युक्रझालिझ्नित्सिया
Appearance
युक्रझालिझ्नित्सिया ही युक्रेनमधील सरकारी मालकीची रेल्वेकंपनी आहे. युक्रेनमधील लोहमार्गांवर एकाधिकार असलेल्या या कंपनीचे लोहमार्ग २३,००० किमी लांबीचे आहेत. त्यानुसार ही जगातील १४वी मोठी कंपनी ठरते.
युक्रझालिझ्नित्सिया प्रवासीसंख्येनुसार जगातील ७व्या तर मालवाहतूकीत ६व्या क्रमांकाची रेल्वेकंपनी आहे.
रशियन यादवीनंतर १९९१ साली या कंपनीची स्थापना झाली.