महिपतबुवा ताहराबादकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महिपतबुवा ताहराबादकर-मूळ आडनाव कांबळे (जन्म : इ.स. १७१५; मृत्यू : ६ सप्टेंबर १७९०) हे एक थोर मराठी कवी व संतचरित्रकार होते. दादोपंत कांबळे आणि गंगाबाई हे त्यांचे वडील आणि आई. वयाच्या साठाव्या वर्षी दादोपंतांना हा मुलगा झाला.

लहानपणापासून महिपतींना भजन कीर्तनाचा लळा. त्यांच्या वयाच्या १६व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यावर प्रपंचाचा भार त्यांच्यावर पडला. गावची कुलकर्णी ही जवाबदारी त्यांच्याकडे होती, परंतु सरकारी अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यावर त्यांनी ही चाकरी सोडली, आणि पूर्णवेळ भजन कीर्तन हा ईश्वरोपासनेचा मार्ग स्वीकारला. त्यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते. तुकाराम महाराजांच्या प्रेरणेने उतारवयात ते ग्रंथ रचनेकडे वळले. शनिमाहात्म्य हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ.

महिपतबुवांनी विविध संतांची चरित्रे अभंगरूपाने गायली. 'प्रभंजनाचे योगे जाणा l डोळे तृणांचे बुझावत l तेवी आपले बुद्धीस स्फुरण ते l तुझे सत्येने पांडुरंगा ll ही दृष्टी ठेवून त्यांनी मोठया भक्तिभावाने संत चरित्रग्रंथाची निर्मिती केली. त्यांची निवेदन पद्धती प्रासादिक, रसाळ व साधी आहे.

लेखन[संपादन]

महिपतीबुवांनी नाभाजी, उद्धवचितधन या होऊन गेलेल्या संतचरित्रकारांचा आधार घेऊन व 'भक्तविजय' या ओवीबद्ध संतचरित्रावरून ग्रंथरचना केली. काही माहिती त्यांनी स्वतः मिळवली.

महिपतबुवांनी लिहिलेली चरित्रे[संपादन]

 • ऋषिपंचमीवृत्त
 • कथासारामृत (या पुस्तकात कार्तिक वृत्त, माघमाहात्म्य, वैशाख वृत्त एकादशी महात्म्य या पौराणिक कथा आल्या आहेत.)
 • गणेशपुराण
 • तुलसी माहात्म्य
 • भक्त दामाजी
 • संत नामदेव
 • पांडुरंग माहात्म्य ऋषिपंचमीवृत्त
 • बोधलेबुवा
 • भक्तिलीलामृत (संत व भक्त यांच्या चरित्रावर)
 • भानुदास
 • विसोवा सराफ
 • शनिमाहात्म्य
 • संत [[ज्ञानेश्वर|ज्ञानदेव}
 • संतलीलामृत ( या पुस्तकात चांगदेवांसह एकूण ५० संतांच्या चरित्रकथा आल्या आहेत.)
 • संतविजय (या पुस्तकात २६ अध्याय असून त्यात रामदास व बाबाजी गोसावी यांची चरित्रे आहेत.)