Jump to content

भारतामधील निवडणुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Elecciones en India (es); eleiciones n'India (ast); eleccions a l'Índia (ca); Wahlen in Indien (de); toghcháin san India (ga); انتخابات در هند (fa); 印度选举 (zh); valg i Indien (da); بھارت دیاں عام چوناں (pnb); بھارتی انتخابات (ur); val i Indien (sv); בחירות בהודו (he); matdhan ka mahtwa (sa); भारत में चुनाव (hi); భారతదేశ ఎన్నికలు (te); ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਚੋਣਾਂ (pa); Elections in India (en-ca); volby v Indii (cs); இந்தியத் தேர்தல்கள் (ta); elezioni in India (it); ভারতে নির্বাচন (bn); élections en Inde (fr); भारतामधील निवडणुका (mr); eleições na Índia (pt); volitve v Indiji (sl); ഇന്ത്യയിലെ തിരഞ്ഞെടുപ്പുകൾ (ml); verkiezingen in India (nl); выборы в Индии (ru); ಭಾರತದಲ್ಲಿನ ಚುನಾವಣೆಗಳು (kn); भारतमा निर्वाचन (ne); elections in India (en); インドの選挙 (ja); Εκλογές στην Ινδία (el); Elections in India (en-gb) politične volitve za javne funkcije v Indiji (sl); ভারতে সরকারি কার্যালয়ের জন্য রাজনৈতিক নির্বাচন (bn); organisation électorale en Inde (fr); politiska val för offentliga ämbeten i Indien (sv); भारत में लोकतांत्रिक चुनाव (hi); భారతదేశ రాజకీయ ఎన్నికలు నిర్వహించే విధానం (te); ਭਾਰਤ ਵਿੱਚ ਜਨਤਕ ਦਫ਼ਤਰਾਂ ਲਈ ਸਿਆਸੀ ਚੋਣਾਂ (pa); political elections for public offices in India (en); political elections for public offices in India (en) indijske volitve (sl); ఎన్నికల వ్యవస్థ (te); ਭਾਰਤ ਦੀਆਂ ਆਮ ਚੋਣਾਂ, ਭਾਰਤੀ ਚੋਣਾਂ (pa); India elections, Indian elections, elections of India (en); 印度選舉 (zh)
भारतामधील निवडणुका 
political elections for public offices in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारaspect in a geographic region
उपवर्गनिवडणूक
चा आयामनिवडणूक
स्थान भारत
भाग
  • legislative assembly election in India
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.[]ह्या देशात संसदीय प्रणाली आहे जी भारताच्या संविधानाने परिभाषित केली आहे. ह्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये शक्ती वितरीत केली आहे.

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे औपचारिक प्रमुख आहेत. तथापि, भारताचे पंतप्रधान, जे लोकसभेच्या राष्ट्रीय निवडणुकीत बहुमत असलेल्या पक्षाचे किंवा राजकीय आघाडीचे नेता आहे. पंतप्रधान हे भारत सरकारच्या कार्यकारी शाखेचे नेते आहेत. पंतप्रधान हे राष्ट्रपतींचे मुख्य सल्लागार आणि केंद्रीय मंत्री परिषदेचे प्रमुख आहेत.

भारत प्रादेशिकरित्या राज्यांमध्ये (आणि केंद्रशासित प्रदेश) विभागलेला आहे आणि प्रत्येक राज्याचे एक राज्यपाल आहे जे राज्याचे प्रमुख आहे. परंतु कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे जे प्रादेशिक बहुमत मिळविलेल्या पक्षाचे किंवा राजकीय आघाडीचे नेता आहे.

निवडणूक प्रशासन

[संपादन]

निवडणूक आयोग ही भारताची संघराज्य संस्था आहे जी राज्यघटनेच्या तरतुदींनुसार अंमलात आणली गेली आहे. ही भारतातील सर्व निवडणूक प्रक्रियांवर देखरेख आणि प्रशासन करण्यासाठी जबाबदार आहे. कोणत्याही पक्षपात न करता निवडणूका मुक्त आणि निष्पक्ष आहेत याची खात्री करण्यासाठी ही संस्था जबाबदार आहे.[]

निवडणूकांचे प्रकार

[संपादन]

भारतीय प्रजासत्ताकमधील निवडणुकांमध्ये खालील निवडणुकांचा समावेश होतो:

जेव्हा एखाद्या विशिष्ट घटकातील जागाधारकाचा मृत्यू होतो, किंवा राजीनामा दिला जातो किंवा अपात्र ठरवला जातो तेव्हा पोटनिवडणूक घेतली जाते.

