उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक, २०१७
भारत
२०१२ ←
११ फेब्रुवारी - ८ मार्च, २०१७ → २०२२

उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व ४०३ जागा
बहुमतासाठी २०२ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता नरेंद्र मोदी अखिलेश यादव मायावती
पक्ष भारतीय जनता पक्ष समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष
आघाडी राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मागील निवडणूक 47 224 80
जागांवर विजय 312 47 19
बदल 265 177 61
एकूण मते 34,403,039 18,923,689 19,281,352
मतांची टक्केवारी 39.7% 21.8% 22.2
परिवर्तन 24.7% 7.35 3.71%

  चौथा पक्ष पाचवा पक्ष
 
नेता अनुप्रिया पटेल राहुल गांधी
पक्ष अपना दल (सोनेलाल) काँग्रेस
आघाडी रालोआ
मागील निवडणूक - 28
जागांवर विजय 9 7
बदल 9 21
एकूण मते 8,51,336 5,416,324
मतांची टक्केवारी 1.0% 6.2%
परिवर्तन 1.0% 5.43%

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

अखिलेश यादव
सपा

निर्वाचित मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ
भाजप

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ११ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान ७ फेऱ्यांमध्ये घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेमधील सर्व ४०३ जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. मागील मुख्यमंत्री अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे तर भूतपूर्व मुख्यमंत्री मायावती ह्या बहुजन समाज पक्षाच्या नेत्या होत्या. भारतीय जनता पक्षाने आपला नेता जाहीरना करता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्याच नावाखाली निवडणूक प्रचार केला. उत्तर प्रदेशसोबत उत्तराखंड, गोवा, पंजाबमणिपूर ह्या राज्यांमध्ये देखील विधानसभा निवडणुका घेतल्या गेल्या. सर्व निवडणुकांचे निकाल ११ मार्च २०१७ रोजी घोषित करण्यात आले.

ह्या निवडणुकीत भाजपला अभुतपूर्व यश मिळाले व ४०३ पैकी तब्बल ३२५ जागांवर रालोआचे उमेदवार विजयी झाले. पश्चिम उत्तर प्रदेश, बुंदेलखंड, अवध, पूर्वांचल इत्यादी सर्व भौगोलिक भागांमध्ये भाजपने मुसंडी मारली व सपा-काँग्रेस आघाडी तसेच बसपा ह्या प्रमुख पक्षांना दारुण अपयशाचा सामना करावा लागला. भाजपच्या विधिमंडळ बैठकीदरम्यान गोरखपूर मठाचे पुजारी व विद्यमान लोकसभा सदस्य योगी आदित्यनाथ ह्यांची मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली व १९ मार्च २०१७ रोजी त्यांनी पदाची शपथ घेतली.

निकाल[संपादन]

पक्ष आघाडी जागा लढवल्या जागा जिंकल्या जागा बदल मत टक्केवारी बदल
भारतीय जनता पक्ष रालोआ 384 312 265 39.7% 24.7%
अपना दल (सोनेलाल) रालोआ 11 9 9 1.0% 1.0%
सुहेलदेव भारतीय समाज पार्टी रालोआ 8 4 4 0.7% 0.7%
समाजवादी पक्ष 298 47 177 21.8% 7.7%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस समाजवादी पक्ष 105 7 21 6.2% 5.43%
बहुजन समाज पक्ष 403 19 61 22.2% 3.71%
राष्ट्रीय लोक दल 131 1 8 1.8% 0.53%

बाह्य दुवे[संपादन]