सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ३०

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभिनंदन[संपादन]

शाबासकीची थापही येथेच द्या!


आपली संपादने १,००,५०३ झालीत. हार्दिक अभिनंदन.- नरसीकर

सदस्य Yogeshs यांचा निनावी संदेश आणि माझे उत्तर[संपादन]

@Yogeshs:, तुमचा मजकूर तिरक्या मजकूरात, माझे उत्तर सरळ मजकूरात --


व्वा उत्तम.... तुम्ही म्हणता ते सरळ आणि इतर म्हणतात ते तिरके _/\_

१. http://indiarailinfo.com/departures/8566 या पानावर लौजी रेल्वे स्थानकाचा फलक आपणास पहायला मिळेल. त्यावर स्पष्टपणे लौजी असा शब्द आहे .... लवजी नाही. महाराष्ट्रातल्या कित्येक ठिकाणी गावाचे नाव आणि स्थानकाचे नाव यात फरक आहे.

मान्य आहे. म्हणूनच मी असलेल्या लेखापासून पुनर्निर्देशन केले. तरीही फलकावरील मराठी नावच ग्राह्य धरावे. मराठी नाव लौजी असल्यास लौजी रेल्वे स्थानक असाच लेख असावा, जो तुम्ही तयार केलात.


तरीही आपण शंका उपस्थित केलीत म्हणून स्पष्टीकरण दिले.

२. मुंबई उपनगरीय (लोकल) गाड्यांसाठी / मार्गिकेसाठी इंग्रजी / मराठी / हिंदी मध्ये fast / जलद / तेज तसेच slow / धिमी / धीम्री या संज्ञा प्रचलित आहेत. (Ref: indiarailinfo.com) उद्घोषणादेखील मराठीत धिमी लोकल आणि हिंदीत धीमी लोकल अशीच होते. slow साठी मराठीमध्ये 'मंद' / 'संथ' / 'सावकाश' इ. कोणत्याही संज्ञा प्रचलित नाहीत.

प्रचलित आहे पण बरोबर आहे? रेल्वेने उद्घोषणा केल्याने नवीन मराठी शब्द तयार होत नाहीत. धिमी या शब्दाचे मराठी मूळ दाखवावे. मराठी वर्तमानपत्रांतून अगदी गचाळ, घाणेरडे व्याकरण आढळते, म्हणून ते लगेच मान्य करायचे? आणि रेल्वेशिवाय slow साठी मराठीतून संथ, हळू, मंद, सावकाश याच संज्ञा आहेत. अरे, जरा धिमा चाल, अवघड जिन्यावरुन धिमे चालत, असे कोणी बोलल्याचे ऐकीवात नाही.


आपण निश्चितच पुण्यातले दिसता. तुम्ही म्हणता तीच मराठी बरोबर? असे नाही. महाराष्ट्रात इतर ठिकाणी धिमी हा शब्द प्रचलित आहे. आपल्या ऐकिवात नसला तरी धिमी गती हा शब्द मी महाराष्ट्रातल्या कांही भागात निश्चितच ऐकला आहे.

३. धीमी हा हिंदी शब्द आहे. मराठीत धिमी हा शब्द आहे.(Ref: indiarailinfo.com) शिवाय जे शब्द सध्या प्रचलित आहेत तेच शब्द वापरल्यास अधिक उपयोगाचे ठरेल. मंद मार्गिका अशी संज्ञा मुंबईत कोठेही वापरात नाही. मराठी विकीपेडियावर रेल्वे हा शब्द का वापरतो? रेल्वेला पर्यायी मराठी शब्द का वापरत नाही?

युक्तिवाद बरोबर आहे परंतु रेल्वे आणि लोहमार्ग यांतील सोपा शब्द कोणता? मंद आणि धिमी मध्ये फारसा फरक नाही पण रेल्वे आणि लोहमार्ग मध्ये आहे. अग्निरथगमनागमनसूचताम्रलोहपट्टिका वापरावे कि सिग्नल (किंवा दुसरा एखादा सोपा मराठी शब्द)? आणि विकिपेडिया नव्हे, विकिपीडिया.


जर रेल्वेमध्ये धिमी मार्गिका असा शब्द प्रचलित असेल तर आपणास काय समस्या आहे? आपण रेल्वेशी संपर्क साधून धिमी ऐवजी मंद शब्दाचा उपयोग करण्यास सांगावे .. नंतर निश्चितच येथेदेखील मंद शब्द वापरता येईल.

४. 'माथेरान रेल्वे स्थानक' या लेखात आपण "नॅरो गेज" हा चुकीचा शब्द वापरला आहे. त्यासाठी मराठी शब्द अस्तित्वात तसेच प्रचलित आहे.

जर असा शब्द असेल तर जरूर वापरावा.

५. 'माथेरान रेल्वे स्थानक' या लेखात आपण MTH हा चुकीचा संकेत वापरला आहे. (http://indiarailinfo.com/departures/6675 येथे तपासून पहा.)

आवश्यक ते बदल जरूर करावे.


६. 'माथेरान रेल्वे स्थानक' या लेखात "मागील स्थानक / पुढील स्थानक" या चौकटीत आपण चुकीची माहिती दिली आहे.

आवश्यक ते बदल जरूर करावे.


७. आपण ब-याच ठिकाणी गावांचे लेख रेल्वे स्थानक या ठिकाणी पुनर्निर्देशित केले आहेत. उदा. "कळवा > कळवा रेल्वे स्थानक". कृपया असे करू नये. गावांचे लेख आणि रेल्वे स्थानकांचे लेख हे वेगवेगळे असल्यास निशितच उपयोगाचे होईल. अशा प्रकारे पुनर्निर्देशित केल्याने समस्या अशी उद्भवत आहे की: गावाची माहिती स्थानकाच्या लेखात दिसत आहे. उदा. "कळव्यात ई.सन् १९८३ पर्यंत ग्रामपंचायत होती नंतर ती ठाणे महानगर पालिकेत विलीन झाली. ईथे मूळ कुळांची आडणावे गायकर, साळवी, म्हात्रे, पाटिल, केणी, लासे अशी आहेत." ही माहिती 'कळवा' लेखात अत्यंत उपयोगी आहे .... 'कळवा रेल्वे स्थानक' या लेखात नाही. तरी कृपया आपण अशा प्रकारे केलेले सर्व पुनर्निर्देशन पूर्ववत करावे.... जेणे करून योग्य माहिती योग्य लेखात लिहिता येईल. गाव/शहर आणि त्याची रेल्वे स्थानक असे २ वेगवेगळे लेख असणे आवश्यक आहे.

कळव्याबद्दलच्या माहितीबद्दल धन्यवाद. असे दोन लेख आपण तयार केलेत तर सोन्याहून पिवळे. उडवून टाका बार!


८. ज्याप्रमाणे 'तुमच्या लेखात इतरांनी ढवळाढवळ करू नये' अशी अपेक्षा आपण करता.... अशी अपेक्षा मी पण आपल्याकडून का करू नये? सुरवात तर आपणच केली की? काय नक्की समस्या काय आहे आपली? का आपण माझ्या लेखात सतत ढवळाढवळ करत आहात??

वरील विधान फोल आहे. माझी अपेक्षा काय हे आपण कसे ठरवलेत? आणि माझी अपेक्षा नसताना आणि इतर कोणाचीही नसताना आपली का असावी? आपण लिहिलेला मजकूर बदलला जाईल हे आपण मान्य केलेले आहेच. मी केलेले बदल हे तुमचे संकेतविरहीत लेखन सुधारण्यासाठी आहेत. मी तुम्हाला दिलेल्या सूचना तुमचे विकिपीडियावरील लेखन सुधारण्यासाठी आहे.


सदर विधान फोल नाही. आपणच तसा संदेश मला ०७:२५, २१ मार्च २०१७ (IST) या वेळेस लिहिला आहे. "आपण लिहिलेला मजकूर बदलला जाईल हे आपण मान्य केलेले आहेच" हे मला पूर्ण माहिती आहे. तुम्हाला करावासा वाटल्यास तो तुम्ही विनाचर्चा करू शकता. अनावश्यक चर्चा न केल्यास उत्तम.

मी लिहिलेल्या मजकूरात चुकीची माहिती असल्यास ती बदलली तर मला (किंवा इतर कोणालाही) अपमान वाटत नाही. तुमच्या चुका दाखवल्या तर त्यात तुमचा अपमान झाल्याचा पवित्रा तुम्ही घेत आहात. आत्ता आणि पूर्वीही. कृपया क्राउसोर्सिंगबद्दल थोडीशी माहिती वाचून घ्यावी.


माझ्या लेखनातील चुका दुरुस्त केल्यास मला निश्चितच आनंद होईल. त्यात अपमान वाटण्यासारखे काहीही नाही आणि असा कोणताही पवित्रा मी घेतलेला नाही. आत्ताही नाही आणि पूर्वीही नाही.

९. 'जगा आणि जगू द्या' या तत्त्वानुसार कृपया 'लिहा आणि लिहुद्या'. वैतागलोय मी तुमच्या असल्या चर्चेला. लेखन करायचे सोडून या असल्या चर्चा करायलाच वेळ जातोय माझा....एवढ्या वेळात एक पान तरी लिहून झाले असते. कृपया त्रास देऊ नका ही अत्यंत नम्र विनंती. धन्यवाद.

तुमच्यापेक्षा वैताग मला आला आहे. तुम्ही येथील संकेतांचा, इतरांच्या लिखाणाचा बिलकुल आदर करीत नाही, किंबहुना दखलही घेत नाहीत हे अगदी चुकीचे आहे. विकिपीडियासारख्या ठिकाणी लिखाण करायचे तर त्यात इतरांची ढवळाढवळ होणारच. ती कमीतकमी हवी असेल तर येथील नियम/संकेत पाळा आणि लिहा. तुमच्या योगदानाचे येथे स्वागतच आहे...नाही गरजच आहे. पण म्हणून इतरांचे ऐकायचे नाही हे ठीक नाही. त्रास तुमचा येथे होत आहे याची दखल घ्यावी.

साधे संदेशानंतर सही करा हे अनेकवेळा सांगून आपण पाळत नाही यातही हे दिसते.

असो. आपण सुज्ञ आहात. ज्ञानीही आहात. माझ्या लिहिण्याचा मथितार्थ घेउन योग्य ते कराल ही खात्री आहे.

धन्यवाद.


मी "इतरांच्या लिखाणाचा बिलकुल आदर करीत नाही" या विधानाचे स्पष्टीकरण द्यावे. अशी त्रोटक विधाने न केल्यास उत्तम. तुम्हाला जर माझा वैताग आलेला असेल तर तुम्ही कृपया माझ्याशी कोणतीही चर्चा न केल्यास तो निश्चितच दूर होईल. त्रास तुम्ही स्वता:हून करून घेत आहात याची कृपया दखल घ्यावी. मी विकिपीडियावर बरेच लेख वाचले आहेत... त्यात अनंत चुका आहेत. पण आपणास केवळ माझेच लेख दिसतात की काय अशी शंका मला का येऊ नये?

इतरांचे ऐकायचे नाही' असे अजिबात नाही. जेथे बरोबर आहे तेथे मी निश्चीतच ऐकेन. आपण वगळता मी कोणासही संदेश पाठविलेला नाही....कोणासही संदेश पाठविण्याची मला इच्छादेखील नाही. संदेशानंतर सही कशी करायची याची मला माहिती नाही .... आपण माहिती करून दिल्यास उपयोगी ठरेल. येथील नियम/संकेत माझ्याकडून न पाळले गेल्यास आणि लेखनात चूक झाल्यास कोणीही ती चूक दुरुस्त करू शकते.

अभय नातू (चर्चा) १२:३१, २१ मार्च २०१७ (IST)[reply]

दुसरे उत्तर[संपादन]

@Yogeshs:, अहो काय गिचमिड करुन ठेवलीयेत वर?! तुमचे लिहिणे काय अन माझे लिहिणे काय हे कसे कळायचे? विकिपीडियावर कसे लिहायचे याची किमान माहिती तरी करून घ्यायला हवी होतीत.

असो, मला कळेल तितक्याला उत्तर देत आहे.

व्वा उत्तम.... तुम्ही म्हणता ते सरळ आणि इतर म्हणतात ते तिरके _/\_

आता काय बोलायचे? दोन लोकांच्या लिहिण्यात फरक कळावा म्हणून हे केले जाते. हजारो लोक शेकडो विकिप्रकल्पावर हे वापरतात. आता यातही तुम्हाला खोडी दिसली तर धन्य आहे.

मी पुण्यातला नाही. मी पुण्यात काही वर्षे राहिलो असलो तरी त्याहून पाचपट काळतरी बाहेर आहे. आणि पुणेरी असो किंवा मुंबईकर किंवा कोणी स्वर्गीय महाभागांनी (आता हा विनोद आहे, हलकेच घ्या...नाहीतर याल पुन्हा अंगावर), कोणीही मराठीमध्ये शब्द असे इतस्ततः घुसडू नयेत. अगदी रेल्वेमंत्र्यांनीही. आता एखाद्या क्लिष्ट शब्दाला सोपा शब्द सापडला तर त्याचे स्वागतच आहे - उदा. robot साठी सांगकाम्या हा शब्द अगदी म्हराटी आहे आणि तो विकिपीडियावर पहिल्यांदा वापरला गेला असावा.

महाराष्ट्रातील काही भागातील शब्द बोलीभाषेत मोडतात. अशा बोलीभाषांचा वेगळा विकिपीडिया करावा किंवा लेखात बोलीभाषा असल्याचे नमूद करावे. हे लेख वेगळे, त्या प्रदेशाबद्दल किंवा संस्कृतीबद्दल असावेत.

रेल्वेने त्यांचे धिमी/मंद सांभाळावे. आम्ही आमच्या शुद्धलेखन आणि व्याकरणाचे पाहू. रेल्वेतील बिगरमराठी अधिकाऱ्यांनी हिंदी शब्द ठोकले की आम्ही ते स्वीकारणार हे रेल्वेत चालेल. येथे नाही. किंवा असे करा, तुम्हीच रेल्वेशी संपर्क साधा आणि त्यांना प्रमाण मराठी वापरण्यास उद्युक्त करा.

८व्या क्रमांकाचे तुमचे विधान अगदी बिनबुडाचे आहे. कोणी माझ्या लेखात ढवळाढवळ करू नये ही माझी अपेक्षा आहे. हे तुम्हीच ठरविले व त्यामुळे तुमच्या लेखात मी (किंवा इतर कोणीही) ढवळाढवळ करू नये ही मागणी केलीत. अगदी फोल विधान. पांचट. विकिपीडियावर लिहिणे म्हणजे त्यात बदल, ढवळाढवळ होणारच. पुन्हा एकदा - अशी ढवळाढवळ किमान हवी असल्यास इतरांचे मत विचारा. कोणी अभिप्राय दिल्यास त्यावर मोकळेपणाने चर्चा करा.

आता माझे तुमच्याशी चर्चा करण्याचे कारण म्हणजे ही आशा की तुम्ही एखाद्या लेखात केलेल्या चुका अजून दहा ठिकाणी करू नयेत. जर तुम्हाला कोणाशी बोलायचे नसेल आणि त्याचत्याच चुका करीत राहिल्यास तुमची संपादने उलटविली जाऊ शकतात. यासाठी मीच नव्हे तर इतरही प्रचालक लक्ष ठेवून असतात. अगदी कहर झाला आणि तरीही तुम्ही चर्चा करण्यास नाकारलेत तर तुम्हाला संपादनांपासून तात्पुरती (तरी) बंदी घातली जाऊ शकते. हे सगळे अगदी पराकोटीचे उपाय आहेत. ते वापरावे लागू नयेत ही आशा. विकिपीडिया हा क्राउडसोर्स्ड प्रॉजेक्ट आहे. येथे मी चर्चा करणारच नाही आणि मला वाटेत ते मी कोणाचेही न ऐकता करत सुटेन असे चालत नाही हो!

तुम्ही म्हणता अपमान झाल्याचा पवित्रा घेतला नाही. मग हे सगळे काय चालवले आहे? पूर्वीचा माझा, तुमचा संवाद पहा. त्यातील माझी मदत करण्याची ऑफर आणि त्यावरील तुमची प्रतिक्रिया पहा. रुसून जाउन कोपऱ्यात बसल्याचा आव दिसतो त्यात.

तुम्हाला दिलेले अनेक संदेश तुम्ही सरसकट घालवले आहेत. हे घालवू नका असे म्हणूनसुद्धा परत परत तेच केले आहे.

सही कशी करायची हे दोनदा तरी तुम्हाला दाखवले तरीही तुम्ही न कळल्याचे दाखवता? पुन्हा एकदा - ~~~~ असे लिहिल्यास सही होते.

येथे शेकडो, हजारो मराठीप्रेमी आपला वेळ घालवून काहीतरी निर्माण करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांची दखल घ्या. लिहिण्याआधी कसे लिहावे ते अभ्यासा. असलेले संकेत पाळा, त्यात बदल पाहिजे तर सुचवा. चर्चा करून ते सुधारण्यास हातभार लावा. या सगळ्यातील काही कळले नाही तर मदत करण्यास अनेक लोक तयार आहेत, ऑनलाइन तसेच ऑफलाइनही.

उगीचच मनात राग धरून रुसून बसू नका. मनमोकळेपणाने चर्चा करा. त्यात तुमचे चुकले तर ते स्वीकारायची तयारी ठेवा. असे केल्यास आनंद. नाहीतर आहेच ये रे माझ्या मागल्या.

असो. तुम्ही येथे केलेल्या लिखाणात वर म्हणल्याप्रमाणे अतिशय गोंधळ निर्माण केला आहेत. त्यातून जे मला दिसले त्यास उत्तर दिले. अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास वर विषय जोडा यावर टिचकी मारून एक एक करून बोला.

काहीही झाले तरी शक्य तितकी मदत करण्यास मी तयार आहे तरी मागण्यास संकोच करू नका. अगदी माझ्याकडे मागण नको वाटल्यास नरसीकरजी, सुबोध कुलकर्णी, नितीन कुंजीर, संतोष दहीवळ, रामप्रसाद साळवे, संदेश हिवाळे, माहितगार, राहुल देशमुख, असे असंख्य जाणते लोकही मार्गदर्शनास तयार आहेत याची मला खात्री आहे. आमच्या प्रत्येकी ८-१४ वर्षांच्या अनुभवाचा उपयोग करा आणि मराठी विकिपीडियावर भर घाला.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) १७:१२, २१ मार्च २०१७ (IST)[reply]

ता.क. तुम्हाला जर माझा वैताग आलेला असेल तर तुम्ही कृपया माझ्याशी कोणतीही चर्चा न केल्यास तो निश्चितच दूर होईल. त्रास तुम्ही स्वता:हून करून घेत आहात याची कृपया दखल घ्यावी.

आता येथील प्रचालकपद स्वीकारल्यावर इतरांच्या उद्योगांचा वैताग करून घेणे हे आलेच. गेले दशकभर तरी हे मी (आणि इतर प्रचालक) करीत आहे. हा त्रास करून घेत आहे ते विकिपीडियावरील संपादनांत समानता रहावी यासाठी. यासाठी मी तुमच्याशी चर्चा करू नये हा हट्ट पुरवला जाणार नाही. प्रचालक या नात्याने तुम्हाला मी मदत करण्याची ऑफर केली, ती तुम्ही लाथाडलीत. आता माझ्याशी बोलूच नका असे म्हणणे तर्काबाहेर आहे. तुम्हीच नाही, इतर अनेकांशी मी असा संवाद साधलेला आहे. ९९% लोकांनी त्यास सकारात्मक उत्तर दिलेले आहे, अगदी आमचे मतभेद असले तरीही.

छान ![संपादन]

चर्चा वाचून छान मनोरंजन झाले ! --वि. नरसीकर (चर्चा) १५:५७, २१ मार्च २०१७ (IST)[reply]

साचा:मुखपृष्ठ/आजचे चलचित्र[संपादन]

साहेब व्हिडिओची साईझ फिट नाही होत जस जमेल तसं करा साचा:मुखपृष्ठ/आजचे चलचित्र --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:३६, २१ मार्च २०१७ (IST)[reply]

पुन्हा एकदा Yogeshs[संपादन]

खालील लेखन Yogeshs यांचे आहे ते व्यवस्थित करून त्यास उत्तरे दिली आहेत.

१. तुमचे लिहिणे अन माझे लिहिणे यामध्ये रेष आहे. तुम्हालाच तुमचे लिहिणे ओळखता येत नसेल तर ........

रेष दिल्याने किती गोंधळ होत आहे हे दोन महिन्यांनी त्रयस्थ व्यक्तीस वाचण्यास दिल्यावर लक्षात येईल.

२. विकिपीडियावर लेख कसे लिहायचे याचे प्रशिक्षण मी घेतले आहे. परंतु चर्चेमध्ये कसे लिहायचे याची मला खरोखरच माहिती नाहीये. आपण करून दिल्यास मदतच होईल.

नक्कीच. हे उतारे जसे वेगवेळे केले आहेत असे लिहिणे एक प्रकार आहे. हा विभाग (पुन्हा एकदा Yogeshs) याचा स्रोत न्याहाळल्यास लक्षात येईल.

३. आपण म्हणत आहात की "बोलीभाषांचा वेगळा विकिपीडिया करावा" ... म्हणजे जर महाराष्ट्रातल्या एखाद्या भागात जर एखादा शब्द वापरात असेल तर तो मराठी विकिपिडीयावर येइलच असे नाही... पण मग स्टँडर्ड मराठी कोणती?

यावर मी भाष्य करण्यापेक्षा माहितगार यांनी केलेले बरे. त्यांनी विकिपीडियावर वऱ्हाडी बोलीभाषेबद्दल थोडे संशोधन केलेले होते.

४. विकिपीडियावर मराठीमध्ये कोणते शब्द वापरायचे आणि महाराष्ट्रात मराठीत प्रचलित असलेले कोणते शब्द वापरायचे नाहीत याची यादी द्यावी...म्हणजे महाराष्ट्रातल्या एखाद्या भागात प्रचलित असलेला शब्द मराठी विकिपीडियावर लिहायचा की नाही हे निश्चितपणे ठरविता येईल आणि अमुक एखादा म्हणतोय तोच शब्द स्टँडर्ड मराठी असा गोंधळ होणार नाही.

अशी यादी माझ्या माहितीत नाही पण तुम्ही पुढाकार घेउन सुरू केलीत तर मदत होईल.

५. आपण म्हणत आहात की "तुम्हीच रेल्वेशी संपर्क साधा आणि त्यांना प्रमाण मराठी वापरण्यास उद्युक्त करा." पण मला धिमी या शब्दापासून कोणतीही समस्या नाही (कारण तो महाराष्ट्रातल्या काहे भागात प्रचलित आहे) आपणासच धिमी या शब्दापासून समस्या असल्याने मी तसे विधान केले.

माझे हे वाक्य तुमच्या तुम्ही रेल्वेला मंद वापरायला लावा अशा विधानास उत्तर होते. धिमी हा शब्द कोणत्या भागात आहे? नागपूरात अनेक हिंदी शब्द मराठी म्हणून वापरले जातात. त्यांपैकी हा एक आहे का? असे असल्यास इतर शब्दांशी तुम्हाला समस्या आहे कि नाही? मी हितं लिवून ऱ्हायलेला असे दोन (तरी) बोलीभाषेतील विधान ग्राह्य धरावे का? मग काही लेखांतच ते ग्राह्य धरावे का सगळीकडे?

६. आपण आपली प्रतिक्रिया नीट वाचल्यास आपल्याला समजेल की माझे विधान अजिबात बिनबुडाचे नाही. विकिपीडियावर लिहिणे म्हणजे त्यात बदल, ढवळाढवळ होणारच हे मी व्यवस्थित जाणतो. माझ्या लेखात तुम्ही (किंवा इतर कोणीही) ढवळाढवळ करू नये ही मागणी मी कधीही केली नाही. चुकीचे विधान करू नये.

नाही. तुम्हीच पुन्हा एकदा पूर्ण सूत्र नीट वाचा.

७. "मी 'लेख' तयार करताना कोणत्या चुका केल्या आहेत त्याची कृपया यादी द्यावी" की ज्यामुळे तुम्हाला माझ्याशी चर्चा करावी लागली. मी चर्चेस आणि चुका दुरुस्त करण्यास तयार आहे.

मला जे दिसले ते मी लिहिले. तुमच्या सगळ्या मजकूराचे प्रूफरीडींग करणे शक्य नाही. कधीकधी चुका ठळकपणे जाणवतात. तेव्हा त्या दर्शविल्या जातात. काही चुका उशीरा लक्षात येतात. तेव्हा त्या दर्शविल्या जातील.

८. आपण जरी मदत करण्याची ऑफर दिली असली तरी ती घ्यायची का नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मी ज्या दिवसापासून विकिपीडियावर आलो आहे तेव्हापासून तुम्ही सतत डिस्टर्ब करत आहात. अहो साहेब ... जरा समजून घ्या .... एखादा लेख तयार करायला घेतल्यावर तो पूर्ण होईपर्यंत थोडा वेळ तरी लागतो ना..... नवीन पान तयार केले आणि काही वाक्य लिहीपर्यंत तुम्ही तेथे लगेच हजार असता .... किंवा एखादा परिच्छेद लिहिला ..... आणि तो पुन्हा संपादन करेपर्यंत काही मिनिटात .. तुमचे संदेश सुरु ! हे का केले ? आणि ते का केले?

