सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आभार[संपादन]

आज विकिवर माझे एक वर्ष पूर्ण झाले.सात हजार संपादनांचा टप्पा गाठत आहे. आज/उद्या तो पूर्ण होईल. दररोज सुमारे १९.०१९ संपादनांच्या सरासरीने या ३६५ दिवसात संपादने पूर्ण केली आहेत.आपले,माहितगार व संकल्प यांचे वारंवार मार्गदर्शन लाभले त्यानेच हे शक्य झाले. साचा प्रकारात पारंगतता नव्हती. ते काम नुकतेच सुरु केले आहे. जमेल काही दिवसांनी. वेळोवेळी केलेल्या सहाय्याबद्दल व माझ्याप्रती दाखविलेल्या सदिच्छेबदल आपणा सर्व विकिकरांना मनःपूर्वक धन्यवाद.आपला लोभ आहेच. कायम ठेवावा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:३५, ९ जून २०१० (UTC)

धन्यवाद :)[संपादन]

नमस्कार अभय, सर्वप्रथम आपणांस धन्यवाद देऊ इच्छितो,तुम्ही माझ्या कार्याची घेतलेली दखल नक्कीच माझ्यातील लिखाणाच्या उत्साहाला द्विगुणीत करेल आणि मी ह्या पुढे अधिक जोमाने व दर्जेदार लिखाण करेन असा आत्मविश्वास निर्माण करणारी आहे.पुनःश्च धन्यवाद,आभारी आहे,असेच लक्ष असू द्यावे :). बाकी सर्व ठीक,क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार ०३:२८, १० जून २०१० (UTC)

मनःपूर्वक आभार्[संपादन]

'गौरव चिन्हाबद्दल'आपले व सर्वांचे आभार. वि. नरसीकर (चर्चा) ०७:०२, १० जून २०१० (UTC)

Request for help[संपादन]

Please help me translate this part into mr.wikipedia.org. Thank you very much for your help.Genghiskhan १३:१५, १० जून २०१० (UTC)

Dong Hoi Airport is an airport in Vietnam. It is in Dong Hoi city, Quang Binh province, 450 km south of Hanoi. The runway is 2400 meters long 45 meters wide. It can serve 500,000 passengers per years and can serve Airbus A321.

भारतातील विमानतळ साचा[संपादन]

या साच्यात 'देशांतर्गत विमानवाहतुक'येथे Navbarमध्ये > [[Template: {{{name}}}|प]] • [[साचा चर्चा: {{{name}}}|च]] • [{{fullurl:साचा: {{{name}}}|action=edit}}< अशी ओळ येत आहे.ती काढण्यास मैंहूडॉन ला विनंती केलेली आहे.आपणही सहाय्य करु शकत असल्यास सवड काढा ही विनंती. वि. नरसीकर (चर्चा) ०३:३५, ११ जून २०१० (UTC)


माफ करा. आपण पळस मध्ये बदल केल्यावर मी पुन्हा केले. पूर्वा म्हणजे पूर्वा फाल्गुनी.कृपयाआराध्यवृक्ष बघा. अनवधानाने माझ्याकडून चुक झाली होती.ती मी आता दुरुस्त केली आहे. वि. नरसीकर (चर्चा) ०३:५२, ११ जून २०१० (UTC)

वर्ग-पद्धतशीर अभ्यास[संपादन]

वर्ग:पद्धतशीर अभ्यास या अंतर्गत असलेले उपवर्ग इ.स. ११७ आणि इ.स. १२६ हे बघा. याची या वर्गात वर्गवारी कां केल्या गेली ते कळले नाही. त्यांची वर्गवारी चुक असेल तर दुरुस्त करावी ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) १०:५६, ११ जून २०१० (UTC)

फुटबॉल खेळाडू[संपादन]

मला विश्वचषक हा लेख लाल दुवा नसलेला बनवायचा आहे.

तुम्ही दिलेली माहिती खूप महत्वाची आहे. बर्याच ठीकाणी स्पेलिंग इतके अवघड आहेत कि त्यांचा उच्चा‍र समजणे थोडे अवघड जाते.

मी सर्व गटांचे खेळाडुंची नावे मराठीत लिहिली आहेत. तुमच्या सवडी नुसार खालील पाने तुम्ही तुमच्या नजरे खालुन घालावीत व योग्य तो बदल करावा.

वर दिलेल्या गटातील खेळाडूंची पाने अजुन तयार केलेली नाहीत.

इंग्रजी नावा बद्दल अधिक माहिती साठी 2010_FIFA_World_Cup_squads_इंग्लिश_विकि

Maihudon ०६:४९, १४ जून २०१० (UTC)

धन्यवाद[संपादन]

गौरवचिह्न दिल्याबद्दल धन्यवाद. Maihudon ०५:२५, १७ जून २०१० (UTC)

तृश्शूर विषयी[संपादन]

नमस्कार, त्रिश्शूर,थ्रिसुर,त्रिशुर,तृशुर इ. ह्या नावाविषयी बरेच गोंधळ आहेत आणि त्यामुळे अनवधानाने चुकून दोन तीन प्रकारचा नामोल्लेख आढळतो,कृपया योग्य ते नामकरण असलेला लेख ठेवाव आणि इतर लेखांना त्या लेखाकडे वळवावे हि (प्रबंधकांना) विनंतीवजा सूचना.क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार ०५:१३, १५ जून २०१० (UTC) तृश्शूर हे नाव अधिक योग्य वाटते असे माझे मत आहे

संदर्भाविषयी[संपादन]

होय नक्कीच,मल्याळम : തൃശൂര്‍ (तृशूर (दिर्घ) असे लिहिले आहे :उच्चार त्रिश्शुर दक्षिणेत तृ लिहिण्यासाठी तिरु अशी फोड करुन लिहितात जसे प्रसन्न लिहिण्यासाठी पिरसन्न असे लिहितात,कृष्ण लिहिण्यासाठी किरुष्ण असेच लिहितात.) , जुने नाव त्रिशिवपेरुर/तृशिवपेरुर.तृश्शूर किंवा तृशुर ह्या शब्दाची संधी पुढिलप्रमाणे : तृश्शूर = तिरु (देव) + शिव (शंकर) + ऊर (गाव),हिंदीत देखील तृश्शूर(जे शब्दफोडकरुन तार्किक वाटते) तर तमिळ मध्ये "तिरुच्चुर" असे नामकरण आहे जे उच्चारतांना त्रच्चुर,त्रस्सुर,त्रश्शुर असे होते.तमिळ भाषेत तिरु म्हणजे तृ ह्या अर्थानेच असतो जसे "श्रिया" ह्या शब्दाचा उच्चार श्रया असा होतो,क्रिष्णाचा कृष्णा असा होतो.पण लिहितांना आंग्ल पद्धतीने लिहितात.Krishna (कृष्ण),Trisha (तृषा),Trishna (तृष्णा),Shriya (श्रृया किंवा श्रया),Nrithya (नृत्य),Krithya (कृत्य)etc. आता इतका संदर्भ पुरेसा असावा असे मला वाटते.कळावे.चे.प्रसन्नकुमार ०८:१५, १५ जून २०१० (UTC)

साचा:हितसंघर्ष मध्ये सहाय्य हवे[संपादन]

सदस्यांच्या संपादनाने हितसंघर्ष/हितसंबंध/औचित्यभंग होत असल्यास त्या बद्दल चिंता त्यांच्या चर्चा पानावर नोंदवण्याकरिता साचा:हितसंघर्ष तयार केला आहे. त्यातील मजकुर तपासून सुयोग्य बदल करावेत म्हणजे हा साचा अधिक व्यापक प्रमाणावर वापरता येईल.

माहितगार ०६:१५, १५ जून २०१० (UTC)

साचा विमानतळ संकेत[संपादन]

साचा विमानतळ संकेत हा Infobox Airport ही माहितीचौकट लावली असतांना वापरु नये असे Template:Airport codes येथे इंग्रजी विकिवर नमुद केले आहे. त्याने Airport codes ची या साच्यात व इंफोबॉक्स मध्येपण द्विरुक्ती होते म्हणुन असेल.त्यानुसार जेथेजेथे Infobox Airport लावला आहे तेथे Template Airport codes साचा मी लावला नाही.कृपया माझी धारणा नक्की करावी वा खोडावी.

वि. नरसीकर (चर्चा) ०८:३०, १५ जून २०१० (UTC)

आपल्या संदेशानुसार यापुढील लेखात साचा लावतो. झालेल्या लेखात मग सावकाशीने लावील. वि. नरसीकर (चर्चा) ०५:५६, १६ जून २०१० (UTC)

वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ‎ या लेखात सदस्यःJ (त्यांचेविषयी पूर्ण आदरभाव ठेवुनच लिहित आहे) यांनी ब्लेर चे-ब्लेअर एर चे एअर आदी बदल केले आहेत. ते कृपया तपासावेत. आपल्या कोणाशीतरी झालेल्या चर्चेत एर हे बरोबर आहे असे वाचल्याचे स्मरते.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:१८, १७ जून २०१० (UTC)

भाषांतरास मदत[संपादन]

अभय,

२०१० फिफा विश्वचषक सामना अधिकारी लेखात भाषांतरास आपली मदत पाहिजे आहे.

