इटालियन वसाहती साम्राज्य
Appearance
इटालियन वसाहती साम्राज्य (इटालियन: Impero Italiano) किंवा इटालियन साम्राज्य म्हणजे इटलीच्या वसाहती. या सर्व वसाहती आफ्रिकेत होत्या. १८६१ साली इटलीचे एकत्रीकरण झाले. १८६१ पर्यंत स्पेन, पोर्तुगाल, ब्रिटन, नेदरलँड्स व फ्रान्स या राष्ट्रांनी जगभर स्वतःच्या वसाहती स्थापल्या होत्या. त्यामुळे आफ्रिकेतील उर्वरित विभाग इटलीने आपल्या अधिपत्याखाली आणले.