझीलंडला ५-० ने हरवून व्हॉईटवॉश दिला. कोहलीच्या या मालिकेतील कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात एक नियमित झाला<ref>[http://www.espncricinfo.com/magazine/content/story/492907.html कोहली आणि त्याचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील पराक्रम (इंग्रजी मजकूर)]</ref> आणि तो भारताच्या विश्वचषक संघाचा एक प्रबळ दावेदार झाला<ref>[http://www.espncricinfo.com/magazine/content/story/490146.html कोहलीने भारतीय संघात विविधता आणली (इंग्रजी मजकूर)]</ref> २०१० मध्ये २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.३८ च्या सरासरीने ३ शतकांसह त्याने ९९५ धावा केल्या. त्यावर्षीची ही भारतीय फलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.<ref name=stat2010>[http://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_career.html?class=2;id=2010;team=6;type=year नोंदी / २०१० – भारत / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / सर्वाधिक धावा]</ref><br /> <br /> |
खराब कामगिरीनंतर सुद्धा, ऑस्ट्रेलिया विरूद्ध ऑक्टोबर मध्ये झालेल्या [[ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०#एकदिवसीय मालिका|तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी]] कोहलीची निवड झाली. पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. विशाखापट्टणम् येथील दुसर्या सामन्यात कोहलीने त्याचे तिसरे एकदिवसीय शतक साजरे केले. त्याने १२१ चेंडूंत ११८ धावा केल्या त्यामुळे हा सामना २९० धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीरांना लवकर गमावूनसुद्धा भारताने जिंकला.<ref name=mom3>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/464529.html ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (सप्टेंबर-ऑक्टोबर २०१०), २रा एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम्, ऑक्टोबर २०, २०१०]</ref> त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्याने कबूल केले की आधीच्या दोन मालिकांमधील अपयशामुळे भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी तो दडपणाखाली होता.<ref>[http://www.espncricinfo.com/ci/content/story/482917.html स्थान टिकवून ठेवण्याचे दडपण कोहलीला जाणवत होते (इंग्रजी मजकूर)]</ref> २०१० च्या शेवटी [[न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०|न्यूझीलंड विरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी]] गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताचा एक खूपच अननुभवी संघ निवडण्यात आला, ज्यात कोहलीने आपले स्थान राखले.<ref>[http://www.espncricinfo.com/ci/content/story/489325.html गंभीर नेतृत्वाच्या आव्हानाने उत्सुक (इंग्रजी मजकूर)]</ref> गुवाहाटीमधल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने १०४ चेंडूत १०५ धावा केल्या, हे त्याचे लागोपाठ दुसरे व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील चवथे शतक. सामन्यामध्ये भारताने ४० धावांनी विजय मिळवला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.<ref name=mom4>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/467883.html न्यूझीलंडचा भारत दौरा-नोव्हेंबर २०१०, १ला एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी, नोव्हेंबर २८, २०१०]</ref> दुसर्या आणि तिसर्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना गंभीरसोबत १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि अनुक्रमे ६४ आणि ६३* धावा केल्या.<ref>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/467884.html न्यूझीलंडचा भारत दौरा-नोव्हेंबर २०१०, २रा एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, जयपूर, डिसेंबर १, २०१०]</ref><ref>[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/467885.html न्यूझीलंडचा भारत दौरा-नोव्हेंबर २०१०, ३रा एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, वडोदरा, डिसेंबर ४, २०१०]</ref> भारताने मालिकेत न्यूझीलंडला ५-० ने हरवून व्हॉईटवॉश दिला. कोहलीच्या या मालिकेतील कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात एक नियमित झाला<ref>[http://www.espncricinfo.com/magazine/content/story/492907.html कोहली आणि त्याचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील पराक्रम (इंग्रजी मजकूर)]</ref> आणि तो भारताच्या विश्वचषक संघाचा एक प्रबळ दावेदार झाला<ref>[http://www.espncricinfo.com/magazine/content/story/490146.html कोहलीने भारतीय संघात विविधता आणली (इंग्रजी मजकूर)]</ref> २०१० मध्ये २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.३८ च्या सरासरीने ३ शतकांसह त्याने ९९५ धावा केल्या. त्यावर्षीची ही भारतीय फलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.<ref name=stat2010>[http://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_career.html?class=2;id=2010;team=6;type=year नोंदी / २०१० – भारत / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / सर्वाधिक धावा]</ref><br /> <br /> |
||
जानेवारी २०११ मध्ये [[भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१०-११|दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर]] कोहली एका आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याच्या मालिकेत आणि सर्वच्या सर्व पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत खेळला. टी२० सामन्यात भारताचा विजय झाला, ज्यात त्याने २८ धावा केल्या, परंतू एकदिवसीय मालिकेत भारताचा २-३ असा पराभव झाला. एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या.<ref>[http://stats.espncricinfo.com/ci/engine/records/batting/most_runs_career.html?id=5927;type=series नोंदी / दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारत एकदिवसीय मालिका, २०१०-११ / सर्वाधिक धावा]</ref> एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने [[क्रिकेट विश्वचषक, २०११ - संघ|विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला]] ज्यात कोहलीचेही नाव होते<ref>[http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/story/497102.html विश्वचषक संघात रोहित शर्मा नाही]</ref>. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसर्या स्थानावर पोहोचला.<ref name=kohliraina/><br /> <br /> |
|||
+ |
|||
