सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३१
माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न, इ. येथे नोंदवा.
चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण
[संपादन]या लेखाला मी दोन केटेगरी जोडल्या होत्या त्या आपण काढल्या. पुन्हा त्या काढल्या जाऊ नयेत अशी विनंती जर लेख जाती वर असेल तर त्याच्याशी संबंधीत विद्यापिठीय केटेगरी त्या लेखाला दिल्या जातात. हा संकेत पाळला जावा ही माफ़क अपेक्षा. तसं माझही जानवं आपण बघू शकता. कारण भटांच्या लेखांना भाटांनीच हात लावावा अशी आवश्यकता असेल तर ती माझ्याबाबत पूर्ण होतेय... बाकी आपण खुप विद्वान आहातच. मर्यादेय विराजते Sureshkhole १८:१६, २३ जानेवारी २०१८ (IST)
- Suresh Khole Sir, आपण एकच आशय असलेली अनेक दोन वर्ग आपण लेखात चढवताय. वर्ग:हिंदू धर्मामधील जाती व वर्ग:हिंदू धर्मामधील जातीव्यवस्था, पुन्हा वर्ग:जात अभ्यास व इतर वर्ग हे या कोणत्या प्रकारच्या लेखांसाठी आहे ? कृपया, याची माहिती द्या.
--संदेश हिवाळेचर्चा १९:११, २३ जानेवारी २०१८ (IST)
- @Sureshkhole:
- सगळ्यात पहिले - जानवे, जात, इ. येथे निरर्थक काढू नये. तुम्ही करीत असलेले बदल हे सुसंगत आणि तार्किक नसले तर ते मीच नव्हे तर कोणीही बदलू शकतो. त्यासाठी जानवे, किरपाण किंवा इतर जातीसूचक वस्तू बाळगले असण्याचे कारण नाही.
- दुसरे - हिवाळे यांनी विचारल्याप्रमाणे तुम्ही घालीत असलेले वर्ग कशासाठी आहेत? चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण हा लेख ब्राह्मण पोटजाती --> जातीनुसार पोटजाती --> जाती अशा वर्गवारीत आहे. त्यात अधिक वर्ग घालण्याचे कारण दिसत नाही. मागे उल्लेखिलेल्या वर्गवारीमध्ये बदल करण्यास वाव आहे परंतु त्यासाठीचा विचार काय आहे हे लिहावे.
- विद्यापीठीय केटेगरी म्हणजे काय?
- अभय नातू (चर्चा) २०:५९, २३ जानेवारी २०१८ (IST)
- ता.क. अभ्यास वर्ग काढला आहे पण दुसरा जातीव्यवस्थेशी निगडीत वर्ग ठेवला आहे. त्याचसोबत पूर्वीपासून असलेली सूचना प्रस्तावनेतून काढून चर्चा पानावर लावली.
अभय नातू आणि संदेश, संदेश : दलित अभ्यास, जातीव्यवस्था, जाती भिन्न बाबी आहेत. पुढील काही दिवसात त्यावर अपेक्षित असे लिखाण येईल.
अभय नातू : आपल्याला ‘चित-घाणेरडे’ जातीच्या पानाला हात लावल्या मुळेच जास्त त्रास होत आहे हे आपण मान्य करावे. तार्कीकतेचा प्रश्न असता तर आपण caste studies नावाची गोष्ट गुगलवर शोधून त्या वर लेख लिहीण्यास सुरूवात केली असतीत ‘नातूबुवा’.
जात अभ्यास हा वर्ग माझा स्वत:चा शोध नसून तो एक अभ्यास विषय म्हणुन विद्यापिठीय विश्वात शिकवीला जातो. फ़क्त त्यावर अजून फ़ारसे लिखाण मराठीत झालेले नाही. मी विस्ताराने त्यावरील पान करीनच. मी आपल्या शंकाचे समाधान करिनच, तो पर्यंत आपण त्या वर्गांबाबत शांतता बाळगावी हि माफ़क अपेक्षा. नेमकं जातीवरच लिहीलं गेल्यावर आपला जिव खवळतो यावरूनच आपला उघडपणे नि:पक्ष ‘पाती’पणा दिसून येतो. इतर अनेक पानांवर अनेक निकामी बाबी लिहिल्या गेल्या आहेत त्या स्वच्छ करण्यास आपण आपला वेळ सत्कारणी घालावा आणि काही दिवस जातीच्या पानांकडे न पाहिल्यास मला आनंद होईल. Sureshkhole २१:२५, २३ जानेवारी २०१८ (IST)
- @Sureshkhole:
- कृपया व्यक्तिगत आरोप आणि हल्ले त्वरित थांबवावे. जातींवर टीका करणेही थांबवावे.
- मला कसला त्रास होत आहे याबद्दल विकृत तर्क न लढवता येथील ज्ञानात भर घालण्याकडे लक्ष केंद्रित करावे.
- गूगलवर काय आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा तुम्ही येथे काय लिहीत आहात त्याकडे माझे लक्ष आहे. त्याबद्दल चर्चा केल्यास स्वागत आहे..
- विद्यापीठात शिकविले जात असलेले विषय येथे कसे लिहावे याचा कृपया अभ्यास करावा. तितका वेळ नसला तर इतरांकडून मदत घ्यावी.
- येथे जात, जानवे तुम्ही प्रथम काढले आहे. ते लगेच बंद करावे. प्रत्येक निकामी बाब (रिकामटेकड्या लोकांनी लिहिलेल्या) काढण्याचा मक्ता मी घेतलेला नाही. जितके शक्य आहे तितके करीत असतोच. यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची मुळीच आवश्यकता नाही.
- असो. तुमच्या खोडसाळ विधानांमुळे आता तुम्ही केलेल्या लेखनाकडे माझे आणि इतरांचेही विशेष लक्ष असेल याची खात्री बाळगावी.
- पुन्हा एकदा आठवण - व्यक्तिगत हल्ले करू नये.
- अभय नातू (चर्चा) २१:३१, २३ जानेवारी २०१८ (IST)
चिमणराव ह्या नोंदीविषयी
[संपादन]नमस्कार, मी तयार करत असलेली चिमणराव ही नोंद आपण रद्द करून ते पान पुनर्निर्देशित केलेले आढळले. ते चिं.वि. जोशी ह्या नोंदीकडे पुनर्निर्देशित करण्यात आले आहे आणि त्याचे कारण असलेला लेख असे नोंदवण्यात आले आहे. पण चिमणराव ही नोंद चिं.वि. जोशी ह्यांच्याविषयीची नसून त्यांनी लिहिलेल्या साहित्यातून साकारलेल्या चिमणराव ह्या काल्पनिक पात्राविषयीची आहे. अशा नोंदी अन्य भाषांच्या विकिपीडियांतही आढळतात. अशा काही प्रसिद्ध पात्रांविषयी लेखन करण्याचा माझा विचार आहे. उदा. गुंड्याभाऊ, पांडुरंग सांगवीकर, तळीराम, गोकुळ, बेणारे, सखाराम बाईंडर इ.
--सुशान्त देवळेकर (चर्चा) २१:३४, २० सप्टेंबर २०१७ (IST)
आपण माझ्या चर्चापानावर केेलेल्या सूचनेप्रमाणे मी त्या पानावर बदल करून काम चालू असा साचा लावतो. आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. --सुशान्त देवळेकर (चर्चा) २१:४१, २० सप्टेंबर २०१७ (IST)
अभ्युदय व नि:श्रेयस===
[संपादन]'अभ्युदय व नि:श्रेयसची दीक्षा देणारा जैन धर्म' या विषयावरील लेखाची मी सुरुवात केली होती.पण हा लेख बदलला किंवा वगळला असे म्हंटले आहे. पण त्यामागचे कारण समजू शकेल का? कारण संदर्भासहीत लिखाण अपेक्षित असते हे मला माहित आहे. ही फक्त सुरुवात होती .मी नेहमी लिहित नाही त्यामुळे कृपया मार्गदर्शन करावे .
त्वक् स्नेह ग्रंथी
[संपादन]मराठीच्या १९६२च्या नियमांनुसार शब्दाच्या शेवटी हलन्त अक्षर आल्यास ते पूर्र्ण करून लिहितात. उदा० अकस्मात्, अर्थात्, कदाचित्, दैववशात्, परिषद् भगवान्, विद्युत्, विद्वान्, सम्यक्, सम्राट्, संसद् असले शब्द लिहिताना शेवटच्या अक्षराचा पाय मोडत नाहीत. तसेच बायरन्, वॉटसन्, बँक् आदी शब्द लिहितानाही तोच संकेत पाळतात. (अपवाद - ‘आणि’ या अर्थी येणारे न् आणि अन् हे शब्द!)
शब्दातल्या शेवटच्या अक्षराचा पाय मोडू नये असा नियम असल्याने शब्दाच्या मधल्या भागात हलन्त व्यंजन आले तर त्याचा पाय मोडायला हरकत नाही, नव्हे तो मोडलाच पाहिजे. उदा० एल्एल.बी., कीट्स, घरन्घर, पीएच्डी, फूड्ज, लॉर्ड्स, वाङ्मय, विद्युत्प्रवाह, स्पोर्ट्स, वगैरे.