संसदीय सार्वत्रिक निवडणूका (लोकसभा)

[संपादन]

लोकसभा (हाऊस ऑफ द पीपल) किंवा भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य भारतातील सर्व प्रौढ (१८+ वय वर्षे) नागरिकांच्या मतदानाद्वारे निवडले जातात. नागरिकांच्या संबंधित मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांच्या गटातून ही निवडणूक होते. प्रत्येक पात्र नागरिक त्यांच्या मतदारसंघातच मतदान करू शकतो. लोकसभा निवडणूकीत जिंकलेल्या उमेदवारांना 'संसद सदस्य' किंवा खासदार म्हणले जाते आणि पाच वर्षे किंवा मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी सभा विसर्जित करेपर्यंत त्यांची जागा ठेवली जाते. नवीन कायदे तयार करणे, भारतातील सर्व नागरिकांना प्रभावित करणारे, विद्यमान कायदे काढून टाकणे किंवा सुधारणे या विषयांवर सभागृहाची बैठक नवी दिल्लीतील संसद भवनाच्या लोकसभा चेंबर्समध्ये होते. लोकसभेच्या ५४३ सदस्य निवडण्यासाठी ५ वर्षांतून एकदा निवडणूका होतात.[]

लोकसभा निवडणूकीचा इतिहास

[संपादन]
लोकसभा निवडणूका[][][][]
लोकसभा

(निवडणूक)
एकूण जागा पहिला दुसरा तिसरा
पक्ष जागा मतांची टक्केवारी पक्ष जागा मतांची टक्केवारी पक्ष जागा मतांची टक्केवारी
१ ली

(१९५१-५२)
४८९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३६४ ४४.९९% भारतीय कम्युनिस्ट पक्ष १६ ३.२९% समाजवादी पक्ष १२ १०.५९%
२ री

(१९५७)
४९४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३७१ ४७.७८% भारतीय कम्युनिस्ट पक्ष २७ ८.९२% प्रजा सोशलिस्ट पार्टी १९ १०.४१%
३ री

(१९६२)
४९४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३६१ ४४.७२% भारतीय कम्युनिस्ट पक्ष २९ ९.९४% स्वतंत्र पक्ष १८ ७.८९%
४ थी

(१९६७)
५२० भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २८३ ४०.७८% स्वतंत्र पक्ष ४४ ८.६७% भारतीय जनसंघ ३५ ९.३१%
५ वी

(१९७१)
५१८ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ३५२ ४३.६८% भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) २५ ५.१२% भारतीय कम्युनिस्ट पक्ष २३ ४.७३%
६ वी

(१९७७)
५४२ जनता पक्ष २९५ ४१.३२% भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १५४ ३४.५२% भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) २२ ४.२९%
७ वी

(१९८०)
५२९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) ३५३ ४२.६९% जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) ४१ ९.३९% भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ३७ ६.२४%
८ वी

(१९८४)
५४१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४१४ ४८.१२% तेलुगू देशम पक्ष ३० ४.०६% भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) २२ ५.७२%
९ वी

(१९८९)
५२९ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १९७ ३९.५३% जनता दल १४३ १७.७९% भारतीय जनता पक्ष ८५ ११.३६%
१० वी

(१९९१)
५३४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २४४ ३६.४०% भारतीय जनता पक्ष १२० २०.०७% जनता दल ५९ ११.७३%
११ वी

(१९९६)
५४३ भारतीय जनता पक्ष १६१ २०.२९% भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १४० २८.८०% जनता दल ४६ ८.०८%
१२ वी

(१९९८)
५४३ भारतीय जनता पक्ष १८२ २५.५९% भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १४१ २५.८२% भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ३२ ५.१६%
१३ वी

(१९९९)
५४३ भारतीय जनता पक्ष १८२ २३.७५% भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ११४ २८.३०% भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ३३ ५.४०%
१४ वी

(२००४)
५४३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १४५ २६.५३% भारतीय जनता पक्ष १३८ २२.१६% भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) ४३ ५.६६%
१५ वी

(२००९)
५४३ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २०६ २८.५५% भारतीय जनता पक्ष ११६ १८.८०% समाजवादी पक्ष २३ ३.२३%
१६ वी

(२०१४)
५४३ भारतीय जनता पक्ष २८२ ३१.३४% भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४४ १९.५२% अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम ३७ ३.३१%
१७ वी

(२०१९)
५४३ भारतीय जनता पक्ष ३०३ ३७.७०% भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ५२ १९.६७% द्रविड मुन्नेत्र कळघम २४ २.३६%
१८ वी

(२०२४)
५४३ भारतीय जनता पक्ष २४० ३६.५६% भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९९ २१.१९% समाजवादी पक्ष ३७ ४.५८%

राज्य विधानसभा निवडणूका

[संपादन]

राज्य विधानसभेचे सदस्य, त्यांच्या संबंधित मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांच्या गटातून थेट मतदानाद्वारे निवडले जातात. भारतातील प्रत्येक प्रौढ नागरिक त्यांच्या मतदारसंघातच मतदान करू शकतो. राज्य विधानसभेच्या निवडणुका जिंकणाऱ्या उमेदवारांना 'मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली' (एमएलए) किंवा आमदार म्हणले जाते.

