फ्रान्सचे पहिले साम्राज्य
Appearance
पहिले फ्रेंच साम्राज्य Empire Français | ||||
|
||||
|
||||
![]() |
||||
१८१२ सालचे आपल्या सर्वोच्च शिखरावर असतानाचे फ्रेंच साम्राज्य.
फ्रान्सचे साम्राज्य मांडलिक राष्ट्रे |
||||
राजधानी | पॅरिस | |||
अधिकृत भाषा | फ्रेंच | |||
राष्ट्रीय चलन | फ्रेंच फ्रँक | |||
आजच्या देशांचे भाग | ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() |
फ्रान्सचे साम्राज्य (फ़्रेंच:Empire Français) फ्रान्सचे मोठे साम्राज्य, फ्रान्सचे पहिले साम्राज्य किंवा नेपोलियनिक साम्राज्य या नावांनीही ओळखले जाणारे नेपोलियन बोनापार्टचे हे साम्राज्य होते. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील ही एक मोठी शक्ती होती.
डिसेंबर २, १८०४ रोजी नेपोलियन सम्राट झाला. त्याने ऑस्ट्रिया, प्रशिया, रशिया, पोर्तुगाल व मित्रराष्ट्रे यांविरुद्धचे तिसऱ्या संघाचे युद्ध जिंकले. ऑस्टर्लिट्झची लढाई (१८०५) व फ्रीडलॅंडची लढाई (१८०७) ही त्याची युद्धे उल्लेखनीय आहेत. दोन वर्षांचा युरोपातील रक्तपात तिल्सितच्या तहामुळे जुलै १८०७ रोजी संपुष्टात आला.
नेपोलियनने लढलेली युद्धे एकत्रितपणे नेपोलियोनिक युद्धे म्हणून ओळखली जातात. ही युद्धे पश्चिम युरोपपासून पोलंडपर्यंत लढली गेली.