Maihudon १८:२३, १८ जून २०१० (UTC)

अभिनंदन[संपादन]

नमस्कार अभयजी, सहजच अभिनंदन करतोय सध्या मराठी विकिपीडियाची घौडदौड जोरात चालू आहे,मागच्या आठवड्यात माझे लक्ष सहज लेखांच्या संख्येनुसार क्रमवारी कडे गेले तेव्हा मराठीचा क्रमांक ६० होता, तो आता ५७ झाला आहे त्यामुळे पाहून आनंद झाला म्हणुन सहजच वाटले चला आनंद द्विगुणीत करुया.मराठी विकिपीडिया अधिकाधिक समृद्ध होवो आणि पाऊल पुढे पडो अशी आशा.बाकी सर्व ओके.चे.प्रसन्नकुमार ०५:०९, २० जून २०१० (UTC)

मार्गक्रमण साचे महत्वाचे बदल[संपादन]

नरसीकर यांनी तयार केलेला साचा {{भारतातील विमानतळ}} मध्ये काही errors येत होते. थोडी माहिती घेतल्यास असे दिसले कि

ह्या साच्यात केलेले बदल (संदर्भ : इंग्लिश विकि) मराठी विकि वर झाले नव्हते. मी ते सध्या केले आहेत.

काहि formating errors आहेत, माझ्या मते Common.js मध्ये काहि बदल, update जरूरी आहेत.

जर मी केलेले बदल अपेक्षित नसतील तर उलटवावे लागतील.

Maihudon ०९:२६, २१ जून २०१० (UTC)

मशीदींसाठी वर्ग करावा[संपादन]

नमस्कार अभयजी, कृपया मशीदींसाठी स्वतंत्र योग्य असा वर्ग निर्माण करुन वर्गीकरण करावे ,क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार १८:२७, २४ जून २०१० (UTC)

मंदिरांचे वर्ङीकरण[संपादन]

नमस्कार अभय!

वर्ग:हिंदू देउळे व त्याखालील उपवर्गांमध्ये 'देउळे' असा शब्द दिसत आहे. 'देऊळ' या नामाचे अनेकवचन 'देवळे' असे होते. त्यामुळे कृपया हे वर्ग दुरुस्त करावेत, अशी विनंती.

अजून एक मुद्दा डोक्यात आला, म्हणून - 'मंदिर' हा शब्द 'देऊल' या शब्दापेक्षा हिंदू मंदिरस्थापत्य वगैरे वगैरे विषयांवरील मराठी ग्रंथांमध्ये अधिक वापरात असल्याचे दिसते. त्यास अनुसरून वर्ग:हिंदू मंदिरे असा वर्ग बनवणे, हाही पर्याय होऊ शकतो.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:१८, २५ जून २०१० (UTC)

फ्रान्स[संपादन]

अभय,

काही दिवसांपूर्वी फ्रांस हा शब्द फ्रान्स असा लिहिला जावा असे ठरवले गेल्याचे स्मरते. त्यानुसार अनेक वर्ग देखील बदलले गेले आहेत. ह्याच कारणास्तव मी नवीन लेखांमध्ये फ्रान्स असाच प्रयोग करतो आहे.

अभिजीत साठे १६:२६, २५ जून २०१० (UTC)

योग्य लेखनाव[संपादन]

'भारतातील समुद्री बंदरांची यादी' 'भारतातील बंदरांची यादी' 'भारतातील समुद्री तळांची यादी' यापैकी कोणते नांव लेखास योग्य राहील कृपया कळवावे.माहितगार व संकल्पलापण हीच पृच्छा करीत आहे.

वि. नरसीकर (चर्चा) ०९:४६, २८ जून २०१० (UTC)

बासेतेर[संपादन]

धन्यवाद! मला देखील बासेतेर व बासे-तेर ही दोन वेगळी शहरे आहेत हे माहीत नव्हते.
अभिजीत साठे १६:१०, २८ जून २०१० (UTC)

विकिक्वोट[संपादन]

नमस्कार, मी विकिक्वोट येथे काही लेखांचे संपादन सुरू केले आहे. त्यात व्यक्तींचे जन्म-मृत्यू (वर्गीकरण) वर्ष लिहिले आहेत. या भागाचे वर्गीकरण मला करता येत नाही. तुम्ही काही करू शकाल का?

 • कॉमन्स वर नसलेली पण विकिवरच अन्यत्र असलेली चित्रे क्वोट मध्ये चढवायची असल्यास समोर एखादे अक्षर लिहून ते जोडता येते का? (काही वेळा मी w: q: en: असे लिहिलेले पाहिले आहे, पण नक्की उपयोग माहीत नाही)
 • विकिपीडिया:धूळपाटी२५ पहावे. Gypsypkd ०६:०३, २९ जून २०१० (UTC)

Hello!

I am Jimmy Wales (Jimbo), founder of Wikipedia and the Wikimedia Foundation, and I'm doing a personal investigation into the smaller language Wikipedias. I will be presenting some information about this at the upcoming Wikimania, and I am hoping to conduct a video interview with you (over skype) to learn more about your personal stories about what is going on in your language Wikipedia.

You were chosen through a process of looking at a list of smaller languages and the most active contributors. If you feel that you aren't the best person to speak about your language version, please do share this message widely. I'm looking for the most active volunteers in some of the smaller languages.

Please email me at: jwales@wikia.com and also email my assistant Topher at jwalesassist@gmail.com as soon as possible. Wikimania is less than a week away and I want to get as many interviews done as possible before then!

--Jimbo Wales ०८:११, १ जुलै २०१० (UTC)

३०,००० चा टप्पा[संपादन]

 • आपण ३०,००० लेखांच्या टप्प्याला पोचण्यास फक्त १५ लेख बाकी आहेत.
 • सवड मिळाल्यास येथे आवश्यक तो बदल करावा ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ११:३६, २ जुलै २०१० (UTC) हो वरती दिलेल्या दूव्यावर चूक दर्शविली जातेय,कृपया ते टूल ऍक्टिव्हेट करावे,तसेच माझे एकंदरीत योगदान किती आहे नेमके किती लेख निर्माण केले गेले किती एडिट्स झाले हे पहायचे असेल तर कुठे पहावे ते सांगावे.क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार १२:२४, २ जुलै २०१० (UTC)

३० हजारी अभिनंदन[संपादन]

नमस्कार अभयजी, हार्दिक अभिनंदन ३०००० चा आकडा ओलांडला.मराठी विकिपीडिया अशीच उत्तरोत्तर अनेक हजारी टप्पे पार करो आणि पहिल्या दहात आपले स्थान निर्माण करो अशी अपेक्षा आणि शुभेच्छा !अर्थात माझ्यासारख्या खारी आहेतच :)ते साध्य करायला. क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार १३:४०, २ जुलै २०१० (UTC)

जिमी वेल्स यांच्यासोबत झालेली भेट[संपादन]

नमस्कार अभय! विकिपीडिया:२०१००७०२ जिमी वेल्सशी भेट येथे आपल्या भेटीच्या वृत्तांताची मी वाट बघत आहे. सवडीनुसार वृत्तांत लिहिण्याचे अगत्य करावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:२३, १८ जुलै २०१० (UTC)

धन्यवाद! चर्चेवरून त्यांना मराठी विकिपीडियाच्या सद्यस्थितीबद्दल थोडीबहुत कल्पना आली असेल, अशी खात्री वाटते.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०७:१६, २५ जुलै २०१० (UTC)

फाईल फॉरमॅट्स ला काय म्हणावे?[संपादन]

कृपया मराठी शब्द सूचवा.ऑडिओ व्हिडीओ फाईल फॉरमॅट्स साठी मराठी शब्द सांगावे.चे.प्रसन्नकुमार ०५:३६, ३ जुलै २०१० (UTC)

पुस्तकांच्या मुखपृष्ठाधिकारांबाबत शंका[संपादन]

गेल्या काही दिवसात मी काही मराठी पुस्तकांची मुखपृष्ठे विकीकॉमन्सवर चढवली आहेत आणि लेखांमध्ये त्यांचा वापरही केला आहे. परंतु ती चित्रे चढवताना त्यांच्या कॉपीराईटबाबत मला निश्चित माहिती नव्हती व विकीकॉमन्सच्या पानावरची माहितीही मला नीट कळाली नाही. माहितगार यांची व माझी याबाबत चर्चा माझ्या चर्चापानावर झाली. आपण कृपया ती बघाल का? इंग्रजी विकीचे एक उदाहरणही मी तिथे दिले आहे. त्यानुसार लवकरात लवकर मराठी विकीचेही धोरण ठरवावे असे मला वाटते. जेणेकरुन माझे काम पुढे चालू ठेवता येईल. पुढे काय करावयाचे याबाबत माहितगार यांच्याशीही मी संपर्क साधला पण सध्या ते व्यस्त आहेत असे दिसते.सौरभदा ०३:२६, ७ जुलै २०१० (UTC)

दालन:विशेष लेखन येथे सहयोग हवा[संपादन]

मराठी विकिपीडिया अधीक वाचकाभिमूख बनवण्याच्या दृष्टीने , इंग्रजी विकिपीडियातील en:Portal:Featured content च्या धर्तीवर दालन:विशेष लेखन येथे भाषांतर आणि इतर लेखन सहयोग हवा आहे.माहितगार ०७:४७, ८ जुलै २०१० (UTC)

फाँटविषयी[संपादन]

नमस्कार अभयजी, मी नुकतेच माझ्या संगणकप्रणालीत बदल केले(विन-७) आणि असे त्यानंतर असे लक्षात आले कि विकिवर जोडशब्द पूर्वीसारखे उमटत नाहीत किंवा लिहितांना त्रास होतो,माझी प्रणाली अद्ययावत आहे तसेच सर्व सॉफ्टवेअर पहिल्याप्रमाणेच टाकले असले तरी हि समस्या कायम आहे.त्याचे काय कारण असावे? नाही काही कल्पना? दुसरे असे कि आपल्या विकिचा फाँट कोणता आहे (Mangal??)?तो बदलता येतो का?कारण त्यापेक्षा एक दोन चांगले फाँट (Utsaah/Kokila) जे बराहा मध्ये वापरतात दिसायला व्यवस्थित आणि वाचायला सोयिस्कर असे वाटते.मला ह्यातले काही कळत नाही,कृपया जमेल तेव्हा कळवावे,बाकी ठिक. चे.प्रसन्नकुमार ११:४६, ८ जुलै २०१० (UTC)

प्रवेशद्वाराविषयी[संपादन]

नमस्कार,मी तंजावूर विषयी माहिती संपादित करत असतांना मला एक नविन दूव्याचा शोध लागला जो मराठी विकिवर माझ्या पाहण्यात नव्हता,तो आपणांस इथे चिकटवून देत आहे कृपया एकदा पहावे आणि मला ह्यावर मार्गदर्शन करावे कि असा लेखप्रकार आपण मराठीवर करू शकतो का? आणि तो कसा निर्माण करावा ते.क.लो.अ.दूवा हिंदी विकिचा आहे चे.प्रसन्नकुमार १४:४०, ९ जुलै २०१० (UTC) ता.क.-तसेच तंजावूर लेखास भेट देऊन तेथील तसाच एक साचा पहावा तो साचा मराठीत तयार करावयाचा आहे. http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0:%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%81

 • तमिळनाडु च योग्य आहे र्‍हस्व उच्चार कारण डु चा उच्चार ड् असाच होतो आणि तमिळ भाषेत र्‍हस्व लिहिले आहे.

தமிழ்நாடு < र्‍हस्व தமிழ்நாடூ < दिर्घ

 • अहो नातू मी शिकतोय खरतर मी ते फक्त कॉपी पेस्ट करून काहीतरी करून पाहतोय एकदा का तांत्रिक बाजू कळाली ना मग अगदी सजावट करुनच दालने तयार करेल..असो.पुढच पुढे.
 • इथे आपण जसे PUNJAB असे लिहितो तेव्हा पुंजाब न लिहिता पंजाब असा उच्चार आणि लेखन करतो तसाच प्रकार आहे तमिळ भाषेतील प्रत्येक शब्द असाच आहे ज्याचे अंत्याक्षर हे पूर्ण व्यंजन किंवा स्वर न राहता अपूर्ण असते किंवा पुढच्या शब्दाचे आद्याक्षर असते.जसे समजा अंगाडि तेरु(इथे तेरु र्‍हस्व दिसत असला कि तेर् असा उच्चार होतो) असा शब्द स्थानिक भाषेत अंगाडित् तेरु असा लिहितात.शब्दाच्या शेवटी आलेले उकार आकार,अनुस्वार इ.उच्चारतांना बर्‍याचदा गौण असतात.असो,ह्याविषयी नंतर कधीतरी चर्चा करुया.
 • हा हा हा.. एक गोष्ट तुम्हाला म्हणून सांगतो खरतरं मला माझ्या कुणी चुका वगैरे काढतं अस कधी वाटतचं नाही, ते मी मला नविन आयडिया देत आहेत असेच समजतो :) पॉझीटिव्ह थिंकिंग !

प्रचालकपद[संपादन]

नमस्कार अभय,मला प्रचालक किंवा प्रबंधक पदाविषयी २-४ प्रश्न विचारायचे आहेत,१)ह्यातील नक्की कोणता शब्दप्रयोग आपण करतो?कारण संबंधीत पृष्ठावरील माहिती गोंधळ उडविणारी आहे असे मला वाटते निदान शब्द त्यांचे इंग्रजी अर्थ आणि २ वाक्यात माहिती अशी सूची असती तर चटकन कल्पना आली असती २) ह्या पदासाठी मी पात्र आहे का? ३) अर्ज विनंती कुठे आणि कशी करावी? ती इतरांना कशी समजेल?४)त्याद्वारे इतर काय जबाबदारी येऊन पडते?ह्या विषयी मार्गदर्शन करावे.मी आजच http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Emijrp/List_of_Wikipedians_by_number_of_edits हा दूवा पाहिला ज्यात सर्व संपादकांची क्रमवारी दिली आहे ज्यात संपादनांनुसार आपला क्रम आणि एकुण संख्या कळते,असेच दूवे तुम्ही मागे मला दिले होते परंतु ते आता काम करत नाही,कृपया ह्याविषयी अधिक माहिती असणार्‍या दूव्यांची माहिती द्यावी.म्हणजे माझे सविस्तर वर्गीकृत संपादन इतिहास,नविन लेख,जूने,चित्र संचिका इ.क.लो.अ.चे.प्रसन्नकुमार ०४:३१, १० जुलै २०१० (UTC)

नावाविषयी घोळ[संपादन]

माझ्या नावात बदल करणे विषयी.इंग्रजी विकिवर ह्या नावाने आधीच कुणीतरी असल्यामुळे तेथील संपादन मला ह्या लॉगीन मधून करता येत नाही.जर माझे नाव Prasannakumar ऐवजी इतर बदलून (Che Prasannakumar असे) ते शक्य असेल तर मी जवळपास सर्वच संकेतस्थळांवर कार्यरत होऊ शकेल. ह्याविषयी मार्गदर्शनपर सल्ला द्यावा.एकत्रीत खात्याची स्थिती: पाठविण्याचे काम चालू तुमचे खाते ३६ संकेतस्थळांवर अस्तित्वात आहे.४ प्रकल्पांमध्ये तुमची खाती (ज्यांना तुम्ही सहमती दिलेली नाही) उरलेली आहे."Prasannakumar" हे खाते आपोआप तुमचेच आहे याची खालील संकेतस्थळांवर खात्री होऊ शकलेली नाही; कदाचित त्यांचा परवलीचा शब्द तुमच्या मुख्य खात्यापेक्षा वेगळा असू शकतो:

 • en.wikipedia.org
 • en.wikibooks.org
 • en.wikisource.org
 • te.wikipedia.org (तेलुगू)

चे.प्रसन्नकुमार ०५:३१, १० जुलै २०१० (UTC)

विनंती[संपादन]

नमस्कार,शुभप्रभात,आहो आमच्या संदेशाकडे लक्ष द्या जरा.४००० चा आकडा पार केला बरका आम्ही.:) असो माझ्या नावाच्या बदला संदर्भात कृपया मार्गदर्शन करावे,इंग्रजी विकिवर माझे खाते आहे ते त्यात मर्ज होईल का? म्हणजे मी नविन तयार केले आहे.செ.प्रसन्नकुमार ०२:५९, ११ जुलै २०१० (UTC)

 • आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद,मी चावडीवर विनंती केली आहे ,एकदा पहावे.कळावे.செ.प्रसन्नकुमार ०५:०८, ११ जुलै २०१० (UTC)


काउंटर[संपादन]

आपल्या सदस्यपानावरील लेखांचा 'काउंटर' कृपया दुरुस्त करावा ही विनंती.तसेच इतरत्रही आवश्यक ते बदल करावेत ही पण विनंती.

