Jump to content

राणी पद्मिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Rani Padmini (it); রানী পদ্মিনী (bn); રાણી પદ્માવતી (gu); Rani Padmini (ast); Рани Падмини (ru); राणी पद्मिनी (mr); Rani Padmini (de); رانی پدماوتی (ur); 帕德靡妮王后 (zh); රාණි පද්මිනී (si); رانی پدماوتی (pnb); ラーニー・パドミニー (ja); रानी पद्मिनी (bho); Rani Padmavti (en); Rani Padmini (id); ਰਾਣੀ ਪਦਮਨੀ (pa); റാണി പത്മിനി (ml); Rani Padmini (nl); Rani Padmini (es); रानी पद्मावती (hi); rani padmini (te); 라니 파드마바티 (ko); ৰাণী পদ্মিনী (as); रानी पद्मावती (ne); रानी पद्मिनी (mai); ராணி பத்மினி (ta) भारतीय रानी (१३ - १४ शताब्दी) (ne); ভারতীয় রাণী (bn); പതിന്നാലാം നൂറ്റാണ്ടിൽ ഇന്ത്യയില്‍ ജീവിച്ചിരുന്ന ഒരു ഐതിഹാസിക ഇന്ത്യൻ രാജ്ഞി (ml); भारतीय रानी (hi); ভাৰতীয় ৰাণী (as); ඉන්දියානු ‍රැජින (si); Indian queen (en); कहानी में एगो नायिका (bho); चित्तौडगढ राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी (mr); இந்திய வீர மங்கை (ta) رانی پدمانی (ur); Padmavati, Pudmini of Cheetore (en); राणी पद्मिणी (mr); 帕德瑪瓦蒂 (zh); පද්මාවතී, චීතෝරයේ පද්මිනී, පද්මිනී (si)
राणी पद्मिनी 
चित्तौडगढ राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी
An 18th-century painting of Padmini
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
मृत्यू तारीखइ.स. १३०३
मृत्युची पद्धत
उत्कृष्ट पदवी
वैवाहिक जोडीदार
  • Ratnasimha
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राणी पद्मिनी ऊर्फ पद्मावती ही चित्तोडगढ राज्याची राणी व राजा रतनसिंह याची पत्‍नी होती, असे सांगितले जाते. . मलिक मोहम्मद जायसी याने इ.स. १५४०च्या सुमारास तिच्यावर अवधी भाषेत पद्मावत नावाचे महाकाव्य लिहिले होते. या महाकाव्याने पद्मावती नावाच्या काल्पनिक पात्राला जन्म दिला. पद्मावतीचे नाव इतिहासात सापडत नाही.

उपलब्ध दंतकथेप्रमाणे राणी पद्मावतीची कहाणी पुढीलप्रमाणे आहे.

सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका, सासरा आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी राजवंशाचा संस्थापक असणाऱ्या जलालुद्दिन खिलजीचा कपटाने आणि अतिशय क्रूरपणे खून करून, त्याचे मुंडके भाल्याच्या टोकात खूपसून पूर्ण सैन्यातून मिरवून, त्यानंतर आपले भाऊ व साल्यांचे मुडदे पाडून २१ ऑक्टोबर १२९५ रोजी अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीश्वर झाला. सत्तेसाठीचा रक्तपात आटोपून अल्लाउद्दीनने भारतातील इतर राज्यांवर आक्रमण करून लूट मिळवण्याचे सत्र सुरू केले. चित्तोड(इ.स.१३०३), गुजरात (१३०४), रणथंबोर(१३०५), माळवा(१३०५), सिवाना(१३०८), देवगिरी(१३०९), वरंगळ (१३१०), जालोर(१३११), द्वारसमुद्र(??, १३११) आदि राज्यांवर आक्रमणे करून अल्लाउद्दीनने परमार, वाघेला, चामहान(चौहान), यादव, काकाटीय, होयसाळ, पांड्य आदि साम्राज्ये उद्ध्वस्त केली. हजारोंचा नरसंहार केला, लाखोंचे धर्मपरिवर्तन केले, कोट्यवधींचीया संपत्ती व हत्ती-घोड्यांची लूट केली आणि अगणित हिंदुसतानी माताभगिनींचा शीलभंग करून त्यांना आपल्या जनानखान्यात भरती केले वा बाजारात विकण्यास्तव गुलाम बनवून नेले. इतिहासकारांच्या लेखण्यांना लिहितानाही लाज वाटेल इतके रानटी व सैतानी अत्याचार अल्लाउद्दीन व त्याच्या सैनिकांनी केले.

