सदस्य चर्चा:अमर राऊत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   Help-browser.svg स्वागत अमर राऊत, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
Nuvola apps ksig-vector.svg आवश्यक मार्गदर्शन अमर राऊत, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८९,९५६ लेख आहे व १८१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Flag of India.svg Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
Crystal Clear app ktip.svg नेहमीचे प्रश्न
Accessories-text-editor.svg सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
Policy - The Noun Project.svg धोरण
Crystal Clear app ksirtet.svg दालने
Nuvola apps bookcase.svg सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) २३:४१, २९ डिसेंबर २०२१ (IST)Reply[reply]

आपले लिखाण[संपादन]

नमस्कार, कृपया लेख लिहिताना त्यात वर्ग जोडावा. तसेच लेखाच्या शेवटी ==संदर्भ == असा मथळा जोडावा. कृपया मी केलेली काही संपादने पहावीत. - संतोष गोरे ( 💬 ) ०७:५८, ३० डिसेंबर २०२१ (IST)Reply[reply]

धन्यवाद. मी मोबाईलवरून लेख लिहतो. त्यात तशी सुविधा उपलब्ध नाही. असल्यास ते कसे करावे ते सांगावे. परिच्छेद सुद्धा लिहता येत नाहीत मोबाईलवरून. अमर राऊत (चर्चा) ०९:४३, ३० डिसेंबर २०२१ (IST)Reply[reply]

दोन प्रश्न आहेत. लेख लिहल्यावर वर्ग कसा जोडावा? मी मोबाईलवरून लिहतो. प्रयत्न केला बराच, पण माहिती नाही मिळाली. आणि दुसरा प्रश्न, माझे लेख गुगलवर सर्च केल्यावर दिसत नाही. दिसण्यासाठी काय करावे. धन्यवाद अमर राऊत (चर्चा) १५:१७, ३१ डिसेंबर २०२१ (IST)Reply[reply]

नकल डकव[संपादन]

Copyright problem icon असे दिसून येते की आपण जोडलेली सामग्री कॉपीराइट धारकाच्या परवानगीशिवाय इतर स्त्रोतांमध्ये नकल (कॉपी) केली आहे. या कारणासाठी, तो काढण्यात आला आहे. कायदेशीर कारणांसाठी, विकिपीडिया प्रताधिकार (कॉपीराइट) केलेल्या मजकुरास, किंवा इतर संकेतस्थळावरून घेतलेले छायाचित्र किंवा मुद्रित सामग्री/मजकूर विनापरवानगीने स्वीकारू शकत नाही; अशा जोडण्या हटविल्या जातील. आपण बाह्य संकेतस्थळे (वेबसाइट्स) किंवा प्रकाशनांचा स्त्रोत याला माहितीचा एक स्रोत म्हणून वापरू शकता परंतु वाक्ये किंवा प्रतिमा/चित्र यासारख्या सामग्रीचा स्त्रोत म्हणून नव्हे - आपल्या स्वतःच्या शब्दांचा वापर करून आपण लिहिणे आवश्यक आहे. विकिपीडियावर प्रताधिकाराचे उल्लंघन फार गंभीरपणे घेतले जाते आणि अशा प्रकारचे सततचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांना प्रतिबंधित केले जाईल.

-

तसेच कृपया आपले लेख स्वतःच्या शब्दात विस्तारित करावेत ही विनंती.- संतोष गोरे ( 💬 ) १८:३०, ६ जानेवारी २०२२ (IST)Reply[reply]

मला याची माहिती नव्हती. मराठी विकीपिडीयावर जास्तीत जास्त माहिती असावी, एवढाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अजूनही असे लेख आहेत, तुमच्या निदर्शनास आले तर ते काढून टाका.मला तांत्रिक अडचण येत आहे. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) ०९:३८, ८ जानेवारी २०२२ (IST)Reply[reply]

तुमचे लिखाण अगदी जोरदार आणि उत्तम चालू आहे. फक्त पुढील काही मुद्दे लक्षात ठेवा
  • प्रताधिकार भंग होऊ देऊ नका
  • संदर्भ देताना ब्लॉग, ब्लॉग साईट, समाज माध्यमे, इत्यादीचे संदर्भ नसावेत.
  • विवादास्पद मुद्दे आणि लेख शक्यतो नकोच.
  • गरज पडल्यास येथील सक्रिय लेखकास बिनधास्त मदत मागा.
  • बाकी इतर विकिपीडियाच्या लेखाचे भाषांतर करून नवीन मराठी लेख निर्माण करणे सगळ्यात सोपे आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा- संतोष गोरे ( 💬 ) १०:२१, ८ जानेवारी २०२२ (IST)Reply[reply]

पानाचे स्थानांतरण[संपादन]

नमस्कार, सध्या आपली संपादने जोरात चालू आहेत. छान, परंतु कृपया लक्षात घ्यावे एखाद्या पानाचे नाव बदलायचे असल्यास move किंवा स्थानांतरण चा पर्याय निवडावा. तुम्ही काही असलेली पाने नवीन नावाने निर्माण करून जुनी माहिती त्यात कॉपी पेस्ट केली. अशाने वाद निर्माण होऊ शकतो. संपादने करताना कोणतीही अडचण असेल किंवा मदत हवी असेल तर प्रचालक यांना संपर्क करणे. सध्या अभय नातू तसेच Tiven2240 हे दोघे नियमित उपलब्ध असतात. तेव्हा त्यांना मदत मागावी, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. - संतोष गोरे ( 💬 ) ०८:०९, २० जानेवारी २०२२ (IST)Reply[reply]

हो नक्कीच. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) ०९:५७, २० जानेवारी २०२२ (IST)Reply[reply]

नाटक/मालीका/चित्रपट/कथा इ. मधीलकाल्पनिक पात्र[संपादन]

नमस्कार, प्रफुल पारेखहंसा पारेख या लेखांसाठी कृपया काल्पनिक व्यक्ती हा साचा वापरावा.- संतोष गोरे ( 💬 ) १६:३७, १ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply[reply]

हो नक्कीच. सूचनेसाठी आभारी आहे अमर राऊत (चर्चा) १७:१३, १ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply[reply]

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा आज २ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या Rockpeterson किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२२/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

--Rockpeterson (चर्चा) ११:०१, ३ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply[reply]

योग्य शीर्षक[संपादन]

आपण अनेक लेख तयार करीत आहात हे चांगलेच आहे, परंतु लेखाचे शीर्षक देताना ते कृपया योग्य द्यावे. चुकीचे शीर्षक दिल्यावर ते पान पुनर्निर्देशित करावे लागते, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) ०९:२०, १९ एप्रिल २०२२ (IST)Reply[reply]

सूचनेसाठी आणि तुमच्या दुरुस्त्यांसाठी आभार. बऱ्याच वेळा घाईघाईत लहानसहान चुका होतात. किंवा कधीकधी काही नियमच माहिती नसतात. उदाहरणार्थ, कालचा "मूलभूत हक्कांचा" लेख. मी कालपर्यंत समजत होतो, "म" ला पहिला उकार असतो. तुम्ही दुरुस्ती केल्यानंतर मी शोध घेतला, तेव्हा चूक समजली. एकमेकांच्या सहकार्यानेच माणूस शिकत जातो. धन्यवाद अमर राऊत (चर्चा) १०:१७, १९ एप्रिल २०२२ (IST)Reply[reply]

Translation request[संपादन]

Hello.

Can you translate and upload the article en:List of World Heritage Sites in Azerbaijan in Marathi Wikipedia?

Yours sincerely, Multituberculata (चर्चा) १५:५५, ८ मे २०२२ (IST)Reply[reply]

Feminism and Folklore 2022 - Local prize winners[संपादन]

Feminism and Folklore 2022 logo.svg

कृपया आपल्या भाषेत भाषांतर करण्यास मदत करा

Congratulations for winning a local prize in Feminism and Folklore 2022 writing competition. Thank you for your contribution and documenting your local folk culture on Wikipedia. Please fill in your preferences before 15th of June 2022 to receive your prize. Requesting you to fill this form before the deadline to avoid disappointments.

Feel free to contact us if you need any assistance or further queries.

Best wishes,

FNF 2022 International Team

Stay connected B&W Facebook icon.png  B&W Twitter icon.png

MediaWiki message delivery (चर्चा) १३:२०, २२ मे २०२२ (IST)Reply[reply]

अधिक माहिती[संपादन]

नमस्कार. तुम्ही जागतिक दृष्टीदान दिन ह्या लेखावर पानकाढा|कारण=नकल अशी विनंती टाकली, पण नाकाला कशाची किंवा कुठून केलेली होती ते कळलं नाही. —usernamekiran (talk) १७:०९, २९ जून २०२२ (IST)Reply[reply]

नमस्कार, संबंधित लेखात दिलेला पहिलाच संदर्भ बघा. "वेबदुनिया" पोर्टलवरचा लेख आहे तसा संपूर्ण कॉपी पेस्ट केला आहे. शिवाय हा लेख विश्वकोशीय लेखनशैलीस देखील धरून नाही. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) १७:३०, २९ जून २०२२ (IST)Reply[reply]