‘त्वक्स्नेहग्रंथी’मध्ये क् हे अक्षर शब्दाच्या मधल्या भागात आल्याने ते तसेच हलन्त लिहिता येते. ... ज (चर्चा) २२:३९, १२ जुलै २०१७ (IST)
- @ज:
- उत्तराबद्दल धन्यवाद.
- याच्याशी निगडीत शंका - जर शब्दाच्या मधले अक्षर हलन्त असले तर मग त्याची संधी का होत नाही, उदा, एल्एलबीचे एलेलबी किंवा घरन्घरचे घरन्घर (अथवा घरंघर) असे का नाही लिहिले जात? त्यासाठी काही नियम आहेत का?
- अभय नातू (चर्चा) २२:४४, १२ जुलै २०१७ (IST)
---
संधी करता येतो
[संपादन]संधी करता येतो पण असे करण्याने शब्दातल्या अक्षरांच्या मूळ रूपाला आणि अर्थाला धक्का बसणार नाही याची काळजी घेतली की झाले. एल्एल.बी ऐवजी एलेल.बी. लिहिले तर या लघु रूपातली मूळ अक्षरे कोणती ते समजणार नाही. गप्शार हा शब्द गप्शार असा लिहिला तर मूळ गप् (म्हणजे निपचित, न बोलणारा) हा शब्द असल्याचे जाणवणार नाही. संस्कृतमध्येही मा उदकैः ताडय ऐवजी मोदकैः ताडय म्हटले की ‘माझ्यावर पाणी फेकू नकोस’ या मूळ अर्थाऐवजी ऐवजी ‘माझ्यावर मोदक फेक’ असा अर्थ विचित्र अर्थ होतो. त्यामुळे शक्य असेल आणि जरूर असेल तर संधी टाळावेत, निदान मराठीत तरी.
वाङ्मय हा शब्द वाङ्मय असा लिहिला तरी चालतो, तसेच विद्युत्प्रवाहाऐवजी विद्युत्प्रवाह. या दोनही उदाहरणांत संधी करण्याने काही तोटा झालेला नाही.. तसे एलेल्बी किंवा पीएच्डीमध्ये होत नाही. त्वक् स्नेह ग्रंथी हा शब्द त्वक्स्नेहग्रंथी असा लिहिता येईल, पण त्याचा उच्चार करणे काहींना जड जाईल.
आपण ज्या चिन्हाला पाय मोडायचे चिन्ह म्हणतो त्याला संस्कृत, हिंदी आणि तमाम अन्य भारतीय भाषांमध्ये ‘विराम चिह्न’ म्हणतात. अर्थ स्पष्ट आहे, तो असा की जेव्हाजेव्हा देशी शब्दात हे चिन्ह दिसेल तेव्हातेव्हा विराम (पॉज) घेऊन पुढचे अक्षर उच्चारायचे. घरन्घर हा शब्द घरन् (पॉज) घर असा उच्चारतात. घरन्घर किंवा घरंघर लिहिले की हा पॉज घेतला जात नाही. बालोद्यान हा शब्द बालोद्यान असा लिहिला तर उच्चार बालोद् (पॉज) यान (हे कुठले यान?) असा होऊन अर्थ विपर्यास होईल. जेव्हा विराम घेतल्याने अर्थविपर्यास होत नसेल तरच पायमोडके अक्षर लिहितात. विद्वांस या शब्दाचा उच्चार विद्(पॉज)वांस असा होत असल्याने तो विद्वांस असा लिहिणे फारसे चुकीचे नाही. मात्र ‘सध्या’ हा शब्द सध्या असा लिहिता येणार नाही. कारण शब्दाच्या उचित उच्चारात ध् नंतर विराम नाही. सद्गती, भगवद्गीता, सत्चिदानंद हे शब्द असे लिहिले तरी चालते, कारण त्यांतील हलन्त अक्षरानंतर नैसर्गिक विराम आहे..... ज (चर्चा) ००:४६, १३ जुलै २०१७ (IST)
- @ज:,
- वा! व्याकरणातील खोचा अशा उलगडून सांगितल्यात की लगेचच कळले.
- आमच्या शालेय जीवनातही असेच स्पष्टीकरण मिळत गेले असते तर काय बरे झाले असते! असो, तेव्हा नाही तर नाही, आता तरी कळते आहे (आणि वळते आहे).
- पुन्हा एकदा धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ००:५४, १३ जुलै २०१७ (IST)
मुखपृष्ठ
[संपादन]मुखपुष्ठात लेफ्ट साईड मध्ये काही खाली दिसते जागा त्यात जर खलील कोड टाकला तर कसे दिसेल ते पहा.
|-
! <div style="position: absolute; margin-top: -6px; margin-left: 4px;">[[चित्र:Wikipedia-logo.png|37px|link=|alt=]]</div><div style="margin: 0; background: #cedff2; font-size: 120%; text-align: left; font-weight: bold; -moz-border-radius:1em; -webkit-border-radius:1em; border-radius:1em; solid #f5faff; padding: 0;"><div style="margin-left: 50px;">[[सहाय्य:संपादन|<span style="color: #000000;">नवीन लेख कसा लिहावा?</span>]]</div></div>
|-
|{{मुखपुष्ठ नवीन पान २०१७}}
एक उधारण माझे धूळपाटी वर आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:१६, १७ जुलै २०१७ (IST)
बहुवचन
[संपादन]List of Caves चे मराठी भाषांतर कसे असेल? लेणींची यादी की लेण्यांची यादी ? --संदेश हिवाळेचर्चा २२:३१, १७ जुलै २०१७ (IST)
- @संदेश हिवाळे:
- बहुवचन लेण्यांची यादी असे होईल.
- Cavesचे भाषांतर गुहा होते. लेणे हे कलाकुसर (चित्र, शिल्प, इ.) असलेल्या गुहांना म्हणतात.
- अभय नातू (चर्चा) २२:५९, १७ जुलै २०१७ (IST)
सुई शोधणे
[संपादन]समुद्रातुन सुई शोधणे म्हणजे काय याचा पूर्ण अनुभव सध्या काही दिवसांपासून मी घेत आहे. :D --वि. नरसीकर (चर्चा) ०९:५१, २० सप्टेंबर २०१७ (IST)
- @V.narsikar:,
- तुम्हाला बऱ्याच सुया मिळत आहेत!
- अभय नातू (चर्चा) ०९:५६, २० सप्टेंबर २०१७ (IST)
पुण्यात नसतो
[संपादन]मी पुण्यात नसतो, भोपाळमध्ये असतो. कधी भोपाळला आलात तर भेट होईल. ... ज (चर्चा) २०:५५, २३ ऑक्टोबर २०१७ (IST)
तू पुण्यात आहेस असे कळले. कधी भेटायचे? फेसबुक वर संदेश टाकला आहे तो बघावा.. माझा फोन नंबर दिला आहे. --सुधन्वा
भेट
[संपादन]नमस्कार ! तुमचा संदेश वाचला. मी ५ नोव्हेंबरपर्यंत पुण्यात आहे. त्यानंतर सहकुटुंब कोकणात स्थलांतरीत होत आहे.त्यामुळे लवकरच ठरवूया. माझा संपर्क-xxxxx xxxx आर्या जोशी (चर्चा)
मदत
[संपादन]सर कृपा विकिपीडिया:संपादन गाळणी/अ(न)पेक्षीत क्रिया व विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन पहा --Tiven2240 2405:204:219F:CC77:0:0:234B:68AC ११:५५, २७ ऑक्टोबर २०१७ (IST)
संपादन जतन
[संपादन]नमस्कार ! लिंक पाहिली आणि एक छोटा प्रयत्नही केला. पण त्यापुढे जाउन आपले बोलणे झाल्याप्रमाणे ते विशिष्ट वाक्य (आपले संपादन जतन करण्यात आले आहे) मला सापडले नाही. त्यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन करावे.धन्यवाद !आर्या जोशी (चर्चा)
- नेमके वाक्य आणि अपेक्षित सुधारणा दिल्यास शोधायला सोपे जाईल. सवड मिळाली की येथे टाकावे.
- अभय नातू (चर्चा) ११:०१, २९ ऑक्टोबर २०१७ (IST)
फिल्टर
[संपादन]फिल्टर मध्ये बद्दल करण्यास धन्यवाद --Tiven2240 १३:५५, १ नोव्हेंबर २०१७ (IST)
विकिपीडिया आशियाई महिना २०१७: सहभागी होण्यासाठी आमंत्रण
[संपादन]नमस्कार! गेल्या तीन वर्षांपासून, मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) असे कार्यक्रम आयोजित केला जाते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी असते, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियायी विषयांवर हजारो लेख तयार करतात.
मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१७ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान ४ (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.
आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.
धन्यवाद!
विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४० (आयोजक)
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:२६, १ नोव्हेंबर २०१७ (IST)
नमस्कार अभय
[संपादन]काही विशेष नाही.फक्त नमस्कार! बर्याच दिवसांनी आलो म्हणुन माझ्या शुभेच्छा. मराठी विकिपिडिया मध्ये बरेच बदल दिसत आहेत. हळु हळु अपण ५०,००० कडे वाटचाल करत चाललो आहे. नेहमी प्रमाणे आपला आधार मला आहे हे मला माहित आहे :) .. म्हणुन मी पूर्ण प्रयत्नशील आहे की नुसते कोरे लेख नाही बनवायचे.. बाकी कसे चालले आहे?? काय नविन? काय जुने? इकडचे तिकडचे?--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!)
- छान वाटले, तुमचा संदेश वाचुन व तुम्हाला सतर्क बघुन. मी मुंबईला असतो, पण पुण्याला येत असतो कारण आई वडील तेथे असतात. का विचारले? एक छोटी विनंती, विशेष पृष्ठे->पाहिजे असलेले लेख हे पान मी सतत तपासत असतो व लाल दुवे काढायाचा प्रयत्न करत असतो.. पण हे पान अद्यायावत होत नाही आहे. शेवटच्या बदल ०९:११, २६ ऑक्टोबर २०१७ रोजी झाला होता.. तुम्हाला काही करता येईल का? त्यामुळे मला कळेल माझ्या प्रयत्नांना किती यश आला आहे.--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!)
- नमस्कार अभय, मला हि तुम्हाला भेटायाची संघी हवी होती, पण दुर्दैवाने मी मागच्या आठवड्यात पुण्यात होतो, आणि अजुन २-३ आठवडे नाही येणार आहे, कारण सुट्टी मिळत नाही.. क्षम्स्व! :( --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!)
Meta
[संपादन]Can you please assert the veracity of Mahitgar's post on Vituzzus t/p at Meta-wiki which contained:--Secondly Marathi Wikipedia is already having a policy that non-Marathi language people can not take part in policy making on Marathi wikipedia i.e. are all policy-discussants bound to make some sort of declaration about being Marathi (or their mother-tongue being Marathi) etc or be restricted? Warm regards:)Godric on Leave (चर्चा) १४:२५, ४ नोव्हेंबर २०१७ (IST)
मी सांगीतलेली समस्या mw:Extension:Scribunto/Lua reference manual#libraryUtil यामुळे उद्भवत असावी असा माझा कयास आहे. अर्थात तो कयासच आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:५८, ७ नोव्हेंबर २०१७ (IST)
डिलीट
[संपादन]सर कृपा केजिवा , विभाग:Countdown/doc , विभाग:Countdown डिलीट करा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:५३, ९ नोव्हेंबर २०१७ (IST)
Beaurocratic help
[संपादन]Abhay sir I have read in विकिपीडिया:प्रचालक that admin that is inactive for more than 6 years (mrwp policy) is to be removed. Is this in force? As I see there is some inactive yet with advanced rights. Do assist me with the same --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:५५, ११ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @Tiven2240:,
- मराठी विकिपीडियावरील नियम/संकेतानुसार प्रचालकाने गेल्या सहा वर्षांत एक जरी संपादन केले असेल तर ते प्रचालक राहण्यास पात्र राहतात. अशा प्रचालकांना सूचना देउन त्यांचे हक्क कमी करण्यासाठी कार्यवाही करता येते.
- प्रचालकांची यादी चाळली असता फक्त सदस्य:श्रीहरि यांचे सहा वर्षांपेक्षाअधिक काळ संपादन नाही असे आढळते.
- अभय नातू (चर्चा) ०७:१७, १२ नोव्हेंबर २०१७ (IST)
- यासाठी सूचना देऊन १० दिवस पार झाले आहे. याकरिता लोकल विकिपीडियावर 'crat काम करतील की स्टिवर्ड ला संदेश टाकायला लागेल? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:०९, २२ नोव्हेंबर २०१७ (IST)
स्वागत साचा
[संपादन]नविन सदस्यांचे चर्चा पानावर आपोआप स्वागत साचा लागणे बंद झाले काय? कृपया तपासावे ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:२९, १८ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @V.narsikar:,
- इतक्यात तयार झालेल्या सदस्याच्या चर्चापानावर स्वागत साचा लागलेला दिसत आहे.
- अभय नातू (चर्चा) २१:००, १८ नोव्हेंबर २०१७ (IST)
मग तो बराच ऊशीरा लागला असेल.असो.सदस्य:Priyadarshini Karve यांची संपादने बघुन संदेश टाकला होता.- नरसीकर
जैव ऊर्जा लेखातील बदल
[संपादन]सुचविलेल्या बदलांबद्दल धन्यवाद. जैव ऊर्जा ही पारंपरिक पण तरीही नवीकरणीय आहे, हा माझ्या मते महत्त्वाचा पण दुर्लक्षित मुद्दा आहे. तो आपण वगळला आहे, पण हरकत नाही, त्याचे थोडे अधिक स्पष्टीकरणही द्यायला हवे, त्यासह जरा विस्ताराने सवडीने लेखात भर घालीन.
लेखाची ही फक्त सुरूवात आहे, वेळ मिळेल तशी भर घालत राहीन. विकिपिडियावर लेखनास नुकतीच सुरूवात केली आहे. आपल्या सूचना व मार्गदर्शनाबद्दल आभार.
- प्रियदर्शिनी कर्वे जैव ऊर्जा
- @Priyadarshini Karve:,
- पारंपारिक तरीही नवीकरणीय असल्याचा मुद्दा माझ्याकडून अनवधानाने वगळला गेला. लेखातील मजकूराचे संकेतांनुसार बदल करताना हे घडले असावे तरी क्षमस्व. मी त्याबद्दलचा उल्लेख घातला आहे.
- तुमच्याकडून अधिकाधिक योगदान मिळो ही आशा वा अपेक्षाही!
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) ००:२१, २० नोव्हेंबर २०१७ (IST)
साईट नोटीस सुजाव
[संपादन]आपला कौल ??/??/२०१७ च्या ??:?? पर्यंत नोंदवा. |
यात काही बदल करून घेतली पाहिजे व टाकण्यात आली पाहिजे
--टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:३५, २० नोव्हेंबर २०१७ (IST)
Translation notification: Meta:Babylon/Translators newsletter
[संपादन]You are receiving this notification because you signed up as a translator to मराठी, गुजराती आणि हिंदी on Meta. The page Meta:Babylon/Translators newsletter is available for translation. You can translate it here:
Your help is greatly appreciated. Translators like you help Meta to function as a truly multilingual community.
You can change your notification preferences.
Thank you!
Meta translation coordinators, २३:४५, २१ नोव्हेंबर २०१७ (IST)शाश्वत विकासाची ध्येये - द्विरुक्ती असलेली पाने
[संपादन]नमस्कार.
मला दोन पाने अशी दिसत आहेत, ज्यामध्ये तीच माहिती थोडी वेगवेगळ्या भाषेत दिलेली आहे. त्यापैकी एकच पान ठेवायला हवे असे वाटते.
https://mr.wikipedia.org/s/1c1y
https://mr.wikipedia.org/s/3uli
शाश्वत विकासाची ध्येये (गोल्स) आणि त्यातील उद्दिष्टे (टारगेट्स) हे जास्त योग्य भाषांतर वाटते.
प्रियदर्शिनी ०९:१२, २२ नोव्हेंबर २०१७ (IST)
Bot
[संपादन]मी बोट फ्लॅग करिता विनंती दाखल केले होते. कृपा त्यावर लक्ष द्या. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १५:००, २७ नोव्हेंबर २०१७ (IST)
- @Tiven2240:,
- दुवा?
- अभय नातू (चर्चा) २२:४३, २७ नोव्हेंबर २०१७ (IST)
तुमच्या करीता एक संदेश सदस्य चर्चा:V.narsikarवर आहे. कृपा पाहावे.--टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:२१, ३० नोव्हेंबर २०१७ (IST)
अतिशय नम्र विनंती
[संपादन]@अभय नातू:
गेल्या काही दिवसापासून आपण करुन राहिलेल्या रेल्वे निगडित लेखात / संपादनात लयच चुका होतायत.
विकिपीडियावर चुकीची माहिती असण्यापेक्षा ती नसलेली बरी असा माझा (भाबडा?) समज आहे.
सदर चुका दुरुस्त करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन. पण त्या चुका झाल्याच नाहीत तर फारच उत्तम.
एखाद-दुसरी चुक होणे समजु शकते...पण आपल्या रेल्वे निगडित लेखात वारंवार चुका होत आहेत.
तरी माझी आपणास अतिशय नम्र विनंती आहे की आपण रेल्वे निगडित संपादने ढोबळमानाने न केल्यास ते मराठी विकिपीडियासाठी अतिशय मोलाचे योगदान ठरेल.
धन्यवाद.
--अभय होतू (चर्चा) ००:०७, १ डिसेंबर २०१७ (IST)
@सुशान्त देवळेकर: :(:(:(--अभय होतू (चर्चा) ००:०७, १ डिसेंबर २०१७ (IST)
- @अभय होतू:,
- चुका होऊ नये हे बरोबर पण चुकीची माहिती असण्यापेक्षा नसलेली ही बरी हे मला मान्य नाही. अशा समजूतींमुळेच प्रगती अशक्य होते.
- मी (आणि माझ्यासारख्या इतर अल्पमती लोकांनी) येथे लिहिले आणि त्यात तुम्ही (आणि इतरांनीही) चुका दुरुस्त केल्यात तर येथे माहिती उपलब्ध होईलही आणि ती अचूकही असेल. पहिल्यांदा लिहितानाच अचूकच माहिती येथे पाहिजे हा हट्टाग्रह करुन उपयोग नाही.
- मी (आणि माझ्यासारख्या इतर अल्पमती लोकांनी) लिहिलेच नाही तर पडून राहील हा विकिपीडिया ५-१० लेख घेउन. मग ज्ञानाचे सागर बसतील खोलून चंची, करीत पोपटपंची * -- मराठी का पुढे जात नाही, यावर.
- आणि चुका सगळ्यांच्याच कडून होतात. आता पहा, तुमचा संदेश - येथे <br> <br> <br>चा ढीग घालून ठेवलात. हे चूकच आहे. तरी आपण चालवून घेतो.
- गेल्या बारा वर्षात मी स्वतः सुधारलेल्या इतरांच्या चुकांची यादी लिहायला आणि वाचायला दोन-पाच डझन तास लागतील.
- तुमचा समज भाबडा आहे हे खरे.क्राउडसोर्स्ड नॉलेज हा प्रकार काय आहे याची आपण कृपया जाण करुन घ्यावी. नाही सापडल्यास सांगावे, मी १-२ संदर्भ देऊ करेन.
- केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असे एका गोसाव्याने म्हणून ठेवले आहे हे अगदी खरे आहे.
- आता पुन्ही येथे देवळेकरांना साद घातलीत....बर त्याबद्दल काही म्हणावे तर तुमचा पापड मोडतो म्हणून काहीही बोलत नाही.
- अभय नातू (चर्चा) ०८:१८, १ डिसेंबर २०१७ (IST)
- * वसंत बापटांची क्षमा मागत
- ता.क. मार्ग आणि जिल्ह्यांतील दिसलेल्या चुका सुधारल्या आहेत. काही हाताने तर काही सांगकाम्या चालवून. अधिक चुका दाखवून दिल्यास त्याही सुधारेन. तुम्हीच सुधारल्यात तरी चालतील.
- पॅसिव्ह-अॅग्रेसिव्ह कॉमेंट्स करण्यापेक्षा सरळ माझ्या चुका दाखवून द्या. झालेली चूक मान्य करण्यात आणि त्या सुधारण्यात मला कमीपणा वाटत नाही.
- वर उल्लेखिलेल्या क्राउडसोर्स्ड नॉलेजच्या निर्मितीसाठी हे महत्वाचे आहे.
- अभय नातू (चर्चा) ०९:४०, १ डिसेंबर २०१७ (IST)
@अभय नातू:
"विकिपीडियावर चुकीची माहिती असण्यापेक्षा ती नसलेली बरी" असा माझा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद.
येथे अचूकच माहिती पाहिजे हा हट्टाग्रह विकिपीडियावर उपयोगाचा नाही / चालत नाही हा नियम स्पष्टपणे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
यापुढे कोणाच्याही कोणत्याही चुकीबद्दल चर्चा करुन वेळ व्यर्थ घालविण्यापेक्षा त्या चुका दुरुस्त करायचा मी नक्की प्रयत्न करेन.:):):)
--अभय होतू (चर्चा) १९:११, १ डिसेंबर २०१७ (IST)
फरक
[संपादन]प्रस्तुत बद्दल आहेत.
Proveit | Reftoolbar |
---|---|
manual | automatic |
Installation required | found in UI |
hard to use | easy to use |
manually reference generation | automatic reference generation |
can only be used by specific people | can be used by all on marathi Wikipedia |
--टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:२५, १ डिसेंबर २०१७ (IST)
- @Tiven2240:,
- सर्वप्रथम, वरील माहितीबद्दल धन्यवाद. रेफटूल येथे आणण्याला माझा विरोध नाही. ते आणेपर्यंत मी काय वापरले हे सांगितले व ते वापरुन पहावे असे सुचवले इतकेच.
- प्रूव्हिटसाठी मला कोणतेही installation करावे लागले नाही. मराठी विकिपीडियावरील कोणालाही वापरता येईल. अवघड आणि सोपे हे वैयक्तिक आहे.
- installation लागते--टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:३४, १ डिसेंबर २०१७ (IST)
- हमम....माझ्या मते ते installation नाही तर संपादन आहे. Installation म्हणजे तुमच्या संगणकावर काहीतरी नवीन आणणे......पण तो मुद्दा गौण आहे.
- installation लागते--टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:३४, १ डिसेंबर २०१७ (IST)
- राहता राहिले स्वयंचलित/अस्वयंचलित. तर स्वयंचलित असलेले उपकरण आणण्यास माझा पाठिंबाच आहे.
- अभय नातू (चर्चा) ११:२७, १ डिसेंबर २०१७ (IST)
- ओके सर माझे म्हणणे म्हणजे स्क्रिप्ट इंस्टॉलशन. तरी आपल्याला हे समजले याबद्दल धन्यवाद.--टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:४३, १ डिसेंबर २०१७ (IST)
- ओके परंतु मी ते पूर्वी वापरले आहे यामुळे मी वरील बद्दल नोंद केली. आशा आहे की रेफटूलबार आपण सुद्धा मराठी विकिपीडियावर लवकर वापरू. धन्यवाद. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:३०, १ डिसेंबर २०१७ (IST)
-- अभय नातू (चर्चा) ११:३२, १ डिसेंबर २०१७ (IST)
युनायटेड एरलाइन्स
[संपादन]युनायटेड एरलाइन्स या लेखाचा मला दिसलेला स्क्रिनशॉट येथे टाकलाय. त्यात संदर्भ आणि नोंदीतील दुसर्या संदर्भात Federal Aviation Administrationज्या सर्वनामातुन पुरुषार्थी शब्दाचा बोध होतो Airline Certificate Informationज्या सर्वनामातुन पुरुषार्थी शब्दाचा बोध होतो Detail View अशी काहिशी असंबद्ध संदर्भनोंद का दिसते आहे? - संतोष दहिवळ (चर्चा) २३:०३, ५ डिसेंबर २०१७ (IST)
- @संतोष दहिवळ:,
- संदर्भात वापरलेल्या {{Ndash}} साच्यात उत्पात होता. तो हटविल्यावर संदर्भ व्यवस्थित दिसत आहे.
- अभय नातू (चर्चा) २३:२६, ५ डिसेंबर २०१७ (IST)
डिसेंबर २०१७
[संपादन]Bot व सदर करिता धन्यवाद. मी काही प्रमाणात टेस्टिंग केले रेफटूलबर करीता परंतु यासाठी मीडियाविकी लागेल. सद्या यासाठी प्रचालकांचीस मदत लागेल. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १५:४०, ७ डिसेंबर २०१७ (IST)
हवी असलेली पाने
- मिडियाविकी:Gadget-refToolbar
- मिडियाविकी:Gadget-refToolbar.js
- मिडियाविकी:RefToolbar.js
- मिडियाविकी:RefToolbarConfig.js
- मिडियाविकी:RefToolbarMessages-en.js
- मिडियाविकी:RefToolbarMessages-mr.js
त्यांचे हिंदी पान
- hi:मीडियाविकि:Gadget-refToolbar
- hi:मीडियाविकि:Gadget-refToolbar.js
- hi:मीडियाविकि:RefToolbar.js
- hi:मीडियाविकि:RefToolbar.js
- hi:मीडियाविकि:RefToolbarMessages-en.js
- hi:मीडियाविकि:RefToolbarMessages-hi.js
व इंग्लिश पान
- en:Mediawiki:Gadget-refToolbar
- en:Mediawiki:Gadget-refToolbar.js
- en:Mediawiki:RefToolbar.js
- en:Mediawiki:RefToolbarConfig.js
- en:Mediawiki:RefToolbarMessages-en.js
@V.narsikar: आपण सुद्धा यात मदत करावी अशी विनंती.--Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १५:५५, ७ डिसेंबर २०१७ (IST)
अभिनंदन
[संपादन]१,१५,००० संपादने झाल्याबद्दल अभिनंदन व शुभेच्छा. वि. नरसीकर , (चर्चा) २०:२८, ११ डिसेंबर २०१७ (IST)
- +1 --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 २२:०९, ११ डिसेंबर २०१७ (IST)
- @V.narsikar:, @Tiven2240:
- धन्यवाद. अधिक महत्वाचा टप्पा आहे मराठी विकिपीडियावरील ५०,००० वा लेख. आता थोड्यात दिवसांत हा टप्पा गाठूयात!
- अभय नातू (चर्चा) २२:२९, ११ डिसेंबर २०१७ (IST)
- जीमेल बघा.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:१२, १२ डिसेंबर २०१७ (IST)
गाव माहितीचौकट दुरुस्ती
[संपादन]गावांच्या माहितीचौकट साच्यात काही घटक दिसत नाहीत. उदा.क्षेत्रफळ, घनता,उंचीचे एकक इ. तसेच वर्गामध्ये लाल दुवे येतात. ही तांत्रिक दुरुस्ती काय असायला हवी? आपली मदत हवी आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:२८, १५ डिसेंबर २०१७ (IST)
आयएनएस कलवरी
मी टाकलेला w/app संदेश :If you have any tamil speaking friend, please ask him how INS Kalvari is pronounced. कलवरी, कलवारी, कलावरी, कल्वरी or what. I need the same in an article to be written. I came to know it is a tamil word.
प्राप्त ऊत्तर:This is what people told me to spell कलवरी -वि.नरसीकर-पुष्टी करीत आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:४१, २२ डिसेंबर २०१७ (IST)
५०,००० चा टप्पा
[संपादन]आपण बघतच असाल. आपले येथे एकूण ४९,९६३ लेख झाले आहेत. २-३ दिवसातच हा टप्पा गाठता येईल असे वाटते.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:४०, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- ४९,९९६ झाले, ४ रच कमी आहेत. तो आपलाच मान आहे असे मी मानतो.--Sachinvenga (चर्चा) १५:२३, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- नक्कीच.उडवा बार मग.--वि. नरसीकर , (चर्चा) १५:२५, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- @Sachinvenga:, @V.narsikar:
- मनापासून धन्यवाद!!!! ५०,०००वा लेख लवकरच तयार होत आहे.
- अभय नातू (चर्चा) १५:२६, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- @Sachinvenga:, आपली मोजण्यात काहीतरी गल्लत झालेली दिसते.सध्या आकडा ४९,९८८ असा आहे.--वि. नरसीकर , (चर्चा) १५:३४, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- ५०,००१ झाले...!!!!!!--Sachinvenga (चर्चा) १५:३७, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- २०१७ गुजरात विधानसभा निवडणूक निकाल हा मराठी विकिपीडियावरील ५०,००० वा लेख आहे.
- अभय नातू (चर्चा) १५:३८, २२ डिसेंबर २०१७ (IST)
अरेरे ..... :( :( :(
मराठी विकिपीडियावरील ५०,००० वा लेख महाराष्ट्रावर हवा होता....ते निश्चितच अभिमानास्पद ठरले असते ......
पण काय करणार ...... दुर्दैव.... येथेदेखील ....
--MSRTC. (चर्चा) २१:५०, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- रावसाहेब,
- होता कुठे तुम्ही मग? करायचा होतात लेख तयार. आता १,००,००० वा लेख तुम्हीच लिहा. त्याआधी तुमचे योगदान ही दिसू देत येथे.
- २३:३०, २२ डिसेंबर २०१७ (IST)
@V.narsikar: वर नरसीकर यांनी उल्लेख केल्याप्रमाणे ५०,००० वा लेख लिहिणे हा निश्चितच आपलाच मान होता. हा लेख आपण महाराष्ट्रावर लिहिला असता... तर ते निश्चितच गौरवास्पद ठरले असते. पण आपण ही सुवर्णसंधी दवडली.... कायमची. --MSRTC. (चर्चा) ००:१७, २३ डिसेंबर २०१७ (IST)
- माझा मान होता असे म्हणल्याबद्दल धन्यवाद. मी हा माझा मान नव्हे तर इतर मराठी विकिपीडियनांनी केलेला छोटासा गौरव समजतो.
- महाराष्ट्राबद्दल शेकडो हजारो लेख येथे आहेतच. अजूनही होतील.
- आणि त्यातूनही मराठवाड्याबद्दल का लिहिला? पुण्याबद्दल का लिहिला? कोकणाबद्दल का नाही? अमुक एका समाजाबद्दल का नाही?' असे विचारणारेही असतेच की?!
- तुम्ही यापुढील अशा लेखांसाठी वेळेच्या भरपूर आधी सुचवलेत तर त्याप्रमाणे काम करता येईल. त्याहून उत्तम म्हणजे तुम्हीच असे लेख लिहावेत.
- कोणता लेख लिहिला गेला याबद्दल हळहळ करीत बसण्यापेक्षा तु्म्ही ५०,००० लेख झाले याबद्दल आनंद व्यक्त केला असता तर अधिक उत्तम असे वाटते.
- असो. तुमच्या पुढील योगदानाची वाट पहात आहे.
- धन्यवाद
- अभय नातू (चर्चा) ००:२९, २३ डिसेंबर २०१७ (IST)
- ता.क. आपल्याला ५०,००० लेखांसाठी एक चित्र हवे आहे. तुम्हाला कसे हवे ते तयार करुन दिल्यास घालता येईल.
. ५०,००० लेख झाले याबद्दल निश्चितच आनंद झाला होता ... पण परराज्यावरील लेख पाहून त्या आनंदावर विरजण पडले. मराठी विकिपीडियासाठी वाहून घेतलेल्या आपल्यासारख्या सातत्याने कार्यरत असणाऱ्या प्रशासकाकडून हे घडले याचेच जास्त दुःख होते. इतर कोणाकडून असे घडले असते तर तितकेसे आश्चर्य वाटले नसते.... असो. आता झालेल्या चुकांबद्दल बोलून काही उपयोग नाही. आपल्या पुढील महाराष्ट्र लेखनास शुभेच्छा. --MSRTC. (चर्चा) ००:५३, २३ डिसेंबर २०१७ (IST)
- यात चुकीचे काही घडले किंवा संधी गेल्याचे मला बिलकुल वाटत नाही. त्याची अनेक कारणे आहेत पण ती येथे आत्ता लिहिणे उचित वाटत नाही. फक्त इतके लिहावेसे वाटते की परराज्य, परभाषा, परजात, परवंश, पर, पर पर.....अशा किती परात किती दिवस आपण अडकून पडणार हे कळत नाहीत.
- पुढे अशी संधी आल्यास तुमच्या मताप्रमाणे करण्याचा प्रयत्न करूयात.
- अभय नातू (चर्चा) ००:५८, २३ डिसेंबर २०१७ (IST)
आपले म्हणणे बरोबर आहे असे मला बिलकुल वाटत नाही. त्याची अनेक कारणे आहेत पण ती येथे लिहिणे उचित वाटत नाही. फक्त इतके लिहावेसे वाटते की परकीयांची सरबराई करण्यात किती दिवस आपण अडकून पडणार हे कळत नाही.
आपल्या सुचनेनुसार तयार केलेले चित्र: File:50 000 articles on marathi wikipedia.png https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/b/b6/50_000_articles_on_marathi_wikipedia.png
--MSRTC. (चर्चा) ०१:२९, २३ डिसेंबर २०१७ (IST)
- चित्र तयार केल्याबद्दल धन्यवाद. हे चित्र विकिपीडियाच्या लोगोच्या वर superimpose करता येईल का? सहसा लोगोमध्ये विकिपीडियाचा पृथ्वीगोल असणे उचित मानले जाते.
- भारतातील (शेजारच्या) राज्यातील अलीकडे झालेल्या महत्वाच्या निवडणुकांबद्दलचा लेख तयार करणे म्हणजे परकीयांची सरबराई करणे असे आपण मानत असाल तर त्यापुढे बोलणे नाही. आपली मते अगदी भिन्न आहेत आणि ती बदलण्याच्या प्रयत्नही आपण दोघांनी करू नये असे वाटते.
- अभय नातू (चर्चा) ०१:३९, २३ डिसेंबर २०१७ (IST)
परराज्यातील अलीकडे झालेल्या महत्वाच्या निवडणुकांबद्दलचा लेख तयार करणे म्हणजे परकीयांची सरबराई करणे असे मी बिलकुल मानत नाही. फक्त या विशेष लेखाचा मान स्वराज्याला मिळाला असता तर ते उचित ठरले असते इतकेच. --MSRTC. (चर्चा) ०७:४९, २३ डिसेंबर २०१७ (IST)
@MSRTC. आणि अभय नातू: या आनंदाच्या प्रसंगी आपण विनाकारणचा वादविवाद टाळू या असे दोघांनाही आवाहन व नम्र विनंती करतो व आधीच धन्यवाद देतो.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:१७, २३ डिसेंबर २०१७ (IST)
लोगो
[संपादन]प्रस्तुत चित्र लोगो मी बनवले आहे. जर काही बदल असतील तर सांगा --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १६:४१, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- @Tiven2240:,:
- धन्यवाद. प्रस्तुत चित्रातील विमानाचे चित्र वापरणे गरजेचे किंवा सक्तीचे नाही. मी ते कॉमन्सवरुन साइटनोटिसवर घालण्यासाठी घेतले. तरी इतर प्रकारे ५०,००० दाखवता आले तरी चालेल.
- अभय नातू (चर्चा) १६:४५, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- पाहतो जर काही नवीन एडिट करू शकेल तर बनवतो --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १६:४८, २२ डिसेंबर २०१७ (IST)
Any suggestion ??--Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १६:४८, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- आकडा (५००००) हा मराठीत हवा काय? येथेही काही अशा प्रकारची चित्रे आहेत.त्यातुन काही सुचते काय तेपण बघावे.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:५८, २२ डिसेंबर २०१७ (IST)
- @Tiven2240 आणि V.narsikar:
- वर सदस्य MSRTC यांनी केलेला महाराष्ट्राच्या नकाशावर विकिपीडिया लोगो सुपरइम्पोझ केला असता कसा दिसेल?
- अभय नातू (चर्चा) ००:५८, २४ डिसेंबर २०१७ (IST)
- ही कल्पना चांगली वाटते. तसेच त्यावर तिसरा स्तर (थर्ड लेयर) म्हणून ५०,००० हा आकडा लिहिता आला तर उत्तमच. बघा कसे ते व जमते काय. दुर्दैवाने, फॉरमॅट करावे लागल्यामुळे माझे संगणकातील अनेक संचेतने गेलीत. त्यामुळे माझा नाईलाज आहे.सल्ला विचारल्याबद्दल आभार. --वि. नरसीकर , (चर्चा) ०९:५८, २४ डिसेंबर २०१७ (IST)
- असहमत कल्पना चांगली आहे परंतु काही प्रश्न निर्माण होतील. जर आपण लोगो पोलिसी पाहिले त्यात स्पस्ट लिहिले आहे ... it is tough to do it well, in a way that doesn't conflict with our neutrality policies.... यामुळे महाराष्ट्राचा नकाशा टाकणे या पोलिसीच्या विरोध असेल असे वाटते. मराठी भाषा जरी महाराष्ट्रातील असेल परंतु ते दुसऱ्या जागी सुद्धा वापरली जाते. असे नकाशा टाकणे माझे मती योग्य वाटत नाही कारण ते dominating impose वाटेल --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १०:३८, २४ डिसेंबर २०१७ (IST)
Request for Translation from Marathi to English Wikipedia
[संपादन]Marathi Wikipedia article: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%87
From Wikipedia:Requested articles/Business and economics/People in business#A
- Chandrashekhar Agashe I[१] (February 14, 1888 - June 9, 1956[२]) was an Indian Chitpavan brahmin[३] industrialist[४] best known as the founder of Brihan Maharashtra Sugar Syndicate Ltd. The Chandrashekhar Agashe College of Physical Education,[५] the Chandrashekhar Agashe Road at Shaniwar Peth, Pune[६] and the Chandrashekhar Agashe Museum at the Raja Dinkar Kelkar Museum are named after him.[७][८]
Please translate if possible, thanks.
- ^ Karandikar, Shakuntala (1992). Viśvasta (Marathi भाषेत). Pune: Śrī Prakāśana. p. 134. ISBN 9781532345012. LCCN 2017322865.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Punyasmaran". Maharashtra Times. 9 June 2017.
- ^ Agashe, Trupti; Agashe, Gopal (2006). Wad, Mugdha (ed.). Agashe Kulvrutant (Marathi भाषेत) (2nd ed.). Hyderabad: Surbhi Graphics. ISBN 978-1-5323-4500-5.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "Pune's Pride - 20th Century". punediary.com.
- ^ "About Us". agashecollege.org.
- ^ "चंद्रशेखर अगाशे पथ". Google Maps.
- ^ "About Us". http://rajakelkarmuseum.com/. External link in
|website=
(सहाय्य) - ^ Putra Viśvastācā : Gaurava Grantha : Jñāneśvara Āgāśe (Marathi भाषेत). Pune: Jñāneśvara Āgāśe Gaurava Samitī. 2002. p. 147. ISBN 9781532345944. LCCN 2017322864.CS1 maint: unrecognized language (link)
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विकिपीडिया संपादन प्रशिक्षण कार्यशाळा २०१८
[संपादन]नमस्कार,
सदर साईट नोटीस लवकर प्रकाशित करावी.आजपासून कार्यशाळा सुरु होत आहेत.
पुढील मजकूर ठळक करावा - यांपैकी काही कार्यशाळांची माहिती येथे मिळेल.
धन्यवाद, -सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०९:००, २ जानेवारी २०१८ (IST)
बातमी
[संपादन]@V.narsikar: व अभय सर प्रस्तुत वर्तमानपत्रात आलेले विकिपीडिया बद्दल बातमी पहा. यावर जर काय आवश्यक तयारी कराची असेल तर करा. http://punemirror.indiatimes.com/pune/civic/state-to-bolster-wikipedia-with-marathi-articles/articleshow/62357384.cms
--Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 ०९:१७, ५ जानेवारी २०१८ (IST)
- नोंद घेतली.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:३०, ५ जानेवारी २०१८ (IST)
खाते विकसक
[संपादन]'एका-आयपीवरुन-ताशी-फक्त-६-नवीन-सदस्य' - यामध्ये ताशी कि दिवशी हे कृपया तपासावे ही विनंती.माझे मते ते दिवशी आहे. निश्चिती करावी.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:४३, १० जानेवारी २०१८ (IST)
अविश्वकोशीय लेख हटवणे बाबत
[संपादन]@V.narsikar: सध्या अनेक अविश्वकोशीय लेख बनवले जात आहेत, उदा. एखादी कविता इ. कृपया, यांना थांबवा. हे करणारे बहुतेक सदस्य विकिपीडियाच्या कार्यशाळेतील आहेत. --संदेश हिवाळेचर्चा १३:३४, ११ जानेवारी २०१८ (IST)
मंत्रालय कार्यशाळा
[संपादन]उद्या दि. १२ ला, मंत्रालयातील कार्यशाळा सकाळी ११ ते ५ या वेळेत आहे.यात सुमारे १०० सदस्य सहभागी होतील असा प्राथमिक अंदाज आहे.(ता.क.- १९.१६ वाजेपर्यंत १३७ नविन खाती निर्माण झाली आहेत). माझे मते, या कार्यशाळेद्वारे होणाऱ्या संपादनांना तत्क्षणी काहीच करू नये. कार्यशाळा संपल्यावर व मग त्याद्वारे झालेल्या योगदानांवर आपण सर्व मिळून एकत्रितपणे प्रक्रिया करू शकतो.त्यातील लेखात साचे लावणे, त्यात वर्ग टाकणे, संपादने बरोबर नसतील तर उलटविणे, अविश्वकोषिय मजकूर काढणे इत्यादी कामे कार्यशाळेनंतर करता येतील.सध्या कार्यरत सदस्यांपैकी अनेकांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत असे वाटते. मराठी विकिवर इतकी मोठी कार्यशाळा प्रथमच होत आहे तर, आपण सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेऊन त्यासाठी मदत करावयास हवी असे माझे प्रामाणिक मत आहे.थोडा वेळ असे लेख अ-प्रक्रियागत राहिले तर त्याने विशेष फरक पडत नाही.संपादलेल्या लेखांवर लगेचच प्रक्रिया केल्याने अलीकडील बदल मध्येपण बराच गोंधळ निर्माण होतो.त्याद्वारे एखादा लेख वा अनेक लेख सुटू शकतात. यावर आपली भूमिका काय आहे ते कृपया विषद करावे ही विनंती.--वि. नरसीकर , (चर्चा) १९:०७, ११ जानेवारी २०१८ (IST)
- @V.narsikar:
- थोडा वेळ असे लेख अ-प्रक्रियागत राहिले तर त्याने विशेष फरक पडत नाही.
- वरकरणी हे बरोबर वाटत असले तरी हे कोण आणि कधी सुधारणार याची माहिती अत्यावश्यक आहे. गेली अनेक वर्षे आलेली अविश्वकोषीय संपादने सुधारताना नाकी नऊ येतात. त्यातून एकदम असा मोठा कार्यभार पडून राहिल्यास काम करीत असलेले संपादक आणि वाचक सुद्धा हतोत्साहित होतील.
- तरीसुद्धा आपल्याला नवीन संपादक आणि नवीन मजकूर हवाच आहे हे अढळ सत्य आहे. त्यासाठी थोडी सबूरीची भूमिका घेणे आवश्यक आहे.
- यात तडजोडीसाठी म्हणून कार्यशाळांमधून होणाऱ्या संपादनांना एखादा साचा, किमानपक्षी वर्ग लावावा असा माझा आग्रह आहे. असे केल्याने कार्यशाळेतील संपादने शोधत जावे लागणार नाही. यासाठी कार्यशाळेच्या समन्वयकांनी पूर्वतयारी करणे आणि ते कार्यशाळेत वारंवार जाहीर करणे आवश्यक आहे.
- कार्यशाळा संपल्यावर असे वर्ग/साचे घेउन त्यावर एकजुटीने काम करता येईल.
- यायोगे आपल्याला नवीन मजकूर, संपादक मिळतील आणि हा मजकूर थोडा तरी नेटका होईल.
- अभय नातू (चर्चा) २०:५९, ११ जानेवारी २०१८ (IST)
- कार्यशाळेत विकिपीडीया काय आहे / नाही आहे याचे विश्लेशन होणे गरजेचे आहे. हे होते का या वर लक्ष देणेही गरजेचे आहे. आपण फक्त वाढलेली सदस्य संखेला महत्व देवू नये असे वाटते.--. Sachinvenga चर्चा . : २१:१४, ११ जानेवारी २०१८ (IST)
- मी आहेच की सोबत. जमेल तसे करतच असतो. आता मी काल किती वर्ग टाकले कार्यशाळेच्या लेखांत? आपण बघितलेच असेल ते. राहूल, अस्मिता, सातपुते व देवळेकरांना तशी सूचना देता येईल.वर्ग लावण्याबद्दल अथवा साचा लावण्याबद्दल. उद्याची जास्तीत जास्त संपादने दालन:महाराष्ट्र शासन मध्येच राहतील. त्यामुळे सोपे होईल असा कयास आहे. वर्ग व साचा कोणी नाही लावला तर मी प्रयत्न करीलच. टायवेन व सचिनवेंगा मदत करतीलच असे वाटते.
फक्त काय होते की, संपादने सुरू असतांनाच वर्ग अथवा साचा सोबतच लावत गेलोत तर अलीकडील बदल मध्ये इतकी सरमिसळ होते की नविन लेख त्यातून शोधणे अवघड जाते.त्यामुळे सबूरीने घेण्याबाबत म्हणत आहे. कार्यशाळा संपल्यावर असे वर्ग/साचे घेउन त्यावर एकजुटीने काम करता येईल. याचेशी पूर्ण सहमत.
मग मंत्रालयातील सदस्यांना तसे वर्ग लावण्याबाबत सूचवू काय? कळावे. नव्हे सांगूनच देतो.--वि. नरसीकर , (चर्चा) २१:१६, ११ जानेवारी २०१८ (IST)
- मला वाटते Sachinvenga यांचा संदेश गायब झाला.
- मान्य! मजकूर/लेख आणि त्याची किमान गुणवत्ता या दोन्ही गोष्टी आपल्याया हव्या आहेत. कार्यशाळा समन्वयक याची नोंद घेतील अशी आशा आहे.
- अभय नातू (चर्चा) २१:१८, ११ जानेवारी २०१८ (IST)
- राहूल देशमुख यांना दूरध्वनीद्वारे आवश्यक खबरदारी घेण्याबाबत कळविले आहे.बघु काय होते ते.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:०९, ११ जानेवारी २०१८ (IST)
+1 अभय नातूच्या मातीशी सहमत. पूर्वी मी एक स्वागत साचा दोन्ही मराठी भाषा गौरव दिन व महिला दिवस एडिट अ थॉन मध्ये बनवले होते. आज सुद्धा एक तसेस साचा मी बनवणार आहे (काही वेळात). नवीन पान जर अविश्वकोषीय असतील तर त्याला डिलीट करावे असे माझे मत आहे. संध्याकाळी मी एक वर्ग बनवले होते ज्यात आज तयार झालेले लेख आहेत. त्यात सुद्धा काम बाकी दिसते. सद्या मी संदेश सचिन व इतर काही सदस्य उद्याचा एडिट अ थॉन चांगले प्रमाणे जाईल याची काळजी घेतो. काही मार्गदर्शन असेल तर चावडीवर देवावे. --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 २१:१८, ११ जानेवारी २०१८ (IST)
- राम राम, संदेश कोणी व का गायब केला हे तपासावे व योग्यती उपाय योजना कारावी आसे वाटते.--. Sachinvenga चर्चा . : २१:२७, ११ जानेवारी २०१८ (IST)
- मला वाटते नरसीकरजींकडून अनवधानाने काढला गेला असावा.
- अभय नातू (चर्चा) २१:४३, ११ जानेवारी २०१८ (IST)
@Sachinvenga: संदेश पुन्हा टाकला आहे, वर पाहावे --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 २१:४६, ११ जानेवारी २०१८ (IST)
कृपया गैरसमज नको. तो संपादन विसंवाद होता. मी माझा संदेश बॅक कळ टिचकून पुन्हा जतन केला.ते हेतूपुरस्सर नव्हते.--वि. नरसीकर , (चर्चा) २२:०५, ११ जानेवारी २०१८ (IST)
- माझ्या मते विकिपीडीयावर एका दिवसाच्या कार्यशाळे साठी नियम बाजुला ठेवणे हे योग्य नाही. जर नोंद घेतली. मंत्रालय कार्यशाळा होऊ द्यावी मग... असे जर sysop म्हणत असतील तर मग काय म्हणावे? माझ्या मते एक दिवसासाठी हे खोटे नाटक करु नये हा पुढे जावुन नियम बनेल.--. Sachinvenga चर्चा . : २२:१८, ११ जानेवारी २०१८ (IST)
मंत्रालय कार्यशाळा निकाल
[संपादन]कशीबशी संपन्न झाली असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांनी काहीच वर्ग टाकले नाहीत म्हणून मी ते टाकले. त्यांचेकडून अपेक्षितही नव्हते. पण आपण (म्हणजे मी) तशी विनंती केली होती. ती विफल गेली. १२ जानेवारी मंत्रालय कार्यशाळा हा वर्ग व त्यातील लेख कृपया बघावेत.मंत्रालय कार्यशाळेतील लेखांवर काहीच प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही असे माझे मत आहे. आपण काय ते बघावे.टायवेनने आपसात बरीच चर्चा करून त्यांचे सदस्यचर्चा पानात साचे टाकले ते आपण बघालच. त्याचे कौतुक करावे.त्याने बरीच मेहनत घेतली आहे.
त्याव्यतिरिक्त आज संपादन झालेले सोलापूर कार्यशाळेतील लेख सरसकट ९ जानेवारी २०१८ कार्यशाळा यात टाकले आहेत.सुबोधला तशी सूचना दिली आहे.इतर संपादने अन-अटेंडेड आहेत.
दुसरे असे कि, कार्यशाळांबाबत काहीतरी ठोस धोरण ठरविणे आवश्यक झाले आहे असे माझे मत आहे.
--वि. नरसीकर , (चर्चा) १७:४२, १२ जानेवारी २०१८ (IST)
- @V.narsikar आणि Tiven2240:
- सर्वप्रथम, ही कार्यशाळा चालू असताना त्यावर नजर ठेवून योग्य ती पावले उचलल्याबद्दल धन्यवाद, विशेषतः टायवीन, तुम्हाला.
- १२ जानेवारी मंत्रालय कार्यशाळा या वर्गात वीसापेक्षा कमी पाने दिसत आहेत. इतकीच पाने तयार झाली का? या कार्यशाळेत संपादित झालेल्या पानांना हा वर्ग दिला नाही का?
- या कार्यशाळेतील लेखांवर प्रक्रिया करणे आवश्यक नाही असे का म्हणता? त्यांचात दुवे, साचे व पुरेसे वर्ग दिसत नाहीत. काही लेखांमध्ये प्रस्तावना नाही किंवा प्रस्तावना पुन्हा लिहून काढावी लागेल.
- असो, रात्रीत हजारेक संपादने झालीत. मला फक्त मागील ५-६०० बघता येतात. ती बघण्यासही थोडा अवकाश लागेल. मग अजून काही निष्कर्ष काढता येतील.
- अभय नातू (चर्चा) ०२:४०, १३ जानेवारी २०१८ (IST)
मंत्रालय कार्यालयात फक्त १३ नवीन पान तयार करण्यात आले आहे बाकी फक्त १५ पानावर संपादन झाले आहे. कार्यशाळेत कमीच कमी १३०+ खाते तयार करण्यात आले परंतु संपादन करणारे >२० आहे. हे आकडे मी स्वतः देत आहे. संपूर्ण कार्यशाळा मी नारसिकरजी सोबत होतू परंतु जी अपेक्षित होते त्यांनी खूप कमी निकाल जाहीर करण्यात आले आहे. जसे नारसिकरांचे मत आहे तसेस संदेश हिवाळे व सचिन ही म्हणतात-विकिपीडियावर कार्यशाळासाठी नवीन धोरण निश्चित करने आवश्यक आहे यासाठी मोठी चर्चा करू व एक नवीन धोरण निश्चित करू असे माझे मत आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:३७, १३ जानेवारी २०१८ (IST)
- कार्यशाळेतील सर्व लेख प्रथम धूळपाटीवर बनावावेत, त्यावर संबंधिताने/कार्यशाळा आयोजकाने/सक्रिय सदस्यांनी प्रक्रिया करावी व मगच त्याचा अंतर्भाव मूळ लेखात /नविन लेखात करावा असा विचार माझे मनात आला आहे. तो कितपत प्रॅक्टिकल आहे ही बाबही आहेच.--वि. नरसीकर , (चर्चा) ०९:४३, १३ जानेवारी २०१८ (IST)
टिप्पणी
[संपादन]मला आशा आहे की आपल्याला विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे#कार्यशाळा कशी हवी? वर टिप्पणी करणे आवडेल --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:२४, १३ जानेवारी २०१८ (IST)
AWB
[संपादन]AWB बद्दल खूप संशोधन केले आहे. काही काम आहे जे प्रचालकांची मदत लागेल. कृपा विकिपीडिया सोडून दुसऱ्या साईटवर पर्सनल भेटावे अशी विनंती --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:०२, १६ जानेवारी २०१८ (IST)
Deletion of contents
[संपादन]In order to delete a comment please do to the diff and than click change visibility(दाखवा/लपवा). By removing the content can't help.
In my case please visit the two links mentioned down and than click change visibility(दाखवा/लपवा) and delete revisions on the page.
https://mr.wikipedia.org/w/index.php?title=सदस्य_चर्चा:Tiven2240&diff=1557011&oldid=1557010
Thanking --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:१२, १६ जानेवारी २०१८ (IST)
- I had to add a dummy edit because I cannot hide the latest update.
