Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ६६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रा.म. १७ या पानावरून पुनर्निर्देशित)
भारत  राष्ट्रीय महामार्ग 66
Map
लांबी १६४० किमी
सुरुवात पनवेल
मुख्य शहरे मुंबई (रा. म. ४८ मार्गे) - पनवेल - रत्नागिरी - सिंधुदुर्ग - पणजी - उडुपी - मंगलोर - कोळिकोड - कोचीन
शेवट कन्याकुमारी
राज्ये महाराष्ट्र: ४७५ किमी
गोवा: १३७ किमी
कर्नाटक: २९४ किमी
केरळ: ६७८ किमी
तमिळनाडू: ५६ किमी
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.

राष्ट्रीय महामार्ग ६६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. जवळपास पूर्णपणे अरबी समुद्राच्या किनारपट्टीजवळून १६४० किमी धावणारा हा महामार्ग मुंबईला तामिळनाडूमधील कन्याकुमारी ह्या शहराशी जोडतो. पनवेल, चिपळूण, संगमेश्वर, रत्‍नागिरी, सावंतवाडी, पणजी, उडुपी, मंगलोर, कालिकत, कोची, कोल्लम, तिरुअनंतपुरम, नागरकोईल ही रा.म. ६६ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ६६ हा कोकणातील तिन्ही जिल्हे जोडणारा एकमेव राष्ट्रीय महामार्ग आहे. १९९८ सालापर्यंत कोकण रेल्वे सुरू होण्यापूर्वी रा. म.६६ हा कोकणातील गावांना मुंबईसोबत जोडणारा एकमेव दुवा होता.

मुंबई-गोवा महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेऊन महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रा. म. ६६ च्या चौपदरीकरणाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे[].

रा.म. ६६ वरील महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणे, शहरे व गावे

[संपादन]
रा. म. १७ कुंदापूरजवळ

रा.म. ६६ वरील घाट आणि घाटरस्ते

[संपादन]

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाट, भोस्ते घाट, परशुराम घाट, कामथे घाट, आरवली घाट, निवळी घाट, अंजनारी घाट, वाकेड घाट, राजापूर घाट, कोडे घाट, नडगिवे घाट, वागदे घाट, अकेरी घाट, इन्सुली घाट इत्यादी घाट येतात.

हा महामार्ग रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्या मध्ये असलेल्या वडखळ,डोलवी,गडब गावातून अतिशय अरूंदपणे गेलेला आहे....वडखळ नाक्याची बाजारपेठ सोडली कि अलिबागला सरळ जाणारा रस्ता वगळता डावीकडे गोव्याला कंटिन्यू करताना डोलवी फाटक,इस्पात कंपनी,जॉन्सन कंपनी इथे खूपच अरुंद आणि निमुळता रस्ता आहे. कशेडी घाट ते सावंतवाडी हे तीनशे किलोमीटरचे अंतर आहे.. या महामार्गावर कशेडी घाटात परशुराम, भोस्ते, कामथे, ओणी, इन्सुली या ठिकाणी अत्यंत धोकादायक घाटवळणाचा रस्ता आहे..तसेच काही ठिकाणी अरुंद पूल आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावरील बहादुरशेख नाका सोडल्यानंतर पुढे कळंबस्ते फाटा येतो. तेथून पुढे रेल्वे मार्गापासून काही अंतरावर आंबडसकडे फाटा फुटतो. तो लोटे येथे बाहेर पडतो. परशुराम घाटरस्त्याला आंबडस मार्गे रस्त्याचा पर्याय आहे; मात्र त्याचा उपयोग केला जात नसल्याने त्याची नियमित डागडुजी होत नसल्याने या रस्त्याचा फारसा उपयोग होत नाही. शिवाय या रस्त्याचे अंतर ८० किमी असल्याने तसेच हा रस्ता जंगलातून जातो. कामथे घाटाला टेरवमार्गे खेर्डी रस्त्याचा पर्याय आहे. कुंभार्ली घाटाला नवजा मार्गाचा पर्याय आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरून एका मिनिटाला पाच गाड्या ये-जा करीत असतात. त्यामुळे रस्त्यावर रात्रंदिवस रहदारी असते. कशेडी किंवा भोस्ते घाटात एखादा अपघात झाला किंवा दरड कोसळली, तर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबते. अशीच अवस्था परशुराम घाटाची आहे. खेड तालुक्‍यातील लोटेपासून पुढे भरणे नाक्‍यापर्यंतचा रस्ता एखाद्या दुर्घटनेमुळे रोखला गेला, तर कोतवली मार्गे जाणाऱ्या रस्त्याचा पर्याय उपलब्ध आहे. खाडीपट्ट्यातील गावांमधून जाणाऱ्या या पर्यायी रस्त्याचा उपयोग काही प्रमाणावर केला जातो. लोटे येथून सुरू होणारा हा ३५ किमी लांबीचा रस्ता खेड शहरात बाहेर पडतो.

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3757481.cms Archived 2008-12-04 at the Wayback Machine. महाराष्ट्र टाईम्स, २६ नोव्हेंबर २००८

बाह्य दुवे

[संपादन]
  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