११ मार्च २०१७ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने ७० पैकी ५७ जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले. काँग्रेस पक्षाला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले तर उर्वरित दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला.
भाजपने विधिमंडळ पक्षनेतेपदी त्रिवेंद्र सिंह रावत ह्यांची निवड केली व १८ मार्च २०१७ रोजी रावत ह्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.