सोनी राजदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सोनी राजदान या १९८०-९०च्या दशकांतील एक अभिनेत्री आहेत. त्‍यांनी अभिनयाची कारकीर्द इंग्रजी नाटकांपासून केली. लव्ह अफेअर हा त्यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट नानावटी प्रकरणावर आधारित आहे.

कुटुंब[संपादन]

चित्रपट निर्माते महेश भट्ट हे सोनी राजदान यांचे पती आणि अभिनेत्री आलिया भट्ट ही त्यांची कन्या.

सोनी राजदान यांच्या भूमिका असलेल्या काही मालिका/चित्रपट[संपादन]

  • खामोश (हिंदी चित्रपट)
  • बुनियाद (हिंदी दूरदर्शन मालिका)
  • मंडी (हिंदी चित्रपट)
  • लव्ह का है इंतजार (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)
  • सडक (हिंदी चित्रपट)
  • सारांश (हिंदी चित्रपट)