असे तुम्हालाच का जाणवते? मी आत्तापर्यंत शेकडो लोकांना मदत केली आहे. तुम्हाला त्याचा जाच वाटतो आहे. विचार करा. तुम्ही समयरेखा पाहिली असता कळेल की तुम्ही एखादी चूक (चुकीच्या शीर्षकाचा साचा, लेखात साच्याचा मजकूर, इ.) झाल्यानंतर काही वेळाने (किंवा तुम्ही इतर लेखांत तसेच संपादन केल्यानंतर) मी हे तुमच्या निदर्शनास आणून दिले. अनेक ठिकाणी तुमची वाट न पाहता मी स्वतःच ते दुरुस्त केले. तुम्हाला हा जाच वाटतो कारण तुम्ही बदल म्हणजे तुमचा अपमान समजता.

अहो लेखन करायला काहीसा वेळ तरी द्याल की नाही? का लगेच संदेशांना सुरवात करायची? हेच तुमचे नको झाले आहे मला.... पूर्वीही आणि आजही. त्याचमुळे मला आपली मदत घेण्याची अजिबात इच्छा नव्हती.

वर पहा.

९. सही कशी करायची हे मला खरेच कळले नव्हते. न कळल्याचे मुद्दामून दाखविण्याचे कोतेही कारण नाही. "आत्ता" तुम्ही सांगितले आहे की " Yogeshs (चर्चा) १८:२२, २१ मार्च २०१७ (IST) असे लिहिल्यास सही होते. Yogeshs (चर्चा) १८:२२, २१ मार्च २०१७ (IST)[reply]


@Yogeshs: @अभय नातू: मध्ये नाक खुपसत आहे याबद्दल दोघेही माफ करा पण, माझी दोघांनाही अत्यंत कळकळीची व विनम्रपणे विनंती आहे कि ही चर्चा कृपया थांबवावी. झाले गेले ते विसरुन परत सामान्यपणे काम सुरू करावे. विकिसाठी हे हितकारक नाही असा माझा 'भाबडा' समज आहे. या विषयावर तरी पुन्हा पुढे चर्चा करु नये.बघा पटते काय?--वि. नरसीकर (चर्चा) १९:५१, २१ मार्च २०१७ (IST)[reply]

नरसीकरजी,
वर मी फक्त मुद्देसूद उत्तरे दिली आहेत ज्यायोगे Yogeshs यांना मदत होईल आणि गैरसमज दूर होण्यास हातभार होईल. तरीही यावर चर्चा आता बंद करतो.
अभय नातू (चर्चा) २०:२७, २१ मार्च २०१७ (IST)[reply]

@अभय नातू माझा कोणताही गैरसमज अजिबात झालेला नाही की जेणेकरून तुझ्या मुद्देसूद उत्तरांमुळे तो दूर होण्यास हातभार लागेल. माझा नक्की 'काय' गैरसमज झालेला आहे असे तुला वाटते याचा कृपया खुलासा कर. तुझ्या मुद्देसूद उत्तरांना माझे प्रश्न/उत्तरे - १. म्हणजे दोन महिन्यांने आपण ही चर्चा कोणाएका त्रयस्थ व्यक्तीस वाचावयास देणार आहात तर.....

२. तुला नक्की काय म्हणायचे आहे तेच कळत नाही.

३ व ४. जर प्रमाण (स्टँडर्ड) मराठी कोणती हे तुला माहिती नसेल आणि "महाराष्ट्रात मराठीत प्रचलित असलेले कोणते शब्द विकिपीडियावर वापरायचे" याची तुला माहिती नसेल किंवा अशी कोणतीही यादी उपलब्ध नसेल तर,.... अमुक एक शब्द मराठी नाहीच असे विधान तू कोणत्या आधारावर केले? की मराठी विकिपिडीयावर अभय नातू म्हणतो तोच शब्द मराठी असे आहे? असे असले तरी मला काही समस्या नाही. पण मला याची माहिती नव्हती. असे असल्यास कृपया जाहीर करावे जेणे करून इथून पुढे सर्व शब्द मी तुझ्या परवानगीनेच वापरत जाईन, मला त्यात कोणताही अपमान वाटणार नाही.

५. मला धिमी या शब्दापासून कोणतीही समस्या नाही (कारण तो महाराष्ट्रातल्या काहे भागात प्रचलित आहे) आपणासच धिमी या शब्दापासून समस्या असल्याने मी तसे विधान केले. नागपूरप्रमाणे मराठवाड्यात, मुंबईत मी धिमी हा शब्द मी कित्येकदा ऐकला आहे. मला इतर कोणत्याही शब्दांविषयी समस्या नाही. बोलीभाषा म्हणजे नक्की काय? याचा खुलासा करावा. मराठी आणि बोलीभाषा यात फरक कसा करावा? 'मी हितं लिवून ऱ्हायलेला' हे विधान ग्राह्य धरण्यात आपणास काय समस्या आहे याचा खुलासा करावा.

६. नाही. तुम्हीच पुन्हा एकदा नीट वाचा.

७. तुला काय दिसले (म्हणजे कोणती चूक दिसली) हे स्पष्टपणे लिहावे ... ज्यावरून तू एवढा वाद सुरु केला आहेस.

८. तू आत्तापर्यंत शेकडो लोकांना मदत केली आहे... ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे...

 परंतु नवीन पान तयार केल्यावर लेख लिहायला थोडा वेळ तरी लागतो ना.... त्या पानावर मला (किंवा कोणालाही) काय आणि कोणत्या साच्यात (पद्धतीने) लिहायचे आहे.... हे ठरवलेले असते ...  परंतु ते लिहीपर्यंतच लगेच तू तेथे तुझ्या पद्धतीने लिहिलेले असते.... आणि माझे (किंवा कोणाचेही) संपादन पूर्ण व्हायच्या आत तूझे संपादन झालेले असते..... मग ते काढावे लागते.... आणि मग तुझे प्रश्न सुरु.... हे का केले ... ते का केले....?
... सूचना कराव्यात ... निश्चित कराव्यात .... इतरांच्या लेखात बदल देखील करावेत ..... पण 

"माझी अतिशय म्हणजे अतिशय नम्र आणि कळकळीची विनंती आहे की ... एखादे नवीन पान तयार झाल्यावर ... त्या लेखकाला कृपया काही वेळ (काही तास ... निदान काही मिनिटेतरी द्यावीत)."

मी असे काही लेख (माझे सोडून) पाहिले आहेत ... की नवीन पान तयार झाल्यावर सदर लेखकाने लिखाण करायच्या पूर्वी तू तिथे संपादन केलेले आहे.

कोणतेही नवीन पान तयार झाल्यावर "लगेचच" अत्यंत तातडीने आपण तिथे संपादन केलेच पाहिजे आणि आपले नाव त्या पानाच्या इतिहासात जोडले गेलेच पाहिजे असा तुझा अट्टाहास का? इतर कोणीही प्रचालक असे वागत नाहीत.

अशा वर्तनामुळे जाच का वाटणार नाही? माझ्या साच्यातील शीर्षकातील : ऐवजी / या चुका तू दुरुस्त केल्या आहेत आणि मला सूचना केली आहे त्याप्रमाणे मी नंतरील साच्यांचे शीर्षक लिहिले आहे. मला हा जाच वाटत नाही आणि अपमान तर बिलकुल नाही. Yogeshs (चर्चा) १०:०६, २३ मार्च २०१७ (IST) जाच, अपमान अशा शब्दांचा वापर तूच सुरु केला आहेस येथे जे अजिबात चांगले वाटत नाहीये. तू या (आणि आधीच्याही) चर्चेला जे शीर्षक दिले आहेस ... ही कृती अत्यंत घृणास्पद आहे ... कोणत्याही प्रचालाकाकडून असे वर्तन मला अपेक्षित नव्हते.... कदाचित माझा तो गैरसमज असावा... असो ... तुझ्यामुळे मला चांगलेच कळले आता ... विकिपिडीयावरील चर्चेचा दर्जा काय असतो ते...[reply]

@Yogeshs: काही दिवसांपासून मी पाहतो कि तुमचा आणि अभयचा काही गोष्टीत तक्रार चालू आहे. तुमच्या मुताबीत असं की जे अभय बोलतील ते बोरोबर असं नाही आहे. जर एखाद्या शब्द बरोबर नसेल तर त्यावर चर्चा करा मुंबईत धीमी असा शब्द आहे. तुम्ही नवीन आहेत अभय व इतर प्रचालकांच्या योगदान उत्कृष्ट आहे त्यांचा आदर करा. तुम्हाला शब्दांचा अनुभव आहे त्याचेही आमाला गर्व आहे परंतु मोठे मोठे भाषण लिहून काहीही हल होणार नाही. काम चालू ठेवा आणि इतर गोष्टी तर चालुस असते. जरा सही बाबत विकिपीडिया:सही हा पान पहा. रेल्वे स्टेशन बाबत तुम्ही खूप मेहनत घेतली आहे तासीस चालू ठेवा आमीही त्यात जोगदांन देऊ. माझ्या हा बोलीतून तुम्ही का संदेशाचा तक्रार बंद करून जे आवश्यक ते करा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १२:०४, २३ मार्च २०१७ (IST)[reply]
@Tiven2240:

१. बरोबर आहे तक्रार तर होणारच ना...अशा व्यक्ती भेटल्यावर २. "जे अभय बोलतील तेच बरोबर का?" या माझ्या शंकेला उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. पण तुमचे म्हणणे त्यांना पटले पाहिजे ना? 'मी म्हणतो तेच बरोबर' असे जर ते करत असतील तर कसे होणार....? ३. मुंबईत धीमी असा शब्द हिंदीत असून मराठीत धिमी असा आहे. (https://indiarailinfo.com) पण अभय यांना जर ते मान्य नसेल तर एकच होऊ शकते:

मी तयार केलेला लेख त्याने धिमी मार्गिका वरून मंद मार्गिका ला पुनर्निर्देशित करावा .... मग मी पुन्हा तो लेख धिमी मार्गिका ला पुनर्निर्देशित करेन. आणि अनंत काळापर्यंत हे असेच चालू राहील.