[[क्रिकेट विश्वचषक, २०११|विश्वचषकाच्या]] संघात कोहली आणि रैना दोघांचाही समावेश झाल्याने, शेवटच्या अकरा जणांत कोण खेळणार याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. स्पर्धेमधल्या भारताच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोणीने सूचित केले की, रैना ऐवजी भरात असलेल्या कोहलीला प्राधान्य दिले जाईल<ref name=kohliraina>[http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/story/501317.html रैना ऐवजी कोहली खेळणार: धोणी (इंग्रजी मजकूर)]</ref>. भारताच्या विश्वचषकाच्या यशस्वी मोहिमेमध्ये कोहली प्रत्येक सामना खेळला. बांगलादेश विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा करीत आपले पाचवे एकदिवसीय शतक साजरे केले आणि पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज बनला. <ref>[http://www.deccanherald.com/content/139360/kohli-first-indian-hit-century.html पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज, कोहली]</ref> पुढच्या चार सामन्यांत त्याने इंग्लंड, [[आयर्लंड क्रिकेट संघ|आयर्लंड]], [[नेदरलँड्स क्रिकेट संघ|नेदरलँड्स]] आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने अनुक्रमे ८, ३४, १२ आणि १ अशा खूपच कमी धावा केल्या. वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात त्याला त्याचा सूर सापडला आणि त्याने युवराज सिंग सोबत तिसर्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ५९ धावांचा होता.<ref>[http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/engine/match/433599.html आयसीसी क्रिकेट विश्वचषक, ४२वा सामना, गट ब: भारत वि. वेस्ट इंडीज, चेन्नई, मार्च २०, २०११]</ref> ऑस्ट्रेलियाविरूद्ध उपांत्य सामन्यात त्याने २४ धावा केल्या,<ref>[http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/engine/match/433601.html आयसीसी क्रिकेट विश्वचषक, दुसरा उपांत्यपूर्व सामना: भारत वि. ऑस्ट्रेलिया, अहमदाबाद, मार्च २४, २०११]</ref> आणि पाकिस्तान विरूद्ध उपांत्य सामन्यात तो ९ धावा काढून बाद झाला.<ref>[http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/engine/match/433605.html आयसीसी क्रिकेट विश्वचषक, दुसरा उपांत्य सामना: भारत वि. पाकिस्तान, मोहाली, मार्च ३०, २०११]</ref> भारताने दोन्ही सामने जिंकून मुंबईतील श्रीलंकेविरूद्ध अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात २७५ धावांचा पाठलाग करताना पहिल्या सात षटकांमध्ये दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि गंभीरने तिसर्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली, ज्यात कोहलीने ३५ धावा केल्या.<ref>[http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/engine/match/433606.html आयसीसी क्रिकेट विश्वचषक, अंतिम सामना: भारत वि. श्रीलंका, मुंबई, एप्रिल २, २०११]</ref> ही भागीदारी म्हणजे "सामन्याचा एक टर्निंग पॉईंट होता".<ref>[http://www.espncricinfo.com/ci/content/story/530962.html कोहलीचे शैक्षणिक वळण]</ref> भारताने सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला आणि १९८३ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला.<ref>[http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/story/509121.html धोणी आणि गंभीरच्या खेळीमुळे भारताने विश्वचषक जिंकला]</ref><br /> <br /> |
|||
===एकदिवसीय उप-कर्णधार म्हणून बढती=== |
===एकदिवसीय उप-कर्णधार म्हणून बढती=== |
१६:३१, २८ मार्च २०१६ ची आवृत्ती
विराट कोहली | ||||
भारत | ||||
व्यक्तिगत माहिती | ||||
---|---|---|---|---|
पूर्ण नाव | विराट कोहली | |||
जन्म | ५ नोव्हेंबर, १९८८ | |||
दिल्ली,भारत | ||||
उंची | ५ फु ९ इं (१.७५ मी) | |||
विशेषता | फलंदाज | |||
फलंदाजीची पद्धत | उजखोरा | |||
गोलंदाजीची पद्धत | उजव्या हाताने | |||
राष्ट्रीय स्पर्धा माहिती | ||||
वर्ष | संघ | |||
२००६-सद्य | दिल्ली | |||
२००८-सद्य | रॉयल चॅलेंजर्स बंगलोर | |||
प्रथम श्रेणी पदार्पण | २३ नोव्हेंबर २००६: दिल्ली v तमिळनाडू | |||
List-A पदार्पण | १८ फेब्रुवारी २००६: दिल्ली v सर्विसेस | |||
कारकिर्दी माहिती | ||||
कसोटी | ए.सा. | टी२० | प्र.श्रे. | |
सामने | ४१ | १७१ | ४१ | ७३ |
धावा | २९९४ | ७२१२ | १४७० | ५२४३ |
फलंदाजीची सरासरी | ४४.०२ | ५१.५१ | ५२.५० | ४८.१० |
शतके/अर्धशतके | ११/१२ | २५/३६ | ०/१४ | १८/२० |
सर्वोच्च धावसंख्या | १६९ | १८३ | ९०* | १९७ |
चेंडू | १५० | ६११ | १३६ | ६१८ |
बळी | ० | ४ | ३ | ३ |
गोलंदाजीची सरासरी | - | १५९.० | ६१.० | १०८.० |
एका डावात ५ बळी | ० | ० | ० | ० |
एका सामन्यात १० बळी | ० | ० | ० | ० |
सर्वोत्तम गोलंदाजी | - | १/१५ | १/१३ | २/४२ |
झेल/यष्टीचीत | ३६/० | ८३/- | १९/- | ६७/- |
२५ मार्च, इ.स. २०१६ |
विराट कोहली (जन्म ५ नोव्हेंबर १९८८) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी तसेच काही वेळा उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करतो. सध्या तो भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील कर्णधार तसेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये उपकर्णधार आहे. तसेच इंडियन प्रीमियर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचाही तो कर्णधार आहे.
दिल्लीसाठी विविध वयोगटातील आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, विराट कोहलीने २००८ साली मलेशियामधील १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी खेळविल्या गेलेल्या सामन्यांमध्ये विजेत्या संघाचे कर्णधारपद भूषविले. त्यानंतर काही महिन्यातच म्हणजे ऑगस्ट २००८मध्ये, १९ वर्षांचा असताना त्याने भारताकडून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. सुरुवातीला राखीव खेळाडू असलेल्या विराट कोहलीने लवकरच भारताच्या मधल्या फळीमध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातही त्याचा समावेश होता. कोहली आपला पहिला कसोटी सामना २०११ मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध किंगस्टन येथे खेळला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला. त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली[१]. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.[२]
२०१२ मध्ये कोहलीची एकदिवसीय क्रिकेट मध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने बरेचदा कर्णधार महेंद्रसिंग धोणीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. २०१४ मध्ये धोणीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला. सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे. सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे. २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.
कोहलीला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू २०१२ आणि २०११-१२ व २०१४-१५ साठीचा बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कारसुद्धा समाविष्ट आहे. २०१३ मध्ये त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.[३] स्पोर्ट्सप्रो (SportsPro), नावाच्या एका इंग्लंडच्या मासिकाने २०१४ मध्ये कोहलीला दुसरा सर्वात उल्लेखनीय खेळाडू म्हणून उल्लेखले आहे.[४]
तो आयएसएल च्या एफसी गोवा आणि आयपीटीएलची फ्रंचायसी असलेल्या यूएई रॉयल्सचा सह-मालक आहे.
सुरुवातीचे जीवन
विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला[५][६]. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी. [७] त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.
कोहली उत्तम नगर मध्ये लहानाचा मोठा झाला आणि विशाल भारती पब्लिक स्कूल मध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले. १९९८ साली, पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता. “विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लब मध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले. अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. त्यावेळी नॉयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडूनही तो सामने खेळला. नववी असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला. खेळाशिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता.
मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. कुटुंबावर कठीण वेळा आल्या... हे सर्व मनावर खोल रुतून बसलं आहे." कोहलीने सांगितल्यानुसार त्याच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा दिला होता, "माझे वडील हा माझा सर्वात मोठा आधार होता. ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत. अजूनही कधी कधी मला त्यांच्या सहवासाची आठवण होते."
तरुणपणीची आणि स्थानिक कामगिरी
कोहली प्रथम ऑक्टोबर २००२ मध्ये पार पडलेल्या २००२-०३ पॉली उम्रीगर ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांखालील दिल्लीच्या संघातून खेळला. या स्पर्धेत ३४.४० च्या सरासरीने त्याने सर्वांत जास्त १७२ धावा केल्या. [८] २००३-०४ पॉली उम्रीगर ट्रॉफीसाठी त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली. [९]. त्या स्पर्धेत पाच डावांत त्याने दोन शतके आणि दोन अर्धशतकांसह ७८ च्या सरासरीने ३९० धावा केल्या. [१०] २००४ च्या उत्तरार्धात तो २००४-०५ विजय मर्चंट ट्रॉफीसाठी १७ वर्षांखालील दिल्ली संघात निवडला गेला. त्या स्पर्धेत त्याने दोन शतकांसह ११७.५० च्या सरासरीने ४७० धावा केल्या, त्यात नाबाद २५१ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. [११] २००५-०६ विजय मर्चंट ट्रॉफी, १७ वर्षांखालील दिल्लीच्या संघाने जिंकली, ज्यात कोहली सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता. त्याने ७ सामन्यांत तीन शतकांसह ८४.११ च्या सरासरीने ७५७ धावा केल्या. [१२] फेब्रुवारी २००६ मध्ये त्याने सर्व्हिसेसच्या संघाविरुद्ध दिल्लीकडून लिस्ट अ सामन्यामध्ये पदार्पण केले, परंतु त्याला फलंदाजी मिळाली नाही.[१३]
जुलै २००६ मध्ये कोहली इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघात निवडला गेला. त्याने इंग्लंडच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १०५ च्या सरासरीने [१४] तर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ४९ च्या सरासरीने धावा केल्या[१५]. भारताच्या क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यांच्या दोन्ही मालिकांमध्ये अजिंक्यपद मिळवले. दौऱ्याच्या समाप्तीच्या वेळी संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत कोहलीच्या फलंदाजीने प्रभावित होत म्हणाले, "कोहलीने जलद आणि फिरकी दोन्ही गोलंदाजीविरुद्ध मजबूत तांत्रिक कौशल्य दाखविले [१६] ". सप्टेंबर महिन्यात भारताच्या १९ वर्षांखालील खेळाडूंच्या क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केला. कोहलीने पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी मालिकेत ५८[१७] तर एकदिवसीय मालिकेत ४१.६६ च्या सरासरीने धावा केल्या. [१८] ऑक्टोबर मध्ये दिल्ली १९ वर्षांखालील क्रिकेट संघाकडून खेळताना त्याने विनू मनकड ट्रॉफीमध्ये १५ च्या सरासरीने[१९] आणि कुचबिहार ट्रॉफीमध्ये ७२.६६ च्या सरासरीने धावा केल्या. [२०] त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तर विभाग १९ वर्षांखालील संघामध्ये निवडला गेला, ज्यामध्ये त्याने दोन सामन्यांत २८ च्या सरासरीने धावा केल्या.[२१]
मी ज्याप्रकारे खेळाला सामोरा गेलो, त्यामुळे तो दिवसच बदलला. माझ्या मनात एकच गोष्ट होती – की मला माझ्या देशासाठी खेळायचं आहे आणि माझ्या वडिलांसाठी ते स्वप्न जगायचं आहे.
