गहडवाल वंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गहडवाल वंश याची स्थापना प्रतिहार साम्राज्याच्या अस्तानंतर चंद्रदेवाने इ.स. १०८५ मध्ये कनौज येथे केली.

राज्यकर्ते[संपादन]

राजांची कामगिरी[संपादन]

चंद्रदेवाने इ.स. १०८५ ते इ.स. ११०० पर्यंत राज्य केले. या काळात त्याने काशी, कनौज, व इंद्रप्रस्थावर प्रभुत्व निर्माण केले. बंगालच्या विजयसेनाने त्याच्यावर केलेले आक्रमणही त्याने परतवून लावले. चंद्रदेवानंतर गोविंदचंद्र हा पराक्रमी राजा झाला. त्याने गझनीच्या राजाचे परकीय आक्रमण परतवून लावले. पालवंशीयांच्या ताब्यातील मगधचा प्रदेश जिंकून घेतला. त्याच्यानंतर इ.स. ११५४ मध्ये विजयचंद्र हा राजपदावर आला. यानेही बिहारपर्यंत आपला प्रभाव वाढवला. याच्यानंतर याचा मुलगा जयचंद याने इ.स. ११७० ते इ.स. ११९२ पर्यंत कनौजवर राज्य केले. पृथ्वीराज चौहानाने जयचंदाची मुलगी संयोगिता हिला स्वयंवर मंडपातून पळवून नेल्याने दोघात संघर्ष सुरू झाला होता.[१] | जयचंदाने पृथ्वीराजाचा पराभव करण्यासाठी तुर्की आक्रमक शहाबुद्दीन घोरीची मदत घेतली होती. पण पृथ्वीराजाने इ.स. ११९१ मध्ये झालेल्या तराईच्या पहिल्या लढाईत घोरीचा पराभव केला. नंतर परत इ.स. ११९२ मध्ये तराईच्या दुसऱ्या लढाईत घोरीने जयचंदाच्या मदतीने पृथ्वीराजाला पराभूत केले.

शेवट[संपादन]

पृथ्वीराज चौहानाचा पराभव करण्यासाठी जयचंदाने ज्या घोरीची मदत घेतली होती त्या घोरीनेच विश्वासघात करून जयचंदावरच स्वारी करून कनौजचे राज्य जिंकून घेतले आणि गहडवाल वंशाचा शेवट झाला.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ जे. एल. मेहता. हिस्ट्री ऑफ एंशंट इंडिया (इंग्रजी भाषेत). pp. ८१५. २४ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)