आमदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आमदार हा त्याचे मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी असतो. लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे.हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य आहे. दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून याची निवड होते.

आमदाराचा कालावधी: विधानसभा सदस्य म्हणजेच आमदाराचा कालावधी पाच वर्षाचा असतो. विधानसभेची मुदत संपल्याने आमदारकीचा कार्यकाल संपतो. विधानसभेची मुदत पाच वर्षांची आहे परंतु मुख्यमंत्र्याच्या विनंतीनुसार राज्यपाल त्याआधीच बरखास्त सुद्धा करू शकतात. आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेची ही मुदत वाढवली सुद्धा जाऊ शकते, परंतु एका वेळी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वाढविता येत नाही.आमदर होण्यासाठी वयोमर्याद कीमान 25 असने अवश्यक असते.