४. 'मी कधी आणि कोणत्या प्रचालकांच्या योगदानाचा आदर केला नाही' ते कृपया माझ्या निदर्शनास आणून द्यावे ... जेणे करून माझ्याकडून तसे पुन्हा होणार नाही. ५. मला शब्दांचा अनुभव आहे हे तुमचे म्हणणे अंशतः खरे आहे. मला फक्त रेल्वेविषयक शब्दांचा अनुभव आहे इतर नाही. ६. "मोठे मोठे भाषण लिहून काहीही हल होणार नाही" हे आपले विधान अतिशय योग्य आहे. पण अभयच्या वर्तनामुळे मला नाईलाजाने, इच्छा नसताना देखील तसे करावे लागत आहे. ७. सहीसाठी पाननिर्देश दिल्याबद्दल धन्यवाद. नवीन सदस्याला माहिती नसते ना हे सही काय प्रकरण आहे ते.. ८. मला फक्त "रेल्वे" या विषयावर आवड असल्यानेच मी येथे लिहित आहे. बाकी विकिपीडिया वगैरे इतर कोणत्याही बाबीत मला अजिबात रस नाही. (पण नाईलाजाने, त्रास होत असला तरी या असल्या चर्चा कराव्या लागत आहेत.) ९. आजपर्यंत अभय नातू व्यतिरिक्त विकिपिडीयावरील कोणत्याही सदस्याने मला कधीच काही त्रास दिला नाही. पण या माणसाला काय अडचण आहे काय माहिती? पहिल्या दिवसापासून माझ्या मागे लागलाय. मी आजपर्यंत रेल्वेवर काही माहिती लिहिली आहे. काही रेल्वेमार्गांचे साचेदेखील तयार केले आहेत.(असे साचे तर मला इंग्रजी विकिपिडीयावर देखील दिसले नाहीत.) महाराष्ट्रातील सर्व रेल्वे स्थानकांची पाने तयार करून त्यावर त्यांची तपशीलवार माहिती लिहायची इच्छा "होती". पण व्यर्थ! या एका माणसामुळे माझा येथे लेखन करण्याचा सगळा उत्साहाच निघून गेला आहे. Yogeshs (चर्चा) १३:४१, २३ मार्च २०१७ (IST)[reply]


@Yogeshs:

तुमचे बोलणे पटले आहे. माणूस माणूस असते त्याच्यापासून कधी कधी छोटी चूक होते.सदस्य_चर्चा:Tiven2240#डिलन/डायलन इथे तुमच्यासारखे एका शब्दाचे गडबड झाली होती परंतु जेवढे आवश्यक तेवढेच बोलायचे. तुमचे धीमी शब्दाचा मी समर्थन केले आहे अभय साहेब याची नोंद घ्यावी कि मी मुंबईचा आहे आणि रेल्वे स्टेशन वर हा शब्द मराठीत वापरला जातो. तर जरी इतर लोकांना त्रास नाही व्हावा त्याला पुनर्निर्देशन करा. त्यांनी दोनी बाजूला समर्थन होते. विकिपीडियाच्या संदभात फक्त २ माहिनाचा अनुभव तुमच्याकडे आहे. इथे काही लोक आहेत जे एका विषयात लिहितात. तुम्ही जसे रेल्वे तसे एका सदस्य क्रिकेट वर सर्वाना लिहिण्याचा हक आहे त्यांचा आदर करणे आमचा व तुमचा कर्तव्य आहे. २ महिन्यात तुम्ही खूप काही संपादन केले [३३५ फक्त] थोडा वेळ घ्या कायदे शिका. कसे चालते विकिपीडिया ते पहा. आपोआप सगळे आरामात जाईल. असे वाद विवाद केले की मग हिंदीत बोलतात ना डॉली से उत्तरी और आंगण मै सिमा खडी की असे बोलतील. नवीन मीही आहे परंतु काहीही करून जे जोग्य असेल त्याला साथ देईल. अभय सगळं वाचते त्यांची व इतर प्रचालक मराठी विकिपीडियावर बरोबर नजर आहे.असेस काम करा एका दिवशी अभय स्वतः तुम्हाला संमाणित करतील तेव्हा या दिवशाची अटवन ठेव्हा.आता ते चांगले की इतर विकि सारखे मराठी नाही नाहीतर तिथे नवीन सदस्य म्हणजे vandalism वाला बकरा. तिथे इतके कायदे समोर येतील कि मग तुम्ही बाय बाय करतील. इथे तुमचा शब्दाचा आदर केले आहे मी आणि इतर लोकांनी तिथे असं नाही चालत. आपले माणूस आहे तुम्ही आपल्या भाष्यात आपण आपल्यासाठी लिहितो असे मनात विचार करून लेखन करा.रेल्वेची गाडी इंटरनेटवर गतिमान एक्सप्रेस सारखे फास्ट आणि विवेक एक्सप्रेस सारखे खूप दुरवर पसरा.पुडील लेखनात सुभेच्छा. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:५६, २३ मार्च २०१७ (IST)[reply]

Yogeshs यांच्याकडे दुर्लक्ष[संपादन]

सदस्य Yogeshs हे आता एकेरी संबोधनावरवर उतरले आहेत आणि त्यांनी या एका माणसामुळे सारखी विधाने करण्यास सुरुवात केलेली आहे. यात त्यांचा उद्वेग आहे कि माझ्यावरील व्यक्तिगत राग आहे हे माहिती नाही. याला उत्तरे देत बसलो तर माझ्या वेळाचा नास आहे. त्यांच्या मागे मी आत्तापर्यंत बराच वेळ घालविलेला आहे. अधिक घालवायची इच्छा नाही. अशा प्रकारची अनेक प्रकरणे मराठी विकिपीडियावर होउन गेली. त्यांत विकिपीडिया कसा चालतो, त्यांतील लोक एकमेकांशी कसे बोलतात, संवाद साधतात, याविषयीची माहिती नसणे (किंवा ही माहिती मिळाली तरीही ती नाकारणे) हेच दिसून आले. येथेही हाच प्रकार दिसत आहे.

टायवीन यांनी लिहिल्याप्रमाणे इतर विकिंवर Yoheshs यांचे लिहिणे व्हँडेलिझम ठरवून त्यांना कधीच बॅन केले गेले असते. मराठी विकिपीडियावर आपण नवीन सदस्यांना खूप संधी देतो (ढील देतो असे म्हणा हवे तर). असे असता मी या सदस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. इतर प्रचालकांना आणि जाणत्या सदस्यांना विनंती की त्यांनी Yogeshs यांच्या लेखनाकडे लक्ष द्यावे व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे.

तीन गोष्टी --

१. त्यांनी तयार केलेले लेख आधीपासून आहेत कि नाहीत हे कसे शोधावे हे त्यांना समजवावे.

२. चर्चा करताना फॉरमॅटिंग कसे करावे हे नक्कीच सांगावे.

३. नवीन सदस्याला माहिती नसते ना... असे ते म्हणले, तरी नवीन सदस्यांनी माहिती नसलेल्या माहिती करून घेण्यास उद्युक्त करावे

अभय नातू (चर्चा) २०:१६, २३ मार्च २०१७ (IST)[reply]


मी काही मुद्देसूद शंका / प्रश्न विचारले आहेत .... त्याची उत्तरे देण्याऐवजी हे प्रचालक "दुर्लक्ष" करीत आहेत.... ? ? ?

