"राष्ट्रीय महामार्ग ६६" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ४३: | ओळ ४३: | ||
हा महामार्ग [[रत्नागिरी]] जिल्ह्यातून जातो...कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचे अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत. |
हा महामार्ग [[रत्नागिरी]] जिल्ह्यातून जातो...कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचे अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत. |
||
मुंबई-गोवा महामार्गावरील बहादुरशेख नाका सोडल्यानंतर पुढे कळंबस्ते फाटा येतो. तेथून पुढे रेल्वे मार्गापासून काही अंतरावर आंबडसकडे फाटा फुटतो. तो लोटे येथे बाहेर पडतो. |
|||
[[परशुराम घाट]]रस्त्याला आंबडस मार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे. |
[[परशुराम घाट]]रस्त्याला आंबडस मार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही. शिवाय या रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जातो. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे. |
||
मुंबई-गोवा महामार्गावरून एका मिनिटाला पाच गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रस्त्यावर रात्रंदिवस रहदारी असते. कशेडी किंवा भोस्ते घाटात एखादा अपघात झाला किंवा दरड कोसळली, तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबते. अशीच अवस्था परशुराम घाटाची आहे. |
|||
खेड तालुक्यातील लोटेपासून पुढे भरणे नाक्यापर्यंतचा रस्ता एखाद्या दुर्घटनेमुळे रोखला गेला, तर कोतवली मार्गे जाणार्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाडीपट्ट्यातील गावांमधून जाणार्या या पर्यायी रस्त्याचा उपयोग काही प्रमाणावर केला जातो. लोटे येथून सुरू होणारा हा ३५ किमी लांबीचा रस्ता खेड शहरात बाहेर पडतो. |
|||
==राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना== |
==राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना== |
२३:५१, १ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
राष्ट्रीय महामार्ग १७ | |
---|---|
लांबी | १२६९ किमी |
सुरुवात | पनवेल |
मुख्य शहरे | मुंबई (रा. म. ४ मार्गे) - पनवेल - रत्नागिरी - सिंधुदुर्ग - पणजी - उडुपी - मंगलोर - कोझिकोड - कोचीन |
शेवट | एडापल्ली |
राज्ये |
महाराष्ट्र: ४८२ किमी गोवा: १३९ किमी कर्नाटक: २८० किमी केरळ: ३६८ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग १७ (मुंबई-गोवा महामार्ग) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पुर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १२६९ किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला केरळमधील कोची ह्या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोर व कालिकत ही रा.म. १७ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. १७ हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत कोकण रेल्वे सुरू होण्या्पूर्वी रा. म. १७ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता.
मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. १७ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे[१].
रा.म. १७ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे
रा.म. १७ वरील घाट आणि घाटरस्ते
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट, भोस्ते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, आरवली घाट, निवळी घाट, अंजनारी घाट, वाकेड घाट, राजापूर घाट, कोडे घाट, नडगिवे घाट, वागदे घाट, अकेरी घाट, इन्सुली घाट इतके सगळे घाट येतात.
हा महामार्ग रत्नागिरी जिल्ह्यातून जातो...कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचे अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील बहादुरशेख नाका सोडल्यानंतर पुढे कळंबस्ते फाटा येतो. तेथून पुढे रेल्वे मार्गापासून काही अंतरावर आंबडसकडे फाटा फुटतो. तो लोटे येथे बाहेर पडतो. परशुराम घाटरस्त्याला आंबडस मार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही. शिवाय या रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जातो. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून एका मिनिटाला पाच गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रस्त्यावर रात्रंदिवस रहदारी असते. कशेडी किंवा भोस्ते घाटात एखादा अपघात झाला किंवा दरड कोसळली, तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबते. अशीच अवस्था परशुराम घाटाची आहे.
खेड तालुक्यातील लोटेपासून पुढे भरणे नाक्यापर्यंतचा रस्ता एखाद्या दुर्घटनेमुळे रोखला गेला, तर कोतवली मार्गे जाणार्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाडीपट्ट्यातील गावांमधून जाणार्या या पर्यायी रस्त्याचा उपयोग काही प्रमाणावर केला जातो. लोटे येथून सुरू होणारा हा ३५ किमी लांबीचा रस्ता खेड शहरात बाहेर पडतो.
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
हे सुद्धा पहा
- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
संदर्भ
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3757481.cms महाराष्ट्र टाईम्स, २६ नोव्हेंबर २००८