वाकाटक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वाकाटक वंश या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

वाकाटक राजवंश हा विदिशा (हल्लीचे मध्यप्रदेश) व महाराष्ट्रात राज्य करणारा भारतातील एक प्राचीन राजवंश होता.

राजधानी[संपादन]

वत्सगुल्म (सध्याचे वाशिम) ही वाकाटकांची राजधानी होती.

राजे[संपादन]

विंध्यशक्ती (इ.स. २५० ते इ.स. २७०), प्रवरसेन पहिला (इ.स. २७० ते इ.स. ३३०), हरीसेन (इ.स. ४७५ ते इ.स. ५००) हे वाकाटकांचे महत्त्वाचे राजे होऊन गेले.

विंध्यशक्ती[संपादन]

विंध्यशक्ती हा वाकाटक घराण्याचा संस्थापक होता.

प्रथम प्रवरसेन[संपादन]

विंध्यशक्तीचा पुत्र प्रथम प्रवरसेन हा सर्वात बलशाली राजा होता. याने कोल्हापूर, सातारा, सोलापूर, दक्षिण कोसल, कलिंग आणि आंध्र हा भाग जिकला. याने चार अश्वमेध यज्ञ केले असल्याची नोंद आहे.

जेष्ठ शाखा[संपादन]

प्रथम प्रवरसेन याचा पुत्र गौतमीपुत्र यांचा पुत्र प्रथम रुद्रसेन याने समुद्र्गुप्ताशी सलोख्याचे संबंध ठेवले. त्याने आपली नागपूरजवळ नंदिवर्धन येथे आणली. इ.स.४९० च्या सुमारास ही शाखा वत्सगुल्म शाखेत विलीन झाली.

वत्सगुल्म[संपादन]

प्रथम प्रवरसेनचा द्वितीय पुत्र सर्वसेन याने वत्सगुल्म (वाशीम) येथे राजधानी स्थापन केली. सर्वसेन याने धर्ममहाराज या नावाने हरिविजय या प्राकृत काव्याची रचना केली. यानंतर द्वितीय विंध्यशक्ती, द्वितीय प्रवरसेन, देवसेन आणि हरीसेन हे राजे झाले.

कवी कालिदास[संपादन]

कवी कालिदास हा अनेक वर्ष वाकाटक राजांकडे आश्रयाला होता. तेथेच त्याने मेघदूत या काव्याची रचना केली.

ऱ्हास[संपादन]

महिष्पत्तीच्या कलचुरींनी वाकटकांच्या विदर्भात आपले राज्य स्थापन केल्याने या सत्तेचा ऱ्हास झाला.