चला .... म्हणजे एक बाब निश्चित झाली .... मराठी विकिपीडियावर पूर्णपणे अभय नातूसारख्या प्रचालकांचा अंमल आहे. त्याना हवा तसाच मराठी विकीपेडिया चालतो. त्यांनी कसेही वागले तरी "कोणीही काहीही करू शकत नाही"

तरी माझी सर्व सदस्यांना नम्र विनंती आहे की .... विकिपीडिया हे मुक्त असले तरी प्रत्यक्षात तसे नाही हे समजून घ्यावे आणि कोणताही लेख लिहिण्यापूर्वी त्यांची परवानगी घेऊनच लिहावे...म्हणजे तुम्हाला माझ्यासारखा त्रास होणार नाही तसेच तुमचा वेळदेखील वाया जाणार नाही....धन्यवाद! Yogeshs (चर्चा) २२:०७, २३ मार्च २०१७ (IST)[reply]

मुद्देसूद उत्तरे जेव्हा दिली तेव्हा वरील सदस्य हमरीतुमरीवर आले. त्यांच्या नादिष्टपणाला वेळ देण्याऐवजी चार कामे केलेली बरी, यासाठी सध्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
जे सदस्य त्यांना दिलेले संदेश वारंवार घालवून टाकतात, घालवू नका म्हणल्यावरही घालवतात, त्यांच्याशी चर्चा करणे म्हणजे आपला वेळ वायफळ घालवणे आहे.
शेकडो सदस्यांपैकी फक्त त्यांनाच का त्रास झाला हे समजण्यासाठी त्यांनी स्वतः एकदा आत्मपरीक्षण करावे.
त्यांना वर विचारलेल्या किंवा सांगितलेल्या गोष्टींची उत्तरे हे सदस्य देत नाहीत यातच काय ते समजावे.
अभय नातू (चर्चा) ०७:५७, २४ मार्च २०१७ (IST)[reply]
ता.क. या सदस्यांना सही करा हे वारंवार सांगितल्यावर कशी करायची याचा शोध न घेता सर्रास चर्चा पानांवर गिचमिड करुन ठेवणारे संदेश ठेवतात.
त्यांना सही कशी करायची हे सांगितल्यावरदेखील आज विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन या पानावर ५-६ संदेश घालून ठेवलेत. आता मला माहीत नव्हते ही लंगडी सबब येईलच...
एकूण काय तर विकिपीडियावर काय कसे केले जाते याची माहिती करून न घेता आपलेच रेटायचे आणि कोणी त्यासाठी मदत केल्यास त्याच्याच नावे बोंब मारायची ही त्यांची गेम दिसत आहे.

हमरीतुमरीवर कोण आले ते तर चर्चा वाचल्यावर कोणालाही समजेल.

एकेरी उल्लेख करणे, व्यक्तिगत आरोप करणे, हे या सदस्यांनी सुरू केले. आता हे साळसूदपणाचा आव आणत आहेत.

नादिष्टपणाला सुरवात तर अभय नातू कडूनच झाली.

वर पहा

प्रश्नांना उत्तरे न देता पळून जाण्यासाठी "आपला वेळ वायफळ घालवणे आहे" अशी विधाने नक्कीच उपयोगी ठरतात.

प्रश्नांना सगळी उत्तरे दिली. त्यांकडे दुर्लक्ष करून व्यक्तिगत हल्ले चढविणाऱ्याच्या नादी मला लागायचे नाही.

इच्छा नसताना देखील नाईलाजाने अभय नातूच्या आडमुठेपणामुळे या असल्या चर्चा कराव्या लागतात.

आडमुठेपणा या सदस्यांचा आहे. मी त्यांना प्रत्येकवेळी मदत देऊ केली, जी त्यांनी नाकारली तसेच सूचना व विनंत्यांकडे दुर्लक्ष करीत हे त्याचत्याच चुका करीत राहिले.

सही कशी करायची हे नीट सांगितल्यावर मी केलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे बिनबुडाचे आरोप करू नयेत.

काही वेळापूर्वीच उदाहरण दिले होते. पुन्हा एकदा - विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन हे पहा. वेड पांघरून पेडगावला जाऊ नका.

मी दुरुस्त केलेल्या चुका प्रचालकांना मान्य होत नाहीत. म्हणजे मी चुका दुरुस्त करायच्या नाहीत तसेच त्या दुरुस्त करण्यासाठी प्रचालकांना विनंतीदेखील करायची नाही. म्हणजे थोडक्यात "मी येथून निघून जावे" अशीच अभय नातूची अपेक्षा आहे. 'इतरांना त्रास देणे याला मदत करणे' आणि वर 'इतरच बोंब मारतात' असे म्हणण्याचा अभय नातूला पूर्ण अधिकार आहे.

या सदस्यांनी चुका दुरुस्त केल्या नाहीच तर त्याचत्याच चुका वारंवार, (सूचना आणि मदत देऊ केली असतासुद्धा) केल्या. त्याकडे लक्ष वेधले असता व्यक्तिगत आरोप सुरू केले. यांना माझा एकेरी उल्लेख करण्याचा अधिकार कोठून मिळाला हे माहिती नाही.

ता.क. "विकिपीडिया हे मुक्त नसून प्रचालाकांनुसारच चालते" याची (उशिरा का होईना) आता मला जाणीव झाली आहे.

हे फक्त यांना वाटते. पुन्हा एकदा सांगतो. शेकडो सदस्य येथे काम करतात. त्यांच्यापैकी मोठ्या प्रमाणातील लोकांशी माझा संवाद आहे. त्यांना कधी माझा त्रास झाला नाही. या सदस्यांना तेवढा झाला. वरील वाचल्याने त्यांची भूमिका व विकिपीडियाबद्दलची अनास्था जाणवून येते.

तसेच याची 'सर्व' सदस्यांनीदेखील नोंद घेणे 'अत्यंत आवश्यक' आहे.

असो. "त्यांचा" विकिपीडिया त्यांना लखलाभ असो. माझे काहीही म्हणणे नाही.

येथे त्यांचेच विधान अंतिम असते हे मी स्वीकारले आहे.

"मला आता अभय नातूबद्दल कोणतीही तक्रार नाही."

Yogeshs (चर्चा) १०:५१, २४ मार्च २०१७ (IST)[reply]

ठीक. हा पवित्रा घ्यायचा असेल तर मग तुम्ही तुमच्या मार्गी आणि आम्ही आमच्या मार्गी. गुडलक आणि टा-टा.
अभय नातू (चर्चा) ११:१८, २४ मार्च २०१७ (IST)[reply]

कृपया लवकर या![संपादन]

सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .



--वि. नरसीकर (चर्चा) २०:५४, २१ मार्च २०१७ (IST)[reply]

गुढीपाडवाचे शुभेच्छा![संपादन]

गुढीपाडवाचे शुभेच्छा!

टायवीन२२४०माझ्याशी बोला तुम्हाला गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे..!! 💐💐💐💐💐💐💐💐

{{subst:गुढीपाडवा शुभेच्छा}} असे ज्या सदस्यास संदेश द्यावयाचा आहे, त्या सदस्याच्या चर्चापानावर जोडून हा शुभेच्छा संदेश त्यांचेपर्यंत पोचवा.

अजिंठा लेण्या[संपादन]

आपण माझे अजिंठा लेण्या या लेखाचे शिर्षक बदलून अजिंठा-वेरूळची लेणी असे केले. अजिंठा लेणी व वेरूळ लेणी या दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या लेण्या आहे. वेरूळ लेणी औरंगाबाद जवळची तर अजिंठा लेणी खूप दूरची आहे. Ajanta Caves हा लेख फक्त अजिंठा लेणीसाठी आहे, आणि वेरूळ लेण्यासाठी Ellora Caves हा स्वतंत्र्य लेख अस्तित्वात आहे. वेरूळ लेणी याचा वेगळा लेख बनू शकतो, अजिंठा लेण्या मध्ये वेरूळ लेण्या संबंधी लेख येऊ शकत नाही. कृपया ते लेख नाव दुरूस्त करून अजिंठा लेण्या ठेवा. संदेश हिवाळे (चर्चा) १२:०४, २९ मार्च २०१७ (IST)[reply]

Pls Help me how to upload a pic in my article Vimgram (चर्चा) १२:५३, ५ एप्रिल २०१७ (IST)[reply]

GLAM resources[संपादन]

Hi! During the Wikimedia Conference in Berlin you attended a session on growing your user group. You asked a question about how to best approach a GLAM to develop a partnership. This Learning Patternmay be useful! Cheers, AWang (WMF) (चर्चा) २२:४२, ११ एप्रिल २०१७ (IST)[reply]

@AWang (WMF):
1. Thanks for remembering my question and following up.
2. This material is very useful. I plan to use (at least) parts of it soon.
अभय नातू (चर्चा) ०८:१८, १२ एप्रिल २०१७ (IST)[reply]

