"मस्तानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ५४: | ओळ ५४: | ||
}} |
}} |
||
==मस्तानीचा इतिहास== |
==मस्तानीचा इतिहास== |
||
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजन्तमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या |
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजन्तमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंझावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक राण्यांपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली. |
||
मस्तानी ही काही राजनर्तकी नव्हे. ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. हा राजा हिंदू. त्याला मुस्लीम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अनौरसही नाही. छत्रसाल हा प्रणामी पंथाचा. हा पंथ सेक्युलर विचारांचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानाची मोठी झाली.. त्यामुळेच ती नमाजही पढते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतीण वा वारयोषिता नव्हती. - See more at: http://www.loksatta.com/coverstory-news/mastani-1163899/#sthash.Fn1ZaZAR.dpuf |
|||
पेशव्यांच्या सर्वच स्त्रिया सुंदर असल्या तरी मस्तानीचे लावण्य अभूतपूर्व होते. तिची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे. |
पेशव्यांच्या सर्वच स्त्रिया सुंदर असल्या तरी मस्तानीचे लावण्य अभूतपूर्व होते. तिची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे. |
||
ओळ ७८: | ओळ ८०: | ||
* मस्तानीला न्याय मिळवून देण्यासाठी चित्रकार द.ग. गोडसे यांनी लिहिलेल्या मस्तानी (१९८९) या ग्रंथाला न. चिं. केळकर पारितोषिक मिळाले. |
* मस्तानीला न्याय मिळवून देण्यासाठी चित्रकार द.ग. गोडसे यांनी लिहिलेल्या मस्तानी (१९८९) या ग्रंथाला न. चिं. केळकर पारितोषिक मिळाले. |
||
* प्रा .डॉ. संजय घोडेकर यांनी मस्तानीच्या जीवनावर ’मस्तानी : एक शोध’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. |
* प्रा .डॉ. संजय घोडेकर यांनी मस्तानीच्या जीवनावर ’मस्तानी : एक शोध’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. |
||
* मस्तानीवर डॉ. माधुरी सुरेश मुन्शी व डॉ. लता अकलूजकर यांनी पीएच्.डी केली आहे. |
|||
==हेही पहा== |
==हेही पहा== |
०१:०२, १७ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
मस्तानी | |
---|---|
जन्म | पन्ना राज्य, बुंदेलखंड |
मृत्यू |
इ.स. १७४० (एप्रिल) पाबळ, शिरूर तालुका,पुणे जिल्हा |
मृत्यूचे कारण | आजारपणामुळे |
चिरविश्रांतिस्थान | पाबळ, शिरूर तालुका,पुणे जिल्हा |
मालक | थोरले बाजीराव पेशवे (१७००–१७४०) पती |
कार्यकाळ | १६९९-१७४० |
राजकीय पक्ष | मराठा साम्राज्य |
धर्म | परशि॔न-मुस्लिम |
अपत्ये | समशेर बहादुर |
वडील | छत्रसाल बुंदेला (१६४९–१७३१) |
मस्तानीचा इतिहास
दिल्लीचा वजीर "मोहम्मद खान बंगेश" छत्रसाल बुंदेल्यावर चालून आला. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता, आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता. "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली. याच पत्रात त्याने "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥ असा "गजन्तमोक्षाचा" हवाला देऊन बाजीरावाकडे मदतीची याचना केली. पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंझावातापुढे मोगल हैराण झाले. या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तीस लाखाचे उत्पन्न असलेला मुलूख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक राण्यांपैकी एकीची मुलगी "मस्तानी" बाजीरावास दिली.
मस्तानी ही काही राजनर्तकी नव्हे. ती बुंदेलखंडातील छत्रसाल राजाची कन्या. हा राजा हिंदू. त्याला मुस्लीम राणीपासून झालेली मस्तानी ही कन्या. तेव्हा ती अनौरसही नाही. छत्रसाल हा प्रणामी पंथाचा. हा पंथ सेक्युलर विचारांचा. त्या प्रभावाखाली मस्तानी लहानाची मोठी झाली.. त्यामुळेच ती नमाजही पढते आणि कृष्णाची पूजाही करते. उत्तर हिंदुस्थानी संस्कृतीनुसार ती नृत्यकुशल आहे. कृष्णाची भजने गात ती नाचते. याचा अर्थ ती कोठ्यावर बसणारी कलावंतीण वा वारयोषिता नव्हती. - See more at: http://www.loksatta.com/coverstory-news/mastani-1163899/#sthash.Fn1ZaZAR.dpuf
पेशव्यांच्या सर्वच स्त्रिया सुंदर असल्या तरी मस्तानीचे लावण्य अभूतपूर्व होते. तिची त्वचा इतकी पातळ होती की विड्याच्या पानाचा रस गिळताना तो तिच्या गळ्यातून ओघळताना दिसे.
कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही. त्याने मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला होता.
मस्तानी ही एक बुंदेल स्त्री होती. ती थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी लग्न करून पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने इ.स. १७४० साली हे जग सोडून गेली. त्यांना समशेर बहादुर नावाचा मुलगा होता. ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात मस्तानी प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, संत मीराबाई, मस्ताना, केशवदास, तुलसीदास या संतांचे साहित्य तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिने अभ्यास केला होता.
मस्तानीचा मृत्यू आणि कारण
मस्तानीचा मृत्यू इ.स.१७४० मध्ये, पेशवे बाजीराव २७ फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुद्ध लढाई जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक प्रकृती बिघडून, नर्मदा तीरावर रावेरखेडी या गावी विषमज्वराने २८ एप्रिल १७४०(वैशाख शुद्ध शके १६६२) रोजी पहाटे थोरले बाजीराव वारले. त्या धक्क्याने मस्तानीने विष प्राशन करून तिने आपल्या प्राणाची आहुती दिली.
मस्तानीचे समाधीस्थळ
तिचे समाधीस्थळ पाबळ गाव हे पुण्याजवळ आहे. त्यालाच आता "मस्तानी समाधिस्थळ" म्हणून ओळखले जाते. समाधीची काळजी मस्तानीचे वंशज मोहम्मद इनामदार ह्यांच्याकडून घेतली जाते.
मस्तानीचा वंश
बाजीरावांना मस्तानीपासुन समशेरबहाद्दर ऊर्फ "कृष्णराव" असे एकूण ४ पुत्र झाले. मस्तानीचा पुत्र समशेर बहादर याला पेशवे घराण्यात व राजकारणात मानाचे स्थान लाभले. १७६१ साली पानिपतावर तो प्राण पणाला लावून लढला व धारातीर्थी पडला. पेशवे कुटुंबाला त्याचे अतीव दु:ख झाले. त्याचा पुत्र अलिबहादूरसुद्धा शूर होता. त्याला ‘श्रीमत्’ म्हटले जाई. श्रीमंत म्हणजे पेशवे व श्रीमत् हे परिवारातील सदस्य अशा उपाध्या होत्या. १७८८ साली मध्य प्रदेशातील बांदा येथे मस्तानीच्या शाखेला जहागिरी देण्यात आली. महादजी शिंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नाना फडणविसाने अलिबहादूरला पाठविले होते. कारण बाजीरावाच्या रक्ताची भीती मराठा सरदारांना होती. ब्राह्मण राघोबाने आपल्याच पुतण्याचा खून केला, पण मस्तानीचे मुसलमान वंशज स्वामिनिष्ठेपासून कधी ढळले नाहीत. १८५७च्या संग्रामात बांद्याचा नवाब झांशीची राणी व नानासाहेब पेशवा यांच्या बाजूने लढला. तो मस्तानीचा वंशज होता. बंडानंतर बांदा संस्थान खालसा झाले. तेथील नवाबास पेन्शन देऊन इंदूरला आणून बसविण्यात आले. प्रसिद्ध उर्दू शायर मिर्झा गालिब हासुद्धा मस्तानी वंशातील दूरच्या नात्याचा होता. आज इंदुरातील अॅडव्होकेट नबाब बहादूर यांचा परिवार बाजीराव-मस्तानीचा रास्त अभिमान बाळगून आहे.
मराठी-हिंदी माध्यमात मस्तानी
- मराठी भाषेतले 'रविराज तू, मी रोहिणी' हे नाटक बाजीराव-मस्तानीच्या कथेवर आधारलेले होते. त्यात मस्तानीची नृत्यमय भूमिका सुहास जोशी करत असत.
- गजानन वाटवे यांचे दिग्दर्शन असलेले आणि ’बाजीराव आणि मस्तानी’ ही ओळ असलेले एक भावगीत आहे.
- बाजीराव मस्तानी नावाचा एक हिंदी चित्रपट आहे; प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांचे त्यात एक नृत्य आहे. या नृत्यामुळे अनेकांनी चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे. नाराजी व्यक्त करणार्यांमध्ये मस्तानीचे आठवे वंशज अवैझ नवाब बहादूरही आहेत.
- बाजीराव मस्तानी नावाची एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे.
- मस्तानीला न्याय मिळवून देण्यासाठी चित्रकार द.ग. गोडसे यांनी लिहिलेल्या मस्तानी (१९८९) या ग्रंथाला न. चिं. केळकर पारितोषिक मिळाले.
- प्रा .डॉ. संजय घोडेकर यांनी मस्तानीच्या जीवनावर ’मस्तानी : एक शोध’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.
- मस्तानीवर डॉ. माधुरी सुरेश मुन्शी व डॉ. लता अकलूजकर यांनी पीएच्.डी केली आहे.