बार्नस्टारसुद्धा समाविष्टकरता सहाय्य हवे[संपादन]

सदस्यांना सुचना आणि मार्गदर्शनाचे विवीध स्तर आता उपलब्ध होत आहेत. एकदम सर्व सूचनांची यादी हातात ठेवल्यास पुर्ण वाचन समजेल अथवा अवलंब होईलच असे नाही. त्यामुळे सदस्यांना संपादनसंख्येचा टप्प्यांनुसार सदस्य मार्गदर्शन करता आले तर सदस्यांनाही फायदा होईल व दर्जाही सुधारण्यास हातभार लागेल असे वाटते. त्या दृष्टीने काही साचे तयार आहेत/प्रस्तावित आहेत. त्यात हजार, पाच हजार आणि दहाहजार या टप्प्य्यांवरील अभिनंदन-सहाय्य सदेशातच बार्नस्टारसुद्धा समाविष्टकरता यावेत या दृष्टीने सुयोग्य बदल करण्यात आपल्या सवडीनुसार सहाय्य हवे आहे.माहितगार

अलिकदील बदल मथळ्यातील नोंदी[संपादन]

अलिकडीलबदल मथळ्यात सदस्यांना काही विशीष्ट गोष्टी सुलभकरण्याच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण बदल केले आहेत.आपले मत प्रार्थनीय आहेच

त्या शिवाय साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथे मासिक सदर ,उदयोन्मूख लेख आणि प्रकल्प बावन्नकशीतील नोंदी संबधीत प्रकल्पाच्या सहमतीने, सहमती असलेले पुरेशी लेख नावे नसल्यास स्वतः प्रचालकांनी निर्णय घावयाचे अभिप्रेत आहे.

नवेलेख हवे/ भाषांतर हवे:/मराठी शब्द सुचवा हे तीन प्रकार शक्यतो साचा चर्चा:अलीकडील बदल लेख विनंत्या येथील सहमती नुसार घ्यावयाचे आहेत.

साचा:अलीकडील बदल लेख विनंत्या पान अती महत्वपूर्ण असल्यामूळे केवळ प्रचालकांकरिता सुरक्षीत केले आहे तर साचाचे चर्चा पान प्रवेशीत सदस्यांकरिता अर्ध सुरक्षीत केले आहे.

माहितगार ०७:५२, १६ जुलै २०१० (UTC)

साधनपेटी गायब[संपादन]

एखादे पान संपादन करण्यासाठी उघडले असता डावीकडील स्तंभ लोगो सोडला तर पूर्णपणे रिकामा दिसत आहे. गेल्या एक-दोन दिवसांतच हे होत आहे. मला वाटते मिडियाविकी नामविश्वातील पानांतील बदलांमुळे हे झाले असावे.

शक्य तितक्या लवकर पूर्वीची साधनपेटी परत दिसू लागेल असे करावे.

अभय नातू १६:१९, १६ जुलै २०१० (UTC)

इंग्रजी विकिवर पुरेशी स्टेबल असलेली मिडियाविकी:Edittools.js मिडियाविकी:Edittools/chars हि दोन नवी पाने इंग्रजी विकिपीडियातून आयात केली होती व मिडियाविकी:Edittools मध्ये इंगीश विकिप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न केला. मिडियाविकी:Edittools.js मिडियाविकी:Edittools/chars मधील कंटेंटवर आता नो विकि लावले आहे. आता बरोबर दिसते का ते कुकीज मुळे मला लगेच लक्षात येणार नाही.या करिता कुक्की वगळून तपासून लगेच संदेश द्यावा. तरी फरक पडला नाही तर या तिन्ही टिकाणच्या बदलांवर द्रूतमाघार घ्यावी लागेलमाहितगार ०५:१८, १७ जुलै २०१० (UTC)
मी कुकीज काडून पाहिले.मला प्रॉब्लेम आता केवळ फायरफॉक्सवर येत आहे.इंटरनेट एक्सप्लोररवर येत नाही आहे आपण कोणता ब्राऊझर वापरत आहात आणि आता प्रॉब्लेम येतो आहे काय ?
 • इंटरनेट एक्सप्लोररवर काहीच प्रॉब्लेम येत नाही. पूर्वीसारखेच काम सुरू आहे. वि. नरसीकर (चर्चा) ११:४७, १७ जुलै २०१० (UTC)
मिडियाविकी:Edittoolsमधील बदलांमुळे फायफॉक्सवरच प्रॉब्लेम येत होता. बदल परतवल्यानंतर पुन्हा पूर्ववत झाले.पण असे का झाले ते समजले नाही मला फायर फॉक्स वापरताना इंग्रजी विकिपीडियावर प्रॉब्लेम येत नाही मराठी विकिपीडियावरच का येत होता ते उमगले नाही. माहितगार १४:११, १७ जुलै २०१० (UTC)

वर्ग:Speedy deletion requests[संपादन]

Hello,

It seem there is some work for sysops at वर्ग:Speedy deletion requests ;o)

Regards

--Hercule २३:१९, २२ जुलै २०१० (UTC)

एका लेखाच्या अनुषंगाने[संपादन]

 • नमस्कार अभय,मी आपणांस मुद्दाम त्रास देत आहे,त्याचे कारण माझ्यात आणि नरसीकर ह्यांच्यात काही पत्रव्यवहार (संदेश)झाला त्याच्या अनुषंगाने मी काही सूचना त्यांना केल्या होत्या,त्या आपल्या दृष्टीस आणून देत आहे,कृपया ह्यात काही चूका असतील किंवा खटकण्यासारखे असेल तर आपण त्यात योग्य त्या सूचना करून कुणाचाही गैरसमज न होता,आवश्यक ते बदल होतील हे पहावे.बाकी सर्व ठिक,माझ्या काही विकिपीडियाविषयी कल्पना आहेत ज्या मी सविस्तर पणे मुद्देसूद लिहून पाठवेन..செ.प्रसन्नकुमार ०५:०२, २३ जुलै २०१० (UTC)
 • माझा पत्रव्यवहार खालीलप्रमाणे =

नमस्कार व्ही.(किंवा तुमच्या लिखाणानुसार वी.)नरसीकर,मला एक नविनच शोध लागलाय तो म्हणजे विदर्भातील लोक बटाट्याला आलु असे म्हणतात, नंतर मला असं लक्षात आलं (इथे तुम्ही आल्याला-अदरक वगैरे म्हणत असाल पण तो हा शब्द नाहिये) कि ह्या लेखात कुणीतरी आलु ह्या हिंदी शब्दास (आता तो हिंदी कि मराठी माहित नाही पण हिंदीच/उत्तरभारतातील असावा असे वाटते) पुनर्निर्देशीत करुन मराठीतील सर्वसाधारण वापरातील (प्रमाण शब्द)" बटाटा" कडे वळविले आहे.माझ्या माहितीनुसार मला इतके दिवस वाटत होते कि "बटाटा" हाच मराठी शब्द आहे पण त्यास मराठीत आलु (?) म्हणतात हे आपल्यामुळे कळले त्याबद्दल धन्यवाद .(माझा आणि विदर्भाचा फारसा संब्ंध नाही किंवा तिकडे जाणे येणे नाही, मी आपला पुण्यामुंबईत राहणारा मराठी माणूस त्यामुळे शेव बटाटा पुरी,बटाटा वडा,कांदे-बटाटे पोहे,अळूभजी,अळुवडी इ.(आलुभजी नाही) शब्दांशी परिचीत असणारा तसेच दक्षिणेकडे काही दिवस राहिल्याने हिंदी शब्दांची माझी ओळख तशी कमीच,असो.).कदाचीत काही दिवसांनी आणखी नवनविन शब्दांची त्यात भर पडेलही पण एक प्रमाण शब्द म्हणून आणि विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी आपण सोपा आणि सुटसूटीत ज्ञानकोश निर्माण करू शकलो तर सर्व मराठी भाषकांस ते उपयुक्त होईल पर्यायाने सर्व मराठी जनमाणसात एकसारखीच प्रमाण बोलीभाषा निर्माण होण्यास मदत होईल असे मला वाटते.जसे इंग्रजी विकिपीडिया किंवा इंग्रजी भाषेत जो शब्द योग्य असतो तोच बहूदा उल्लेखीत असतो इतर जर्मॅनीक किंवा रोमान्स (हे दोन मुख्य भाषांचे गट/प्रकार आहेत) भाषेतील शब्दप्रयोगांचा उल्लेख नसतो तसेच काहीसे मराठी (भाषा आणि विकिपीडिया) बद्दल करता आले तर बरे होईल नाहीतर मराठी शब्दकोशा ऐवजी तो सर्वभाषांचा (बहूदा भारतातील) सामाईक शब्दकोश/ज्ञानकोश व्हायचा.माझ्यामते विकिपीडियावर फक्त प्रमाण भाषा असावी आणि जिथे जिथे आवश्यक असेल तिथे त्या त्या भागातील शब्दप्रयोगाविषयी टिपा त्याही लेखात कुठेतरी समाविष्ट केलेल्या असाव्यात.माझ्या पहाणीत मराठी विकिपीडियावर हिंदी (किंवा इतर देवनागरी भाषांतील शब्दप्रयोग) शब्दांची रेलचेल अधिक प्रमाणात आढळते ते कदाचीत लिपीसाधर्म्यामुळे असावे किंवा मग रोजच्या व्यवहारात लुप्त होत जाणार्‍या मराठी शब्दांविषयी अनास्था असल्यामुळे होत असावे.आपण विकिपीडियन्स ने ह्याविषयी जागरूकता दाखवून (लेखांविषयी,शब्दप्रयोग,भाषाप्रयोग इ.) एक उत्तम दर्जाचा मराठी भाषेतील ज्ञानकोश निर्माण करून मराठी शब्दांचे स्थान अबाधीत राखले पाहिजे आणि जमेल तसे माध्यमांना सूचना करुन योग्य शब्दांची आठवण करून द्यायला हवी त्याने इतर भाषांतील शब्द तर त्यांच्या ठिकाणी राहतीलच शिवाय मराठी राज्यात मराठी शब्द आणि भाषेचे वैशिष्ट्य टिकून राहिल.(आपण एक जबाबदार नागरीक आणि विकिपीडियावरील संपादक ह्यानात्याने प्रमाण मराठी शब्दांचा प्रसार करू शकतो आणि त्याद्वारे भाषेची सेवाच होईल असे मला वाटते,भविष्यात हळूहळू अनेक बोली नाहिशा होऊन (जे आता होतच आहे) एक सामाईक प्रमाण बोली आस्तित्त्वात येण्यास त्याद्वारे मदतच होईल.विशेषत: मराठीचे महाराष्ट्रातील स्थान पाहता,तीला ह्या गोष्टींची अधिक आवश्यकता आहे.) (मी एवढे उपदेशात्मक सांगतोय ह्याचा अर्थ मी काही कुणी मोठा मराठीभाषातज्ञ आहे किंवा कोणत्याही राजकीय पक्षांच्या विचाराने प्रेरीत होऊन सांगतोय असे नाही,मी एक सामान्य मराठीचा कळवळा असणारा अस्सल मराठी भाषक होण्याचा प्रयत्न करणारा विकिपीडियाचा संपादक आहे. ) आपण कोणत्याही गोष्टीचा गैरसमज न करता.मोकळेपणाने माझ्याशी बोलून आपल्या सूचना मला कळवा.क.लो.अ.செ.प्रसन्नकुमार ०५:०२, २३ जुलै २०१० (UTC)

चर्चा संदेश तुमच्या पानावरील असल्यामुळे तो अधीक व्यापक चर्चेकरिता विकिपीडिया:लेखनभाषा संकेत#परभाषी शब्दांचे लेखन/भाषांतर विवाद मुख्य गट कौल येथे नेता आला तर बरे अशी विनंती आहे.
मला इथे विवक्षीत 'आलु' या शब्दा बद्दलची चर्चा करावयाची नाहीतर माझे सर्व साधारण मत मांडावयाचे आहे. व्यक्तीशः "मी मराठी शब्द जमेल तेथे बनवा आणि वापरा पण संस्कृत हिंदी इंग्रजी अशी कोणताही वरचष्मा नको." या गटात मोडतो. प्रमाण भाषेच्या आग्रहा स्वरूपाबाबत मी नेहमी साशंक रहात आलो आहे. प्रमाण भाषेची व्याख्या व्यासपिठीय मराठी अशी करून व्यासपिठावरील सद्य मराठी खरोखर पडताळणी आणि जोखून तीचा स्विकार करावयास हरकत नाही.
पण कुणा अनोळखी इंग्रज साहेबाने लादलेली सदाशिव शनिवारातील कोकनस्थ ब्राह्मणांची मराठीच प्रमाण भाषा हि व्याख्या आपल्याला मान्य नाही,बरे तसे करणे बिचार्‍या कोकणस्थ ब्राह्मणांवरही विनाकारण अन्याय आहे.बिचार्‍या कोकणस्थ ब्राह्मणांची मूळबोली ते विसरून गेले पण ती काही वेगळीच होती.ज्यांची स्वतःची मराठी हि मूळ बोली नव्हती त्यांनी बोललेली मराठी हि प्रमाण भाषा असे म्हणणे कोकणस्थ ब्राह्मणांवर त्यांनी न मागता केलेला विनाकारणचा अन्याय आहे,त्या शिवाय ती मराठी समस्त मराठी लोकांची मराठी कसे म्हणायचे हा प्रश्न जातीयतेतून नाही तर शिक्षणशास्त्र विषयक आहे.विकिपीडिया ज्ञानक्षेत्रात आहे आणि विकिपीडियाने विकिपीडियातील ज्ञान महाराष्ट्रातील सामान्य लोकांना कळेल रूचेल अशा शब्दात द्यावयास हवे. खानदेशी,वर्‍हाडी,मराठवाडी,कोकणी बोलींनी दिलेले शब्द स्विकारून मराठीस समृद्ध करावयास हवे. जीथे एखाद्या बोली ने अर्थबोध होतो ती वाक्ये केवळ प्रमाण मराठीत बसत नाहीत म्हणून त्यांना अशुद्ध मानणे हे सर्वांना सोबत घेऊन न जाणारे,संस्कृतीवर एखाद्याच गटाची मक्तेदारी सांगणारे म्हणून असांस्कृतीक पणाचे आहे असेच माझे व्यक्तिगत मत आहे.
भाषाशास्त्रानुसार भाषा प्रवाही असते बदलती असते. लोकसंभाषणात जे शब्द येतात ते न स्विकारण्यात प्रमाण भाषा लोकांपासून दूर जाते आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यात अक्षम होण्याचे कारण बनते.विकिपीडियातिल भाषा सामान्य मराठी बांधवांना समजणारी हवी इतर बोलीतून शब्द घेतले गेले तर घ्यावेत आणि ज्यांना हे शब्द माहित नाहीत त्यांच्याकरिता शब्दाच्या जवळ सुयोग्य सुचना लावून तळटिपेत विवक्षीत अर्थ नमुद करणे आणि पहाणे विकिपीडियात सहज शक्य आहे.


माझे हिन्दीवर प्रेम नाही, मी हिन्दी चित्रपट आणि गाणि पण पहात नाही.तरीपण हिन्दी भाषेशी नाते मिळणार्‍या किंवा गनमावलेल्या नौकर्‍र्यांच्या पलिकडे जाऊन भाषा शास्त्राच्या चष्म्तातून पहाणे गरजेचे आहे. कोणत्या हिन्दी शब्दांना कुठे पर्यंत स्विकारायचे हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. तो केवळ पश्चिम महाराष्ट्रीय चष्म्याने पाहून सूटणारा नाही.विदर्भातील मुख्य शहर नागपूर मोठा काळ पर्यंत हिन्दी भाषी मध्यप्रदेशाच्या राजधानीचे शहर होते.त्यांचे व्यापारनिमीत्ताने हिन्दी भाषी भागांशी संपर्क मोठे आणि पुरातन असणे आणि म्हणून हिन्दी शब्द वैदर्भीय लोकांच्या , कन्नाड शब्द बेळगावींच्या आणि गुजराथी शब्द धुळे नंदुरबारच्या मराठी लोकांच्या वापरात आपसुक पणे होणे स्वाभाविकच आहे.या दृष्टीने हिन्दी शब्द कुठेपर्यंत आणि किती स्विकारावेत न स्विकारावेत याची चर्चा भावनिक अंगाने न होता भाषाशास्त्रीय दृष्टीने होणे गरजेचे आहे.आणि अशा चर्चा होणे निश्चित गरजेचे आहे.
हिन्दीस विरोधाचे स्वरूप येथे पर्यंत आहेकी आपण पाकिस्तानी भाषी विकिपीडिया पेक्षा आपला विकिपीडिया चांगला कसा यात आभिमान न बाळगता हिन्दीच्या भाषेच्या आपण किती पुढे किंवा मागे आहोत यात गुंतुन रहाणे किमान मराठी विकिपीडियन्सनी गुंतवुन घेणे मला सयूक्तीक वाटत नाही. हिन्दी भाषेतील वाक्ये मराठीत भाषांतर करणे इंग्रजी भाषेतून भाषांतरेकरण्यापेक्षा तांत्रीक दृष्ट्या जास्त सोपे आहे,त्यामुळे आपला भाषातरांचा वेळ काही अंशी वाचू शकतो आणि विकिपीडियन्सनी हिन्दी विकिपीडियाकडे या दृष्टीकोणातून बघावे त्या शिवाय महाराष्ट्रीय दृष्टीकोण केवळ मराठीतून मांडून भागण्या सारखे नाही तर .हिन्दी विकिपीडियातून हिन्दीतून आपले येथील लेख भाषांतरीत करून उपलब्ध केले तर त्यांना महाराष्टीय आणि मराठी चळवळी संकुचीत नाहीत हे अधीक चांगले लक्षात येईल असे माझे मत आहे.
दोन्ही भाषांचा ५०%पेक्षा जास्त शब्द संग्रह सारखाच असताना, मराठीतील कॉमन शब्द वापरणार्‍या हिन्दी भाषकांना आपल्याला जाऊन अहो आमच्या भाषेतील शब्द वापरू नका असे सांगण्याची वेळ येणार नाही हे पहावे म्हणजे झाले :)

०८:३०, २३ जुलै २०१० (UTC)

तुमच्याचर्चेविषयी[संपादन]

नमस्कार अभय,तुमची जिमी वेल्स ह्यांच्याशी झालेली चर्चा नुकतीच पाहिली वाचून मजा आली (विशेषतः भूतकाळातील अनुभवाचे)बर मलाही आपल्या मराठी गँगमध्ये सहभागी करून घ्या म्हणजे जिमीवेल्स ह्यांना भेटता येईल.तुमचा ऑफलाईन ग्रुप वगैरे जे काही असेल ते कळवावे.बाकी ठिक.செ.प्रसन्नकुमार ०३:५२, २४ जुलै २०१० (UTC)

 • तुमच्या चर्चेसंदर्भात मराठीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला असता मला अचानक आठवण झाली ती खालील लेखकात्रणाची ती कृपया पहावी आणि भविष्यात कुणी तुम्हाला विचारलेच कि मराठीचा खटाटोप कशाला?? मातृभाषा एवढी महत्त्वाची का?? तर मांडतांना हे सांगा..
 • ह्या चर्चेबाहेरचे परंतु एक वेगळीच माहिती आपल्यासाठी = सर्वांनी अवश्य वाचावी अशी.

भारतेंदू हरिश्चंद्र (आधुनिक हिंदी साहित्याचे जनक)(साहित्य हरिश्चंद्र ),1885 ह्या विद्वान साहित्यीकाने आपल्या मातृभाषेविषयी काय म्हटले आहे ते अवश्य वाचावे.अधिक माहिती करीता इंग्रजी विकिपीडीयावर भारतेंदू हरिश्चंद्र ह्या लेखाचा शोध घ्यावा. The following two rhyming couplets are taken from his famous poem, मातृ-भाषा के प्रति (For the Sake of Mother-Tongue or Towards Mother-Tongue). The poem has ten couplets in total. The poet asserts the importance of using mother tongue as a medium of instruction – conversational and educational.

  निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल ।
बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल ।।
विविध कला शिक्षा अमित, ज्ञान अनेक प्रकार।
सब देसन से लै करहू, भाषा माहि प्रचार ।।
Translation:
Progress is made in one's own language (the mother tongue), as it the foundation of all progress.
Without the knowledge of the mother tongue, there is no cure for the pain of heart.
Many arts and education infinite, knowledge of various kinds.
Should be taken from all countries, but propagated in own mother tongue.

चर्चा:स्वाद[संपादन]

कृपया चर्चा:स्वाद बघा.

वि. नरसीकर (चर्चा) १५:१९, २७ जुलै २०१० (UTC)

साचा:विशिष्ट अर्थ पहा[संपादन]

आपण साचात पुर्ननिर्देशन पुन्हा वापरलेत, वस्तुतः काही हरकरत नाही कारण मागे मला सतावणारी त्रूटी तूम्ही स्थानांतरण केल्या नंतर पुन्हा येत नाही आहे,पण सयीमुळे काही वेळा लक्षात येण्यास वेल लागतो. या साचाच्या प्रत्यक्ष वापरात पुर्ननिर्देशनाने त्रुटी येत आहे असे वाटल्याने पुर्ननिर्देशन काढून [विशिष्ट अर्थ पहा] ला स्वतंत्र अस्तीत्व दिले होते. पण आता ती त्रूटी दिसत नाही किंवा सयी मुळे लक्षात येत नाही. हे साचे वापरल्या नंतर नंतरचा शब्द खूपच दूर जात आहे असे वाटल्यास कदाचित पुर्ननिर्देशन काढावयास लागेल. लगेच कार्यवाहीची आवश्यकता नाही केवळ आपले लक्ष राहिल म्हणून निर्देश प्रपंच.माहितगार १५:४४, ३० जुलै २०१० (UTC)

पॅरिस[संपादन]

होय, मुखपृष्ठ लेख करता येईल. काही विभाग अजून अपुरे आहेत पण लवकरच पूर्ण करेन.
अभिजीत साठे २०:२४, ५ ऑगस्ट २०१० (UTC)

नागद्वार[संपादन]

कृपया नागद्वार हा लेख बघावा.त्यावर आपली नेहमीप्रमाणे निष्पक्ष व सडेतोड प्रतिक्रिया आमंत्रित करतो.वाट बघत आहे.अशा प्रकारचे लेख लिहावेत काय?ते सयुक्तिक वगैरे आहेत काय ईत्यादी. वि. नरसीकर (चर्चा) ०४:०२, ७ ऑगस्ट २०१० (UTC)

sorry[संपादन]

sorry for mistake from me सदस्य:Svikram69 ००:१२, ११ ऑगस्ट २०१० (UTC)

नमस्कार[संपादन]

नमस्कार,बर्‍याच दिवसात दिसला नाहीत,सध्या मी विक्शनरीचा प्रकल्प हाती घेतला आहे त्यामुळे विकिवर येणे जाणे कमीच आहे,आजच मी विक्शनरीचे नविन मुखपृष्ठ सजविण्याचा प्रयत्न केला,तो आपणांस दाखविण्यासाठी खाली दुवा देत आहे,कळावे,सूचना असल्यास संदेश पाठवावेत,Prasannakumar १८:१६, १६ ऑगस्ट २०१० (UTC)

जमल्यास प्रसन्नकुमारांनी करू घातलेल्या बदलात मुखपृष्ठापेक्षा नवीन लेखांची संरचना फॊर्मॆटींग कशी असावी असा काहीसा प्रश्न महत्वाचा आहे. आपण लक्ष घालून मार्गदर्शन करावे असे वाटते माहितगार ०६:०३, १७ ऑगस्ट २०१० (UTC)
मी सुरवातीस मांडलेला wikt:विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम असा होता त्या नुसार फार जास्त लेखांची नाही wikt:मुंगी , wikt:मेळा सारख्या केवळ काही नमुना लेखांची निर्मिती होऊ शकली त्यात विभक्ती वगैरेकरिता दाखवा लपवा चसाचे लावने शिवाय इंग्रजी विक्शनरी प्रमाणे काही भाषांतरे सोप्यापद्धतीने जोडण्या सारखे सुविधा जोडण्याचा बेत होता, wikt:विशेष:योगदान/श्रीहरि यांनी मुख्यत्वे या योजने करिता आराखडे बनवून त्याचे दुवे मुखपृष्ठावर लावले, श्रीहरिंनी भर घातलेल्या योजनेत नवीन लेख बनवताना सर्वात वर भाषाशीर्ष आराखडा जोडणे मध्ये शब्द जाती नुसार आराखडे इनसर्ट करणे आणि शेवटी अंतीम शीर्ष मध्ये अंतीम विभाग नमुद करणे अशी अभिप्रेत ठेवून बनवली भाषा शीर्ष आणि अंतीम शीर्ष हे आराखडे सर्व लेखात समान असतील आणि मधील भाग तेवढा शब्द जाती नुसार आवश्यकते नुसार असेल , आराखड्यांतून् त्यांनी शब्दजातींचे शक्य ते सर्व उपप्रकार सम्मीलीत करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ज्यांना कल्पना नाही त्यांनाही सुयोग्य उपप्रकार निवडणे आणि नेमके काय करावयाचे आहे हे समजणे सोपे जाईल. खरेतर इतर कोनत्याही विक्शनरी पेक्षा अधीक विस्तृत व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जो की ,मराठी भाषेचे उच्चतर अभ्यासक (कारन मराठीच्या उच्चतर अभ्यासकांनाही अशा विकिसॉफ्टवेअर आणि बॉट्स इत्यादींनी उपलब्ध होणार्‍या सुविधा इतरत्र सहज उपलब्ध होण्याची शक्यता सध्यातरी फार मोठी नाही), नवीन शब्द घड्वणारी/गरज पडणारी मंडळी ,आणि केवळ शब्दातील रंजकता शोधणारी मडळी सार्‍यांचेच्याच उपयोगी पडेल अशी रचना अभिप्रेत होती /(मला अजुनही आहे)
पण कदाचित इतरांना रचना सांगण्यात आम्ही कुठे कमी पडलो / लोकांची पहिल्यास्तरापलिकडे मराठी व्यकरणाबद्दल अनभिज्ञता अथवा अनास्था का क्लिष्टता भय? /अती विस्तार / नेमके कुठे चुकले समजले नाही, पण हवी तशी दिशा प्रत्यक्षात प्राप्त झाली नही आणि प्रथम दर्शनी कुठेही काह्ही असे मत बनते हे खरे आहे.
अपणास तमीळ विक्शनरीतील जाणते सदस्य श्री सेल्वा नवीन शब्द भर घालण्यात यांचे सहकार्य लाभते आहे त्यांना मराठी भाषेचे जुजबी ज्णान आहे पण रचना अधीक माहिती करून हवी आहे, प्रसन्नजींना अजूनही अभिप्रेत रचना समजलीच असे नेमके पणाने सांगता येत नाही. माहितगार १६:२०, १७ ऑगस्ट २०१० (UTC)

(बर्‍याच ठिकाणी ण बरोबर उमटला नाही पण साईन आऊट करणे आवश्यक असल्यामुळे लगेच करणे जमत नाही आहे य बद्दल क्षमस्वमाहितगार १६:२२, १७ ऑगस्ट २०१० (UTC))

आभार[संपादन]

श्री. अभय नातू यांचे यती आणि यती (हिममानव) फरक दिल्या बद्दल धन्यवाद !

