Jump to content

केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेसचा फलक
केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेसचा मार्ग

१२२१७/१२२१८ केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे तिरुवनंतपुरमच्या कोचुवेली रेल्वे स्थानक ते चंदीगढ स्थानकांदरम्यान धावते. तिरुवनंतपुरमला दिल्लीसोबत जोडणाऱ्या केरळ एक्सप्रेसला पर्याय म्हणून ही गाडी चालू करण्यात आली. केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस कोकण रेल्वेमार्गे धावते. संपर्क क्रांती शृंखलेमधील सर्वाधिक अंतर धावणारी ही गाडी तिरुवनंतपुरम व दिल्लीदरम्यानचे ३,०९१ किमी अंतर सुमारे ५४ तासांमध्ये पूर्ण करते.

थांबे

[संपादन]
क्रम स्थानक कोड नाव
1 CDG चंदीगढ
2 UMB अंबाला
3 NDLS नवी दिल्ली
4 NZM हजरत निजामुद्दीन
5 KOTA कोटा
6 BRC वडोदरा
7 PNVL पनवेल
8 MAO मडगांव
9 UD उडुपी
10 MAJN मंगळूर
11 KGQ कासारगोड
12 CAN कन्नूर
13 CLT कोळिकोड
14 SRR शोरणूर
15 TCR तृशुर
16 ERS एर्नाकुलम जंक्शन
17 ALLP अलेप्पी
18 KYJ कायमकुलम
19 QLN कोल्लम
20 KCVL कोचुवेली