भारत १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
India Under-19s
Flag of India.svg
प्रशिक्षक: भारत अरूण
कर्णधार: उन्मुक्त चंद
स्थापना:
मैदान:
मॅनेजर: डी.डी.श्रीधरन

१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार उन्मुक्त चंद हा आहे. प्रशिक्षक पदावर माजी भारतीय खेळाडू भारत अरूण हे आहेत.

१९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने आज पर्यंत ३ वेळा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. सन २००० मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली, २००८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली तर २०१२ मध्ये उन्मुक्त चंद हा कर्णधार असताना भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. याशिवाय १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाने खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांतील ७५% सामने जिंकले आहेत. ही सरासरी इतर कोणत्याही १९ वर्षांखालील क्रिकेट संघापेक्षा जास्त आहे. [१]

सध्याचा संघ[संपादन]

सध्याचा संघ

राखीव

 • अलोक प्रताप सिंग
 • बाबा इंद्रजीथ
 • निखील गंगता
 • आकर्षित गोमेल
 • मयांक जैन
 • चिराग खुराना
 • अक्षर पटेल
 • शुभम रांजणे
 • शुभम शर्मा
 • रवी कुमार
 • सचिन नौटियाल
 • स्वप्नील परब

अलिकडील कामगिरी[संपादन]

उन्मुक्त चंदच्या कर्णधार पदाला साजेश्या खेळीमुळे २६ ऑगस्ट २०१२ रोजी, भारतीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने ९वा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक ६ गडी राखून जिंकला. विजयासाठी ऑस्ट्रेलियाने भारताला २२६ धावांचे आव्हान दिेले होते. [२]

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक मालिकेतील कामगिरी[संपादन]

वर्ष यजमान देश निकाल
१९८८ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ५ वे स्थान
१९९८ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ५ वे स्थान
२००० श्रीलंका श्रीलंका विजेता
२००२ न्यूझीलंड न्यूझीलंड उपांत्य फेरी
२००४ बांगलादेश बांग्लादेश उपांत्य फेरी
२००६ श्रीलंका श्रीलंका उपविजेता
२००८ मलेशिया मलेशिया विजेता
२०१० न्यूझीलंड न्यूझीलंड ६ वे स्थान
२०१२ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया विजेता

संदर्भ आणि नोंदी[संपादन]