आपला,
(अर्धज्ञानी) विशुभाऊ रणदिवे १२:२८, १७ ऑगस्ट २०१० (UTC)

कमिंग सून[संपादन]

नमस्कार! :)

विकिपीडियावरच्या गंभीर वातावरणात गंमत करायची लहर आली, म्हणून तो प्रकार करून एक आवृत्ती साठवून ठेवली. इ.इ. कमिंग्स या नावाच्या पानावर माहिती काही नाही, आणि जणू काही त्या माहितीची वाट पाहत ताटकळत एका दिशेने पाहणारा त्या कवीचा फोटो पाहून थोडी मस्करी करायची इच्छा झाली. इथे] जसे किस्से पाहायला मिळतात, त्यातलाच मराठी विकिपीडियावरचा किस्सा म्हणा. :)

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:०९, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

विक्शनरी[संपादन]

नमस्कार, तुम्ही विक्शनरीकडे लक्ष देत आहात हे कौतुकास्पद आहे. तेथे तर संपादकांची विकपीडियापेक्षा वानवा आहे. नवीन मुखपृष्ठाबद्दल माझ्या (सडेतोड) नोंदी -

 • >>>दखल घेतल्याबद्दल धन्यवाद.

१. चित्रे नाहीत.

 • >>>अर्ध्याहून अधिक विक्शनरीज पाहिल्यानंतर चित्रे असावीत असे वाटले नाही,खरतर अपवादानेच एखाद्या विक्शनरीवर चित्रे पहावयास मिळतील हे आपण शोधल्यानंतरही लक्षात येईल-मराठी विकिपीडियाला त्याची अधिक गरज आहे,आणि वारंवारपणे ती बदलली जावी हे अपेक्षा आहे,पण ह्या बाबतीत इतर सदस्यांमध्ये कमालीची अनास्था पहावयास मिळते.

२. भरपूर माहिती आहे.

 • >>>हे मात्र अत्यंत आश्चर्यकारक वाटल!आधीचे विक्शनरीचे रूप पाहता हे त्याच्या एक चतुर्थांश असावे असे वाटते,इंग्रजी विक्षनरी किंवा कोणत्याही मोठ्या विक्षनरीवर ह्याहून अधिक दुवे पहावयास मिळतात,मुळात ह्यापूर्वीच्या विक्शनरीच्या पृष्ठावर भारंभार माहिती असणे ह्याचमुळे एका कारणामुळे मी रूप पालटण्याकडे मोर्चा वळविला.ती अधिक प्रमाणात कमी करण्याचा परंतु महत्वाचे दुवे न वगळण्याच्या विचाराअंती एवढीच शिल्लक ठेवली आहे.माझ्या चर्चा पहा.

३. या माहितीची अजून नीट मांडणी व्हावी. आत्ता खूपच गर्दी-गर्दी वाटत आहे.

 • >>>गर्दी वाटत आहे? हा प्रश्न आपल्याला ह्या आधी पडला नाही ह्याचे आश्चर्य वाटते,असो आपल्याला नक्की काय अपेक्षीत आहे कळू शकले नाही.


४. एखाद्या चांगल्याप्रकारे लिहिलेल्या शब्दाचे मुखपृष्ठ सदर करावे म्हणजे विक्शनरी हा प्रकार काय आहे, कसे करावे हे सोदाहरण स्पष्ट होईल.

 • >>> ह्यावर विचार करून अशा लेखांची मालिका करता येईल.


तसेच काही महिन्यांपूर्वी माहितगार, श्रीहरी, इ. जाणकार मंडळींनी विक्शनरीवर लेख कसे असावे याचा आराखडा तयार केला होता. नवीन अनेक शब्दांचे लेख तयार करण्यापूर्वी जर असलेले लेख या आराखड्यात आणता आले तर ते अतिउत्तम होईल.

 • >>> ते आराखडे एखाद्या नवलेखकाला अधिक क्लिष्ट वाटल्यास तो लिखाणापासून परावृत्त होऊ शकतो ,असे नाही का वाटत? कदाचीत हेच कारण असावे कुणी

विक्शनरी कडे वळत नाही,इतकेच काय त्यातले साचे आणि कित्येक माहिती अपडेट देखील होत नाही.असो,ह्यावर चर्चा होणे गरजेचे आहे

असे करणे विकिपीडियापेक्षा विक्शनरीवर गरजेचे आहे कारण विक्शनरीवर एकच (किंवा मोजकेच) आराखडे असतील. जर हा आराखडा पक्का बसवला तर सदस्य अजून वेगवेगळे आराखडे तयार करणार नाहीत. यासाठी wikt:mr:विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम हे पान पहावे, तसेच wikt:mr:मुंगी हा शब्दही पहावा.

 • >>> आधी साचे ठरविणे आवश्यक आहे,त्यावर काम लवकरच सुरू होईल,आपणही मदत करावी ही अपेक्षा.

तुमच्याकडून असाच उपक्रम चालू रहावा अशी आशा. मदत लागली तर मागालच.

 • >>>प्रोत्साहनाबद्दल आभारी आहे,कळावे

अभय नातू १५:१७, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

 • >>> Prasannakumar १७:०१, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

ता.क- मी नुकतेच तमिळ विक्शनरी विकिवरील श्री.सेल्वाकुमार ह्यांच्या सोबत १०००-तमिळ-मराठी शब्दसंग्रह करण्याचे योजिले आहे,त्यात हातभार लाऊ शकला तर अवश्य लावावा.तमिळ विक्शनरी वर कार्यरत असणार्‍या सेल्वांना थोडीफार मराठी कळते,त्यातुनच त्यांना हवा तो शब्द न सापडल्याने त्यांना आणि त्यांच्याशी वार्तालाप करून मला हा प्रकल्प सुचला,तमिळ विक्शनरीचा क्रमांक १००० च्या साच्यात पाहून त्यांना आश्चर्य वाटले त्यामुळे त्यांनी साचे अपडेट (अद्यायावत करावे असे सुचविले,सध्या ते साचा निर्मितीत मदत करीत आहेत.)

 • 100,000+: 中文 (Chinese) • Suomi (Finnish) • Français (French) • Deutsch (German) • Ελληνικά (Greek) • Magyar (Hungarian) • Ido • Italiano (Italian) • 한국어 (Korean) • Lietuvių (Lithuanian) • Norsk Bokmål (Norwegian) • Polski (Polish) • Português (Portuguese) • Русский (Russian) • Svenska (Swedish) • தமிழ் (Tamil) • Türkçe (Turkish) • Tiếng Việt (Vietnamese)
 • तमिळ विक्शनरीवर लेखांची एकुण संख्या :१,२०,३७४ त्यात देखील १००० नविन मराठी शब्दसंग्रह जोडण्याचे योजिले आहे.
 • अजुन एक सूचना- ह्यापूर्वी श्रीहरी आणि माहितगार ह्यासारख्या जाणकार मंडळींनी ज्या साच्यांची निर्मिती केली होती,किंवा लेखांच्या मांडणीचे स्वरूप तयार केले होते त्याची साधी झलक पाहिली असता माझ्यासारख्या १ वर्षाच्या अनुभव असणार्‍याला देखील धडकी भरते (अरे बापरे ! इतक्या सार्‍या गोष्टी भराव्या लागणार?),अर्थात इतकेच जर क्लिष्ट लिखाण करावयाचे असेल तर त्यापेक्षा असल्या भानगडीत नकोच पडायला असा विचार येतो,इतकेच नाही तर मराठी विकि आणि इतर प्रकल्पात हाच क्लिष्टपणा,नकोत्या जाचक अटी,त्यावरून जाणकार मंडळी सल्ले देतात परंतु त्यात बदल करत नाही (म्हणजे काय नको होते काय हवे होते हे सांगतील परंतु स्वतः मात्र अपवादानेच अगदीच वाटला तर त्या लेखात/पृष्ठात बदल करतील) असे अनेकवेळा पहावयास मिळते,हे सारे उत्तेजनावर्धक वाटत नाही.त्याने ह्या सर्व गोष्टींत पडणे कठिण वाटते,आणि त्याचमुळे संपादक संख्या असुनही कुणी फारसे उत्साह दाखवित नाही.ह्यावर विचार होऊन एक काय ती नियमावली म्हणा,साचे म्हणा,वर्ग म्हणा,इत्यादी सर्वच ठिकाणी उत्साहवर्धक असे नुतनीकरण होणे गरजेचे आहे असे वाटते.