साचा:संदर्भ हवा[संपादन]

कृपया साचा संदर्भ हवाचे चर्चापान बघावे.--वि. नरसीकर (चर्चा) २०:००, १२ एप्रिल २०१७ (IST)[reply]

अर्जुनराजे भोसले यांचे फोटो[संपादन]

नमस्कार सर, मी अर्जुनराजे भोसले यांचे सोशल मीडिया टीम लीडर आहे, मी लवकरच त्यांच्या पूर्ण वंशावळ जोडणार आहे, कृपया मला आपण मदत करावी, पण सर त्यांचे फोटो ज deletation request कोनि केली व का, हे समजले नाही, आमच्याकडे त्याचे सर्व document आहेत, व संदर्भ आहेत, कृपया मदत करा, कशा प्रकारे deletation request cancel , करता येईल,

Mahakalclub (चर्चा) २०:५५, १२ एप्रिल २०१७ (IST)[reply]

सर माझी विनंती इथे अडकली आहे. जर इथून पास झाली तर पुढचे सोसिअल मीडियावर काम करू शकते. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:५३, २१ एप्रिल २०१७ (IST)[reply]

Sorry to express myself in English
While having research on various Wikipedia having their social media accounts I have found the suitable thing for Marathi Wikipedia. The policy of id:Wikipedia:Media_sosial is appropriate for us too to have it. Please review with it and Express your opinion on it.The discussion of do and donts are also available at id:Pembicaraan_Wikipedia:Media_sosial --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१२, २६ एप्रिल २०१७ (IST)[reply]

@Tiven2240:,

I cannot read Bahasa Indonesia (I think that's what the language at the link posted is.) Is there a translated version available?

अभय नातू (चर्चा) ०७:२७, २७ एप्रिल २०१७ (IST)[reply]

As I am using the latest version of chrome on mobile i get a notification of translate the page. It can be done with this orelse google translate can help. If so is not possible contact me i will copy paste the translation for you. But make sure that u have it read once --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:४१, २७ एप्रिल २०१७ (IST)[reply]

@Tiven2240:,
Yes, please copy-past it.
अभय नातू (चर्चा) २०:०५, २७ एप्रिल २०१७ (IST)[reply]
इंग्लिश ट्रान्सलाशन (गुगल ट्रान्सल्ट)

English version of id Wikipedia social media declaration To improve relationships and interactions among members of the Wikimedia Indonesian community (WBI) and to disseminate Wikipedia Bahasa Indonesia content, WBI has a page on Facebook social media at URL: Http://www.facebook.com/id.wiki . This policy contains rules on administration and content that can and can not be shared through the Facebook page.

  • Purpose [ edit source ]

Social media Wikipedia Bahasa Indonesia on Facebook has the following objectives:

Become an alternative communication medium for Indonesian Wikipedia users Become a means of promotion within the network for Indonesian Wikipedia content and content from other projects under the Wikimedia Foundation and Wikimedia Indonesia. Become a means of promotion of activities organized by the Indonesian Wikipedia community and Wikimedia Indonesia Prevent the existence of Facebook accounts on behalf of the Indonesian Wikipedia community for their own benefit

  • Content [ edit source ]

Some things to consider in publishing content on the Facebook Page Wikipedia:

  1. The published content may be in the form of (1) status, (2) links, (3) drawings, or (4) notes associated with Wikipedia and other Wikimedia projects. Rules on what can be published and what is not adapted from the article writing policy on the Indonesian Wikipedia, especially on WP policy : NOT .
  2. Content published does not provoke controversial opinions from readers. Please be careful and avoid offensive content.
  3. Prior to publishing, content must be written first in the content candidate page first. Content must be proposed no later than two days prior to the date the content is published.
  • Roles [ edit source ]
  • Management [ edit source ]

The role of the Facebook Page Management Wikipedia the Indonesian is held by all Wikipedia officials in Indonesia. Facebook account status on the Facebook page administration page will be set as manager . The board can do the following:

  1. Choose one "Content Manager"
  2. Manage administrative roles
  3. Change the page description
  4. Publish content
  5. Reply to and delete comments
  6. Sending message
  7. View stats
  • Content Manager [ edit source ]

A content manager is the person responsible for managing all content on the Facebook Wikipedia Page. Facebook account status on the Facebook page administration page will be set as manager . The content manager is selected by the board. Content managers can do the following:

  1. Choose one or more "Content Contributors"

Manage administrative roles

  1. Change the page description and add the app
  2. Publish content
  3. Reply to and delete comments
  4. Sending message
  5. View stats

The status of the content manager may be revoked if the board agrees, through discussion, that the content on the Wikipedia Indonesian Facebook page does not comply with the rules set by the community.

  • Content Contributors[ edit source ]

Content contributors are people who help content managers manage and publish content. Facebook account status on Facebook page administration page will be set as content creator . Content contributors are selected by Content manager. Content managers can do the following:

  1. Choose one or more "Content Contributors"
  2. Change the page description and add the app
  3. Publish content
  4. Reply to and delete comments
  5. Sending message
  6. View stats

Do and don't as per talk page of Id.wikipedia social media

Do and Do not: [ edit source ] Given on Facebook and twitter is not as democratic as wikipedia, where anyone who finds a mistake can fix it, please also create rules of do and do not for the admin who will write the status and respond to the comments on Wikipedia. I suggest this rule is written and protected, so that if there are users who object, basically for a clear protest.

Eg as below. Just scribbles, please fix and add in order to be a good rule:

Do [ edit source ]

  1. Post a link to a wikipedia article that invites fans to read and complete the article
  1. Check in advance the facts on #Tukukahanda before posting, if necessary include the source article.
  1. Inform current events that are or will take place on Wikipedia (eg Marathon)
  1. Create quizzes that encourage fans to search and browse certain articles on Wikipedia.
  1. Sign each status written with the admin initials who wrote it down, so it's clear who's responsible.
  1. Give help to fans who are confused about contributing or accessing wikipedia.
  1. A positive joke or comic encourages users to contribute
  2. Tips and tricks in contributing

Do not [ edit source ]

  1. Write things related to the distinction and / or harassment of SARA and Gender. ( OK : "Tribe A has a unique custom blah blah blah, Not OK : Tribe A has advantages over Tribe B, which is more so)
  2. Post things that tendensius justify violence, criminal acts, or immoral acts (eg: "Do you know, slapping parents in public in Country X is a thing that is allowed, even considered entertainment?)
  3. Contains disturbing, scary or disgusting pictures (eg, accident victims, etc).
  4. Inform, even make jokes, destruction made by the user idle.
  5. Degrading, laughing, or arguing with fans or users.
  6. Invite fans / users to attack the fans / other users. (Bully)
  7. Make a status of confusion, vent, or anything personal.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:४२, २७ एप्रिल २०१७ (IST)[reply]

I hope you have seen the above 👆 message --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:२१, २९ एप्रिल २०१७ (IST)[reply]

Sir when you see the social media sites like this www.facebook.com/wikipedia it is not a account it is a page. And in social media sites The page can only share anything on it. It cannot like or comment on anyone's post, to like and comment on anyones post a account is needed. I maintain 3 pages on Facebook and I know about it. I can only share my post on page but I cannot comment on anyone's post with my page name. For example it can come that Tiven commented on Abhay's post but it cannot be possible that marathi Wikipedia commented on Abhay's post because it cannot do that. Hope you understand this or else I may explain you more.. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:१५, ३ मे २०१७ (IST)[reply]

@Tiven2240:,
Thank you for taking the time to work on this.
I think I understand what you're saying. However, my "do's and don't's" that I posted earlier were for the person operating the Marathi Wikipedia page. If you're saying that as the owner/operator of the page, facebook/twitter doesn't allow you to 'like' anything posted on facebook/twitter, then what you're saying makes sense. However, in my experience, anyone that logs into Facebook is free to operate as a user as well as an owner of a particular account.
That being the case, my recommendaton of "Don't like any posts" still stands (with exceptions such as one noted by you earlier.)
The key here is for the operator to understand that s/he is not the owner of Marathi Wikipedia social network account(s), rather an operator of it and any actions taken by her/him must be endorsed by the entire community. If there's a doubt, don't do it is my corollary to this recommendation.
अभय नातू (चर्चा) १०:२३, ३ मे २०१७ (IST)[reply]

