व्हॅलेन्टाईन्स डे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
व्हॅलेन्टाईन कँडी
सैनिक असलेले कॅनडियन प्रेमी युगलांचा व्हॅलेन्टाईन्स दिन, १४ फेब्रुवारी १९४४

व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे.[१][२] हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. हा दिवस सेंट व्हॅलेन्टाईन नावाच्या ख्रिश्चन हुतात्म्याच्या नावाने साजरा करतात. इ. स. 270 च्या आसपास एक ख्रिश्चन संत व्हॅलेन्टाईन होउन गेले. एका दंतकथे नुसार संत व्हॅलेन्टाईन चा हा बलिदान दिवस आहे. परंतु युरोप मध्ये अजूनही संधिग्धता आहे की, नक्की कोणत्या व्हॅलेन्टाईन नावाच्या व्यक्ति पासून सुरुवात झाली.[३]

तसेच तारखेचा पण घोळ आहे. जसे की Western Christian Church हे व्हॅलेन्टाईन डे 14 फेब्रुवारी ला साजरा करतात [४] आणि Eastern Orthodox Church -6 जुलै/30 जुलै रोजी साजरा करतात. [५]

भारतातील व्हॅलेन्टाईन्स दिन[संपादन]

भारतात मोठ्या प्रमाणावर हा दिवस प्रेमी युगलांकडून साजरा केला जातो. तथापि, 'व्हॅलेन्टाईन्स डे हा आपल्या संस्कृती विरूद्ध आहे' असे म्हणून भारतातील बजरंग दल व इतर कट्टरतावादी हिंदू धार्मिक संघटनांना याला विरोध करतात आणि प्रेमी युगलांना धमक्या देत मारहाण करतात. असे असतानाही व्हॅलेंटाईन डे भारतमध्ये जास्त प्रमाणात लोकप्रिय होत आहे.[६]

हे सुद्धा पहा[संपादन]

कामदेव

संदर्भ[संपादन]

  1. [१]
  2. [२]
  3. [३]
  4. [४]
  5. [५]
  6. . BBC. February 11, 2003 http://news.bbc.co.uk/2/hi/south_asia/2749667.stm  Unknown parameter |Title= ignored (|title= suggested) (सहाय्य); हरवले किंवा मोकळे |शीर्षक= (सहाय्य)


बाह्यदुवे[संपादन]

साचा:व्हॅलेंटाईन अभिवादन