नमस्कार, कोणताही जागतिक दिन हा विकिपीडियावर असणे गरजेचे आहे. तेव्हा अशा वेळेस अशा उपयुक्त लेखात आपण स्वतः काही बदल करून सदरील लेख ठेवावा असे मला वाटते.- संतोष गोरे ( 💬 )
@संतोष गोरे: हो, कोणताही जागतिक दिन विकिपीडियावर असावा मी पण याच मताचा आहे, पण तो खरंच मान्यताप्राप्त जागतिक दिन आहे कि नाही हे सुद्धा महत्वाचे आहे. इंटरनेटवर शोधले असता ह्या दिवसाची माहिती केवळ काही मराठी भाषेतील संकेतस्थळांवरच सापडली. पण जागतिक दृष्टी दिवसाची भरपूर माहिती सापडली, तर "राष्ट्रीय दृष्टिदान पंधरवडा" बद्दल (२५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर) भारत केंद्र सरकारच्या या संकेतस्थळावर माहिती भेटली. मलासुद्धा वाटते कि हा लेख काढलेला योग्य राहील. —usernamekiran (talk) ०९:१३, ३० जून २०२२ (IST)Reply[reply]
@Usernamekiran @संतोष गोरे नमस्कार, अलीकडे कामांच्या व्यापामुळे मी विकीपिडीयावर सक्रीय नाही. त्यामुळे या लेखात हवं तर नंतर भर घालतो.
पण माझं मत असं आहे की बरेच लोक भाषांतरित करून किंवा नक्कल करून लेख सुरू करून जातात. नंतर इतरांना ते लेख सुधारत बसावे लागते. आणि शक्यतो ते काम सहसा कोणी करत नाही. ते दर्जाहीन लेख तसेच राहतात. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे.
काही लोक नुसते एकापाठोपाठ एक लेख भाषांतर करून मराठी विकिपीडियावर आणतात खरं. पण त्या लेखाच्या इतिहासात भाषांतराचं एकच संपादन सोडून नवीन संपादन दिसतच नाही. याने होतं असं की, ते लेख तर कमी प्रतीचेच राहतात कायम, पण नवीन वाचकांना हे प्रकरण समजत नाही. त्यांनी असा लेख पाहिला तर ते इकडे पुन्हा वळत नाहीत. ते सरळ इंग्रजी विकिपीडियावर जातात. मीसुद्धा असे बरेच लेख पूर्वी पाहिले, सहसा इकडे येतच नव्हतो. शेवटी नवीन भर घालायला आणि असलेल्या लेखांत सुधारणा करायला इथं काम सुरू केले. पण काही लोक नुसती कामंच वाढवून ठेवत आहेत.
मी माझं मत प्रामाणिकपणे मांडलं आहे. कदाचित चुकत असेनही. कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही.

धन्यवाद. - अमर राऊत (चर्चा) ०९:४३, ३० जून २०२२ (IST)Reply[reply]

@अमर राऊत: नमस्कार, तुम्हाला माझ्या लेखासहित कोणत्याही लेखावर {{बदल}}, {{अशुद्धलेखन}} {{उल्लेखनीयता}} यासाहित इतर साचे लावायला काहीही हरकत नाही. राहिला प्रश्न एखाद्या विशिष्ट व्यक्तीने मोठ्या प्रमाणावर अशुद्ध लिखाण केले तर आपण त्यांना सौम्य भाषेत तसा संदेश द्यावा. मी स्वतः हे करत असतो, आज भलेही कुणी नाराज होवो, नंतर त्यांनी याचे महत्त्व लक्षात येतेच. असो, कृपया दिवसातून एकदा तरी एक फेरी मारत जाणे ही नम्र विनंती.
@Usernamekiran: एखादी चळवळ किंवा विधायक काम जर एक व्यक्ती करत असेल, जसे की 'राहीबाई पोपेरे' किंवा 'वनिता बोराडे' तरी त्याची दखल विकिपीडियावर घेतली जाते. अनेकदा शासनाला याचा विसर पडतो जर आपण डॉ प्रकाश आमटे चित्रपट पाहिला असेल तर त्यात तुम्हाला हे दिसले असेलच की, मॅगसेसे पुरस्कारासाठी विदेशात जाताना स्थानिक प्रशासन आणि अमेरिकन दूतावासाने त्यांची दखल घेतली नव्हती. सबब सरकारी संकेतस्थळावर काही कारणाने हा दिवस नोंदवला नसेल पण अनेक भारतीय उल्लेखनीय संकेतस्थळे या दिवसाची ग्वाही देत आहेत. तसेच एच व्ही देसाई हॉस्पिटल च्या या संकेतस्थळावर महाराष्ट्र शासनाने हा दिवस साजरा करण्याचे ठरावल्याचे दिसत आहे. सबब मोजकेच परंतु 'उल्लेखनीय दुवे' उपलब्ध असल्याने हा लेख दुरुस्त करून येथे राहुद्यावा असे माझे मत आहे.- संतोष गोरे ( 💬 ) १३:१९, ३० जून २०२२ (IST)Reply[reply]
@संतोष गोरे: मार्गदर्शनासाठी आभार. लोक नाराज होऊ नयेत म्हणून मी शक्यतो बोलायचं टाळतो. असो. पण तुम्ही म्हणालात तसं "सौम्यपणे संदेश द्यायचा" गुण नक्कीच तुमच्याकडून शिकण्यासारखा आहे. फक्त विकिपीडियावरच नाही, तर दैनंदिन जीवनातही हे फार उपयोगी आहे.
कामांमुळे सध्या फार व्यस्त आहे. लवकरच सक्रिय होईन. धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) २२:०५, १ जुलै २०२२ (IST)Reply[reply]

