२०२२ मधील भारतातील निवडणुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२२ मधील भारतातील निवडणुकांमध्ये भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, लोकसभेच्या]] पोटनिवडणुका, राज्यसभेच्या निवडणुका, सात राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका, पोटनिवडणुका यांचा समावेश आहे.[१]

राष्ट्रपती निवडणूक[संपादन]

१८ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली आणि २१ जुलै २०२२ रोजी मतमोजणी झाली. द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या पुढील राष्ट्रपती म्हणून निवड झाली. [२]

उपराष्ट्रपती निवडणूक[संपादन]

६ ऑगस्ट २०२२ रोजी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाली. त्याच दिवशी मतमोजणी झाली आणि जगदीप धनखड यांची भारताचे पुढील उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. [३]

राज्य विधानसभेच्या निवडणुका[संपादन]

२०२२ मध्ये ७ राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यातील फक्त पंजाब व हिमाचल प्रदेश मध्ये पक्ष व मुख्यमंत्री परिवर्तन झाले.

दिनांक राज्य निवडणुका आधिचे सरकार निवडणुका आधिचे मुख्यमंत्री निवडणुका नंतरचे सरकार निवडणुका नंतरचे मुख्यमंत्री नकाशा
१४ फेब्रुवारी २०२२ गोवा भारतीय जनता पक्ष प्रमोद सावंत भारतीय जनता पक्ष प्रमोद सावंत
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
१४ फेब्रुवारी २०२२ उत्तराखंड भारतीय जनता पक्ष पुष्कर सिंह धामी भारतीय जनता पक्ष पुष्कर सिंह धामी
२० फेब्रुवारी २०२२ पंजाब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चरणजीत सिंह चन्नी आम आदमी पक्ष भगवंत मान
२८ फेब्रुवारी, ५ मार्च २०२२ मणिपूर भारतीय जनता पक्ष एन. बीरेन सिंह भारतीय जनता पक्ष एन. बीरेन सिंह
नॅशनल पीपल्स पार्टी
नागा पीपल्स फ्रंट
१०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारी,
३, ७ मार्च २०२२
उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्ष योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्ष योगी आदित्यनाथ
निषाद पक्ष
अपना दल (सोनेलाल)
१२ नोव्हेंबर २०२२ हिमाचल प्रदेश भारतीय जनता पक्ष जयराम ठाकूर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सुखविंदर सिंह सुक्खू
१, ५ डिसेंबर २०२२ गुजरात भारतीय जनता पक्ष भूपेन्द्र पटेल भारतीय जनता पक्ष भूपेन्द्र पटेल

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Terms of the Houses". Election Commission of India. 27 Aug 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Droupadi Murmu elected 15th President of India". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2022-07-21. ISSN 0971-751X. 2022-07-21 रोजी पाहिले.
  3. ^ "Vice-Presidential poll on August 6". The Hindu (इंग्रजी भाषेत). 2022-06-29. ISSN 0971-751X. 2022-07-09 रोजी पाहिले.