अल्लाउद्दीन दिल्लीच्या गादीवर असतांना मेवाडात रावळ वंशाचा राणा रतनसिंह गादीवर होता व चित्तोडगड ही त्याची राजधानी होती.आणि रतिप्रमाणे अद्भूत,आरसपानी अशा लावण्याची खाण असलेली पद्मिनी मेवाडची महाराणी होती. सिंहली(श्रीलंकेचा ?) राजा गंधर्वसेन व राणी चंपावतीची रुपगर्विता राजकन्या असणारी पद्मिनी लहानपणापासून युद्धकौशल्यात निपुण होती. तिच्या स्वयंवराचा पण असा होता की जो कोणी तिने निवडलेल्या सैनिकाला लढाईत हरवेल, त्याच्याच गळ्यात ती वरमाला घालेल.आणि असे म्हणतात की तो सैनिक म्हणजे स्वतः पद्मिनीच असे. तर असा पण जिंकून राणा रतनसिंहाने पद्मिनीला वरले. रतनसिंह आपल्या प्रजाहितदक्ष राज्यकारभारासाठी आणि पद्मिनी आपल्या रूपासाठी त्याकाळी जगविख्यात होते.

रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता. कसल्यातरी गुन्ह्यासाठी राण्याने राघव चेतनला अपमानित करून दरबारातून हाकलून दिले. सूडाग्नीने पेटलेला राघव चेतन दिल्ली राज्यातील एका वनात जाऊन बसला जेथे खिलजी नियमितपणे शिकारीला येत असे. एके दिवशी खिलजीचे शिकारी टोळके येताना पाहून राघव चेतनने सुंदर बासरी वाजवणे सुरू केले. बासरीचे सूर ऐकून अल्लाउद्दीनने त्याला आपल्यासमोर हजर करण्यास सांगितले. त्यावेळी त्याने राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे रसभरित वर्णन करून सांगितले की, "तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे", हे ऐकून खिलजीच्या व्यभिचारी व लंपट मनात पद्मिनीच्या प्राप्तीची इच्छा बळावली.आणि पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी 1303मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली व गडाला वेढा घातला. राजपुतांच्या चिवट प्रतिकारामुळे आठ महिने होऊनही खिलजीला काहीच यश मिळत नव्हते.तेंव्हा त्याने रतनसिंहाकडे निरोप पाठवला की, "मला जर राणी पद्मिनीचे दर्शन करविण्यात आले, तर मी दिल्लीला निघून जाईन." प्रजाहितास्तव राण्याने हे मान्य केले. परंतु यामागील कुटिल डाव ओळखून राणी पद्मिनीने स्वतः समोर न जाता आरशातून खिलजीला स्वतःचे प्रतिबिंब दाखवण्यात यावे,असे सुचविले.त्याप्रमाणे खिलजीला पद्मिनीचे प्रतिबिंब दाखवण्यात आले अन् कपटी,लंपट खिलजी राणीचे रूप पाहून आणखीनच चेकाळला. 'अतिथी देवो भव' या भारतीय मूल्याचे पालन करण्यास्तव (परंतु देश-काल-पात्राचा विवेक न केल्यामुळे जी आपल्याच अंगावर उलटून अनेकदा आपली 'सद्गुणविकृती' ठरली) रतनसिंह गडाच्या दरवाजापर्यंत गेला.मात्र खिलजी व त्याच्या सैनिकांनी कपटाने राजाला कैद करून खाली आपल्या पाडावात नेले आणि निरोप पाठवला की ,"राणा जिवंत हवा असेल तर पद्मिनीला आमच्या स्वाधीन करा."

गडावर सैनिकी खलबते झडली. आणि गडावरून निरोप गेला की,"राणी पद्मिनी तिच्या पन्नास दासींसमवेत अल्लाउद्दीनच्या डेऱ्यात दाखल होईल, पण त्याबदल्यात राणा रतनसिंहास सोडून देण्यात यावे." ठरल्याप्रमाणे राणी व तिच्या दासी एका-एका पालखीत व त्या पालखी उचलणारे चार-चार पालखीचे भोई खिलजीच्या डेऱ्यात दाखल झाले.राणी पद्मिनीची पालखी खिलजीच्या शामियान्यासमोर थांबली. राणा रतनसिंहाला मोकळे करून घोड्यावर बसवण्यात आले. पद्मिनीच्या पालखीतून एक स्त्री उतरली.अन्य पन्नास पालख्यांतून पन्नास दासीही उतरल्या. संकेत झाला. आणि....आणि हे काय? क्षणात पद्मिनी, त्या दासी व त्या भोयांच्या हातात पालखीत लपवून ठेवलेल्या तलवारी तळपायला लागल्या. राणीचा मामा गोराच पद्मिनीचा वेश घेऊन आणि त्याचा पुतण्या बादल (ही गोरा-बादलची काका-पुतण्याची जोडगोळी राजस्थानी लोकगीतांमध्ये फार प्रसिद्ध आहे). काही निवडक सैनिकांना घेऊन स्त्रीवेश धारण करून खिलजीच्या डेऱ्यात घुसले होते. काही कळायच्या आतच सपासप कत्तल सुरू झाली.गोरा तर खुद्द अल्लाउद्दीनच्या तंबूत शिरला व त्याची गर्दन उडवणार तो त्याने आपल्या दासीला समोर केले. स्त्रीवर वार न करण्याच्या राजपूत बाण्यामुळे गोरा थांबला अन् मागून आलेल्या खिलजीच्या सैनिकांनी गोराचे मुंडके धडावेगळे केले. आपल्या स्वामीचे प्राण वाचविण्यासाठी गोराने हौतात्म्य पत्करले.बादल व अन्य राजपूत सैनिक आपल्या राण्याला घेऊन झपाट्याने गडावर निघून गेले अन् खिलजी हात चोळत राहिला.

