सदस्य चर्चा:V.narsikar

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वि. नरसीकर (चर्चा • योगदान)

१४:४९, १३ नोव्हेंबर २००९ (UTC)

विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण

'Archives'
जुन्या दप्तरदाखल चर्चा खाली आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1) ९/०६/२००६ ०३/०८/२००९
चर्चा २ (Archive 2) ०४/०८/२००९ १२/११/२००९
चर्चा ३ (Archive 3) १३/११/२००९ ३१/१२/२००९
चर्चा ४ (Archive 4) ३१/१२/२००९ ०५/०६/२०१०
चर्चा ५ (Archive 5) ०६/०६/२०१० ३१/०७/२०१०
चर्चा ६ (Archive 6) ०१/०८/२०१० २४/०९/२०१०
चर्चा ७ (Archive 7) २५/०९/२०१० २९/०७/२०११
चर्चा ८ (Archive 8) ३०/०७/२०११ २४/१०/२०१२
चर्चा ९ (Archive 9) २४/१०/२०१२ ०९/१२/२०१३
चर्चा १० (Archive 10) १०/१२/२०१३ १२/०९/२०१६

लिबिया[संपादन]

नमस्कार,

लिबिया/लीबिया काम थोडे किचकट दिसते आहे. अधूनमधून प्रयत्न करुन तोड काढतो.

अभय नातू (चर्चा) १०:३३, १६ सप्टेंबर २०१६ (IST)


धन्यवाद[संपादन]

आपण केलेल्या अभिनंदनाबद्दल आभारी आहे.... (चर्चा) १५:०२, १९ सप्टेंबर २०१६ (IST)

साचे दस्तऐवज[संपादन]

शक्यतो सगळ्या साच्यांचे दस्तऐवज असावेत. असे केल्याने नवख्या संपादकांसही ते सहजपणे वापरता येतात. आपल्याकडील अनेक साचे इंग्लिश किंवा इतर विकिपीडियावरुन घेतलेले आहेत तरी तेथील दस्तऐवज अनेकदा भाषांतर करुन वापरता येतात. अर्थात, मूळ विकिपीडियावरील साच्यांचे नवीनीकरण झालेले असल्यास दस्तऐवज जसेच्या तसे आणणे बरोबर नाही. एकदा नजरेखालून घातल्यावर ते दस्तऐवज येथे आणावेत. क्वचित नवीन साचे आणून येथील साच्यांचे आधुनिकीकरण करणे योग्य ठरेल.

आपणास जमेल तसे हे काम जरुर करावे. मदत लागल्यास कळवालच.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १८:४९, १९ सप्टेंबर २०१६ (IST)

हॉटकॅटच्या कळींचे मराठीकरण[संपादन]

नरसीकरजी,

हे केल्याबद्दल अनेक धन्यवाद. या पानाचे संपादन कोणास करता येईल? तेथील शुद्धलेखनात काही बदल करायचे आहेत (उदा. ठिक ऐवजी ठीक) मला ते करता आले नाही. आपणास माहिती असल्यास कळवावे.

पुन्हा एकदा धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २१:१२, २३ सप्टेंबर २०१६ (IST)

Convert साचा[संपादन]

नरसीकरजी,

आपण केलेल्या Convert साचा आणि इतर अनेक उपकरणांतील बदलांची आमच्याकडून दखल.

उपकरणांवर काम केल्याबद्दल बार्नस्टार

धन्यवाद,

अभय नातू (चर्चा) ०४:०२, २४ सप्टेंबर २०१६ (IST)

विकिडाटा कलमे[संपादन]

धन्यवाद. माझ्या न्याहाळकावर विकिडेटा काहीकारणास्तव नीट चालत नाही तरी मला यात अधिक अनुभव नाही परंतु अभिजीत साठे यांनी बरेच विकिडेटा कलमे घातलेली आहेत. त्यांच्याकडे कदाचित हे काम भराभर करण्याच्या काही युक्त्या असतील तर त्यांच्याकडे विचारणा करावी.

अभय नातू (चर्चा) २१:४७, २६ सप्टेंबर २०१६ (IST)


कसचं कसचं ! (म्हणजे नो मेन्शन किंवा दॅट्स आॅल राइट!) ... (चर्चा) १३:५९, ३ ऑक्टोबर २०१६ (IST)

नमस्कार ! रांगोळी विषयाबद्दल तुम्ही अभिप्राय दिला त्याबद्दल धन्यवाद. ! मला भाषांतर असे करायचे त्याविषया कृपया मार्गदर्शन आपण करावे.आर्या जोशी (चर्चा)

साचा नरेंद्र मोदी[संपादन]

बरेचसे झाले

कर्नाटकातील शहरे[संपादन]

कर्नाटकातील शहरे हा वर्ग इतर राज्यांतील शहरांतील वर्गांशी सुसंगत आहे. तरी इतर राज्यांतील शहर-वर्गांचेही स्थानांतर करावे किंवा न्यायक्षेत्र साच्यात बदल करावे, असे दोन पर्याय दिसतात.

या दोनपैकी तुम्हास कोणता पर्याय ठीक वाटतो? कि तिसराही पर्याय आहे?

अभय नातू (चर्चा) १८:२०, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)


@अभय नातू:

तिसरा पर्याय काही सुचला नाही.मी निर्णय घेऊ शकलो नाही म्हणून आपणास संदेश टाकला.तरी आपणास योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा ही विनंती.साच्यात बदल केला तर तो ईतर राज्यांसाठी लागू होणार नाही. मी ते बघितले आहे.--वि. नरसीकर (चर्चा) १९:५०, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)
जाउ द्या.काहीच तरणोपाय दिसत नाही. असेच चालू द्या.--वि. नरसीकर (चर्चा) १९:५०, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)
ठीक. सध्या असेच राहिले तरी एकदा आपला निर्णय झाल्यावर सांगकाम्याकरवे एकत्रीकरण करणे अगदी सोपे आहे.
अभय नातू (चर्चा) १९:५३, १७ ऑक्टोबर २०१६ (IST)

धन्यवाद[संपादन]

आपण केलेल्या गौरवाबद्दल धन्यवाद
नितीन कुंजीर (चर्चा) १२:३७, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)


आभार[संपादन]

मला देऊ केलेल्या बार्न स्टारबद्दल मनापासून आभार! .... (चर्चा) १८:४८, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)

बार्नस्टार[संपादन]

नरसीकरजी,

आपण दिलेल्या गौरवचिह्नाबद्दल आपले आभार!

अभय नातू (चर्चा) १९:०५, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)

लघुपथ[संपादन]

नमस्कार,

तुम्ही कोणत्या ९ संपादनांचा उल्लेख करीत आहात? मला वाटते कि लघुपथ कसे तयार करावे या लेखांतील ही संपादने असवीत परंतु एकदा नक्की करावे म्हणजे मी लगेच बघेन.

अभय नातू (चर्चा) २२:०९, २८ ऑक्टोबर २०१६ (IST)

वर उल्लेखिलेली संपादने पाहिली. ती दोन प्रकारची असल्याचे दिसते - १. असलेल्या दुव्यांऐवजी लघुपथ-दुवे घालणे आणि २. नवीन लघुपथ तयार करणे.

पैकी पहिले काम सांगकाम्याकरवी नक्कीच करता येईल. दुसऱ्या प्रकारचे काम करण्यात काळजी घ्यावी लागेल. नवीन लघुपथ-दुव्यांमध्ये काटेकोर सुसंगतता असणे आवश्यक आहे नाहीतर अनागोंदी माजण्याचा मोठा संभव आहे. हे काम जुन्या लोकांकरवी (किंवा त्यांच्या देखरेखीखाली) केले जावे असे मला वाटते. यामागे असलेल्या लेखांची व दुव्यांची माहिती असणे हाच उद्देश आहे. असे असता हे काम सांगकाम्याकरवी करुन घेऊ नये असे मला वाटते.

दुव्यांचे रुपांतर लघुपथांमध्ये करण्यासाठी एखादे प्रकल्पपान केल्यास तेथील यादी पाहून ते काम मी करू शकतो.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) २०:५८, ३० ऑक्टोबर २०१६ (IST)


तुम्ही 'लघुपथापासूनचे पुनर्निर्देशन', 'सहाय्य' वगैरेरे शब्द वापरातां, त्या वापराबद्दल मला शंका आहॆ. मराठीत निर्दॆश म्हणजे उल्लेख किंवा बोट दाखवणे. मराठीत डायरेक्टरला दिग्दर्शक म्हणतात, हिंदीत निर्देशक. पण पुनर्निर्देशनसाठी मला पर्यायी मराठी शब्द सुचत नाही, तॊपर्यंत हा शब्द वापरत रहावे.

सहाय्य हा शब्द मराठीत नाही, हिंदीतही नाही. मराठी सहाय, साह्य आणि साहाय्य हे शब्द आहेत, हिंदीत सहाय, सहायता, सहायक, वगैरे. पण साह्य, निदान वापरात तरी नाही. (चर्चा) ०७:४३, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)

@:

हे शब्द येथे पूर्वीपासूनच वापरात होते. मी येथे बराच नंतर आलो. तेच शब्द वापरत राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण, त्यास पर्यायी सब्द टाकावयाचे तर खूप मोठे बदल करावे लागतील.[१] या संकेतस्थळापासून सुरुवात करुन मिडियाविकि वगैरे वगैरे.प्रत्येक पान तपासून मग बदल करावयास हवेत.सहाय्य हा शब्द इंग्रजी हेल्पचे मराठीतले पर्यायी नाव आहे.मला मदत हा शब्द त्यासाठी योग्य वाटतो.पण इतके बदल करावे झाले तर त्यासाठी मला तितके सांगकाम्याचे वगैरे ज्ञान नाही. माणसातर्फे हे शक्य नाही असे माझे मत आहे, कारण त्यात काही सुटण्याचा, चूका होण्याचाही संभव आहे. मग त्या पुन्हा निस्तरत बसाव्या लागतील. तसेच हे बदल अनेकांना रुचणारही नाहीत.या विकिवर मनुष्यबळाचा अभाव कायमच राहिला आहे (येथे तशी नेहमीच मारामार असते). प्रत्येक जण हा प्रत्येक क्षेत्रात तज्ज्ञ/तज्ञ नसतो. ज्या कोणी हा विकि उभारण्याचे काम केले त्याचे खरेतर आभारच मानावयास हवेत. त्यावेळेसच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपला बहुमूल्य वेळ खर्च करुन हे काम केल्या गेले आहे. हे सर्व बदल करणे म्हणजे त्याचे काम पुसून टाकल्यासारखेपण होईल असे माझे मत आहे.आपले मतप्रदर्शन एकदम योग्य आहे,त्यात शंका नाही पण, याचा आग्रह धरु नये ही विनंती.मला टाकलेल्या संदेशाबद्दल आभार.

आपणांस काही संदेश टाकावयाचा तर भिती वाटते कारण माझे मराठी तितकेसे चांगले नाही.ऱ्हस्व दिर्घ यात नेहमी गफलत होते.(हास्याचा ईमोजी) दिवाळीच्याही शुभेच्छा कृपया स्वीकाराव्यात --वि. नरसीकर (चर्चा) ०९:२६, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)


पण प्रश्न नुसताच तो नाही, तर लघुपथापासून पुनर्निर्देशन या शब्दरचनेचा अर्थ स्पष्ट होत नाही. लघुपथासाठी पुनर्निदेशन, पुनर्निर्देशनासाठी लघुपथ, लघुपथ वापरून पुनार्निदेशन की आणखी काही?

आपण करता ते काम इतके किचकट आणि अफाट आहे की, ऱ्हस्व-दीर्घ पहात बसलात तर काम होणारच नाही. आणि हजार शब्दांमध्ये एखादी चूक होतेच. मी फक्त मोठ्याने वाचून पहातो आणि ऐकताना काही खटकले तरच शुद्धलेखन तपासतो. गरज पडल्यास शब्दकोश पाहतो, तिथे समाधान झाले नाही तर शब्दाची व्युत्पत्ती शोधतो आणि मगच आवश्यक तो बदल करतो. मी पूर्णवेळ रिकामा आहे, म्हणून हे जमते, तुमची तशी गॊष्ट नाही. .... (चर्चा) १५:३५, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)

@ज:

येथे विकिवर पुनर्निर्देशन दोन प्रकारचे असते.आपण लेख १ व लेख २ या दरम्यानची पुनर्निर्देशने बघु. एक म्हणजे लेख १ या लेखापासूनचे पुनर्निर्देशन (ते लेख २ अथवा कोणत्याही लेखास असु शकते.) व दुसरे म्हणजे लेख २ ला असलेले/ली पुनर्निर्देशन/ने. एखाद्या लेखास अनेक लघुपथांची/लेखांची पुनर्निर्देशने असू शकतात. हा फक्त वर्णनात्मक भाग आहे. साचा कशासाठी वापरला जातो हे थोडक्यात शीर्षकावरुनच समजावयास हवे यासाठी ही सोय.तो साचा वापरणाऱ्याचे ते ताबडतोब लक्षात यावयास हवे म्हणून. व्याकरणाचे दृष्टीने ते कदाचित बरोबर नसेलही पण वर्णनात मात्र चपखल बसते. असो.
मला संगणक भाषांचे तितकेसे ज्ञान नाही, जसे जावा, सी++, एचटीएमएल, लुआ वगैरे. पण येथे सरावाने बरेचसे जमते आहे.येथील साचे इंग्रजी विकिवर असतातच. त्यांना मात्र शोधून ते येथे आयात करावे लागतात. मराठीकरण करावे लागते.बरेच वेळेस ट्रायल व एररने काम करतो. केलेले काम तपासून बघतो. सहसा चूक रहात नाही. समजा लक्षात न येणारी चूक घडली तर कोणीतरी वापरकर्ता / वाचक त्यास दुरुस्त करतो. मी बिनचूक आहे असा माझा अजिबात दावा नाही. हं! प्रयत्न मात्र मनापासून करतो.
मी ही निवृत्तच आहे.

--वि. नरसीकर (चर्चा) १६:२४, ३१ ऑक्टोबर २०१६ (IST)

विकिपीडिया आशियाई महिना साठी प्रोत्साहन[संपादन]

नमस्कार , मी टायवेंन [मराठी विकिपीडिया आशियाई महिना आयोजक] तुह्मला विकिपीडिया आशियाई महिना मध्ये आमंत्रित करतो . विकिपीडियाच्या तुमचा योगदान संपूर्ण दुनियेला दकायेचे हे चांगले मोका आहे. तुम्ही योगदान साठी विकिपीडिया आशियाई महिना च्या लिंक वर साइन अप करू शकता. विकिपीडिया मराठी तुमचा योगदानाचे आभारी आहे --Tiven2240 (चर्चा) १४:२८, १६ नोव्हेंबर २०१६ (IST)

invalid, deprecated[संपादन]

नमस्कार,

अवैध शब्दाचा इंग्लिश अर्थ illegal होईल. invalid साठी चुकीचा/चे/ची अधिक बरोबर वाटतो. invalid ला मराठी शब्द अवैध बरोबर आहे परंतु deprecated साठी शिळा, जुना, इ. शब्द बरोबर आहे.

अभय नातू (चर्चा) ०५:२१, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)

@अभय नातू:

एखादे कार्ड, परवाना इत्यादी valid upto=पर्यंत वैध असेच असते. त्यानंतर ते invalid=अवैध होते.असो.--वि. नरसीकर (चर्चा) १७:०६, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)

माझ्या चर्चापानावरील वर्ग पुन्हा बघतो. बहुतेक दोन वेगळ्या पानांमधून येत आहे असे वाटते.
अवैध = invalid हे पटत नाही. अर्थात, मी व्याकरणपंडित नाही.
अभय नातू (चर्चा) २०:३५, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)
गैरसमज नाहीच. परंतु एक सांगावेसे वाटते की आपण (तुम्ही, आम्ही, सगळेच) आत्ता करीत असलेले हे बदल कायमस्वरूपी (कमीतकमी दीर्घायुषी तरी) आहेत तरी योग्य ती काळजी घ्यालच. आत्तापर्यंत येथील संदेशांमध्ये अनेकदा सदोष व्याकरण, शुद्धलेखन आलेले आहे. हे बदलणे अवघड, क्लिष्ट असतेच पण त्याने नवीन वाचकांना ते खटकून त्यांचा विरस होण्याची मोठी शक्यता असते.
असो, तुम्ही योग्य तेच कराल व गरज पडेल तेथे तज्ञांची मदत घ्याल ही खात्री आहेच.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) २०:५३, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)