जपानी साम्राज्य
जपानी साम्राज्य दाइ निप्पॉन तेइकोकु 大日本帝國 | ||||
|
||||
|
||||
ब्रीदवाक्य: 八紘一宇 हाक्को इचीउ (सर्व जग एका छत्राखाली!) |
||||
राजधानी | तोक्यो | |||
राष्ट्रप्रमुख | मैजी (इ.स. १८६८ - इ.स. १९१२) तैशो (इ.स. १९१२ - इ.स. १९२६) हिरोहितो - (इ.स. १९२६ - इ.स. १९४७) |
|||
पंतप्रधान | हिरोबुमी इतो (इ.स. १८८५-८८, इ.स. १८९२-९६, इ.स. १८९८, इ.स. १९००-०१) फुमिमारो कोनोये (इ.स. १९३७-३९, इ.स. १९४०-४१) हिदेकी तोजो (इ.स. १९४१-४४) शिगेरू योशिदा (इ.स. १९४६-४७) |
|||
धर्म | बौद्ध | |||
राष्ट्रीय चलन | जपानी येन | |||
आजच्या देशांचे भाग | जपान दक्षिण कोरिया उत्तर कोरिया रशिया चीन तैवान (तैवान) |
जपानी साम्राज्य (जपानी: 大日本帝國) हे इ.स. १८६८ ते इ.स. १९४७ या कालखंडात अस्तित्वात असलेले, वर्तमान जपान देशाचे पूर्ववर्ती साम्राज्य होते. ३ जानेवारी, इ.स. १८६८ रोजी मेइजी पुनर्स्थापनेनंतर हे साम्राज्य उदय पावले व दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर ३ मे, इ.स. १९४७ रोजी या साम्राज्याचा अस्त झाला.
जपानी साम्राज्याने "फुकोकु क्योहेई" (जपानी: 富国強兵 ; अर्थ: देश श्रीमंत करा! सैन्याची ताकद वाढवा!) या प्रकल्पांतर्गत देशाचे सैनिकीकरण व उद्योगीकरण आरंभले. यामुळे जपानी साम्राज्य जागतिक शक्ती बनले.
जपानी साम्राज्यकाळादरम्यान ह्या देशाने झपाट्याने प्रगती केली व तो जगातील एक प्रगत देश बनला. साम्राज्यवाढीने झपाटलेल्या जपानी राज्यकर्त्यांनी दुसऱ्या महायुद्धात अक्ष राष्ट्रांसोबत हातमिळवणी केली व पूर्व आशियामधील अनेक देशांवर लष्करी चढाया केल्या. हिरोशिमा व नागासाकीवरील अणुबॉम्ब हल्ल्यांनंतर जपानी साम्राज्याने २ सप्टेंबर १९४५ रोजी दोस्त राष्ट्रांसमोर शरणागती पत्कारली. त्यानंतर अमेरिकेच्या मदतीने जपान देशाचे संविधान पुन्हा लिहिले गेले व ३ मे, इ.स. १९४७ रोजी जपान ह्याच नावाने हा देश ओळखला जाऊ लागला.
युद्धे
[संपादन]युद्ध | वर्ष | प्रतिस्पर्धी |
---|---|---|
पहिले चीन-जपान युद्ध | इ.स. १८९४-इ.स. १८९५ | छिंग राजवंश |
जपान-रशिया युद्ध | इ.स. १९०४-इ.स. १९०५ | रशियन साम्राज्य |
पहिले महायुद्ध | इ.स. १९१४-इ.स. १९१८ | केंद्रवर्ती सत्ता |
सैबेरीयाचे युद्ध | इ.स. १९१८-इ.स. १९२० | रशियन साम्राज्य |
दुसरे चीन-जपान युद्ध | इ.स. १९३७-इ.स. १९४५ | चीनचे प्रजासत्ताक |
दुसरे महायुद्ध | इ.स. १९३९-इ.स. १९४५ | दोस्त राष्ट्रे |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
[संपादन]- "जपानने पराभव स्वीकारल्याचे मूळ शरणपत्र" (इंग्लिश भाषेत). 2008-05-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-01-10 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |