अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
Appearance
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
Chief Minister of State of Arunachal Pradesh | |
---|---|
अरुणाचल प्रदेशची राजमुद्रा | |
भारतीय ध्वजचिन्ह | |
अरुणाचल प्रदेश सरकार | |
दर्जा | राज्यशासनाचे प्रमुख |
सदस्यता | अरुणाचल प्रदेश विधिमंडळ (विधानसभा) |
मुख्यालय | मंत्रालय, इटानगर |
नियुक्ती कर्ता | अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
निर्मिती | १३ ऑगस्ट १९७५ |
पहिले पदधारक | प्रेम खंडू थुंगन |
उपाधिकारी | अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री |
अरुणाचल प्रदेशचा मुख्यमंत्री हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
मुख्यमंत्र्यांची यादी
[संपादन]क्र | नाव | चित्र | पदावरील काळ | कार्यकाळ | निवडणूक | पक्ष | ||
---|---|---|---|---|---|---|---|---|
अरुणाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश (१९७२ ते १९८७) (१९७२ मध्ये उत्तर पूर्व पुनर्रचना अधिनियमद्वारे आसाम राज्याचे विभाजन करत अरुणाचल प्रदेशची विधिमंडळासह केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना. पहिली निवडणूक १९७८ साली) | ||||||||
१ | प्रेम खंडू थुंगन (जन्म १९४६) (मतदारसंघ: दिरांग-कलकतांग) |
१३ ऑगस्ट १९७५ | १८ सप्टेंबर १९७९ | ४ वर्षे, ३६ दिवस | — ————————— १९७८ |
जनता पक्ष | ||
२ | टोमो रिबा (१९३४-२०००) (मतदारसंघ: बसर) |
१८ सप्टेंबर १९७९ | ३ नोव्हेंबर १९७९ | ० वर्षे, ४६ दिवस | — | पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश | ||
- | पर रिकामे (राष्ट्रपती राजवट) |
३ नोव्हेंबर १९७९ | १८ जानेवारी १९८० | ० वर्षे, ७६ दिवस | — | - | ||
३ | गेगॉंग अपांग (जन्म १९४७) (मतदारसंघ: तुतिंग-यिंगकियाँग) |
१८ जानेवारी १९८० | २० फेब्रुवारी १९८७ | ७ वर्षे, ३३ दिवस | १९८० ————————— १९८४ |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
अरुणाचल प्रदेश राज्य (१९८७ पासून) (१९८७ मध्ये अरुणाचल प्रदेशला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला.) | ||||||||
(३) | गेगॉंग अपांग (दुसरा कार्यकाळ) (जन्म १९४७) (मतदारसंघ: तुतिंग-यिंगकियाँग) |
२० फेब्रुवारी १९८७ | १९ जानेवारी १९९९ | ११ वर्षे, ३३३ दिवस | — ————————— १९९० ————————— १९९५ |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
अरुणाचल काँग्रेस | ||||||||
४ | मुकुट मिठी (जन्म १९५२) (मतदारसंघ: रोइंग) |
१९ जानेवारी १९९९ | ३ ऑगस्ट २००३ | ४ वर्षे, १९६ दिवस | १९९९ | अरुणाचल काँग्रेस (मिठी) | ||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||||||||
(३) | गेगॉंग अपांग (तिसरा कार्यकाळ) (जन्म १९४७) (मतदारसंघ: तुतिंग-यिंगकियाँग) |
३ ऑगस्ट २००३ | ९ एप्रिल २००७ | ३ वर्षे, २४९ दिवस | — ————————— २००४ |
युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट | ||
भारतीय जनता पक्ष | ||||||||
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||||||||
५ | दोरजी खांडू (१९५५-२०११) (मतदारसंघ: मुक्तो) |
९ एप्रिल २००७ | ३० एप्रिल २०११ | ४ वर्षे, २१ दिवस | — ————————— २००९ | |||
६ | ॲड. जारबोम गमलीन (१९६१-२०१४) (मतदारसंघ: लिरोंबा) |
५ मे २०११ | १ नोव्हेंबर २०११ | ० वर्षे, १८० दिवस | — | |||
७ | नबं तुकी (जन्म १९६४) (मतदारसंघ: सागाली) |
१ नोव्हेंबर २०११ | २६ जानेवारी २०१६ | ४ वर्षे, ८६ दिवस | — ————————— २०१४ | |||
- | पर रिकामे (राष्ट्रपती राजवट) |
२८ जानेवारी २०१६ | १९ फेब्रुवारी २०१६ | ० वर्षे, २४ दिवस | — | - | ||
८ | कलिखो पुल (१९६९-२०१६) (मतदारसंघ: हायुलियांग) |
१९ फेब्रुवारी २०१६ | १३ जुलै २०१६ | ० वर्षे, १४५ दिवस | — | पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश | ||
(७) | नबं तुकी (दुसरा कार्यकाळ) (जन्म १९६४) (मतदारसंघ: सागाली) |
१३ जुलै २०१६ | १७ जुलै २०१६ | ० वर्षे, ४ दिवस | — | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | ||
९ | पेमा खांडू (जन्म १९७९) (मतदारसंघ: मुक्तो) |
१७ जुलै २०१६ | सद्य | ८ वर्षे, ११४ दिवस | — ————————— २०१९ ————————— २०२४ |
|||
पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश | ||||||||
भारतीय जनता पक्ष |
अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट तपशील
[संपादन]अरुणाचल प्रदेशात आत्तापर्यंत एकूण दोन वेळा राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.
- पहिला कार्यकाळ : ३ नोव्हेंबर १९७९ ते १८ जानेवारी १९८० : जनता पक्ष व सत्ताधारी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल प्रदेश पक्षामधील वादविवाद विकोपाला गेल्याने तसेच सत्ताधारी पक्षातील आमदारांनी पक्षबदल केल्याने विद्यमान मुख्यमंत्री टोमो रिबा यांचे सरकार पडले. टोमो यांच्या राजीनाम्याने भारताचे विद्यमान राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डींनी राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यानंतर विधानसभा विसर्जीत करण्यात आली आणि नवी विधानसभा गठित करण्यासाठी १९८० साली निवडणूक घोषित करण्यात आली. निवडणूकीनंतर राष्ट्रपती राजवट उठविण्यात आली.
- दुसरा कार्यकाळ : २५ जानेवारी २०१६ ते १९ फेब्रुवारी २०१६ : सत्ताधारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या २१ आमदारांनी भारतीय जनता पक्षाचे ११ आणि २ अपक्ष आमदारांसोबत हातमिळवणी केल्याने विद्यमान मुख्यमंत्री नबं तुकी यांचे सरकार पडले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रपती राजवट लागू केली. परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाने अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल यांनी विधीमंडळ आणि विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजात घटनाबाह्य ढवळाढवळ करत राष्ट्रपती राजवट लावण्यास शिफारस केली असा हवाला देत लागू केलेली राष्ट्रपती राजवट १९ फेब्रुवारी २०१६ च्या निकालात घटनाबाह्य ठरवत उठवण्याचे आदेश दिले आणि नबं तुकी यांचे सरकार पुर्नस्थापित केले.