- अभय नातू (चर्चा) २३:२३, १६ जानेवारी २०१८ (IST)
Thanks for the same please see for the protection --टायवीन२२४०माझ्याशी बोला २३:३१, १६ जानेवारी २०१८ (IST)
लातूर जिल्हा धार्मिक स्थळे
[संपादन]नमस्कार अभय सर,
लातूर जिल्हा व तेथील धार्मिक स्थळे याबद्दल मी माहिती गोळा करून प्रेत्येक स्थळाबद्दल विस्तृत लेख त्या ठिकाणांच्या फोटोसहीत लिहिण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळेच लातूर जिल्ह्यातील देऊळे (धार्मिक स्थळे) या मुद्द्याखाली ठिकाणांची नावे व त्याबद्दलची माहिती अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहे, यात विराट हनुमान, मंदिर या लेखाचे स्वतंत्र पान मि तयार केले होते पण ते लातूर या पानावर पुनर्निर्देशित केल्याने इतर धार्मिक स्थळांबद्दलची माहिती देखील याच लेखात समाविष्ठ करावी की स्वतंत्र पानावर लिहावी ? कृपया मार्गदर्शन करावे.
धन्यवाद सर !
श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी २२:२३, १९ जानेवारी २०१८ (IST)
- नमस्कार @Shrinivaskulkarni1388:,
- तुम्ही लातूरजवळील धार्मिक स्थळांबद्दल माहिती लिहीत असाल तर असे करावे -
- १. लातूर लेखात धार्मिक स्थळे अशा विभागात यांची यादी करावी. सुरुवातीस लाल दुवे असले तरी चालतील.
- २. एक एक लेख तयार करीत जावे. असा लेख करताना {{कामचालू}} हा साचा लावावा म्हणजे इतरांच्या लक्षात येईल की हा लेख लवकरच विस्तृत होईल.
- ३. अशा लेखांत वर्ग:लातूर घालावा तसेच इतर योग्य ते वर्ग ही घालावे.
- धन्यवाद.
- अभय नातू (चर्चा) २३:३६, १९ जानेवारी २०१८ (IST)
विनंती
[संपादन]कृपा विकिपीडिया:ऑटोविकिब्राउझर/विनंत्या पाहावे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:१६, २५ जानेवारी २०१८ (IST)
वंजारी/vanjari आणि banjara/बंजारा
[संपादन]वंजारी आणि बंजारा हे दोन एक सम परंतु वेगवेगळे समाज आहेत. आणि दुर्दैवाने Wikipedia वर "banjara" ची मराठी भाषा निवडली की "वंजारी" लेख येतोय. कृपया ही गफलत दुर करुन द्यावी ही विनंती. Goresm (चर्चा) २३:१८, २९ जानेवारी २०१८ (IST)
- @Goresm:,
- इंग्लिश विकिपीडियावरील Banjara पानावर मराठी आंतरविकी दुवा नव्हताच तरी तुमचे नेमके म्हणणे कळले नाही.
- मी Banjara --> बंजारा हा आंतरविकी दुवा आता घातला आहे.
- अभय नातू (चर्चा) ००:०८, ३० जानेवारी २०१८ (IST)
नमस्कार, वंजारी हा मराठी लेख इंग्रजी banjara ला जोडल्या गेला. कृपया वंजारी या लेखाची भाषा इंग्रजी निवडल्यास vanjari असं यायला हवे त्या ऐवजी banjara हा दुसराच लेख येतोय. (दोन्ही जाती वेगवेगळ्या आहेत. केवळ नाम साधर्म्य असल्याने Wikipedia वर गफलत होतेय. Goresm (चर्चा) ००:१६, ३० जानेवारी २०१८ (IST)
- @Goresm:,
- याचे कारण इंग्लिश विकिपीडियावर Vanjari असा लेख नाही. तेथे Vanjari --> Banjara असे पुनर्निर्देशन केले गेलेले आहे. हे बदलण्यासाठी इंग्लिश विकिपीडियावर Vanjari असा वेगळा लेख तयार करावा लागेल.
- अभय नातू (चर्चा) ००:१९, ३० जानेवारी २०१८ (IST)
नमस्कार, मी vanjari असा लेख edit केलाय. पण आता एक नवीन गफलत झाली आहे. Vanjari_caste असा पण एक जुना लेख दिसतोय. कृपया योग्य ते जोडावे. चर्चा संपवतो. धन्यवाद. शुभ रात्री ...! Goresm (चर्चा) ००:३८, ३० जानेवारी २०१८ (IST)
व्हॅलेंटाईन अभिवादन
[संपादन]व्हॅलेंटाईन अभिवादन!!! | |
नमस्कार अभय नातू, प्रेम हे अंत: भाषा आहे आणि रोख्यांची दोन आत्म्यांच्या जोडणारा आणि आणते की दोन अंत: करणात एकत्र भावना आहे. विकिपीडिया पातळी प्रेम घेऊन, एकमेकांना व्हॅलेन्टाईन्स डेच्या शुभेच्छा बनवू करून विकिप्रेम पसरु,पूर्वी तो कोण असेल ज्याच्या सोबत आपले मतभेद झाला असेल, एक चांगला मित्र, किंवा फक्त काही यादृच्छिक व्यक्ती. |
मेटावरील मतदान
[संपादन]@V.narsikar, ज, सुबोध कुलकर्णी, Tiven2240, आणि प्रसाद साळवे:
नमस्कार, नातू सर.
संपादन साधने पुरवण्यासाठीचे मेटावर मतदान सुरू आहे. कृपया, आपल्या मराठी विकिपीडियावरील संपादकांना तेथे मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करणारी साईट नोटिस तयार करणे गरजचे वाटते. यासाठी इतरही आवश्यक ते करावे, विनंती.
धन्यवाद.
संदेश हिवाळेचर्चा १९:०७, २१ फेब्रुवारी २०१८ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १९:०७, २१ फेब्रुवारी २०१८ (IST)
- हे का?
- https://meta.wikimedia.org/wiki/Meta:Requests_for_comment/Add_a_link_on_the_sidebar_navigation_to_the_Wikimedia_Resource_Center
- अभय नातू (चर्चा) ०९:५२, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)
संदेश meta:Supporting_Indian_Language_Wikipedias_Program/Support या बदल बोलत होते --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:०४, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)
कृपया, टायवीनने सुचवलेली लिंक पहा. हिंदी संपादक जास्त संख्येने मतदान करताहेत. मराठी संपादकांनी सुद्धा यात भाग घ्यावा असे मला वाटते.--संदेश हिवाळेचर्चा १०:१२, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)
- ठीक. साइट नोटीस तयार केल्यास लावता येईल.
- अभय नातू (चर्चा) १०:३०, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)
धन्यवाद सर,
@Tiven2240: कृपया, तुम्ही साइट नोटीस तयार केल्यास लावता येईल.--संदेश हिवाळेचर्चा १०:५०, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)
अभय सर कन्टेन्ट काय असावे? --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:५९, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)
- साधारणतः --
- हा प्रोग्रॅम काय आहे (संगणक मिळू शकेल, इंटरनेटसाठी पैसे मिळू शकतील, इ.)
- हे कोणी प्रायोजित केलेले आहे (फाउंडेशन आणि गूगल)
- यासाठी काय करावे (दुवा द्यावा)
- ठळक अक्षरात - २५ फेब्रुवारी पर्यंतच मुदत आहे
- चित्रे असल्यास उत्तम पण तो पर्यंत मजकूरही चालेल.
- येथे तयार करावे. अंतिम झाल्यावर साइटनोटिसवर घातला जाईल - विकिपीडिया:भारतीय भाषांतील विकिपीडियन्सना संपादनासाठी मदत - सूचना
- अभय नातू (चर्चा) ११:०३, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)
सदर भारतीय भाषा विकिपीडिया सहकार्य प्रकल्प याचे निवेदन १८ डिसेंबर रोजी चावडीवर CIS-A2K तर्फे मी दिले होते. त्यानंतर बहुतेक सर्व सक्रीय संपादकांना मेलद्वारे मागणी नोंदविण्यासाठी आवाहन केले होते. बहुतेक लोकांना या प्रक्रियेत मदत केली आहे. तरीही सर्वांना माहिती होण्यासाठी नोटीस करावी. तसेच संदेश म्हणतात त्याप्रमाणे येथे मतदान व त्यावर आधारित निवड अपेक्षित नाही. या मागण्या/प्रस्ताव हे व्यक्तिगत असून ते आपापल्या पद्धतीने लोकांना संपर्क/आवाहन करू शकतात असे माझे मत आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:१६, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी: या प्रोग्रॅम बदल मराठीत माहिती द्यावी असे माझे मत आहे. कृपा याची माहिती विकिपीडिया:भारतीय भाषांतील विकिपीडियन्सना संपादनासाठी मदत - सूचना यात द्यावी --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:२३, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)
कुलकर्णी सर, निवड प्रक्रियेत जर मतदान महत्त्वपूर्ण असेल तर त्यात जास्तीतजास्त मराठी सदस्यांनी सहभागी होणे गरजेचे वाटते. साइट नोटीस तयार करणे ही माझी व्यक्तिगत मागणी आहे आणि/मात्र इतरांनी त्यास अनुकुलता दाखवल्याने पुढील प्रकिया होत आहे.--संदेश हिवाळेचर्चा ११:३२, २२ फेब्रुवारी २०१८ (IST)