Yeah sir I too believe that the marathi wikipedia social media must be operated by a operator rather than a person like a dictator. Your point of not liking has sense but at some places it doesn't works. Marathi wikipedia won't be a property of a person it is the property of the community and wikimedia foundation. I am aware of the misuse of the sites so whether whosoever becomes the operator I won't allow it to do so. And I am sure you will frame strict rules against that person as he will be termed as a block for the social media team and block from all access of communication. In order to maintain it is about maintaining an official account because it is surely to get official. I think we must have a biggest debate one day on another medium like conference so we all the social media team as well as admin beaurocrat come together online for the discussion for a new progress of Marathi Wikipedia. I have got the results of March 2017 which shows you at number 1 wikipedian of marathi wikipedia the 17th largest wikip edia group. I'll soon have a personal message on the top 50 marathi wikipedians. For social media i think we must have a great discussion as u know better than me fix a time and date for this big discussion--टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:४०, ३ मे २०१७ (ISTs

@Tiven2240:,
Thanks for the complementary words :)
Yes, the topic of social media representation for Marathi Wikipedia is not easy, but I believe that it is not rocket science, if "we" (Marathi Wikipedia community) is ready and willing to give up personal ambitions and work for the greater good.
A discusson will certainly help. There are serveral (surmountable) challenges - a. Get enough people involved. b. the right people involved. c. Time-boxing. d. Calling out personal ambitions honestly and avoiding them at all costs. d. Get agreement from majority of quorum.
I don't think that implementing a strategy once agreed to/approved by w:mr users/editors is complex.
Let's hope we can generate enough interest to at least have a discussion and hopefully, have a majority agree to implementing something that's useful and powerful for Marathi Wikipedia.
अभय नातू (चर्चा) १०:४९, ३ मे २०१७ (IST)[reply]

हॅपी बर्थडे मराठी विकिपीडिया[संपादन]

१ मे २०१७--टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:५२, १ मे २०१७ (IST)[reply]

मार्च २०१७ बाबत शुभेच्छा[संपादन]

नमस्कार अभय नातू,

विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे.

या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे पहिला सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी इथे पहा

आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.


आपल्या योगदानाबद्दल धान्यवाद.


आपला शुभचिंतक,

टायवीन

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४०, ३ मे २०१७ (IST)[reply]

नमस्कार | सहा ऋतू आणि त्यांचे महिने असा लेख आपण केला आहे. आज तो पाहिला आणि जरा त्यात भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. आपण अवश्य पहाआणि योग्य तो अभिप्राय द्या. गरज वाटल्यास सुधारणाही करा. धन्यवाद.आर्या जोशी (चर्चा)

मराठी विकिपीडिया व्हॉट्सॲप ग्रुप[संपादन]

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:५४, ५ जून २०१७ (IST)[reply]

Hi,मी उपरोक्त👆 संदेश संबंधित आठवण देत आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:२०, १४ जून २०१७ (IST)[reply]

साचा दुरुस्ती मदत करावी[संपादन]

नमस्कार अभय, कसे आहात? कसे चाल्लेय? एक साचा दुरुस्ती मध्ये आपली मदत हवी.

साचा:माहितीचौकट चित्रपट येथे दोन BRACE BRACKET जास्त असल्यामुळे, साचा बरोबर नाही दिसत आहे.

तुम्हाला हि चुक येथे सापडेल

| belowstyle = border-top:1px solid #aaaaaa; text-align:left }} क्रुपया मदत करावी.--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १७:२३, ६ जून २०१७ (IST)[reply]

@Koolkrazy:,
तुम्ही सुचवलेला बदल केला व त्यामुळे लेखांतील }} गेले आहे परंतु आता साचा पान विद्रुप दिसत आहे. मला वाटते की includeonly व noinclude यांच्यात conflict होत आहे.
साच्याची सुरक्षितता पातळी काही दिवसांकरिता बदलली आहे तरी तुम्ही त्यात बदल करुन पहावे ही विनंती.
अभय नातू (चर्चा) २१:१३, ६ जून २०१७ (IST)[reply]
@अभय नातू:,
नमस्कार अभय, साचा पूर्ण पणे निट केला आहे.. मदती बद्द्ल आभार. --प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) २१:४२, ६ जून २०१७ (IST)[reply]

हे चालेल का?[संपादन]

नमस्कार अभय, कसे अहात? एक प्रश्न आहे.. मी फॉर्म्युला वनच्या लेखांवर काम करतोय. या कामाची व्याप्ती खुप मोठी आहे, त्यामुळे सद्द्या सर्व लाल दुवे आहेत. कारण, भाषांतर करणे खुप कठिण आहे, व वेळ सुद्दा लागतो. म्हणुन मला वाटत होते की तात्पुरते जर मी असे पुनर्निर्देशन केले, तर चालेल का? यामुळे लाल दुवे पण कमी होतील, व नंतर जसा वेळ मिळेल, तसा मी ते पुनर्निर्देशन काढुन, तेथे लेख टाकीन.

उदाहरण: अॅलेक्स ब्लिगनॉट --> फॉर्म्युला वन चालक यादी#अॅलेक्स ब्लिगनॉट कडे पुनर्निर्देशित केले आहे.

आपला विचार कळवावा हि विनंती..

--प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) २१:४१, १२ जून २०१७ (IST)[reply]

नमस्कार प्रशांत,
लाल दुव्यांचे तुम्ही सुचविल्याप्रमाणे पुनर्निर्देशन करण्यास हरकत नाही.
लाल दुवे असण्यासही हरकत नाही. लाल दुवे पाहून इतर सदस्य ते लेख तयार करण्यास उद्युक्त होतील.
अजून एक ऑप्शन - या चालकांच्या नावाचे छोटे, साचेबद्ध लेख तयार करावे, ज्यात अबक हा कखग देशाचा फॉर्म्युला वन ड्रायव्हर आहे/होता. हा डपझ संघासाठी शर्यतीत भाग घेतो. अशी एक-दोन वाक्ये असावीत. त्याशिवाय अशा प्रत्येक लेखात फॉर्म्युला वन चालक - अपूर्ण (किंवा तत्सम नावाचा) साचा घालावा ज्यात फॉर्म्युला वन चालकाबद्दलचा हा लेख सुरुवातीच्या अवस्थेत आहे. त्यात तुम्ही भर घालू शकता. यासाठी मिखाएल शुमाखर लेखाचा आधार घेता येईल. असा मजकूर असावा. यासारखा साचा आपण क्रिकेट खेळाडूंबद्दल वापरलेला आहे (उदा - साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू). या लेखांमध्ये आंतरविकी दुवे देता आले तर अतिउत्तम.
यायोगे इतर संपादकांना (मी ही त्यात!) फॉर्म्युला वन चालकांबद्दलचे लेख लिहिणे व वाढवणे सोपे जाईल.
अर्थात, वर लिहिल्याप्रमाणे पुनर्निर्देशनासही हरकत नाही.
अभय नातू (चर्चा) २३:०४, १२ जून २०१७ (IST)[reply]

४६,००० चा टप्पा[संपादन]

सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ४७,८१७ आहे. मराठी विकिपीडियाला ४६,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त -१,८१७ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.

हे आपल्या सदस्य पानावर आहे. कृपया यात आपण बदल करावा असे सुचवावेसे वाटते कारण विकिने ४६ हजाराचा टप्पा केव्हाच पार केलाय म्हणून तुम्ही ५०,००० चे नवे टार्गेट ठेवू शकता. धन्यवाद! --संदेश हिवाळेचर्चा १६:३३, १८ जून २०१७ (IST)[reply]

@संदेश हिवाळे:,
हा संदेश पूर्वी इतरत्र घातलेला होता (कदाचित मुखपृष्ठावरही असेल). हा घालण्यापूर्वी या माझ्या सदस्य पानावर संदेशावर प्रयोग करण्यासाठी तेथे घातलेला होता. खरे पाहता आता त्याची गरज नाही आहे.
असो. ५०,०००चा टप्पा या वर्षाअखेर गाठला जावा अशी माझी इच्छा/आशा आहे. त्यात आपल्याकडून मोठे योगदान अपेक्षित आहे!
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १६:३७, १८ जून २०१७ (IST)[reply]

सर, ५० हजाराचा टप्पा पूर्ण करण्यासाठी सदस्यांना ६ महिन्यात २,१३९ लेख लिहावे लागतील. माझे योगदान सतत चालू राहील, तुमचेही सहकार्य असू द्या. --संदेश हिवाळेचर्चा १७:३५, २७ जून २०१७ (IST) --संदेश हिवाळेचर्चा १७:३५, २७ जून २०१७ (IST)[reply]

साचा वर्ग[संपादन]

नमस्कार! कृपया साचा:AthAbbr बघावा. त्यातील वर्ग तपासावेत व काही बदल करावयाचे असल्यास सुचवावेत ही विनंती.--वि. नरसीकर (चर्चा) २०:१२, २९ जून २०१७ (IST)[reply]

मन:पूर्वक आभार.--वि. नरसीकर (चर्चा) २०:३७, २९ जून २०१७ (IST)[reply]