घड्याळ
घड्याळ हे काल मापनासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. पुरातन काळी लोक सूर्याची आकाशामधील जागा पाहून वेळ ठरवत असत. त्यानंतर अगदी इस.पूर्व २५० पासून कालमापनाचे पुरावे आढळतात. भारतात घटिकापात्र अनेक शतकांपासून वापरात होते. पण त्यात त्रुटी होत्या. जसे ते पाण्यात ठेवावे लागत असे. पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने ते भरून बुडले म्हणजे ‘एक घटिका झाली’ असे मोजले जात असे. घड्याळाचा शोध लावण्यासाठी गॅलीलिओने लावलेला लंबकाच्या आवर्तनांना ठराविकच वेळ लागतो हा शोध महत्त्वाचा ठरला. लंबकाच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करण्यासाठी केला गेला. यामुळे अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली. घड्याळ्यामध्ये तीन काटे असतात. तास काटा मिनिट काटा आणि सेकण्ड काटा. जे वेळ दर्शाविण्यासाठी मदत करतात. काही घडयाळ्यांमध्ये दिवस आणि वार सुद्धा दर्शवले जाते.२४ तासाचा एक दिवस, ६० मिनिटाचा एक तास, ६० सेकंदाचा एक मिनिट असतं.
चित्रदालन[संपादन]
लंडनच्या किंग्स क्रॉस रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील घड्याळ
बाराव्या शतकातील अल-जझारीने तयार केलेले घड्याळ
अल-जझारीने लिहिलेल्या चतुर यंत्रांच्या माहितीचे पुस्तक या पुस्तकातील हत्तीघड्याळ
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |