२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक ही भारताच्यागुजरात राज्यामधील विधानसभा निवडणूक होती. ह्या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले गेले. गेले २२ वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला काँग्रेस पक्षाने मोठे आव्हान दिले होते. पक्षाध्यक्ष राहुल गांधी तसेच पंततप्रधान मोदी ह्यांनी गुजरातमध्ये कसून प्रचार केला होता.