मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेसचा फलक
मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेसचा मार्ग
मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. संपर्क क्रांती ह्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या जबलपूर रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील हजरत निजामुद्दीन स्थानकांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. पश्चिम मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या मध्य प्रदेश संपर्क क्रांती एक्सप्रेसला जबलपूर ते दिल्ली दरम्यानचे ९०९ किमी अंतर पार करायला १४ तास लागतात.
गाडी क्रमांक
|
मार्ग
|
प्रस्थान
|
आगमन
|
कधी
|
१२१२१ |
जबलपूर – हजरत निजामुद्दीन |
१९:१० |
०९:०५ |
रवि, बुध, शुक्र
|
१२१२२ |
हजरत निजामुद्दीन – जबलपूर |
१७:२५ |
०७:४५ |
सोम, गुरु, शनी
|