कोहलीने नोव्हेंबर २००६ मध्ये, तो १८ वर्षांचा असताना तामिळनाडूविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण केले, आणि पदार्पणाच्या सामन्यात तो अवघ्या १० धावा काढू शकला. परंतु जेव्हा तो डिसेंबर महिन्यात झालेल्या वडलांच्या निधनानंतरही कर्नाटकविरुद्ध खेळला तेव्हा तो तेव्हा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आला. त्या सामन्यात त्याने ९० धावा केल्या. [२३] तो बाद झाल्यानंतर लगेचच वडिलांच्या अंत्यविधीसाठी गेला. दिल्लीचा कर्णधार मिथुन मन्हास म्हणतो "ही एक खूपच वचनबद्धतेची कृती आहे आणि त्याच्या खेळी निर्णायक ठरली. त्याचा करारीपणा आणि वृत्तीला सलाम." [२४] त्याची आई नमूद करते की "त्या दिवसानंतर विराट थोडासा बदलला. एका रात्रीत तो खूपच प्रौढ झाला. प्रत्येक सामना त्याने खूप गंभीरपणे घेतला. बाकावर बसून राहण्याचा त्याला तिटकारा येऊ लागला. जसं काही त्याचं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटशी जोडलं गेलंय. आता, तो फक्त त्याच्या वडलांच्या स्वप्नामागे धावतोय. ते त्याचं स्वतःचं सुद्धा स्वप्न आहे." [७] त्या मोसमात त्याने ६ सामन्यांत ३६.७१ च्या सरासीने २५७ धावा केल्या.[२५]
एप्रिल २००७ मध्ये त्याने ट्वेंटी२०त पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.[२६] जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि बांग्लादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघयांच्याशी झालेल्या त्रिकोणी मालिकेतील ५ सामन्यांमध्ये कोहलीने १४६ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळविले.[२७] त्यानंतरच्या दोन कसोटी सामन्यांच्या मलिकेत त्याने एका शतकाच्या आणि एका अर्धशतकाच्या जोरावर १२२ च्या सरासरीने २४४ धावा केल्या. [२८]
तो एक भक्कम शरीरयष्टी असलेला खेळाडू आहे. तो त्याची शरिरीक क्षमता त्याच्या खेळात वापरतो आणि त्याला त्याच्या कौशल्याची जोड देतो.
फेब्रुवारी-मार्च २००८ मध्ये कोहली मलेशिया मध्ये पार पडलेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकणार्या संघाचा कर्णधार होता. ४थ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन ६ सामन्यांमध्ये ४७च्या सरासरीने त्याने २३५ धावा केल्या, आणि सर्वात जास्त धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळविले. स्पर्धेमध्ये शतक झळकावणार्या तीन फलंदाजांपैकी तो एक होता.[२९] वेस्ट इंडीज १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्धची त्याच्या ७४ चेंडूंतील १०० धावांच्या खेळीला ESPNcricinfo ने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळी म्हणून संबोधले आहे.[३०]. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडीज विरुद्ध भारताने ५० धावांनी विजय मिळविला आणि त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. कोहलीला सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली परंतु इंग्लंड १९ वर्षांखालील संघाविरुद्ध उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी तो वेळेत बरा झाला.[३१] न्यूझीलंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध विजयात त्याचा खूप मोठा वाटा होता. त्या सामन्यात त्याने २७ धावांत २ गडी बाद केले आणि लक्ष्याचा तणावपूर्ण पाठलाग करताना ४३ धावा केल्या. या सामन्यातही त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.[३२] अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने १९ धावा केल्या, हा सामना भारताने डकवर्थ/लुईस पद्धतीनुसार १२ धावांनी जिंकला. ESPNcricinfo ने त्याने स्पर्धेत अनेकदा केलेल्या गोलंदाजीतील बदलांची प्रशंसा केली. [३०]
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोहलीला ३०,००० अमेरिकी डॉलर्स किंमतीत करारावर विकत घेतले.[३३] जून २००८ मध्ये कोहली आणि त्याचे १९ वर्षांखालील संघमित्र प्रदीप संगवान व तन्मय श्रीवास्तव या तिघांनाही बॉर्डर-गावस्कर शिष्यवृत्ती देण्यात आली. या शिष्यवृत्तीअंतर्गत तिघांनाही ब्रिस्बेन येथे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सहा आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी मान्यता देण्यात आली. [२९] जुलै २००८ मध्ये, सप्टेंबर २००८ दरम्यान पाकिस्तानात होणार्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ३० जणांच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव सामील करण्यात आले.[३४] तसेच ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या चार संघांच्या उदयोन्मुळ खेळाडूंच्या स्पर्धेसाठी भारतीय उदयोन्मुख खेळाडूंच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला. त्या स्पर्धेतील सहा सामन्यांत त्याने ४१.२० च्या सरासरीने २०६ धावा केल्या.[३५]
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सुरुवातीची वर्षे
ऑगस्ट २००८ मध्ये, श्रीलंकेच्या दौर्यासाठी आणि पाकिस्तानात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणार्या भारतीय संघामध्ये कोहलीची निवड करण्यात आली. श्रीलंकेच्या दौर्याआधी कोहली फक्त आठ लिस्ट अ सामने खेळला होता.[३६] त्यामुळे त्याच्या संघात निवडल्या जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले.[३७] श्रीलंकेच्या दौर्यादरम्यान सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर जायबंदी झाल्याने, कोहलीने पूर्ण दौर्यामध्ये कामचलाऊ सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडली. वयाच्या १९ व्या वर्षी पदार्पणाच्या एकदिवसीय लढतीत तो फक्त १२ धावांवर बाद झाला.[३८] मालिकेतील चौथ्या समन्यात ५४ धावांसह त्याने त्याचे पहिले अर्धशतक साजरे केले, त्याची मदत भारताला मालिका जिंकण्यासाठी झाली.[३९] इतर तीन सामन्यांत त्याने ३७, २५ आणि ३१ धावा केल्या.[४०] भारताने मालिका ३-२ अशी जिंकली. हा भारताचा श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत पहिलाच मालिका विजय.
चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली गेल्या नंतर, जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली.[४१] दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या. [४२] त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एसएनजीपीएल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला. सामना अनिर्णित राहिला परंतु एसएनजीपीएलचा संघाने पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावर ट्रॉफी जिंकली.[४३] ऑक्टोबर २००८ मध्ये कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय अध्यक्षीय XI संघाकडून चार दिवसीय सामना खेळला. त्याने ब्रेट ली, स्टुअर्ट क्लार्क, मिचेल जॉन्सन, पीटर सीडल, जॅसन क्रेझा अशा दिग्गज गोलंदाजांचा सामना करत १०५ आणि नाबाद १६ धावा केल्या. [४४].
