इस्लामाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


इस्लामाबाद
اسلام آباد
पाकिस्तानमधील शहर


इस्लामाबाद is located in पाकिस्तान
इस्लामाबाद
इस्लामाबाद
इस्लामाबादचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 33°43′N 73°4′E / 33.717°N 73.067°E / 33.717; 73.067

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रदेश इस्लामाबाद राजधानी क्षेत्र
स्थापना वर्ष इ.स. १९६०
क्षेत्रफळ ९०६ चौ. किमी (३५० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,७७० फूट (५४० मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १६,२९,१८०
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००


इस्लामाबाद (उर्दू: اسلام آباد) ही दक्षिण आशियामधील पाकिस्तान देशाची राजधानी व एक मोठे शहर आहे. इस्लामाबाद पाकिस्तानच्या उत्तर भागात रावळपिंडीच्या उत्तरेस वसवले गेले असून ते लाहोरच्या २९५ किमी वायव्येस, पेशावरच्या १८० किमी पूर्वेस तर श्रीनगरच्या ३०० किमी नैऋत्येस स्थित आहे.

१९४७ साली भारत व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीस पाकिस्तानची राजधानी कराची येथे होती. नव्या राजधानीसाठी पाकिस्तान सरकारने लष्कराचा प्रमुख तळ असलेल्या रावळपिंडीजवळची एक जागा निवडली व १९६० साली इस्लामाबाद शहर तेथे वसवण्यास सुरुवात झाली. १९६६ साली पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादला हलवण्यात आली. सध्या इस्लामाबाद पाकिस्तानमधील एक आघाडीचे व प्रगत शहर आहे. फैजल मशीद ही पाकिस्तानमधील सर्वात मोठी तर जगातील चौथ्या क्रमांकाची मोठी मशीद येथेच स्थित आहे.

वाहतूक[संपादन]

कराची-पेशावर रेल्वे मार्गावर स्थित असलेले लाहोर रेल्वे स्थानक हे पाकिस्तानमधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. लाहोरहून समझौता एक्सप्रेससह अनेक रेल्वेगाड्या सुटतात. बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळ हा इस्लामाबादमधील प्रमुख विमानतळ असून येथे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एरलाइन्सचा हब आहे.

खेळ[संपादन]

क्रिकेट हा इस्लामाबादमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. २००४ सालचे दक्षिण आशियाई खेळ इस्लामाबादमध्ये आयोजीत केले गेले होते.

बाह्य दुवे[संपादन]