युक्रेन
युक्रेन Україна | |||||
| |||||
राष्ट्रगीत: Ще не вмерла України (Ukrainian)[१] (अर्थ: युक्रेनचे वैभव गेलेले नाही) | |||||
युक्रेनचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
क्यीव | ||||
अधिकृत भाषा | युक्रेनियन | ||||
इतर प्रमुख भाषा | रशियन, क्राइमियन तातर | ||||
सरकार | अर्ध-अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
- राष्ट्रप्रमुख | पेत्रो पोरोशेन्को | ||||
- पंतप्रधान | वलोडिमिर ग्रोय्समन | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
निर्मिती | |||||
- क्यीवन रुस | इ.स. ८८२ | ||||
- गालिसिया-व्होल्हिनियाचे राजतंत्र | इ.स. १११९ | ||||
- युक्रेनियन राष्ट्रीय प्रजासत्ताक | ७ नोव्हेंबर, १९१७ | ||||
- पश्चिम युक्रेनियन राष्ट्रीय प्रजासत्ताक | १ नोव्हेंबर १९१८ | ||||
- सोव्हिएत युक्रेन | ३० डिसेंबर १९२२ | ||||
- दुसरी स्वातंत्र्यघोषणा | ३० जून १९४१ | ||||
- सोव्हिएत संघापासून स्वातंत्र्य | २४ ऑगस्ट १९९१ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ६,०३,६२८ किमी२ (४६वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | ७ | ||||
लोकसंख्या | |||||
- २०१० | ४,५८,८८,०००[२] (२८वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | ७७/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | ३०२.६७९ अब्ज[३] अमेरिकन डॉलर (२८वा क्रमांक) | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ६,६५६ अमेरिकन डॉलर (८७वा क्रमांक) | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.७१०[४] (उच्च) (६९ वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | युक्रेनियन रिउनिया (UAH) | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+२) | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | UA | ||||
आंतरजाल प्रत्यय | .ua | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +३८० | ||||
युक्रेन (युक्रेनियन: Україна; रशियन: Украи́на; क्राइमियन तातर: Ukraina) हा पूर्व युरोपातील एक देश आहे. युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत. क्यीव ही युक्रेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
नवव्या शतकात निर्माण झालेले क्यीवन रुस हे राज्य मध्य युगादरम्यान एक बलाढ्य राष्ट्र होते. १९व्या शतकामध्ये युक्रेनचा मोठा हिस्सा रशियन साम्राज्याच्या तर उर्वरित भाग ऑस्ट्रिया-हंगेरीच्या अधिपत्याखाली होता. पहिल्या महायुद्धा व रशियन यादवीनंतर ३० डिसेंबर १९२२ रोजी सोव्हिएत संघामध्ये सामील होणारा युक्रेन हा आघाडीचा देश होता. तेंव्हापासून १९९१ सालामधील सोव्हिएत संघाच्या विघटनापर्यंत युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य हे सोव्हिएत संघातील एक आघाडीचे गणराज्य होते. २४ ऑगस्ट १९९१ रोजी युक्रेनला स्वातंत्र्य मिळाले.
इतिहास
[संपादन]नावाची व्युत्पत्ती
[संपादन]प्रागैतिहासिक कालखंड
[संपादन]भूगोल
[संपादन]६,०३,७०० वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला युक्रेन हा जगातील ४४व्या क्रमांकाचा देश आहे. ह्या बाबतीत युक्रेनचा युरोपात दुसरा क्रमांक लागतो. युक्रेनला २,७८२ किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. द्नीपर ही युक्रेनमधून वाहणारी प्रमुख नदी असून डॅन्युब नदी युक्रेन व रोमेनियाच्या सीमेवरून वाहते.
चतुःसीमा
[संपादन]युक्रेनच्या उत्तरेस बेलारूस, पूर्व व वायव्येस रशिया, पश्चिमेस पोलंड, स्लोव्हाकिया व हंगेरी, नैऋत्येस रोमेनिया व मोल्दोव्हा हे देश, दक्षिणेस काळा समुद्र तर आग्नेयेस अझोवचा समुद्र आहेत.
राजकीय विभाग
[संपादन]युक्रेन देश २४ ओब्लास्त, क्राइमिया हे स्वायत्त प्रजासत्ताक व क्यीव आणि सेव्हास्तोपोल ही दोन विशेष शहरे अशा राजकीय विभागांचा बनला आहे.