नोव्हेंबर २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशी खेळल्या गेलेल्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली, परंतु तेंडूलकर आणि सेहवागच्या संघातील समावेशामुळे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.[४५] डिसेंबर २००८ मध्ये बीसीसीआय च्या वार्षिक करारांच्या यादीत त्याला ड दर्जाचा करार देण्यात आला, ज्यामुळे तो १५ लाख रुपये मिळण्यास पात्र ठरला.[४६] त्यानंतर जानेवारी २००९ च्या श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेत होणार्या दौर्यातून त्याला वगळण्यात आले.
जुलै-ऑगस्ट २००९ मध्ये ऑस्ट्रेलियात होणार्या चार संघांच्या उदयोन्मुख खेळाडूंच्या स्पर्धेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने भारत उदयोन्मुख खेळाडूंच्या संघासाठी या स्पर्धेत सलामीवीराची भूमिका बजावली. सदर स्पर्धेत त्याने सात सामन्यांत ६६.३३ च्या सरासरीने ३९८ धावा केल्या आणि स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.[४७] त्याने ब्रिस्बेन येथील अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध १०२ चेंडूत १०४ धावा केल्या. भारताने तो सामना १७ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. [४८] स्पर्धेच्या शेवटी राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत कोहलीच्या कामगिरीवर खूष होऊन म्हणाले, "मला सांगावसं वाटतंय, सलामीवीर विराट कोहली खूपच छान खेळला. त्याने खेळलेल्या काही फटकेच त्याची क्षमता सिद्ध करतात."[४९] कोहलीच्या मते ही स्पर्धा म्हणजे त्याच्या कारकिर्दीला "कलाटणी देणारा क्षण" होता.[५०]
कोहलीने नंतर श्रीलंकेतील त्रिकोणी मालिकेत जायबंदी गौतम गंभीरची जागा घेतली.[५१] २००९ आय.सी.सी. चँपियन्स ट्रॉफीमध्ये जायबंदी युवराज सिंगच्या जागी ४थ्या क्रमांकावर कोहलीने फलंदाजी केली. फारसे महत्व नसलेल्या गट सामन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध १३० धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना त्याने नाबाद ७९ धावा केल्या आणि पहिल्यांदाच सामनावीराचा पुरस्कार मिळवला. [५२] ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मायदेशी होणार्या सात एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत कोहलीची एक आरक्षित फलंदाज म्हणून निवड झाली, त्यापैकी दोन सामन्यांत तो दुखापत झालेल्या युवराज सिंग आणि गौतम गंभीर ऐवजी खेळला. डिसेंबर २००९ मध्ये मायदेशी होणार्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कोहलीची निवड झाली. त्याने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात २७ आणि ५४ धावा केल्या. त्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या युवराज सिंगने तिसर्या सामन्यासाठी त्याची जागा घेतली. परंतु, युवराजच्या वारंवार उद्भवणार्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले.[५३] कोलकात्याच्या ४थ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने संघात पुनरागमन केले. त्याने १११ चेंडूंत १०७ धावा करीत पहिले एकदिवसीय शतक साकारले. गौतम गंभीरने त्याच्या सर्वोच्च १५० धावा करून कोहलीसोबत तिसर्या गड्यासाठी २२४ धावांची भागीदारी केली. भारताने सात गडी राखून सामना जिंकला आणि मालिकेमध्ये ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.[५४] गंभीरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, तो त्याने कोहलीला दिला.[५५]
जानेवारी २०१० मध्ये झालेल्या बांगलादेश मधील त्रिकोणी मालिकेसाठी तेंडूलकरला विश्रांती देण्यात आली, त्यामुळे कोहलीला भारताच्या सर्वच्या सर्व पाच सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्ध पराभव झालेल्या पहिल्या सामन्यात त्याने ९ धावा केल्या, परंतु त्यानंतरच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात २९७ धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी ५१/३ अशी कोसळली असताना त्याने ९१ धावांची खेळी करून भारताला विजय प्राप्त करून दिला.[५६] पुढच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीने नाबाद ७१ धावा केल्या, त्यामुळे भारताने केवळ ३३ षटकांत २१४ धावांचा पाठलाग करून बोनस गुण मिळवला. पुढच्याच दिवशी त्याने बांगलादेशविरुद्ध त्याचे दुसरे शतक झळकावले आणि भारताने तो सामनासुद्धा जिंकला.[५७] भारतातर्फे २२व्या वाढदिवसाआधी दोन शतके झळकाविणारा तेंडूलकर आणि सुरेश रैना नंतर तो तिसराच फलंदाज. [५८] या मालिकेमधील कोहलीच्या कामगिरीमुळे त्याची खुप प्रशंसा करण्यात आली[५०][५९] प्रामुख्याने कर्णधार धोणीद्वारा.[६०] श्रीलंके विरुद्ध अंतिम सामन्यात भारत ४ गडी राखून पराभूत झाला त्यात कोहलीने फक्त २ धावा केल्या,[६१] परंतु तरीही पाच डावांमध्ये ९१.६६ च्या सरासरीने २७५ धावा काढून तो मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.[६२] फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये दोन सामन्यांत त्याने ३१ आणि ५७ धावा केल्या.
तळागाळातून वर
पहिला पर्याय असणार्या खेळाडूंना मे-जून २०१० दरम्यान होणार्या श्रीलंका आणि झिंबाब्वे विररुद्धच्या त्रिकोणी मालिकेमधून वगळण्यात आल्यामुळे रैनाची कर्णधार म्हणून तर कोहलीची उपकर्णधार म्हणून निवड झाली. कोहलीने दोन अर्धशतकांसह ४२.०० च्या सरासरीने १६८ धावा केल्या,[६३] परंतु चार सामन्यांपैकी तीन मध्ये पराभव झाल्याने भारत स्पर्धेतून बाद झाला. मालिकेदरम्यान, कोहली भारतातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.[६४] त्याने हरारे येथे झिंबाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आणि नाबाद २६ धावा केल्या.[६५] नंतर त्याच महिन्यात २०१० आशिया चषकासाठी कर्णधार धोणी आणि उपकर्णधार सेहवागच्या नेतृत्वाखाली भारताने आपला पूर्ण ताकदीचा संघ निवडला. संपूर्ण मालिकेमध्ये कोहलीने ३र्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि १६.७५ च्या सरासरीने ६७ धावा केल्या.[६६] त्यानंतर ऑगस्ट २०१० मध्ये पार पडलेल्या श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या त्रिकोणी मालिकेमध्ये सुद्धा त्याला सूर गवसला नाही. त्या मालिकेत तो फक्त १५ च्या सरासरीने धावा करू शकला.
