किलोग्रॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रान्समधल्या सेव्हर्स या गावी ठेवलेला ठोकळा(एका किलोग्रॅमचे मूळ एकक)

किलोग्रॅम हे वजनाचे एकक आहे. एका किलोग्रॅमचे एक हजार ग्रॅम होतात. याचे एस.आय. संक्षिप्त नाम kg आहे.

मोजण्याच्या पद्धती[संपादन]

जगभर ब्रिटिशांचे साम्राज्य असण्याच्या काळात त्यांनी इंग्लंडमध्ये चालत असलेली वजनमापाची पद्धत, त्यांचे राज्य असलेल्या प्रत्येक देशात सुरू केली. या पद्धतीला एफ.पी.एस. (फूट-पौंड-सेकंद) पद्धत म्हणतात. पुढे फ्रान्सने दशमानपद्धतीचा (मेट्रिक पद्धत) वापर सुरू केल्यावर जगभरात वैज्ञानिक मापनांसाठी सी.जी.एस. (सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद) ही पद्धत सुरू झाली. यांतली सेंटिमीटर आणि ग्रॅम ही मूल एकके फार लहान असल्यामुळे मोजमापांचे आकडे फार मोठे असायचे. त्यामुळे दशमानपद्धतीतच किंचित सुधारणा करून मोजमापनाची एस.आय. नावाची आंतराराष्ट्रीय मापन पद्धत (फ्रेंच: Système international d'unités) लागू करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार, सी.जी.एस. पद्धतीऐवजी एम.के.एस. (मीटर-किलोग्रॅम-सेकंद) ही लांबी-वस्तुमान-काळ मोजण्याची नवी मूल एकके वापरात आली. (आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमध्ये अँपियर, केल्व्हिन, कॅन्डेला, आणि मोल अशी आणखी चार मूल एकके आहेत.)

या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमध्ये, इरिडियम व प्लॅटिनियम यांच्या मिश्र धातूपासून(आयपीके) बनलेल्या आणि फ्रान्समध्ये ठेवलेल्या एका विशिष्ट ठोकळ्याच्या वस्तुमानाला एक किलोग्रॅम असे म्हणतात..1

बाह्य दुवे[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.