मोठी शहरे
[संपादन]शहर | शहर नाव (युक्रेनियन) | विभाग | लोकसंख्या (२००१) |
---|---|---|---|
क्यीव | Київ | क्यीव | 2,611,327 |
खार्कीव्ह | Харків | खार्कीव्ह ओब्लास्त | 1,470,902 |
द्नेप्रोपेत्रोव्स्क | Дніпропетровськ | द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त | 1,065,008 |
ओदेसा | Одеса | ओदेसा ओब्लास्त | 1,029,049 |
दोनेत्स्क | Донецьк | दोनेत्स्क ओब्लास्त | 1,016,194 |
झापोरिझिया | Запоріжжя | झापोरिझिया ओब्लास्त | 815,256 |
लिव्हिव | Львів | लिव्हिव ओब्लास्त | 732,818 |
क्रिव्यी रिह | Кривий ріг | द्नेप्रोपेत्रोव्स्क ओब्लास्त | 668,980 |
मिकोलाइव | Миколаїв | मिकोलाइव्ह ओब्लास्त | 514,136 |
मरिउपोल | Маріуполь | दोनेत्स्क ओब्लास्त | 492,176 |
|
संरक्षण दले
[संपादन]सैन्य
[संपादन]वायुसेना
[संपादन]युक्रेनी वायुसेना देशाच्या संरक्षण दलाचा भाग[५] असून याचे मुख्यालय विनित्सिया शहरात आहे. सोवियेत संघाच्या विघटनानंतर मूळ सोवियेत वायुसेनेतील अनेक विमाने युक्रेनला मिळाली व त्यातून युक्रेनी वायुसेनेची निर्मिती झाली. त्यानंतर युक्रेनने आपल्या वायुसेनेचा आकार कमी करीत असतानाच दर्जा वाढविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यातील बहुसंख्य विमाने मूळ रशिया व सोवियेत बनावटीचीच आहेत. २०२२ च्या सुमारास युक्रेनी वायुसेनेत २२५ लढाऊ विमाने होती.[६][७]
आरमार
[संपादन]समाजव्यवस्था
[संपादन]वस्तीविभागणी
[संपादन]धर्म
[संपादन]शिक्षण
[संपादन]संस्कृती
[संपादन]राजकारण
[संपादन]अर्थतंत्र
[संपादन]वाहतूक
[संपादन]युक्रेनमध्ये रस्त्यांचे जाळे १,६४,७३२ किमीचे आहे. त्यातील १०९ किमीचा क्यीव-द्निप्रोपेत्रोव्स्क आणि १८ किमी लांबीचा क्यीव-बोरिस्पिल हे मार्ग द्रुतगती मार्ग आहेत.
युक्रझालिझ्नित्सिया ही युक्रेनमधील सरकारी मालकीची रेल्वेकंपनी आहे. युक्रेनमधील लोहमार्गांवर एकाधिकार असलेली ही कंपनी २३,००० किमी लांबीच्या लोहमार्गांचे व्यवस्थापन करते.
एरोस्वित आणि युक्रेनियन इंटरनॅशनल एरलाइन्स या युक्रेनच्या सगळ्यात मोठ्या विमानकंपन्या आहेत. क्यीव आणि ल्विव येथील विमानतळ सगळ्यात मोठे असून दोनेत्स्कचा विमानतळ आता उद्ध्वस्त झाला आहे.
ओदेसा हे युक्रेनचे सगळ्यात मोठे बंदर असून येथून काळा समुद्र आणि भूमध्य समुद्रातील मोठ्या शहरांना सागरी सेवा उपलब्ध आहे.
खेळ
[संपादन]सोव्हिएत संघाच्या शारिरिक शिक्षणावर भर देण्याच्या व क्रीडा संकुले बांधण्याच्या धोरणाचा युक्रेनला फायदा झाला. संघाच्या विघटनानंतर युक्रेनला असंख्य स्टेडियम व मैदाने मिळाली. सध्या क्यीवमधील ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल हे युक्रेनमधील सर्वात मोठे व राष्ट्रीय स्टेडियम मानले जाते.
फुटबॉल हा युक्रेनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. ऑंद्रे शेवचेन्को हा येथील सर्वात लोकप्रिय फुटबॉल खेळाडू आहे. युक्रेनने युएफा यूरो २०१२ ह्या स्पर्धेचे पोलंडसोबत आयोजन केले आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Law of Ukraine. State Anthem of Ukraine" (Ukrainian भाषेत). Verkhovna Rada of Ukraine. 2003-03-06.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Ukrainian population keeps decreasing". National Radio Company of Ukraine. 2010. 2010-06-20 रोजी पाहिले.
- ^ "Ukraine". International Monetary Fund. 2010.
- ^ "Human Development Report 2010" (PDF). United Nations. 2010. 5 November 2010 रोजी पाहिले.
- ^ "Military Balance in Europe 2011", The Military Balance, 111: 73–172, 7 March 2011, doi:10.1080/04597222.2011.559835, S2CID 219628702
- ^ Trendafilovski, Vladimir (March 2006). "Ukrainian Reforms". Air Forces Monthly (216): 32–39.
- ^ Air Forces Monthly, December 2007 issue, p. 64.
बाह्य दुवे
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |