Jump to content

गोवा विधानसभा निवडणूक, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोवा विधानसभा निवडणूक, २०१७
भारत
२०१२ ←
४ फेब्रुवारी २०१७ → २०२२

गोवा विधानसभेच्या सर्व ४० जागा
बहुमतासाठी २१ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता प्रतापसिंह राणे लक्ष्मीकांत पार्सेकर सुदिन धवलीकर
पक्ष काँग्रेस भाजप मगोप
मागील निवडणूक २१
जागांवर विजय १७ १३
बदल
एकूण मते २,५९,७५८ २,९७,५८८ १,०३,२९०
मतांची टक्केवारी २८.४% ३२.५%

  चौथा पक्ष
 
पक्ष गोवा फॉरवर्ड पार्टी
मागील निवडणूक
जागांवर विजय
एकूण मते ३१,९००
मतांची टक्केवारी ३.५%

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

लक्ष्मीकांत पार्सेकर
भाजप

निर्वाचित मुख्यमंत्री

मनोहर पर्रीकर
भाजप

गोवा विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या गोवा राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये गोवा विधानसभेमधील सर्व ४० जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. मागील निवडणुकीत मनोहर पर्रीकर ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला २१ जागंसह बहुमत मिळाले होते. २०१४ साली पर्रीकरांनी भारताचे संरक्षणमंत्रीपद स्वीकारले व गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. लक्ष्मीकांत पार्सेकर ह्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली.

११ मार्च २०१७ रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पक्ष १७ जागांवर विजय मिळवून सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला तर भाजपला १३ जागांवर समाधान मानावे लागले. परंतु २ अपक्ष आमदारांनी तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व गोवा फॉरवर्ड पार्टी ह्या दोन पक्षांच्या प्रत्येकी ३ आमदारांनी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यंच्या अटीनुसार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर ह्यांनी पुन्हा गोव्याच्या राजकारणात परतून मुख्यमंत्रीपद स्वीकारले व १४ मार्च २०१७ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून देखील त्यांच्या पदरी निराशा आली.

बाह्य दुवे

[संपादन]