खराब कामगिरीनंतर सुद्धा, ऑस्ट्रेलिया विरूद्ध ऑक्टोबर मध्ये झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली. पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. विशाखापट्टणम् येथील दुसर्या सामन्यात कोहलीने त्याचे तिसरे एकदिवसीय शतक साजरे केले. त्याने १२१ चेंडूंत ११८ धावा केल्या त्यामुळे हा सामना २९० धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीरांना लवकर गमावूनसुद्धा भारताने जिंकला.[६७] त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्याने कबूल केले की आधीच्या दोन मालिकांमधील अपयशामुळे भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी तो दडपणाखाली होता.[६८] २०१० च्या शेवटी न्यूझीलंड विरूद्ध एकदिवसीय मालिकेसाठी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताचा एक खूपच अननुभवी संघ निवडण्यात आला, ज्यात कोहलीने आपले स्थान राखले.[६९] गुवाहाटीमधल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने १०४ चेंडूत १०५ धावा केल्या, हे त्याचे लागोपाठ दुसरे व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील चवथे शतक. सामन्यामध्ये भारताने ४० धावांनी विजय मिळवला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.[७०] दुसर्या आणि तिसर्या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना गंभीरसोबत १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आणि अनुक्रमे ६४ आणि ६३* धावा केल्या.[७१][७२] भारताने मालिकेत न्यूझीलंडला ५-० ने हरवून व्हॉईटवॉश दिला. कोहलीच्या या मालिकेतील कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात एक नियमित झाला[७३] आणि तो भारताच्या विश्वचषक संघाचा एक प्रबळ दावेदार झाला[७४] २०१० मध्ये २५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ४७.३८ च्या सरासरीने ३ शतकांसह त्याने ९९५ धावा केल्या. त्यावर्षीची ही भारतीय फलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती.[७५]
जानेवारी २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर कोहली एका आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याच्या मालिकेत आणि सर्वच्या सर्व पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत खेळला. टी२० सामन्यात भारताचा विजय झाला, ज्यात त्याने २८ धावा केल्या, परंतू एकदिवसीय मालिकेत भारताचा २-३ असा पराभव झाला. एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या.[७६] एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला ज्यात कोहलीचेही नाव होते[७७]. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसर्या स्थानावर पोहोचला.[७८]
+
विश्वचषकाच्या संघात कोहली आणि रैना दोघांचाही समावेश झाल्याने, शेवटच्या अकरा जणांत कोण खेळणार याविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. स्पर्धेमधल्या भारताच्या पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी धोणीने सूचित केले की, रैना ऐवजी भरात असलेल्या कोहलीला प्राधान्य दिले जाईल[७८]. भारताच्या विश्वचषकाच्या यशस्वी मोहिमेमध्ये कोहली प्रत्येक सामना खेळला. बांगलादेश विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने नाबाद १०० धावा करीत आपले पाचवे एकदिवसीय शतक साजरे केले आणि पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज बनला. [७९] पुढच्या चार सामन्यांत त्याने इंग्लंड, आयर्लंड, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याने अनुक्रमे ८, ३४, १२ आणि १ अशा खूपच कमी धावा केल्या. वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्यात त्याला त्याचा सूर सापडला आणि त्याने युवराज सिंग सोबत तिसर्या गड्यासाठी १२२ धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ५९ धावांचा होता.[८०] ऑस्ट्रेलियाविरूद्ध उपांत्य सामन्यात त्याने २४ धावा केल्या,[८१] आणि पाकिस्तान विरूद्ध उपांत्य सामन्यात तो ९ धावा काढून बाद झाला.[८२] भारताने दोन्ही सामने जिंकून मुंबईतील श्रीलंकेविरूद्ध अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात २७५ धावांचा पाठलाग करताना पहिल्या सात षटकांमध्ये दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर कोहली आणि गंभीरने तिसर्या गड्यासाठी ८३ धावांची भागीदारी केली, ज्यात कोहलीने ३५ धावा केल्या.[८३] ही भागीदारी म्हणजे "सामन्याचा एक टर्निंग पॉईंट होता".[८४] भारताने सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला आणि १९८३ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला.[८५]
एकदिवसीय उप-कर्णधार म्हणून बढती
विक्रमांची मांदियाळी
परदेश दौरे
कसोटी कर्णधार
आयपीएल कामगिरी
खेळाची शैली
क्रिकेट शिवाय
वैयक्तिक जीवन
व्यावसायिक गुंतवणूक
मान्यता
विराट कोहली फाऊंडेशन
विक्रम आणि कामगिरी
आकडेवारी
कसोटी क्रिकेट
संदर्भ:[८६] |
एकदिवसीय क्रिकेट
संदर्भ:[८७] |
पुरस्कार
- आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू २०१२[८८]
- आयसीसी विश्व एकदिवसीय XI : २०१२, २०१४
- बीसीसीआय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पॉली उम्रीगर पुरस्कार : २०११-१२, २०१४-१५ [८९]
- अर्जुन पुरस्कार: २०१३[३]
