Jump to content

१९६७ लोकसभा निवडणुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९६७ लोकसभा निवडणुका
भारतीय सार्वत्रिक निवडणुका
देशभारत संपादन
कार्यक्षेत्र भागभारत संपादन
मागील.१९६२ लोकसभा निवडणुका संपादन
पुढील१९७१ लोकसभा निवडणुका संपादन
तारीख२१ फेब्रुवारी 1967 संपादन
आरंभ वेळ१७ फेब्रुवारी 1967 संपादन
शेवट२१ फेब्रुवारी 1967 संपादन
Office contestedभारताचे पंतप्रधान, लोकसभा सदस्य संपादन
यशस्वी उमेदवारइंदिरा गांधी संपादन
उमेदवारचक्रवर्ती राजगोपालाचारी संपादन

१९६२ लोकसभा निवडणुका ह्या चौथ्या लोकसभेच्या ५२३ सदस्यांपैकी ५२० सदस्य निवडण्यासाठी १७ ते २१ फेब्रुवारी १९६७ दरम्यान भारतात झाल्या. लोकसभेच्या मागील अधिवेशनाच्या तुलनेत ह्या वेळी १५ ने सदस्यांनी वाढ झाली होती.[] राज्य विधानसभेच्या निवडणुकाही एकाच वेळी घेण्यात आल्या होत्या.

शासनस्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने लक्षणीय बहुमत कमी करूनही सत्ता राखली. १३ मार्च १९६२ रोजी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

पार्श्वभूमी

[संपादन]

१९६७ पर्यंत भारतातील आर्थिक वाढ मंदावली होती. १९६१-६६ पंचवार्षिक योजनेत ६% वार्षिक वाढीचे लक्ष्य दिले होते, परंतु वास्तविक विकास दर २% होता. लाल बहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली १९६५ च्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात भारताचा विजय झाल्यानंतर सरकारची लोकप्रियता वाढली होती. परंतु चीनबरोबरच्या १९६२ च्या युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आला होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट निर्माण होत होती, तर त्याचे दोन लोकप्रिय नेते नेहरू आणि शास्त्री दोघेही मरण पावले होते. शास्त्री यांच्यानंतर इंदिरा गांधी काँग्रेसच्या नेत्या म्हणून विराजमान झाल्या होत्या, परंतु त्यांच्या आणि उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यात मतभेद निर्माण झाले होते, जे १९६६ च्या पक्ष नेतृत्वाच्या स्पर्धेत त्यांचे प्रतिस्पर्धी होते.[]

निकाल

[संपादन]

काँग्रेसला सात राज्यांमध्ये धक्का बसला, ज्यात गुजरातचा समावेश होता, जेथे काँग्रेसने २४ पैकी ११ जागा जिंकल्या तर स्वतंत्र पक्षाने १२ जागा जिंकल्या. मद्रास राज्यात, काँग्रेस ने ३९ पैकी ३ जागा जिंकल्या आणि द्रविड मुन्नेत्र कळघमने २५ जागा जिंकल्या. ओरिसा, जिथे त्यांनी २० पैकी ६ जागा जिंकल्या आणि स्वतंत्र पक्षाने ८ जागा जिंकल्या. राजस्थान मध्ये त्यांनी २० पैकी १० जागा जिंकल्या व स्वतंत्र पक्षाने ८ जागा जिंकल्या. पश्चिम बंगालमध्ये ४० पैकी १४ जागा जिंकल्या, केरळमध्ये १९ पैकी फक्त १ जागा जिंकली. दिल्ली जिथे त्यांनी ७ पैकी १ जागा जिंकली तर उर्वरित ६ जागा ह्या भारतीय जनसंघाने जिंकल्या होत्या.[] निवडणुकींमध्ये नऊ राज्यांतील सत्तेतून काँग्रेस पक्षाची हकालपट्टी करण्यात आली होती आणि नंतर एका महिन्यानंतर उत्तर प्रदेशातील कारभार गमावावा लागला होता.[]

भारताचा निकाल[]
राजकीय पक्षमतेजागा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस59,490,701२८३
स्वतंत्र पक्ष12,646,847४४
भारतीय जनसंघ13,580,935३५
द्रविड मुन्नेत्र कळघम5,529,405२५
भारतीय कम्युनिस्ट पक्ष7,458,396२३
संयुक्त सोशलिस्ट पार्टी7,171,627२३
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)6,246,522१९
प्रजा सोशलिस्ट पार्टी4,456,487१३
बांग्ला काँग्रेस1,204,356
अकाली दल - संत फतेह सिंह दल968,712
शेतकरी कामगार पक्ष1,028,755
अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉक627,910
इंडियन युनियन मुस्लिम लीग413,868
भारतीय रिपब्लिकन पक्ष3,607,711
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स210,020
जन क्रांती दल183,211
ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स112,492
युनायटेड गोअन्स - सेक्वेरिया ग्रुप100,137
नागालँड राष्ट्रवादी संघटना-
अपक्ष20,106,051३५
नामांकित-
वैध मते145,866,510५२३
अवैध मते6,858,101-
एकूण मते152,724,611-
वैध मतदार250,207,401-

तीन सदस्यांची नामांकनाने नियुक्ती करण्यात आली: अँग्लो-इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणारे दोन आणि नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सीचे प्रतिनिधित्व करणारे एक. नागालँड राष्ट्रवादी संघटना पक्षाचे एस.सी. जमीर हे नागालँड लोकसभा मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते.

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 "General Election of India 1967, 4th Lok Sabha" (PDF). Election Commission of India. p. 5. 18 July 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 13 January 2010 रोजी पाहिले.
  2. "politics since independence". The Age. 2 June 1970. 11 May 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 March 2014 रोजी पाहिले.
  3. Ananth, V. Krishna (2017-02-22). "Why 1967 general election was a watershed in Indian politics and the lessons it left behind". DNA India (इंग्रजी भाषेत). 12 July 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2020-12-03 रोजी पाहिले.
  4. ECI