सोव्हिएत संघाचे विघटन
Appearance
(रशियन यादवी या पानावरून पुनर्निर्देशित)
सोव्हिएत संघाचे विघटन २६ डिसेंबर, इ.स. १९९१ रोजी झाले. सुप्रीम सोव्हिएत ऑफ द सोव्हिएत युनियनच्या ठराव क्रमांक १४२-एचनुसार सोव्हिएत संघाचा भाग असलेल्या सोव्हिएत प्रजासत्ताकांना स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. आदल्या दिवशी सोव्हिएत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाइल गोर्बाचेवने आपल्या पदाचा राजीनामा दिला व सत्ता रशियाच्या राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिनकडे दिली. त्याचबरोबर सोव्हिएत सेना आणि अणुशस्त्र प्रक्षेपकांचे संकेतही येल्त्सिनच्या हवाली करण्यात आले.