- सीएट सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू : २०११-१२, २०१३-१४[९०]
कसोटी क्रिकेट
सामनावीर पुरस्कार
क्र. | विरुद्ध | ठिकाण | तारीख | सामन्यातील कामगिरी | निकाल | संदर्भ |
---|---|---|---|---|---|---|
1 | न्यूझीलंड | एम्. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर | ३१ ऑगस्ट–३ सप्टेंबर २०१२ | १ला डाव: १०३ (१९३ चेंडू: १४x४ १x६) २रा डाव: ५१ (८२ चेंडू: ९x४) |
विजयी | [९१] |
2 | दक्षिण आफ्रिका | न्यू वाँडरर्स मैदान, जोहान्सबर्ग | १८-२२ डिसेंबर २०१३ | १ला डाव: ११९ (१८१ चेंडू: १८x४)
२रा डाव: ९६ (१९३ चेंडू: ९x४) |
अनिर्णित | [९२] |
एकदिवसीय क्रिकेट
सामनावीर पुरस्कार
मालिकावीर पुरस्कार
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट
सामनावीर पुरस्कार
मालिकावीर पुरस्कार
संदर्भ आणि नोंदी
- ^ विराट कोहली नंबर वन
- ^ विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्यांदाच अग्रस्थानी
- ^ a b कोहलीला, पी. व्ही. सिंधूला अर्जुन पुरस्कार, रोंजन सोढीला खेलरत्न
- ^ SportsPro च्या मोस्ट मार्केटेबल अॅथलिटच्या यादीद विराट कोहली हा एकच भारतीय
- ^ आजही क्रिकेटपटूला पुरेसा पैसा मिळत नाही : कपिलदेव आणि विराट कोहलीचा संवाद (इंग्रजी मजकूर)
- ^ विराट कोहली : द ग्लॅडिएटर (इंग्रजी मजकूर)
- ^ a b वडीलांच्या मृत्युनंतर विराट बदलला : आई (इंग्रजी मजकूर)
- ^ २००२-०३ पॉली उम्रीगर ट्रॉफी
- ^ १५ वर्षांखालील दिल्ली वि १५ वर्षांखालील हिमाचल प्रदेश, २००३-०४
- ^ २००३-०४, पॉली उम्रीगर ट्रॉफीमध्ये १५ वर्षांखालील दिल्ली संघाची फलंदाजी
- ^ २००४-०५, विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये १७ वर्षांखालील दिल्ली संघाची फलंदाजी
- ^ २००५-०६, विजय मर्चंट ट्रॉफीमधील फलंदाजी
- ^ २००६, दिल्ली विरुद्ध सर्व्हिसेस
- ^ २००६ मध्ये इंग्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची एकदिवसीय मालिकेतील फलंदाजी
- ^ २००६ मध्ये इंग्लंड १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची कसोटी मालिकेतील फलंदाजी
- ^ लालचंद राजपूत भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाच्या कामगिरीने संतुष्ट (इंग्रजी मजकूर)
- ^ २००६-०७ मध्ये पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची कसोटी मालिकेतील फलंदाजी
- ^ २००६-०७ मध्ये पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघाविरुद्ध भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची एकदिवसीय मालिकेतील फलंदाजी
- ^ २००६-०७, विनू मनकड ट्रॉफीमध्ये १९ वर्षांखालील दिल्ली संघाची फलंदाजी
- ^ २००६-०७, कुचबिहार ट्रॉफीमध्ये १९ वर्षांखालील दिल्ली संघाची फलंदाजी
- ^ उत्तर विभाग १९ वर्षांखालील संघाची २००६-०७ विजय हजारे ट्रॉफीमध्ये फलंदाजी
- ^ a b स्वतः उदयोन्मुख (इंग्रजी मजकूर)
- ^ दिल्लीच्या लढ्याची सूत्रे बिश्त आणि कोहलीकडे (इंग्रजी मजकूर)
- ^ वडिलांच्या निधनानंतरही तो दिल्लीला वाचविण्यासाठी खेळला (इंग्रजी मजकूर)
- ^ २००६-०७, रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीची फलंदाजी
- ^ २००६-०७ आंतरराज्य टी२० स्पर्धा
- ^ श्रीलंकेमधील १९ वर्षांखालील त्रिकोणी मालिका, २००७ मध्ये सर्वाधिक धावा
- ^ भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघाची श्रीलंकेतील कसोटी मालिका, २००७
- ^ a b कोहली, सांगवान आणि श्रीवास्तव ऑस्ट्रेलियामध्ये प्रशिक्षण घेणार (इंग्रजी मजकूर)
- ^ a b पाहण्यासारखी खेळी (इंग्रजी मजकूर)
- ^ लीडिंग द वे (इंग्रजी मजकूर)
- ^ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, उपांत्य सामना: भारत १९ वर्षांखालील संघ विरुद्ध न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघ कौलालंपूर, २७ फेब्रुवारी २००८
- ^ होपसाठी आयपीएल लिलावात सर्वात जास्त बोली. (इंग्रजी मजकूर)
- ^ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संभाव्य संघ जाहीर (इंग्रजी मजकूर)
- ^ क्रिकेट ऑस्ट्रेलिया उदयोन्मुळ खेळाडू स्पर्धेतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी साठी फलंदाजी
- ^ कोहलीचे लिस्ट अ सामने
- ^ कोहलीची आश्चर्यकारक निवड (इंग्रजी मजकूर)
- ^ भारत क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १ला एकदिवसीय सामना: श्रीलंका वि भारत, डम्बूला, ऑगस्ट १८, २००८
- ^ भारत क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, ४था एकदिवसीय सामना: श्रीलंका विरुद्ध भारत, कोलंबो, ऑगस्ट २७, २००८
- ^ भारत क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, ५वा एकदिवसीय सामना: श्रीलंका विरुद्ध भारत, कोलंबो, ऑगस्ट २९, २००८
- ^ धवन ऐवजी कोहलीची भारत अ संघात निवड (इंग्रजी मजकूर)
- ^ १ली अनधिकृत कसोटी: भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ, बंगळूर, सप्टेंबर ३-५, २००८
- ^ दिल्ली विरुद्ध सुई नॉर्दर्न गॅस पाईपलाइन्स लिमिटेड, दिल्ली, सप्टेंबर १५-१८, २००८
- ^ ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत अध्यक्षीय XI संघ, हैदराबाद, ऑक्टोबर २-५, २००८
- ^ इंग्लंडचा भारत दौरा / भारत एकदिवसीय संघ – पहिले तीन सामने
- ^ इशांत, रोहित आणि बद्रीनाथचा नवीन करारामुळे फायदा
