हेमंत श्रीराम पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हेमंत श्रीराम पाटील

विद्यमान
पदग्रहण
२४ मे, २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मागील राजीव सातव
मतदारसंघ हिंगोली

कार्यकाळ
१९ ऑक्टोबर, २०१४ – २३ मे, २०१९ (राजीनामा)
मागील ओमप्रकाश गणेशलाल पोकर्णा
मतदारसंघ नांदेड दक्षिण

जन्म १६ डिसेंबर, १९७० (1970-12-16) (वय: ५३)
नांदेड
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
राजकीय पक्ष शिवसेना
पत्नी सौ. राजश्री हेमंत पाटील
व्यवसाय राजकारण

हेमंत श्रीराम पाटील (१६ डिसेंबर, १९७० - ) हे नांदेड जिल्ह्यातले शिवसेनेचे नेते आहेत‌. सध्या हिंगोली मतदारसंघातून १७व्या लोकसभेचे खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते निकटवर्तीय समजले जात होते.

हेमंत पाटील यांचा जन्म तिरोळे पाटील मराठा जातीत झाला

राजकीय कारकीर्द[संपादन]

  • २०१३: नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख
  • २०१४: महाराष्ट्राच्या १३व्या विधानसभेत नांदेड दक्षिणचे आमदार
  • २०१९: १७व्या लोकसभेत हिंगोलीचे खासदार