मोडके लेख[संपादन]

आपण जी संपादने करीत आहेत तसेच नवीन लेखांची निर्मिती, त्यात भर हे सर्व उत्तमच आहे. परंतु एक विनंती आहे आपण काही मोडके पुनर्निर्देशने तयार केली आहेत जसे निःशुल्क दूरचित्रवाणी सेवा तर ही पाने तयार करून नंतर इतर नवीन पानांची निर्मिती आणि भर करावी असे मला वाटते, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १७:०७, २१ जुलै २०२२ (IST)Reply[reply]

@Khirid Harshad: नमस्कार, एक खुलासा करू इच्छितो. मी जे नवीन लेख तयार करतो, त्यामध्ये मुद्दाम लाल दुवे तयार करतो, जेणेकरून तो लेख तयार करता यावा. त्यासाठी मी तयार केलेल्या लेखांच्या यादीमध्ये उलट्या क्रमाने येत जातो. उदाहरणार्थ, सध्या मी जे लेख तयार करतोय ते "हाथरस बलात्कार" पानावरचे लाल दुवे आहेत. ते झाले की पुढच्या लेखातील लाल दुव्यांची पाने तयार करणार.
यासोबतच दर महिन्याची किंवा दिवसांनुसार अत्याधिक वाचकसंख्या असलेल्या लेखांत दुरुस्ती करतो तसेच जास्तीत जास्त चित्रे जोडून लेख अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो.
त्यामुळे तुमची मोडक्या पानांबद्दलची चिंता मान्य आहे, परंतु हळूहळू ते काम करत असतो. आणि कधीकधी चुकुन एखादा दुवा राहतो. तिथे आपण स्वतः बदल करावेत ही नम्र विनंती, किंवा लक्षात तरी आणून द्यावे. तुमच्या सहकार्यासाठी आभार.
धन्यवाद. अमर राऊत (चर्चा) १७:१९, २१ जुलै २०२२ (IST)Reply[reply]
नमस्कार, हत्या या मोडक्या लेखाचे स्मरण. धन्यवाद! Khirid Harshad (चर्चा) २३:५७, १२ ऑगस्ट २०२२ (IST)Reply[reply]
@Khirid Harshad: Yes check.svg झाले. धन्यवाद! अमर राऊत (चर्चा) ००:२७, १३ ऑगस्ट २०२२ (IST)Reply[reply]

स्टेफानिया तुर्कविच[संपादन]

Hello Amar Raut, Thank you for creating this article. I have added Stefania's compositions to it, to help fill out the article. I have left the titles of each composition in Ukrainian and English, as she was a Ukrainian/British composer. Is this alright? Do you want to take a look at it when you get a chance? Thank you again for everything! Nicola Mitchell (चर्चा) २३:२८, ११ सप्टेंबर २०२२ (IST)Reply[reply]

धन्यवाद.[संपादन]

Rosetta Barnstar Hires.png रोसेत्तो बार्नस्टार
शिवाजी महाराजांच्या लेखावर करत असलेल्या योगदानाबद्दल!

-- Akshaypatill (चर्चा) ०७:०४, ३० सप्टेंबर २०२२ (IST)Reply[reply]

@Akshaypatill :
सन्मान केल्याबद्दल मी आपला आभारी आहे:)
-- अमर राऊत (चर्चा) १८:१५, ३० सप्टेंबर २०२२ (IST)Reply[reply]

विकिपीडिया आशियाई महिना २०२२[संपादन]

Wikipedia Asian Month 2022 Banner mr.svg

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

- संतोष गोरे ( 💬 ) २०:२५, ७ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now open[संपादन]

Dear Wikimedian,

We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.

We also have exciting updates about the Program and Scholarships.

The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.

For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.

‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.

Regards

MediaWiki message delivery (चर्चा) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)Reply[reply]

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadline[संपादन]

Dear Wikimedian,

Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.

COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.

Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call

Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)Reply[reply]

On Behalf of, WCI 2023 Core organizing team.

The Wikipedia Asian Month 2022 Barnstar[संपादन]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोर ची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल, पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत कोणत्याही मदतीसाठी, ज्युरी सदस्यांच्या संतोष गोरे किंवा Sandesh9822 यांच्या चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.