ऐ दिल है मुश्किल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऐ दिल है मुश्किल
दिग्दर्शन करण जोहर
निर्मिती करण जोहर
हिरू जोहर
कथा करण जोहर
प्रमुख कलाकार रणबीर कपूर
अनुष्का शर्मा
ऐश्वर्या राय बच्चन
संगीत प्रीतम
पार्श्वगायन अरिजीत सिंग
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २८ ऑक्टोबर २०१६
वितरक फॉक्स स्टार स्टुडियोज
अवधी १५७ मिनिटे
निर्मिती खर्च ₹७० कोटी
एकूण उत्पन्न ₹२३८ कोटीऐ दिल है मुश्किल हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड प्रणयपट आहे. करण जोहरची कथा व दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटात रणबीर कपूरअनुष्का शर्मा ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ऐश्वर्या राय-बच्चन तसेच पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हे देखील ह्या चित्रपटात चमकले. ऐ दिल है मुश्किलचे चित्रण प्रामुख्याने लंडन, पॅरिसव्हियेना येथे झाले.

ऑक्टोबर २०१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या राजकीय पक्षाने चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्याची भूमिका असल्याच्या कारणावरून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह ह्यांनी चित्रपट सुरळीत प्रदर्शित करण्याचे आश्वासन दिले. करण जोहरने देखील ह्यापुढील आपल्या चित्रपटांमध्ये आपण पाकिस्तानी अभिनेत्यांना भूमिका देणार नसल्याचे जाहीर केले व २८ ऑक्टोबर २०१६ रोजी दिवाळीदरम्यान ऐ दिल है मुश्किल प्रदर्शित झाला. ऐ दिल है मुश्किल टीकाकारांच्या पसंतीस उतरला नाही, परंतु त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

बाह्य दुवे[संपादन]