दीपिका पडुकोण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दीपिका पडुकोन-भावनानी
दीपिका पादुकोण
जन्म दीपिका प्रकाश पडुकोन
५ जानेवारी, १९८६ (1986-01-05) (वय: ३८)
कोपनहेगन, डेन्मार्क
इतर नावे दिपू
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय, मॉडेलिंग
कारकीर्दीचा काळ २००६-चालू
भाषा हिंदी, कोंकणी, कानडी, इंग्रजी
प्रमुख चित्रपट बाजीराव मस्तानी, पिकू, पद्मावत इत्यादी
वडील प्रकाश पडुकोण
आई उज्ज्वला पडुकोण
पती
अधिकृत संकेतस्थळ https://www.deepikapadukone.com

दीपिका पदुकोण ( ५ जानेवारी १९८६) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ओम शांती ओम हा आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत आहे.२०१७ साली तिचा विन डिझेल सोबत XXX हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सर्वात जास्त मानधन घेणारी नटी आहे. तिने स्वतःचे वस्त्र उद्योग उघडले आहे.


कौटुंबिक आयुष्य[संपादन]

बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत ती बॅडमिंटन खेळली, परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी खेळण्यातला रस कमी करून ती चित्रपटाकडे वळली आणि ऐश्वर्या या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत २००६मध्ये पदार्पण केले. तिची मातृभाषा कोकणी आहे. शिवाय तिला इंग्लिश भाषा, हिंदी भाषा, कन्नड या भाषा येतात. बेंगळुरूमधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. दीपिका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सोबत विवाहित आहे.

कारकीर्द[संपादन]

उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले.

फोर्ब्जच्या यादीत १०वी[संपादन]

दीपिका पदुकोण ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचे फोर्ब्जच्या यादीवरून समजते. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्‍न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.तिने १० कोटी आयकर भरला आहे.

फुटबॉल विश्वचषक २०२२ ट्रॉफीचे अनावरण[संपादन]

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने जगभरातल्या चाहत्यांना भुरळ घालणारी दीपिका नक्कीच एक इंटरनॅशनल स्टार आहे. कतार मध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक २०२२ या जागतिक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फिफा विश्वचषक ट्रॉफीचे अनावरण दीपिका पदुकोणच्या हस्ते होणार आहे. 18 डिसेंबर रोजी, दीपिका पदुकोण लुसेल आयकॉनिक स्टेडियमवर वर्ल्ड कप ट्रॉफीचे अनावरण करणार आहे. तिच्या तमाम चाहत्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

चित्रपट सूची[संपादन]

वर्ष नाव भूमिका टीपा
२००६ ऐश्वर्या ऐश्वर्या कन्नड सिनेमा
२००७ ओम शांती ओम शांतीप्रिया/स्यांडी फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार‎
२००८ बचना ऐ हसीनो गायत्री जखार
२००९ चांदनी चौक टू चायना सखी/सूझी
२००९ लव्ह आज कल मीरा पंंडित
२०१० कार्तिक कॉलिंग कार्तिक शोनाली मुखर्ज्जी
२०१० हाउसफुल्ल सौंदर्या राव/ स्यंडी
२०१० लफंगे परिंदे पिंकी पारकर
२०१० ब्रेक के बाद आलिया खान
२०१० खेलें हम जी जान से कल्पना दत्ता
२०११ आरक्षण पूर्वी आनंद
२०११ देसी बॉइज राधिका अवस्त्ती
२०१२ कॉकटेल वेरोनिका
२०१३ रेस २ अलीना मलिक
२०१३ ये जवानी है दीवानी नैना तलवार फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित
२०१३ चेन्नई एक्सप्रेस मिनालोचनी अझगसुंंदरम फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित
२०१३ गोलियों की रासलीला राम-लीला लीला सनेरा फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२०१४ हैप्पी न्यू इयर मोहिनी जोशी
२०१५ पिकू पिकू बॅनर्जी फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
२०१५ तमाशा तारा माहेेेश्वरी
२०१५ बाजीराव मस्तानी मस्तानी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित
२०१७ ट्रिपल एक्स : रिटर्न ऑफ झेंडेर केज सेरेेेना हॉलिवूड पदार्पण
२०१८ पद्मावत राणी पद्मावती फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित
२०१९ छपाक मालती
२०२० ८३ रोमी भाटीया

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील दीपिका पडुकोण चे पान (इंग्लिश मजकूर)

संदर्भ[संपादन]