आता मात्र झालेल्या प्रकाराने डिवचलेला हा विषारी भुजंग त्वेषाने चालून गेला. काही दिवस गड झुंजविल्यानंतर गडावरील रसद संपत आली आणि अंतिम युद्धासाठी राणा रतनसिंह व राजपूत वीर सिद्ध झाले. २५ ऑगस्ट १३०३ रोजी गडाचे दरवाजे उघडून, 'जय एकलिंग,जय महाकाल'चे नारे देऊन राजपूत सेना खिलजीच्या सेनासागराशी भिडली. परंतु संख्याबळात कमी असल्यामुळे लढाईचा अपेक्षितच निर्णय आला. दहा-दहा सुलतानी सैनिकांना लोळवून एक-एक राजपूत मृत्युमुखी पडला..लढाई संपली. राण्यासहित सर्व राजपूत मारले गेले. अन् वखवखलेले सुलतानी लांडगे आपल्याला सोळा हजार राजपूत जनानींची शिकार करायला मिळणार, म्हणून गडात घुसले.

पण गडावर शिरताच पाहतात तर काय, एकही स्त्री दिसेल तर शपथ.थोडे पुढे जाऊन चित्तोडगडावरील जगप्रसिद्ध 'विजयस्तंभ' ओलांडल्यावर लागणाऱ्या विस्तीर्ण मैदानावर, जिथे आज 'जौहर स्थल' म्हणून पाटी लागलेली आहे, तिथे राजपूतांच्या पराभवाची वार्ता मिळताच, खिलजीचे सैन्य गडावर शिरण्यापूर्वीच राणी पद्मिनी व सोळा सहस्र वीरांगनांनी ज्या अग्निसाक्षीने आपल्या प्राणनाथांना वरले होते, त्याच अग्नीत उड्या घेतल्या. स्वतःच्या शीलाचे व देव, देश अन् धर्माचे रक्षण करण्यास्तव या सोळा हजार तेजस्वी अग्निशलाका आगीत जळून भस्म झाल्या..तसे चित्तोडगडाने यानंतरही दोन मोठे जोहार अनुभवले, पण हा जोहार युगानुयुगे या देशाला प्रेरणा देणारा ठरला.

लढाई संपल्यावर सुमारे ३०,००० निष्पाप नागरिकांची अल्लाउद्दीनने कत्तल केली, असे त्याच्याच दरबारातील लेखक अमीर खुस्रोने लिहून ठेवले आहे.

ता घटनेवरचा महाराणी पद्मिनी हा हिंदी चित्रपट इ.स. १९६४ मध्ये आला होता. त्यानंतर संजय लीला भन्साळीचा पद्मावत नावाचा हिंदी सिनेमा २०१८ साली 'पद्मावती' चित्रपटगृहांत लागला.

महाराणी पद्मिनी विषयीची पुस्तके

[संपादन]
  • महाराणी पद्मिनी (नाटक - पु.भा. भावे)
  • महाराणी पद्मिनी (मेधा इनामदार)
  • महाराणी पद्मिनी (श्री.पु. गोखले)
  • महाराणी पद्मिनी (मराठी दूरचित्रवाणी मालिका)
  • राणी पद्मिनी (राजेंद्र देशपांडे)

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. "The epic poem Padmavat is fiction. To claim it as history would be the real tampering of history".
  2. "Rani Padmini and four other Hindutva history myths exploded".
  3. रानी पद्मिनी की गौरव गाथा सोनी पर[permanent dead link]। हिंदी मीडिया.इन
  4. "क्या रिश्ता था अलाउद्दीन ख़िलजी और मलिक काफ़ूर का?".
  5. चित्तौड़गढ़-प्रणय तथा वीरता का प्रतीक Archived 2017-11-16 at the Wayback Machine.। टी.डी.आई.एल
  1. चित्तौड़ की रानी पद्मावती और अल्लाउद्दीन खिलजी की कहानी का सच Archived 2017-11-16 at the Wayback Machine.