राज्यांच्या विधानसभा निवडणूका
राज्य / केंद्रशासित प्रदेश १९५० चे दशक १९६० चे दशक १९७० चे दशक १९८० चे दशक १९९० चे दशक २००० चे दशक २०१० चे दशक २०२० चे दशक
आंध्र प्रदेशमधील निवडणुका १९५५
१९५७
१९६२
१९६७
१९७२
१९७८
१९८३
१९८५
१९८९
१९९४
१९९९
२००४
२००९
२०१४
२०१९
२०२४
अरुणाचल प्रदेशमधील निवडणुका  –  – १९७८ १९८०
१९८४
१९९०
१९९५
१९९९
२००४
२००९
२०१४
२०१९
२०२४
आसाममधील निवडणुका १९५२
१९५७
१९६२
१९६७
१९७२
१९७८
१९८३
१९८५
१९९१
१९९६
२००१
२००६
२०११
२०१६
२०२१
BR 1952

1957
1962

1967

1969
1972

1977
1980

1985
1990

1995
2000

2005 (Feb)

2005 (Oct)
2010

2015
2020

2025

CG State didn't exist. Was part of MP. (Established in 2000) 2003

2008
2013

2018
2023
DL 1952  –  –  – 1993

1998
2003

2008
2013

2015
2020

2025

GA  – 1963

1967
1972

1977
1980

1984

1989
1994

1999
2002

2007
2012

2017
2022
GJ  – 1962

1967
1972

1975
1980

1985
1990

1995

1998
2002

2007
2012

2017
2022
HR  – 1967

1968
1972

1977
1982

1987
1991

1996
2000

2005

2009
2014

2019
2024
HP 1952

1967 1972

1977
1985

1990

1993

1998
2003

2007
2012

2017
2022
JK 1951

1957
1962

1967
1972

1977
1983

1987
1996 2002

2008
2014 2024 (expected)
JH State didn't exist. Was part of Bihar. (Established in 2000) 2005

2009
2014

2019
2024
KA Mysore 1952

Mysore 1957
Mysore 1962

Mysore 1967
Mysore 1972

1978
1983

1985

1989
1994

1999
2004

2008
2013

2018
2023
KL 1952 Thiru-Kochi

1954 Thiru-Kochi

1957
1960

1965

1967
1970

1977
1980

1982

1987
1991

1996
2001

2006
2011

2016
2021
मध्य प्रदेशमधील निवडणूका Bhopal 1952

MB 1952

MP 1952

VP 1952

1957
1967 1972

1977
1980

1985
1990

1993

1998
2003

2008
२०१३
२०१८
२०२३
महाराष्ट्रामधील निवडणूका  – १९६२
१९६७
१९७२
१९७८
१९८०
१९८५
१९९०
१९९५
१९९९
२००४
२००९
२०१४
२०१९
२०२४
MN  – 1967 1972

1974
1980

1984
1990

1995
2000

2002

2007
2012

2017
2022
ML  –  – 1972

1978
1983

1988
1993

1998
2003

2008
2013

2018
2023
MZ  –  – 1972

1978

1979
1984

1987

1989
1993

1998
2003

2008
2013

2018
2023
NL  – 1964

1969
1974

1977
1982

1987

1989
1993

1998
2003

2008
2013

2018
2023
OR 1952

1957
1961

1967
1971

1974

1977
1980

1985
1990

1995
2000

2004

2009
2014

2019
2024
PB 1952

1957
1962

1967

1969
1972

1977
1980

1985
1992

1997
2002

2007
2012

२०१७
२०२२
PY  – 1964

1969
1974

1977
1980

1985
1990

1991

1996
2001

2006
2011

2016
2021
RJ 1952

1957
1962

1967
1972

1977
1980

1985
1990

1993

1998
2003

2008 2013

2018 2023
SK  –  – 1979 1985

1989
1994

1999
2004

2009
2014

2019

2024
TN MS 1952

MS 1957
MS 1962

MS 1967
1971

1977
1980

1984

1989
1991

1996
2001

2006
२०११
२०१६
२०२१
तेलंगणामधील निवडणूका १९५२ (हैद्रबाद) राज्य स्थापना २०१४ साली झाली. २०१४
२०१८
२०२३
त्रिपुरामधील निवडणूका[]  – १९६७ १९७२
१९७७
१९८३
१९८८
१९९३
१९९८
२००३
२००८
२०१३
२०१८
२०२३
उत्तर प्रदेशमधील निवडणूका १९५१
१९५२
१९५७
१९६२
१९६७
१९६९
१९७४
१९७७
१९८०
१९८५
१९८९
१९९१
१९९३
१९९६
२००२
२००७
२०१२
२०१७
२०२२
उत्तराखंडमधील निवडणूका राज्य स्थापना २००० साली झाली. २००२
२००७
२०१२
२०१७
२०२२
पश्चिम बंगालमधील निवडणूका १९५२
१९५७
१९६२
१९६७
१९६९
१९७१
१९७२
१९७७
१९८२
१९८७
१९९१
१९९६
२००१
२००६
२०११
२०१६
२०२१

