लघुपथ: WP:WAM 2017

विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विकिपीडिया आशियाई महिना
WAM 2017 Banner-mr.png

विकिपीडिया आशियाई महिना हा एक ऑनलाईन प्रयास आहे. या मुळे आशियायी देशांमध्ये एक एकसंघंता यावी व त्याबद्दल ज्ञान वाढावे हा उद्देश आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिना याचे आयोजन केले जाते आहे. या उपक्रमात मराठी विकिपीडिया मध्ये जास्त व चांगले लेख यावेत अशी अपेक्षा आहे. वाचकांना आणि विकि लेखकांना भारत सोडून इतर आशियाई देशांची माहिती व्हावी. आशियाई समुदायात मध्ये दोस्तीचे नाते तसेही आहेच ते वृद्धींगत व्हावे हा ही एक उद्देश आहे या उपक्रमात तुम्हाला प्रतिनिधी म्हणून फक्त ४ लेख लिहायचे आहेत. हा उपक्रम पूर्ण केल्यावर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या आयोजित देशाकडून एक खास पोस्टकार्ड मिळेल. अर्थातच तुम्ही चार पेक्षा जास्त लेखही लिहू शकता. या विकिपिडिया उपक्रमात जो सर्वात जास्त योगदान देईल त्यास विकिपीडिया आशियाई दूत म्हणून घोषीत केले जाईल.

नियम

थोडक्यात: नवीन लेख, आशिया खंडातील देशांवर (भारत सोडून), चांगल्या दर्ज्याच्या, ३०० शब्द व किमान ३००० बाईट, २०१७ च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.

 • हा लेख तुम्ही नोव्हेंबर १, २०१७ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३०, २०१७ २३:५९ (UTC) स्वतः बनवलेला असले पाहिजे.
 • सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.(महितीचाकोट, साचा सोडून)
 • सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी.
 • लेख लिहिताना, लेख पूर्ण मशीन रूपांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे.
 • लेखात प्रमुख समस्या नसणे आवश्यक आहे (उधारण: कॉपीराईट उलंदन,प्रसिदधी स्पस्ट नाही)
 • लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
 • सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
 • सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.
 • आयोजित करणारे लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
 • प्रत्येक भाषेतील न्यायाधीश (ओं) विकिपीडिया हे त्यांच्या भाषेत विकिपीडियाच्या स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाईल किंवा नाही हे निर्धारित करतील.
 • जेव्हा आपण उपरोक्त नियम पूर्ण करतील व ४ लेख स्वीकार होतील, तेव्हा आपल्याला आशियाई समुदायांपैकी एकापासून WAM पोस्टकार्ड मिळेल.
 • तुम्ही विकिपीडिया आशियाई दूत घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड भेटेल.

या विषयी आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा .

आयोजक

 1. टायवेन गोन्साल्वीस

साइन अप

आता साइन अप करा आणि तुमचे योगदान द्या .

लेख सादर करा

आशियाई महिन्यासाठी मराठी विकिपीडियावर योगदान? आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा.