सिद्धार्थ मल्होत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सिद्धार्थ मल्होत्रा
जन्म १६ जानेवारी, १९८६ (1986-01-16) (वय: ३४)
दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. २०१२ - चालू
वरूण धवनआलिया भट्ट सोबत सिद्धार्थ मल्होत्रा

सिद्धार्थ मल्होत्रा (जन्म: १६ जानेवारी १९८६) हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे. सिद्धार्थने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

अभिनयात पदार्पण करण्या आधी सिद्धार्थ हा एक सक्रिय मॉडल होता तसेच त्याने करण जोहर सोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन माय नेम इज खान (२०१०) या चित्रपटासाठी काम केले आहे.सिद्धार्थने २०१२ मध्ये करण जोहरच्या 'स्टुडेंट ऑफ दि यर' या चित्रपटात आलिया भट आणि वरुण धवन यांसोबत पदार्पण केले. त्याच्या कामगिरीचे चित्रपट समिक्षकांकडुन कौतुक करण्यात आले. धर्मा प्रोडक्शन आणि फँटम फिल्म्स मध्ये तयार झालेल्या आणि विनी मॅथिव दिग्दर्शित 'हसी तो फसी' या चित्रपटात परिणिती चोप्रा आणि अदाह शर्मा यांबरोबर हा त्याचा दुसरा चित्रपट होता. त्याच्या पात्राबद्दल बोलताना तो म्हणाला "तो हरवलेला आहे, तो यशस्वी आणि हळवा नाही. तो ठराविक हिरो प्रकारचा नाही. तो चित्रपटातील सर्वात दबावाखाली असलेला आणि चिंतेत असणारा आहे." सिध्दार्थ चा सगळ्यात अलीकडचा चित्रपट म्हणजे ऐय्यारी होय.

वर्ष चित्रपट भूमिका
२०१२ स्टुडन्ट ऑफ द इयर अभिमन्यू  सिंग
२०१४ हसी तो फसी निखिल  भारद्वाज
२०१४ एक व्हिलन गुरु  दिवेकर
२०१५ ब्रदर माँटी  फेर्नांदेझ       
२०१६ कपूर अँड सन्स अर्जुन  कपूर
२०१६ बार बार देखो  जय वर्मा

बाह्य दुवे[संपादन]