डियर जिंदगी
डियर जिंदगी | |
---|---|
दिग्दर्शन | गौरी शिंदे |
निर्मिती |
गौरी खान करण जोहर |
कथा | गौरी शिंदे |
प्रमुख कलाकार |
शाहरुख खान आलिया भट्ट |
संगीत | अमित त्रिवेदी |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २५ नोव्हेंबर २०१६ |
अवधी | १५० मिनिटे |
निर्मिती खर्च | ₹२२ कोटी |
एकूण उत्पन्न | ₹१३९ कोटी |
डियर जिंदगी हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. गौरी शिंदेचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटात आलिया भट्टची प्रमुख भूमिका आहे तर शाहरुख खान सहाय्यक भूमिकेत चमकला आहे. डियर जिंदगीला तिकिट खिडकीवर चांगले यश लाभले.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कथानक
[संपादन]डिअर जिंदगी जेव्हा सगळंच संपून गेले अस आपल्याला वाटते तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची ह्या प्रेरणादायी ओळी काल रात्री रस्त्यावरून येताना मनात तराळल्या निमित्त होते 'डिअर जिंदगी' हा पिक्चर बघितला म्हणून ह्या ओळी आठवल्या आशा नाहीत, पण कोणीतरी येऊन मला गदागदा हलवून माझ्यातले मी पण जागं करून गेल्याच वाटलं. खरंच आहेना आपलं आयुष्य आपण जन्माला आल्यापासून एका भरधाव एक्सप्रेस ट्रेन सारखं जगत असतो त्यात बहुदा दुःखाचे स्टेशन कधीतरी जास्त भेटतात तर कधी सुखाचे पण ह्या दुःखाच्या संकटाच्या कधी कधी वाईट आठवणींच्या पाऊलखुणा आपल्या आयुष्यावर इतक्या ठळकपणे उठतात कि बहुदा आपण आयुष्यात स्वतःला प्रेरणाहीन करून घेतो, आठवणीच काय त्या ऊन पावसासारख्या असतात माणसाचे अनुभवच माणसाला प्रत्येक कृती करताना साथ देतात. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आशा अनुभवांना झळाळी देणारा प्रसंग काही चांगली तर काही वाईट माणसं झाली असतीलच पण खरंच शाहरुख खानच्या त्या डायलॉग प्रमाणे आपली प्रत्येकाची लाईफ झिग -सॉ पझल सारखी आहेत कोणीना कोणीतरी आपल्याला त्याचे पझल पिसेस शोधायला मदत करेल ही पण सगळं गेम आपल्यालाच पूर्ण करायला हवा आयुष्यात आपण आपलेच गेम मेकर असायला हवे दुःख, संकट, वाईट आठवणी, त्रास, द्वेष निर्माण करणारे अनेक प्रसंग आणि त्या निमित्ताने येणारी माणसे येणारच पण त्या आलिया भट्टच्या शब्दाप्रमाणे आपण जर स्वतःला समजून घेतले तर दुसरं कोण आपल्या बाबतीत काय बोलतं, काय विचार करतं याची आपल्याला पर्वा किंवा काळजी वाटतं नाही Life is about twist and turns it is about experiencing everything and anything it throws your way some people are here to teach us lessons while other people will be here forever as we grow old together. एका इंग्रजीच्या स्टोरी बुक मधल्या ह्या ओळी नुसार जर आपण आपलं आयुष्य जगायला लागलो तर आपल्याला कोणत्या थेरपिस्ट किंवा सायकॅट्रीस्ट कडे जायची गरज पडणार नाही. पण आज दुर्दैवाने आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्याच्या पाट्या टाकण्यात इतके व्यस्त झालेलो आहोत कि आपण आपली ओळख विसरत चाललेलो आहोत डिअर जिन्दगीच्या निमित्ताने एका मानसिक आरोग्य व मानशास्त्रीय दृष्टिकोनाला प्रकाशझोतात आणणाऱ्या पिक्चर किंवा सिनेमाला पाहताना काळ सतत ते शब्द मनात घोळू लागले, "तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी" खरं आहे आपण कायम आयुष्यात अवघड रस्ते निवडतो आपल्या कामासाठी पण कधी कधी सोपे रस्ते किंवा सोपे मार्ग पण आपल्या कमी येऊ शकतात हे आपल्याला लक्षात येत नाही. आयुष्यात कायम वाईट किती घडलं आणि चांगलं किती घडलं भूतकाळ कसा होता त्यावर आपलं भविष्य व वर्तमानकाळ अवलंबून नसतो म्हणूनच डिअर जिंदगीच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या प्रत्येकाला स्वतःमध्ये अंर्तभूत करणारा व मानसशास्त्रीय सकारात्मक विचार नेणारा सिनेमा प्रत्येकाने एकदातरी पाहावाच. कोणतेही गाणं, सिनेमा, चित्र हे अनुभवांना आठवणींचा गारवा देणारं असत म्हणून डेनिस वेईटलेच्या (Denis waitly) वाक्यानुसार "A good life is a collection of happy memories" लाईफ मध्ये आपल्याला प्रत्येकाला 'Move on' करता आलं पाहिजे "Life is like coin you can spend it any way you wish but you only spend it ones"- Lillien Dicksonच्या वाक्यानुसार आपल्याला आपली लाईफ डिअर जिन्दगी म्हणून जगता आली पाहिजे त्यामध्ये प्रत्येकाला शाहरुख खान सारख्या लाईफच्या पझलची पिसेस शोधून देणारा खरा थेरपिस्ट किंवा सायकॅट्रीस्ट मिळेलच असे नाही पण जेव्हा जेव्हा आपण आपल्यामध्ये हरवून गेलो आहोत असे वाटेल तेव्हा मनमुराद हसता रडता व जसे पण आहे आपल्याला वाट्याला आलेले आयुष्य सकारात्मकरित्या जगता आले पाहिजे.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील डियर जिंदगी चे पान (इंग्लिश मजकूर)