राजतरंगिणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजतरंगिणी हा संस्कृत काव्यग्रंथ काश्मिरी कवी कल्हण याने इसवी सन ११४७ ते ११५२ या काळात रचला. या दीर्घकाव्यामध्ये काश्मीरचा इतिहास, भूगोल, निरनिराळ्या जनसमूहांची मिसळण आणि काश्मीरची संस्कृती यांची वैशिष्ट्ये उलगडली आहेत. आठ तरंगांमध्ये (अध्यायांमध्ये) विभागलेल्या या संस्कृत काव्यात ७,८२६ श्लोक आहेत.

या पुस्तकाप्रमाणे काश्मीरचे जुने नाव ‘कश्यपमेरु’ होते.

काश्मीरमध्ये सर्वात आधी पांडवांमधला सर्वात छोटा भाऊ सहदेव याने राज्य स्थापले, असे राजतरंगिणीच्या प्रथम चरणात लिहिले आहे. इ.स.पूर्व २७३ साली काश्मीरमध्ये बौद्ध धर्म आला, असे हा ग्रंथ सांगतो..

राजतरंगिणीची भाषांतरे आणि भाषांतरकर्ते[संपादन]

  • इंग्रजी अनुवाद - ऑरेल स्टाईन आणि गोविंद कौल (१९व्या शतकाचा उत्तरार्ध)
  • Kings of Kashmir (इंग्रजी अनुवाद - योगेशचंद्र दत्त)
  • मूळ संस्कृत मजकुरासह हिंदी अनुवाद - श्रीरामतेजशास्त्री पाण्डेय
  • इंग्रजी अनुवाद - विजयालक्ष्मी पंडित यांचे पती रणजित पंडित (१९६८)
  • फारसी अनुवाद - काश्मीर नरेश जैन-उल-अजान
  • मराठी अनुवाद - वामनशास्त्री लेले (१९२९)
  • मराठी अनुवाद - अरुणा ढेरे (प्रकाशनाधीन, २०१७)