- ^ उदयोन्मुख खेळाडू स्पर्धा, २००९ / नोंदी / सर्वाधिक धावा
- ^ उदयोन्मुख खेळाडू स्पर्धेचे विजेतेपद भारताकडे
- ^ भारतीय क्रिकेटच्या सखोलतेवर श्रीकांत आनंदी
- ^ a b विराट कोहली डीकन्स्ट्रक्टस् द ब्राश स्टीरिओटाईप (इंग्रजी मजकूर)
- ^ त्रिकोणी मालिकेसाठी जायबंदी गंभीर ऐवजी कोहलीची निवड
- ^ आयसीसी चँपियन्स ट्रॉफी, १२वा सामना, गट अ: भारत विरुदॄद वेस्ट इंडीज, जोहान्सबर्ग, सप्टेंबर ३०, २००९
- ^ भारताच्या दुखापतींमुळे श्रीलंकेला संधी
- ^ श्रीलंकेचा भारत दौरा, ४था एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध श्रीलंका, कोलकाता, डिसेंबर २४, २००९
- ^ गौतम गंभीर आणि विराट कोहलींच्या शतकामुळे भारताचा विजय
- ^ बांगलादेश त्रिकोणी मालिका, ३रा सामना, बांगलादेश विरुद्ध भारत, ढाका, जानेवारी ७ , २०१०
- ^ बांगलादेश त्रिकोणी मालिका, ६वा सामना, बांगलादेश विरुद्ध भारत, ढाका, जानेवारी ११ , २०१०
- ^ जडेजाचा प्रवेश, प्रविणचे पुनरागमन (इंग्रजी मजकूर)
- ^ भारताच्या विजयात कोहलीचे नाबाद शतक
- ^ कोहली वयात आला (इंग्रजी मजकूर)
- ^ बांगलादेश त्रिकोणी मालिका, अंतिम सामना, भारत विरुद्ध श्रीलंका, डाक्का, जानेवारी १३ , २०१०
- ^ बांगलादेश त्रिकोणी मालिका, २००९-१० / नोंदी / सर्वाधिक धावा
- ^ झिंबाब्वे त्रिकोणी मालिका, २०१० / नोंदी / सर्वाधिक धावा
- ^ नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / फलंदाजीतील विक्रम / सर्वात जलद १००० धावा
- ^ भारताचा झिंबाब्वे दौरा, १ला आंतरराष्ट्रीय टी२० सामना: झिंबाब्वे विरुद्ध भारत, हरारे, जून १२, २०१०
- ^ आशिया चषक, २०१० / नोंदी / सर्वाधिक धावा
- ^ ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (सप्टेंबर-ऑक्टोबर २०१०), २रा एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, विशाखापट्टणम्, ऑक्टोबर २०, २०१०
- ^ स्थान टिकवून ठेवण्याचे दडपण कोहलीला जाणवत होते (इंग्रजी मजकूर)
- ^ गंभीर नेतृत्वाच्या आव्हानाने उत्सुक (इंग्रजी मजकूर)
- ^ न्यूझीलंडचा भारत दौरा-नोव्हेंबर २०१०, १ला एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, गुवाहाटी, नोव्हेंबर २८, २०१०
- ^ न्यूझीलंडचा भारत दौरा-नोव्हेंबर २०१०, २रा एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, जयपूर, डिसेंबर १, २०१०
- ^ न्यूझीलंडचा भारत दौरा-नोव्हेंबर २०१०, ३रा एकदिवसीय सामना: भारत विरुद्ध न्यूझीलंड, वडोदरा, डिसेंबर ४, २०१०
- ^ कोहली आणि त्याचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील पराक्रम (इंग्रजी मजकूर)
- ^ कोहलीने भारतीय संघात विविधता आणली (इंग्रजी मजकूर)
- ^ नोंदी / २०१० – भारत / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / सर्वाधिक धावा
- ^ नोंदी / दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारत एकदिवसीय मालिका, २०१०-११ / सर्वाधिक धावा
- ^ विश्वचषक संघात रोहित शर्मा नाही
- ^ a b रैना ऐवजी कोहली खेळणार: धोणी (इंग्रजी मजकूर)
- ^ पदार्पणातल्या विश्वचषकात शतक झळकाविणारा पहिला भारतीय फलंदाज, कोहली
- ^ आयसीसी क्रिकेट विश्वचषक, ४२वा सामना, गट ब: भारत वि. वेस्ट इंडीज, चेन्नई, मार्च २०, २०११
- ^ आयसीसी क्रिकेट विश्वचषक, दुसरा उपांत्यपूर्व सामना: भारत वि. ऑस्ट्रेलिया, अहमदाबाद, मार्च २४, २०११
- ^ आयसीसी क्रिकेट विश्वचषक, दुसरा उपांत्य सामना: भारत वि. पाकिस्तान, मोहाली, मार्च ३०, २०११
- ^ आयसीसी क्रिकेट विश्वचषक, अंतिम सामना: भारत वि. श्रीलंका, मुंबई, एप्रिल २, २०११
- ^ कोहलीचे शैक्षणिक वळण
- ^ धोणी आणि गंभीरच्या खेळीमुळे भारताने विश्वचषक जिंकला
- ^ विराट कोहली कसोटी क्रिकेट आकडेवारी espncricinfo.com वर
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;odisummary
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ विराट कोहलीला २०१२ आयसीसी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू पुरस्कार
- ^ विराट कोहली पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित
- ^ विराट कोहली सीएट सर्वोत्तम क्रिकेटपटू
- ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;tmom1
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;tmom2
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
हा क्रिकेट खेळाडू-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- संदर्भ चुका असणारी पाने
- काम चालू
- इ.स. १९८८ मधील जन्म
- इ.स. १९८८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू
- ५ नोव्हेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू
- विस्तार विनंती
- क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर सद्य खेळाडू
- भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू
- २००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू
- अर्जुन पुरस्कारविजेते
- २०११ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू
- २०१५ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेटपटू
- भारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू
- भारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू
- भारतीय कसोटी फलंदाज