लोहार वंश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लोहार वंश राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता. याची सत्ता इ.स. १००३-१३२० दरम्यान सध्याच्या भारतातील जम्मू आणि काश्मीर प्रदेशात होती.


संग्रामराज लोहार घराण्याचे संस्थापक होते. संग्रामराजानंतर अनंत या घराण्याचा राजा झाला. त्याने आपल्या कारकिर्दीत सामंत्यांच्या बंडाळीला चिरडले. त्यांच्या पत्नी राणी सूर्यमती यांनी त्यांच्या कारभारात सहकार्य केले. अनंताचा मुलगा कलश हा एक कमकुवत शासक होता

कल्हणने १२व्या शतकात लिहिलेल्या राजतरंगिणी या महाकाव्यात या राजवंशाचे वर्णन आहे.