राज्यसभा निवडणूका

[संपादन]

राज्यसभा, हे भारताच्या संसदेचे वरचे सभागृह आहे. ह्याचे उमेदवार थेट नागरिकांद्वारे निवडले जात नाहीत, परंतु विधानसभेच्या सदस्यांद्वारे निवडले जातात. १२ सदस्य हे भारताचे राष्ट्रपती नामनिर्देशित करू शकतात जे कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक सेवांमधील योगदानासाठी उल्लेखनीय आहे. राज्यसभेतील संसद सदस्यांना सहा वर्षांचा कार्यकाळ मिळतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवडले जातात. एखादे विधेयक कायदा होण्यापूर्वी राज्यसभा द्वितीय-स्तरीय पुनरावलोकन संस्था म्हणून काम करते. []

निवडणूक प्रक्रिया

[संपादन]
८० वरील ज्येष्ठ नागरिक भोपाळमध्ये घरून मतदान करत आहेत.
भारतीय निवडणुकांमध्ये वापरली जाणारी शाई
मतदान यंत्र

उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाते. कोणत्याही पक्षाला प्रचारासाठी सरकारी संसाधने वापरण्याची परवानगी नाही. सरकार निवडणुकीच्या काळात प्रकल्प सुरू करू शकत नाही. मतदानाच्या दोन दिवस आधी संध्याकाळी ६.०० वाजता प्रचार संपतो.

सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मतदान असते. (काही प्रदेशांसाठी, ही वेळ वेगळी असू शकते.) प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मतदानाची जबाबदारी घेतात. मतदान केंद्रांवर मतदान अधिकारी म्हणून सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत. निवडणुकीतील फसवणूक रोखण्यासाठी मतपेटीऐवजी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा (ईव्हीएम) वापर केला जात आहे. नागरिकांनी मत दिल्यानंतर त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला शाईने चिन्हांकित केले जाते. ही प्रथा १९६२ मध्ये सुरू करण्यात आली.

भारतात वापरल्या जाणाऱ्या मतदान केंद्रासाठी गोपनीयता राखण्याची विभाजक.

घरबसल्या मतदान

[संपादन]

भारताच्या निवडणूक आयोगाने ८० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना आणि शारीरिक समस्या असलेल्यांना मतपत्रिका वापरून घरी मतदान करण्याची परवानगी दिली आहे.[१०] या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, पात्र व्यक्तींनी नियुक्त केलेल्या बूथ-स्तरीय अधिकाऱ्याकडे निवडणुकीच्या तारखेच्या किमान १० दिवस अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.[११]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ Richetta, Cécile; Harbers, Imke; van Wingerden, Enrike (2023). "The subnational electoral coercion in India (SECI) data set, 1985–2015". Electoral Studies. 85. doi:10.1016/j.electstud.2023.102662. ISSN 0261-3794.
  2. ^ "The Election Commission of India: Guardian of Democratic Integrity". IndiaFocus News.
  3. ^ "Terms of the Houses". Election Commission of India. 19 February 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Lok Sabha Election Results 1951-2004". Election Commission of India. 5 April 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Lok Sabha Election Results 2009". Election Commission of India. 5 April 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "General Election 2014". Election Commission of India. Apr 15, 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 April 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "General Election 2019 (Including Vellore PC)". Election Commission of India. Jul 24, 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 April 2021 रोजी पाहिले.
  8. ^ "43. India/Tripura (1949-present)". University of Central Arkansas. 28 February 2022 रोजी पाहिले.
  9. ^ "Rajya Sabha Election 2017: Here Is How Members Are Elected To Upper House". NDTV.com. 29 April 2019 रोजी पाहिले.
  10. ^ "EC provides facility to voters above 80 years of age & Divyanga to vote from home". News On AIR - News Services Division. 13 November 2023. 13 November 2023 रोजी पाहिले.
  11. ^ Ayub, Jamal (8 November 2023). "Vote From Home: Madhya Pradesh Polling Stations Come To The Doorstep For Elderly & Disabled". The Times of India. 13 November 2023 रोजी पाहिले.