-मराठीतील सर्वच प्रकल्प सोप्पे आणि सुटसुटीत आकर्षक रंगसंगतीत,विविध चित्रांसहित व आयकॉन्सचा वापर करून लक्षवेधक असावेत असा माझा विचार आहे. विकिपीडियावरील लेखात देखील रंगसंगती असणारे साचे उपलब्ध असावेत.आपले विचार कळवावे.Prasannakumar १७:४३, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

 • श्रीहरींचा शेवटचा लेख पहावा १८:०७, मे २९, २००८ ,उदा.म्हणून..http://mr.wiktionary.org/wiki/अंतरंग त्यात खाली जे काही वर्ग आहेत कानडी,पाहिजे फ्रेंच पाहिजे, अबक पाहिजे इत्यादी असे २५-३० वर्गात वर्गीकरण करून ठेवले आहे,अशा लेखांनी किंवा किचकटपणाने किती लोक लिखाणास प्रवृत्त होतील? निदान मी तरी नाही.त्याउलट त्यात एकमेव दुवा असलेल्या नेपाळी भाषेत माहिती एकाच ओळीची आहे (जे अपेक्षीत नाहिये)पण लेखसंख्या मात्र अफाट आहे

यस नेपालि शव्दकोषमा ४,५७८ शब्दहरु ,तमिळ विकिपीडियाच्या बाबतीत मात्र आवश्यक माहिती तर आढळतेच परंतु नीटनेकेपणा,संक्षिप्त माहिती,चित्रासह माहिती व इंग्रजी अर्थ ह्या ४ गोष्टी प्रामुख्याने पहावयास मिळतात एखादे अविशिष्ट लेख पहा म्हणजे कळेल.http://ta.wiktionary.org/wiki/உச்சி (उच्चि),म्हणजे मी वरती काय सांगतोय त्याचा अर्थबोध होईल.Prasannakumar १७:५३, १८ ऑगस्ट २०१० (UTC)

आभार[संपादन]

समर्थन कौल दिल्याबद्दल मनःपुर्वक आभार. वि. नरसीकर (चर्चा) ०५:३६, १९ ऑगस्ट २०१० (UTC)

काम चालु साचा[संपादन]

कृपया येथे बघा. काही मोजके अपवाद वगळता,व त्या साच्याची पाने सोडुन,किमान २ महिने वा त्यापेक्षा जास्त प्रलंबित असलेला 'काम चालु साचा' लेखातुन काढण्यात आला आहे. त्यास पर्याय म्हणुन भाषांतर साचा किंवा विस्तार साचा लावला आहे.

 • पुढे विनंती अशी की अश्या प्रकारची कामे आपल्या लक्षात आली असतील किंवा येतील तर मला जरुर कळवावे.त्याचा निपटारा करावयाचा मी शक्यतोवर प्रयत्न करेन.
 • भाषांतरसाचा लावलेले माझे व ईतर लेख पूर्ण करण्याचाही पुढील प्रयत्न राहील.

वि. नरसीकर (चर्चा) १०:०२, २३ ऑगस्ट २०१० (UTC)

साचे[संपादन]

नमस्कार अभय,

आज मी ६ महिन्यांच्या विकिनिद्रेनंतर, मराठी विकिपीडिया मध्ये आलो. खूप काम असल्यामुळे, विकि मध्ये काम करता नाही आले. पण आता पुर्ण जोमाने मी माझे काम करण्यास सुरवात करणार आहे. मला बर्याच गोष्टी येते नवीन दिसत आहेत. पण साच्यांमध्ये काही बदल झालेला दिसतोय. क्रूपया हा साचा बघावे, व यातील रंग कसे सुध्रवयाचे हे सांगावे. मदतीबद्द्ल धन्यवाद!

प्रशांत शिरसाठ (माझ्या बरोबर बोला!) १२:२७, २४ ऑगस्ट २०१० (UTC)

कवेलु[संपादन]

रुफिंग टाईल यासाठी मराठीत नेमकी काय शब्दयोजना करावी? आमचेकडे(विदर्भात) 'कौल' म्हणतात(कौलारु घर).पण देवीचा 'कौल' याचेशी त्याचे साधर्म्य आहे. 'कवेलू' पण म्हणतात. तो हिंदी शब्द आहे.कउल असे म्हणणे अशुद्धलेखन होईल. कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

वि. नरसीकर (चर्चा) ०६:५४, २५ ऑगस्ट २०१० (UTC)

विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा[संपादन]

आपण देवनागरी लेखनव्यवस्था सुरळीत चालावी म्हणुन तातडीने सहकार्य पुरवल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद विकिपीडियाचा नवा चेहरा मोहरा व्हेक्टर बद्दल प्रेस रिलीज पाठविण्याचा मानस आहे. विकिपीडिया:माध्यम प्रसिद्धी मजकुर येथे प्रेस रिलिजमध्ये सुयोग्य सुधारणा करण्यात सहकार्य हवे आहे.माहितगार ०७:५४, ६ सप्टेंबर २०१० (UTC)

साचा:विस्तार[संपादन]

मी सध्या विस्तार साच्यात एक् बदल केला आहे. सध्या साचा आपण {{विस्तार}} असा वापरतो व ज्या पानावर वापरले आहे ते पान वर्ग:विस्तार विनंती मध्ये जाते. जर एखादे पान समजा फुटबॉल वर आपल्याला हा साचा वापरायचा असल्यास आपण {{विस्तार}} किंवा {{विस्तार}} अश्या प्रकारे वापरू शकतो व त्यामुळे फुटबॉल पान वर्ग:विस्तार विनंती किंवा वर्ग:खेळ विस्तार विनंती वर्गात जाईल. ह्याचा उपयोग विस्तारासाठी योग्य आराखडा करण्यासाठी होउ शकेल.

तसेच माझा एक प्रश्न आहे कि समजा वर्ग:महिला टेनिस खेळाडू ह्या वर्गात काहि किंवा सर्व खेळाडूंच्या पानावर जर {{विस्तार}} साचा वापरला असेल तर bot चा वापर करून आपण {{विस्तार}} किंवा {{विस्तार}} असा बदल करू शकतो का ?

Maihudon ०४:०६, ८ सप्टेंबर २०१० (UTC)

रिकाम्याने खूप जलदगतीने उत्तम काम केले, अभिनंदन.
वर्ग:विस्तार विनंती मध्ये अनेक लेख आहेत. त्याचे वर्गीकरण जर आपण अश्यारितीने करू शकलो तर नक्कीच आपण विकि विस्ताराचा एक उत्तम आराखडा आखु शकतो. वर्गीकरण साधे व सुटसुटीत असावे ह्या साठी सगळ्यांच्या सहभागाची / सूचनांची सध्या गरज दिसते आहे. सध्या साठी माझा असा विचार आहे कि आपण खालिल प्रकारे वर्गीकरण करू शकतो.
 • वर्ग:विस्तार विनंती
  • खेळ
   • खेळाडू
   • स्पर्धा
   • खेळ इतर
  • उदाहरण १ (चित्रपट)
   • अभिनेते (उपवर्ग)
   • अभिनेत्री (उपवर्ग)
ह्या प्रकारे आपण ज्या सदस्याला ज्या विषयात रस आहे त्यातील सर्व विस्तारण्याजोग्या लेखांची माहिती एका जागी देउ शकतो.

Maihudon ०६:५९, ८ सप्टेंबर २०१० (UTC)

धूळपाटी२९[संपादन]

नमस्कार, कृपया विकिपीडिया:धूळपाटी२९ पहा, काही बदल, सूचना असतील तर अवश्य सांगा. या ले़खात यापुढे प्रत्येक श्रेणी आणि कुळानुसार पक्ष्यांची थोडक्यात आणि दुवे जोडून माहिती लिहावयाची आहे. gypsypkd (चर्चा) ०५:५६, ८ सप्टेंबर २०१० (UTC)

साचेबदल[संपादन]

एका मिनीटात ८ साचेबदल या गतीने 'रिकाम्याचे' काम सुरु आहे.जवळपास ७.५ सेकंदास एक बदल.कोणते software वापरतो देवजाणे.या गतीने चंद्रावर तर आजच संध्याकाळी पोचेल.एक महिना कशास हवा तेथे जावयास? 'रिकामचोट'

अरे रिकामचोटा,
मिनिटाला पाहिजे तितके बदल करता येतात. विकिपीडिया सर्व्हरचा विचार करुन हे बदल थ्रॉटल केले आहेत.
चंद्रावर कशाला, मंगळावर जाऊ की? पण एकदम नको, टप्प्याटप्प्याने.
आणि एक सदस्यनाव घे की...फुकटच असते.
अभय नातू १४:४५, ८ सप्टेंबर २०१० (UTC)

चळवळीचे दिवस - अश्विनी तोरणे[संपादन]

नमस्कार, मी अश्विनी तोरणे.प्रा.अरूण कांबळे यांच्या 'चळवळीचे दिवस' या पुस्तिकेवरील लेखन मी केले आहे. विकिपीडियावरील कांबळेसरांवरील नोंद पाहिल्यानंतर माझ्याकडे आधीच तयार असणारा हा लेख मी सादर केला. त्यामुळे ते लेखन नियमांनुसार अर्थातच झालेले नाही.मला त्यासंदर्भात माहितीही नव्हती.सहज केलेला फक्त प्रयत्न होता. धन्यवाद.

धन्यवाद! आपणास अपेक्षित बदल मी निश्चितच करेन.अश्विनी तोरणे.